Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण जुळी आणि एकाधिक मुले जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – १५ वा आठवडा

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – १५ वा आठवडा

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – १५ वा आठवडा

In this Article

जुळ्या बाळांसह १५ आठवड्यांच्या गरोदर असलेल्या माता आयुष्यातील एका वेगळ्या टप्प्यावर असतात. एकीकडे, पोटातील बाळांसह सुरक्षितपणे इथपर्यंतचा टप्पा यशस्वीरितीने पार पाडल्याबद्दल तुम्हाला आनंद होत असेल आणि पुढचे काही महिने बाळांसोबत घालवण्याची तुम्ही वाट पहात असाल तर दुसरीकडे तुम्ही बाळांच्या वाढीवर आणि विकासावर लक्ष केंद्रित केल्यामुळे अनावश्यकपणे ताणतणाव निर्माण होऊ शकतात. गरोदरपणाच्या १५ व्या आठवड्यात मळमळ आणि थकवा कमी होतो, ज्याच्यावर मात करणे आधी कठीण होते. म्हणून ह्या काळाचा चांगला उपयोग करून घ्या कारण गरोदरपणाचा अंतिम टप्पा थोडा कठीण वाटू शकतो.

१५ व्या आठवड्यात बाळांची वाढ

मागील आठवड्याप्रमाणेच, ह्या आठवड्यात सुद्धा तुमच्या बाळांची वाढ आणि प्रगती वेगाने सुरू होते आणि वजन व लांबीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते.

जेव्हा कान आणि डोळे विकसित होतात तेव्हा ते अनुक्रमे बाळाच्या मानेच्या दोन्ही बाजूस आणि चेहऱ्याच्या दोन्ही बाजूस असतात. १५ व्या आठवड्यात, कानांचा विकास अंतिम टप्प्यात येतो आणि ते मानेच्या दोन्ही बाजूंकडून डोक्याच्या दोन्ही बाजूला स्थित होतात. डोळे सुद्धा चेहऱ्यावर योग्य ठिकाणी येतात आणि बाळ जन्मल्यावर कसे दिसू शकते ह्याविषयी तुम्हाला थोडी कल्पना येऊ शकते.

स्वतःला  तंदुरुस्त ठेवण्यासाठी फक्त तुम्ही एकट्याच व्यायाम करत नाही आहात तर तुमच्या लहान बाळाची सुद्धा तुमच्या गर्भात त्याविषयीची योजना सुरु आहे. बाळाच्या जवळ्जवळ सर्व अवयवांना क्रियाकलाप मिळण्यास सुरुवात झालेली आहे आणि मेंदू त्यांची चाचणी अनेक मार्गानी करतो.

गरोदरपणाच्या १५व्या आठवड्यात बाळांबद्दल लक्षात घेण्याजोगी एक मनोरंजक बाब म्हणजे त्यांच्या डोळ्यांना आता त्यांच्या आजूबाजूला असलेला प्रकाश समजू लागतो. निश्चितच, त्यांचे डोळे पापण्यांनी पूर्णपणे झाकून ठेवले आहेत आणि गर्भाशयात कुठलाही प्रकाश नसतो, परंतु प्रकाश आहे समजण्याची क्षमता बाळांमध्ये विकसित होते . बाळाची श्वासोच्छवासाची आणि नाकाद्वारे गर्भजल आत घेण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. हा द्रव आतमध्ये पोहोचतो आणि श्वासाद्वारे हवा आत घेण्यासाठी फुप्फुसांचा विकास करण्यास मदत करतो.

१५ व्या आठवड्यात बाळांचा आकार

जुळी आणि एकाधिक बाळे नेहमीच गर्भाशयात वाढणाऱ्या एका बाळापेक्षा आकाराने लहान असतात. गरोदरपणाच्या १५ व्या आठवड्यात बाळाचे वजन हे ४०-५० ग्रॅम्सच्या आसपास असते आणि बाळाची लांबीही ९ -१० सेमी च्या आसपास असते. एकाधिक बाळे असतील तर ही मापे कमी असतील परंतु त्यांचा आकार एकूणात ताज्या संत्र्याइतका मोठा असेल.

१५ व्या आठवड्यात बाळांचा आकार

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या १५ व्या आठवड्यातील सामान्य शारीरिक बदल

इतर गर्भवती महिलांच्या तुलनेत आपण गर्भवती दिसत नाही असे आपल्याला वाटत असल्यास काळजी करू नका. गरोदरपणाच्या १५ व्या आठवड्यापर्यंत, पुष्कळ लोकांच्या लक्षात येईल इतपत तुमचे पोट स्पष्ट दिसू लागेल.

