Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण आहार आणि पोषण गरोदर असताना पिण्यासाठी ८ पोषक फळांचे रस

गरोदर असताना पिण्यासाठी ८ पोषक फळांचे रस

गरोदर असताना पिण्यासाठी ८ पोषक फळांचे रस

गर्भधारणा झाल्याचा क्षण हा स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात आनंददायी क्षणांपैकी एक आहे. गरोदरपणाच्या टप्प्यावर तिने बाळाच्या पोषणाची तसेच स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. गरोदर स्त्रीने मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे महत्त्वाचे आहे. आरोग्यविषयक गुंतागुंत टाळण्यासाठी कोणत्या प्रकारचे अन्नपदार्थ खावेत हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. फळांचे रस पिणे हे तुमच्या गरोदरपणाच्या आहारात एक उत्तम जोड असू शकते.  आम्ही गरोदरपणासाठी उत्तम असलेल्या फळांची यादी इथे दिलेली आहे. चला तर मग त्याआधी, गरोदरपणात फळांचे रस पिणे महत्त्वाचे का आहे ते जाणून घेऊया.

गरोदरपणात ज्यूस का प्यावे?

गरोदर स्त्रिया काहीही किंवा सर्वकाही खाऊ शकत नाहीत हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. खरं तर, गरोदरपणात असंख्य निर्बंध असतात. जर आपण सर्वोत्तम उर्जा स्त्रोतांपैकी बोलतो आहोत तर ताज्या फळांच्या ज्युसचा आहारात समावेश केला पाहिजे. ताज्या फळांच्या रसांची शिफारस केली जाते कारण त्यामुळे बाळाचे आणि आईचे आरोग्य चांगले राहते आणि पोषण मिळते. ताज्या फळांच्या ज्यूसमुळे चेहऱ्यावर चमक देखील येते.

गरोदरपणात आपण प्यावेत असे फळांचे ज्यूस

येथे आम्ही 8 फळांच्या ज्यूसची यादी आहे. ह्या फळांच्या ज्यूसचे गरोदरपणात सेवन केले पाहिजे

1. स्ट्रॉबेरी ज्यूस

स्ट्रॉबेरी ज्यूस

गर्भवती स्त्रियांसाठी शिफारस केलेल्या सर्वोत्तम फळांच्या रसांपैकी हा एक आहे.

फायदे:

स्ट्रॉबेरीमध्ये अँटिऑक्सिडंट असतात. ते शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्यास मदत करतात. त्वचेची नैसर्गिक चमक टिकवून ठेवण्यासाठी अँटिऑक्सिडंट फायदेशीर असतात. याव्यतिरिक्त, त्यामध्ये फोलेट्स देखील असतात, आणि ते बाळाची रोगप्रतिकारक शक्ती विकसित करण्यास मदत करतात

कृती:

स्ट्रॉबेरी थंड पाण्याने स्वच्छ धुवा आणि चिरून घ्या. तुम्हाला गुळगुळीत प्युरी मिळेपर्यंत सर्व चिरलेल्या बेरी मिक्सर मध्ये फिरवून घ्या. तुम्ही यामध्ये बर्फाचे तुकडे टाकू शकता आणि आनंद घेऊ शकता.

2. बीटरूट ज्यूस

गरोदरपणात पिण्यासाठी हा एक उत्तम ज्यूस आहे, कारण त्यामध्ये अ जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर बीटरूट ज्यूस घेणे हा उत्तम उपाय आहे.

फायदे:

हा ज्यूस ऊर्जेची पातळी वाढवण्यास मदत करतो. बीटरूटमध्ये असलेले लोह ऍनिमिया पासून बचाव करते. हा रस तुमच्या नियमित दिनचर्येत नाश्त्याला पूरक म्हणून जोडला जाऊ शकतो.

कृती:

बीटरूटचे तुकडे करा आणि ब्लेंडरमध्ये घाला. एकजीव झाल्यावर त्यात थोडा बर्फ घाला आणि झटपट सर्व्ह करा. ही सर्वात सोपी पाककृती आहे.

3. डाळिंबाचा ज्यूस

ह्या अष्टपैलू ज्यूसचा निश्चितपणे तुमच्या गरोदरपणाच्या आहारात समावेश करायला हवा, कारण यामुळे मिळणारे फायदे खालीलप्रमाणे

फायदे:

डाळिंबाच्या रसामध्ये जास्त प्रमाणात फायबर, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के असते. त्यामुळे बद्धकोष्ठता टाळण्यास मदत होते. गरोदरपणात बद्धकोष्ठता होणे खूप सामान्य असते आणि तुमच्या शरीरात जास्त लोह शोषून घेण्यास मदत होते. डाळिंबाचा रस घेतल्यास तुम्हाला हायड्रेटेड राहण्यास मदत होते आणि बाळाच्या मानसिक विकासासाठी मदत होते.

