In this Article
- जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या १८ व्या आठवड्यात बाळांची वाढ
- जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरदोरपणाच्या १८ व्या आठवड्यात बाळाचा आकार केवढा असतो?
- जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या १८व्या आठवड्यातील सामान्य शारीरिक बदल
- जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या १८ व्या आठवड्यांतील लक्षणे
- जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – १८वा आठवडा – पोटाचा आकार
- जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – १८ वा आठवडा – अल्ट्रासाऊंड
- जुळ्या आणि एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या १८ व्या आठवड्यातील आहार
- जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाचा १८ वा आठवडा – काळजीविषयक टिप्स
- जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या १८ व्या आठवड्यात तुम्हाला काय खरेदी करण्याची आवश्यकता आहे?
गरोदरपणाच्या १८ व्या आठवड्यापर्यंत पोहोचणे कोणत्याही स्त्रीसाठी एक मैलाचा दगड पार करण्यासारखे आहे. जर तुम्ही जुळ्या बाळांसह गर्भवती असाल तर तुमच्या बाळांचा विकास झालेला असून आता फक्त त्यांची वाढ होण्याची वाट पाहायची असा विचार तुम्ही करीत असाल. परंतु ह्या आठवड्यात आणि पुढील काही आठवड्यात तुमच्या भुकेमध्ये तसेच शरीरात सुद्धा असंख्य बदल होतील. गरोदरपणाची काही लक्षणे किरकोळ प्रमाणात १८ व्या आठवड्यात पुन्हा जाणवू लागतील आणि काही विशिष्ट लक्षणे नव्याने जाणवू लागतील. तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या प्रवासात मध्यापर्यंत आलेला आहात आणि शक्य तितकी जास्तीत जास्त विश्रांती घेण्याचा सल्ला तुम्हाला दिला जातो. हा लेख तुम्हाला काही अत्यावश्यक माहितीसह मदत करेल. जुळ्या किंव एकाधिक बाळांसह गरोदर असणाऱ्या स्त्रीला माहिती असावी अशी गरोदरपणाच्या १८ व्या आठवड्याविषयी सर्व माहिती ह्या लेखामध्ये दिलेली आहे.
जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या १८ व्या आठवड्यात बाळांची वाढ
जुळी किंवा एकाधिक बाळे असली तरीही, आपल्या गर्भाशयात त्यांची वाढ नेहमीच्या वेगाने होते आणि काहीवेळा ती आधीपेक्षा जास्त होते. बाळाच्या पोटातील हालचालींवरून बाळाची वाढ वेगाने होते आहे हे समजते. बाळांचा पोटात होणारा गडबड गोंधळ वेगात होतो आणि तुमचे बाळ तुमचे लक्ष वेधून घेऊ लागते. पोटात फडफडल्यासारखी होणारी हालचाल हे बाळांची वाढ योग्य होत असल्याचे आणि बाळे दिवसेंदिवस बळकट होत असल्याचे चिन्ह आहे.
तुमच्या जुळ्या किंवा तिळ्या बाळांच्या शारीरिक विकासाच्या बाबतीत, एक महत्त्वाचा बदल घडून येतो तो म्हणजे त्यांच्या त्वचेच्या बाह्य पृष्ठभागावर बरेच तेल तयार होण्यास सुरवात होईल. हे तेल सेबम म्हणून ओळखले जाते आणि जेव्हा सेबेशियस ग्रंथी उत्तेजित होतात तेव्हा त्या जास्त प्रमाणात स्रवण्यास सुरुवात करतात. त्यासह, अशा असंख्य पेशी आहेत ज्या मागील त्वचेच्या जागी नवीन त्वचा पुनर्स्थित करण्याचे कार्य करतात. बाळाच्या त्वचेवर असणारा मऊ केसांचा थर(ज्याला इंग्रजीमध्ये लानुगो म्हणतात) तो गळून पडतो. पेशी, केस आणि तेलाचा स्राव एकत्र होतो आणि व्हर्निक्स नावाचा पदार्थ तयार होतो. पांढरा रंग आणि द्रवपदार्थ असल्यामुळे त्याची एक प्रकारच्या मलईदार चीजच्या रचनेशी तुलना केली जाऊ शकते. हे वेर्निक्स बाळांना संपूर्ण वेढून घेते आणि त्यांची त्वचा कोरडी होण्यापासून प्रतिबंधित करते. शिवाय, आपल्या लहान बाळांच्या शरीराचे तापमान देखील नियमित केले जाणे आवश्यक आहे आणि ते या आवरणांमुळे प्राप्त करणे शक्य होते.