  • हे एक ज्ञात सत्य आहे की गर्भवती महिलेच्या शरीरात गरोदरपणात असंख्य बदल होतात. परंतु बरेच प्रभाव दीर्घकाळासाठी राहतात.आपल्या भविष्यातील आयुष्याबद्दल आणि आपल्या बाळाच्या सुरक्षिततेविषयीचे विचार येणे, रात्री अनेकदा लघवीसाठी उठावे लागणे आणि पायात पेटके येणे ह्यामुळे रात्री योग्य झोप मिळणे अवघड होते  आणि बर्‍याच गर्भवती स्त्रिया झोपेपासून वंचित होताना दिसतात आणि त्यामुळे निद्रानाशाचा धोका उद्भवतो. विश्रांती मिळत नसल्याने ही गर्भावस्था तुमच्यासाठी एक कठीण प्रवास बनू शकते.
  • शरीरात वाढलेला रक्त प्रवाह नाकाकडील भागात सुद्धा पोहोचतो. यामुळे तुमचे नाक चोंदले जाते तसेच नाकातील श्लेष्मा वाढल्यामुळे नाकात अडथळा निर्माण होऊ शकतो. म्हणून तुम्ही रात्री घरातील घोरणाऱ्या सदस्यांपैकी एक व्हाल. तुमच्या पतीसाठी हे थोडेसे अस्वस्थ होऊ शकते परंतु घोरणे हे काही काळजीचे कारण नाही.
  • पोट थोडेसे दुखणे या आठवड्यात देखील सुरू राहू शकेलआणि ते अस्थिबंधन-आधारित वेदनांचे चिन्ह आहे. सतत वाढणाऱ्या गर्भाशयामुळे तुमचे स्नायू आतून ताणले जाऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला कोणतेही स्ट्रेचिंग करणे अवघड होते. पोटाच्या खालच्या भागावर मुख्यतः परिणाम होतो आणि त्यामुळे काही अंशी अस्वस्थता येऊ शकते परंतु ते कोणत्याही गंभीर स्थितीचे सूचक नाही.
  • पहिल्या तिमाहीमध्ये तुमचे स्तन संवेदनशील आणि कोमल बनतात त्यामुळे त्यांना थोडा जरी धक्का लागला तरी वेदना होऊ शकतात. तथापि स्तनांचा आकार वाढतच राहील आणि स्तनाग्रांभोवतीचा भाग गडद होईल. सुजलेल्या स्तनांभोवतील काही रक्तवाहिन्यांचे जाळे सुद्धा दिसू शकेल.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या १५ व्या आठवड्यातील सामान्य शारीरिक बदल

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या १५ व्या आठवड्यातील लक्षणे

आपल्या गर्भात जुळी किंवा एकाधिक बाळे बाळगणे आपल्या शरीरासाठी सोपे काम नाही. जरी तुम्ही १५ व्या आठवड्यातील लक्षणे हाताळण्यासाठी चांगल्या स्थितीत असलात तरी काही लक्षणे खूप तीव्र असतील.

  • संप्रेरकांमधील वाढलेल्या पातळीमुळे तुमचे पचनसंस्थेचे स्नायू शिथिल होतात आणि त्यामुळे पोट आणि अन्ननलिका ह्यांच्या मधील झडप तिचे कार्य व्यवस्थितपणे करू शकत नाही. तुम्हाला अशावेळी गॅसचा त्रास होऊ शकतो आणि रात्री जळजळ होऊ शकते. तुम्ही आहारावर नियंत्रण ठेवून सुद्धा त्रास झाला तर तुमचे डॉक्टर तुम्हाला ह्या बाबतीत मदत करू शकतात.
  • बाळाच्या वाढत्या गरजा भागवण्यासाठी रक्ताचे आणि रक्तवाहिन्यांचे प्रमाण वाढते. त्यामुळे अप्रत्यक्षपणे तुमचा रक्तदाब वाढू शकतो. तुमच्या नाकाजवळील भागात रक्तप्रवाह वाढल्यामुळे नाकातून रक्त येऊ शकते. तुमच्या हिरड्यांमधून सुद्धा कधी कधी रक्त येऊ शकते कारण त्या अधिक संवेदनशील बनलेल्या आहेत. तुमच्या तोंडातील जिवाणूंशी त्यांची प्रक्रिया होऊन हिरड्यांची समस्या (Gingivitis) उद्भवू शकते. परंतु त्यामुळे तुम्हाला कुठल्याही वेदना होत नाहीत परंतु त्यावर लगेच उपचार करणे जरुरीचे आहे. दात व्यवस्थतीत घासल्यास त्यास प्रतिबंध घालता येऊ शकतो.
  • तुम्ही आधी करत असलेल्या व्यायामाचा अभाव आणि गर्भाशयाचा वाढलेला आकार ह्यामुळे तुम्ही थोडे काम केले तरी तुम्हाला दम लागू शकतो. तुमच्या पतीसोबत लैंगिक संबंधांच्या वेळी ते अधिक जाणवू शकते. पण त्यासाठी तुमची लैंगिक इच्छा दाबून ठेवण्याची गरज नाही. लैंगिक संबंधांच्या वेळेला योग्य स्थिती घेतल्यास ती क्रिया सोपी आणि आनंददायी होऊ शकते.