याखेरीज, वेर्निक्सची एक महत्त्वपूर्ण भूमिका गरोदरपणाच्या शेवटी येते. प्रसूतीच्या वेळी जेव्हा बाळ बाहेर म्हणजेच जन्म कालव्यातून जात असतात तेव्हा त्यांना घर्षण आणि बाहेरच्या अचानक कमी तापमानाला सामोरे जावे लागते. जन्मकालव्यातून बाहेर पडण्यास मदत करण्यासाठी व्हर्निक्स वंगण म्हणून कार्य करते तसेच नर्सने बाळाला गुंडाळण्याआधी बाळे उबदार राहतात.
जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरदोरपणाच्या १८ व्या आठवड्यात बाळाचा आकार केवढा असतो?
एका बाळासह गर्भवती स्त्रीच्या लक्षात येईल की तिच्या बाळाची बरीच वाढ झालेली आहे. डोक्यापासून नितंबापर्यंत बाळाची लांबी सुमारे १३ सेंमी असते, तसेच बाळाचे वजन सुद्धा झपाट्याने वाढून १५० ग्रॅम्स इतके वाढते. तथापि तुम्ही जर जुळ्या किंवा तिळ्या बाळांसह गर्भवती असाल तर तुमची बाळे लहान असतील आणि त्यांचे वजन कमी असेल. बरीच बाळे आकाराने ढोबळी मिरची एवढी असतील.
गरोदरपणाच्या १८व्या आठवड्यात गर्भवती आईमध्ये परिवर्तन घडवून आणते. शारीरिक बदल, लक्षणे इ. जाणून घेण्यासाठी वाचा.
जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या १८व्या आठवड्यातील सामान्य शारीरिक बदल
गरोदरपणाच्या १८ व्या आठवड्यात स्त्रीच्या शरीरात होणारे बदल मागील आठवड्यात किंवा त्याहून खूप वेगळे नसतात. त्यापैकी बहुतेकांची तीव्रता कमी होते, तर इतर मजबूत होऊ शकतात.
१. रक्ताचे वाढलेले प्रमाण आणि प्रवाह
आईच्या शरीरावर प्रचंड शारीरिक तणाव आहे कारण गर्भाशयातील सर्व बाळांना तिच्या शरीराला आधार द्यावा लागतो. रक्त प्रवाह वाढविणे हा एक मार्ग आहे त्यासोबत शरीरातील रक्ताचे प्रमाण आणि रक्ताचे उत्पादन सुद्धा वाढते. परिणामी कदाचित आपले हृदय कार्य करत असेल, परंतु अशा परिस्थितीत आपला रक्तदाब नेहमीपेक्षा कमी असेल. यामुळे, कधीकधी चक्कर येण्याचा त्रास होऊ शकतो. तुम्ही अचानक स्थिती बदलली किंवा आसनावरून पटकन उभ्या राहिलात तर असेल होऊ शकते. एका कुशीवर होऊन थोडी विश्रांती घेतल्यास सामान्यतः गोष्टी व्यवस्थित होऊ शकतात.
२. हार्मोनल बदल
हार्मोनल बदल रहस्यमय मार्गाने आपल्या शरीराच्या विविध भागात परिणाम करतात. एखादा लहानसा क्षोभ म्हणून सुरु झालेल्या गोष्टीची या आठवड्यात पुनरावृत्ती होऊ शकते. उदा: कोरड्या डोळ्यांची समस्या. सर्व अस्थिर संप्रेरकांच्या पातळीमुळे डोळ्यातील अश्रूग्रंथींवर परिणाम होतो, त्यामुळे ते कोरडे पडतात. जेव्हा आपण रडता तेव्हा तुम्ही अश्रू पुसून घेण्यास टिश्यूचा वापर कराल परंतु तुमच्या डोळ्यांतील नेहमीचा ओलसरपणा ओसरेल. कधीकधी, आपल्या दृष्टीक्षेपात देखील बदल घडू शकतो, त्यामुळे तुमच्या नेहमीच्या चष्म्याचा उपयोग होत नाही हे तुम्हाला समजेल. कॉन्टॅक्ट लेन्स वापरकर्त्यांसाठी देखील ही समस्या येऊ शकते. आय ड्रॉप्सचा वापर करणे किंवा आपल्या डोळ्यांना विश्रांती देणे हा सर्वात चांगला पर्याय आहे.