व्हॅनिशिंग ट्वीन सिंड्रोम

हे नाव जितके भीतीदायक आहे तितकीच ही स्थिती आहे. एकाधिक बाळांसह गरोदर असलेल्या २० टक्के स्त्रियांमध्ये ती आढळते. जुळ्या किंवा तिळ्या बाळांच्या बाबतीत असे होऊ शकते. ह्या सिंड्रोम मध्ये गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात एकाधिक बाळे असल्याचे निदर्शनास येते आणि १५ आठवडे पूर्ण होण्याच्या आसपास एक बाळ अदृश्य होते आणि अल्ट्रासाऊंड मध्ये दिसेनासे होते. त्यामुळे बाळामध्ये किंवा गर्भवती स्त्रीमध्ये गुंतागुंत निर्माण होते. गरोदरपणाचा कालावधी पूर्ण केला जातो परंतु पालकांना ह्यामुळे थोडी निराशा येऊ शकते.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – १५ वा आठवडा – पोटाचा आकार

पोटाचा आकार स्त्रियांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे बदलतो. जुळ्या मुलांच्या तुलनेत तिळे असलेल्या गर्भवती मतांचे पोट लहान असू शकते. तथापि, आपल्या लहान बाळांच्या आरोग्याची तुलना करण्याचे हे एक साधन असू नये. बहुतेकवेळा पोटाचा आकार गोल वाढतो परंतु कंबरेकडील भाग तितकासा वाढत नाही.

१५ व्या आठवड्यानंतर पोटाची वेगाने वाढ होते आणि बदल अगदी स्पष्टपणे दिसून येतात. पोटावरील  गडद रेषा देखील अधिक स्पष्ट होऊ  लागते.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – १५ वा आठवडा – अल्ट्रासाऊंड

तुमच्यामध्ये किंवा बाळामध्ये गरोदरपणाच्या पुढच्या कालावधीत काही वैद्यकीय समस्या तर उद्भवणार नाहीत ना हे जाणून घेण्यासाठी गरोदरपणाच्या १५ व्या आठवड्यात अल्ट्रासाऊंड केले जाते. जनुकीय समस्या असतील तर त्याचे निदान ह्या कालावधीत होते परंतु त्याही पेक्षा आनांदाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या पोटातील बाळांची हालचाल ह्या अल्ट्रासाऊंड दरम्यान पाहू शकणार आहात.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या १५ व्या आठवड्यातील आहार

१५ व्या आठवड्यातही पौष्टिकतेला महत्त्व असते. फळे, दुग्धजन्य पदार्थ, तृणधान्ये, अंडी आणि समृद्ध हिरव्या पालेभाज्यांना न चुकता आहारात समाविष्ट करावे लागेल. व्हिटॅमिन ई समृद्ध असलेल्या उत्पादनांची निवड करा कारण नाळेला आवश्यक असणारी शक्ती देण्यात ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. योग्य प्रमाणात ते मिळविण्यासाठी काजू आणि बियाणे किंवा पूरक आहाराचा वापर केला जाऊ शकतो.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या १५ व्या आठवड्यातील आहार

गरोदरपणातील काळजीविषयक टिप्स

स्वतःची चांगली काळजी घेणे खूप क्लिष्ट नसते. येथे काही टिप्स दिल्या आहेत त्या स्वत: ला सुरक्षित ठेवण्यासाठी पुरेशा असू शकतात.

हे करा

  • आपल्या अल्ट्रासाऊंड दरम्यान कोणत्या वैद्यकीय चाचण्या केल्या पाहिजेत याची नोंद ठेवण्यास विसरू नका.
  • आपल्या बाळासोबत संवादात व्यस्त रहा आणि प्रत्येक बाळासोबत बंध निर्माण करण्यास सुरुवात करा.

काय टाळावे?

  • तीव्र परिश्रम करणे टाळा.परिश्रम केल्यास निद्रानाशाच्या समस्येत आणखी वाढ होऊ शकते.
  • चिंता करू नका. आराम करा आणि सुखदायक संगीत ऐका.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या १५ व्या आठवड्यात आपल्याला काय खरेदी करण्याची आवश्यकता आहे?

तुम्हाला लागणारे मॅटर्निटी गाऊन्स खरेदी करणे ही उत्कृष्ट शॉपिंग थेरपी असू शकते. सेंद्रिय फळे खरेदी करण्यासाठी सुपरमार्केटची सहल आपल्या आरोग्यास देखील मदत करेल.

जेव्हा तुम्ही जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गर्भवती असाल तेव्हा काळजी घेणे आवश्यक आहे.  त्यासाठी फक्त शांत मन आणि आपले शरीर आपल्याला ज्या प्रवासाने घेऊन जात आहे त्यावर विश्वास असणे आवश्यक आहे. ह्या प्रवासात तुम्ही एकट्या नसून तुमची बाळे सुद्धा तुमच्या सोबत आहेत हे लक्षात ठेवा.

मागील आठवडा: जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – १४ वा आठवडा
पुढील आठवडा: जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – १६ वा आठवडा

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article