३. योनीतून स्त्राव
आपल्या योनीतून सतत येणारा आणि वाढलेला स्त्राव तुम्हाला त्रासदायक वाटू शकतो. हा देखील रक्ताभिसरण आणि हार्मोनल चढउतारांच्या वाढीचा परिणाम आहे. तुमचे डोळे कोरडे पडण्यासाठी जे संप्रेरक कारणीभूत असते तेच संप्रेरक तुमच्या योनीमार्गातील स्त्राव वाढवण्यास कारणीभूत असते. हॉर्मोन्स शरीराच्या प्रत्येक भागावर कसा परिणाम करतात या विषयातील आपण तज्ञ नाही परंतु ही संप्रेरके खात्रीपूर्वक रहस्यमय मार्गाने कार्य करतात. असे असले तरी, डोळे कोरडे पडण्याच्या समस्येप्रमाणेच, हे काळजी करण्याचे कारण नाही कारण प्रसूतीनंतर स्त्राव कमी होतो.
जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या १८ व्या आठवड्यांतील लक्षणे
होय, तुमच्या गरोदरपणातील १८ वा आठवडा हा ह्या प्रवासातील आनंदाचा काळ आहे आणि दुसऱ्या तिमाहीतील एक चांगला टप्पा आहे. तरीही, वेदनेपासून मुक्त नाही आणि तुम्हाला ह्या परिस्थितीत शांत रहावे लागेल कारण जेव्हा तुम्ही शेवटी तुमच्या जुळ्या किंवा तिळ्या बाळांना तुमच्या हातात घ्याल तेव्हा हे सगळे तुम्ही विसरून जाल.
- १८ व्या आठवड्यात तुमच्या बाळांचा आकार वाढत जाईल. त्यांचे वजन देखील वाढेल. आपल्या शरीरावर विशेषत: मागच्या आणि खालच्या मागच्या भागावर वाढणारा ताण सहन करण्याशिवाय इतर कोणताही पर्याय नाही. जर तुम्ही पुरेशी विश्रांती घेतली नाही तर ही वेदना वेळोवेळी वाढेल. हलका व्यायाम आणि मालिश केल्यास ह्या वेदनेपासून मुक्त होण्यास मदत होईल.
- आपल्या शरीरास सूज देखील येईल. गरोदरपणात सूज येणे केवळ रक्तप्रवाह वाढल्यामुळे तसेच स्नायूंनी पाणी टिकवून ठेवण्याच्या प्रवृत्तीमुळे होते. हे सर्व द्रव शरीरातील वेगवेगळ्या भागात, विशेषत: हात आणि पायापर्यंत पोहोचतात. बऱ्याचदा, थोडासा व्यायाम आणि मालिश केल्याने सूज कमी होऊ शकते आणि थोडीशी अस्वस्थता राहू शकते परंतु ती सुद्धा प्रसूतीनंतर नाहीशी होईल. जर तुम्हाला व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास असेल तर कॉम्प्रेशन सॉक्स वापरल्यास फायदा होईल.
- ह्या आठवड्यात काही स्त्रियांमध्ये नाकातून रक्त येण्याची समस्या उद्भवते. त्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नाही कारण रक्ताभिसरण वाढीचा हा आणखी एक परिणाम आहे आणि शरीराच्या प्रत्येक भागावर तो होतो.
जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – १८वा आठवडा – पोटाचा आकार
तुमच्या बाळांची गर्भाशयात वेगाने वाढ होत असल्यामुळे गर्भाशयाचा आकार वाढतो तसेच नाभीखालील पोटाचा भाग लक्षणीयरीत्या वाढलेला दिसतो. तुमच्या पोटाचा आकार आता टरबूजाएवढा झालेला दिसतो. एका पेक्षा जास्त बाळांच्या वाढीमुळे पोट पुढे ढकलल्यासारखे दिसते. तुमच्या पोटाच्या खालच्या भागाला तुम्ही स्पर्श केलात तर तुम्हाला गर्भाशय सहज जाणवते.
जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – १८ वा आठवडा – अल्ट्रासाऊंड
जुळ्या किंवा एकाधिक बाळांची अपेक्षा करताना, गरोदरपणाच्या १८ व्या आठवड्यात अल्ट्रासाऊंड स्कॅन केल्याने तुम्हाला त्यांच्या वाढीबद्दल अधिक माहिती मिळू शकते. मुख्यतः, जर तुमच्या डॉक्टरांना जुळी बाळे वेगवेगळ्या गर्भजल पिशवीमध्ये आढळली तर सध्याचा स्कॅन तुम्हाला काहीतरी विलक्षण दर्शवेल. बाळांची सतत होणारी हालचाल बाळे वेगवेगळ्या दिशांना ताणली जात असल्याचे दर्शवते. ह्या व्यतिरिक्त, ह्या आठवड्यात बरीच बाळे जांभई देतात किंवा त्यांना अंगठा चोखायला आवडते.
जुळ्या आणि एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या १८ व्या आठवड्यातील आहार
निरोगी पदार्थ नियमित प्रमाणात खाल्ल्याने तुम्ही आणि तुमचे बाळ निरोगी राहतील. या आठवड्यात आपल्याला लोहाचे सेवन करणे आवश्यक आहे. भरपूर लोहयुक्त पदार्थ खा आणि आणि आपल्या गरोदरपणात भरपूर पाणी प्या.
जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाचा १८ वा आठवडा – काळजीविषयक टिप्स
स्वत: ची योग्य मार्गाने काळजी घेण्यासाठी आपणास काही विशेष करण्याची गरज नाही. परंतु येथे काही टिप्स दिलेल्या आहेत आणि त्या तुम्ही लक्षात ठेवण्याची गरज आहे.
हे करा
- आराम करण्यासाठी आणि शांत होण्यासाठी मसाज घ्या. आराम आणि शांततेसाठी अंघोळ करा.
- एका कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्या रक्तप्रवाहात अडथळा येणार नाही.
- पुरेसे पाणी पिऊन स्वत: ला हायड्रेटेड ठेवा.
काय टाळावे?
- आपल्या बाळाच्या आरोग्याबद्दल किंवा आपल्या स्वतःच्या आरोग्याबद्दल डॉक्टरांना काही प्रश्न विचारण्यास घाबरू नका.
- खूप जास्त प्रमाणात व्यायाम करू नका कारण त्यामुळे तुम्हाला थकवा येऊ शकतो.
जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या १८ व्या आठवड्यात तुम्हाला काय खरेदी करण्याची आवश्यकता आहे?
तुम्ही कुशीवर झोपताना तुमच्या डोक्याला चांगला आधार देणारी एखादी छानशी उशी खरेदी करा. तुमच्या गरोदरपणात जसजशी प्रगती होत जाते तसतसे झोपताना आपल्या पायादरम्यान ठेवण्यासाठी अतिरिक्त उशी विकत घ्यावी लागेल. तुम्हाला आरामदायक कपड्यांची आवश्यकता असल्यास तुम्ही स्वत: साठी खरेदी करण्यास जाऊ शकता. ह्या काळात झोपताना घालण्यासाठी चांगले गाऊन घालण्यासाठी ही चांगली वेळ आहे. तुमच्या बाळासाठी सुद्धा काही गोष्टी शोधून ठेवणे किंवा खरेदी करण्यासाठी ही वेळ चांगली आहे.
पहिल्या तिमाहीत होणार मळमळ आणि मॉर्निंग सिकनेसचा त्रास ह्या आठवड्यात होत नाही. गरोदरपणाचा १८ वा आठवडा हा बराच चांगला असतो आणि ह्या आठवड्यात विश्रांती सुद्धा मिळते. परंतु ह्याचा अर्थ तुम्ही ह्या कालावधीत खूप धावपळ करून थकून जावे असा होत नाही. जितकी जास्त विश्रांती घेता येईल तितकी घ्या. नियमित तपासणी करा. निरोगी आहार घ्या आणि तिसऱ्या तिमाहीसाठी स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार करा.
मागील आठवडा: जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – १७ वा आठवडा
पुढील आठवडा: जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – १९ वा आठवडा