कृती:

डाळिंबाचे दाणे काढून ब्लेंडरमध्ये ठेवा. चांगले बारीक होईपर्यंत ब्लेंडरमध्ये फिरवून घ्या आणि गाळून घ्या. बर्फाचे तुकडे घाला आणि ज्यूसचा आनंद घ्या.

4. पेरूचा ज्यूस

पेरू व्हिटॅमिन सी चा एक चांगला स्रोत आहे, पेरूच्या ज्यूसचे गरोदरपणात सेवन करणे चांगले.

फायदे:

पेरूच्या ज्यूसमुळे रक्तदाब आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे ऍनिमिया देखील कमी होतो,  हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते. हा ज्यूस एस्कॉर्बिक ऍसिड किंवा व्हिटॅमिन सी ने समृद्ध आहे आणि आईची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत होते.

कृती:

पेरू पाण्यात उकडून घ्या आणि थंड होऊ द्या. पेरू नीट मिक्सरमधून काढून घ्या. चवीसाठी तुम्ही आले किंवा लिंबाचा रस घालू शकता. बर्फाचे तुकडे घालून सर्व्ह करा.

5. गाजर रस

गाजर रस

सर्व भाज्यांपैकी एक उत्तम पौष्टिक मूल्ये म्हणून ओळखले जाणारे, गाजराच्या  ज्यूसचे गरोदरपणात अनेक फायदे आहेत.

फायदे:

गाजरात भरपूर कॅल्शियम असते आणि ते बाळाची हाडे आणि दातांच्या विकासात मदत करते .हा ज्यूस व्हिटॅमिन सी, ए आणि बीटा-कॅरोटीनचा एक चांगला स्रोत आहे, आणि ते अँटिऑक्सिडेंट म्हणून कार्य करते आणि आईला मुक्त रॅडिकल्सपासून वाचवते. गाजरामध्ये असलेले फायटोकेमिकल्स शरीराच्या योग्य कार्यांना चालना देण्यासाठी मदत करतात.

कृती:

गाजर व्यवस्थित स्वच्छ करा, त्यांचे लहान तुकडे करा आणि ज्युसरमध्ये घाला. गाजर नीट बारीक झाले की, रस एका भांड्यात टाकून सर्व्ह करा.

6. संत्र्याचा रस

संत्र्याच्या रसामध्ये भरपूर व्हिटॅमिन सी आणि फोलेट्स असतात. संत्र्यामध्ये लोह आणि जस्त देखील असतात आणि ते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी महत्वाचे आहेत.

फायदे:

संशोधनानुसार, संत्र्याचा रस लहान मुलांमध्ये होणार्‍या कोणत्याही एलर्जीच्या आजाराचा धोका कमी करण्यास मदत करतो. हा ज्यूस नवीन ऊतक आणि लाल रक्तपेशींच्या निर्मितीस मदत करतो. गर्भवती स्त्रियांमध्ये प्लेसेंटा विकसित करण्यात देखील  हा ज्यूस महत्वाची भूमिका बजावतो.

कृती:

संत्री सोलून मिक्सरमध्ये फिरवून घ्या. पिण्याआधी मिश्रण गाळून घ्या.

7. लिंबाचा रस

लिंबाचा रस

व्हिटॅमिन सीचा एक उत्तम स्रोत आहे आणि त्यात शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स असतात

फायदे:

गरोदरपणात  उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. हा ज्यूस गरोदरपणात आतड्याची हालचाल देखील नियंत्रित करतो आणि गरोदरपणात अपचन आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी देखील ओळखला जातो.

कृती:

हा ज्यूस तयार करण्यास देखील सोपा आहे. फक्त दोन लिंबू घ्या, एक ग्लास पाण्यामध्ये पिळून घ्या आणि आपल्या आवडीनुसार मीठ किंवा साखर घाला. तुमचा लिंबाचा रस तयार आहे.

8. सफरचंद रस

सफरचंद पोषक आणि खनिजांनी परिपूर्ण असतात. सफरचंदाचा रस हा गरोदरपणात  डॉक्टरांनी शिफारस केलेल्या सर्वोत्तम रसांपैकी एक आहे.

फायदे:

सफरचंदाचा रस गरोदरपणात वाढलेले वजन कमी ठेवू शकतो आणि तुमच्या बाळाच्या मेंदूच्या विकासातही मदत करतो.  रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि झोपेच्या विकारांना प्रतिबंध करण्यासाठी देखील हा ज्यूस मदत करतो. हा ज्यूस लोहाचा चांगला स्रोत आहे. सफरचंदामुळे गरोदरपणातील  अशक्तपणा टाळला जाऊ शकतो.

कृती:

दोन किंवा तीन सफरचंद घ्या आणि साल काढून टाका. सफरचंद उकडून घ्या आणि थंड होऊ द्या. थंड झाल्यावर साधारण एक मिनिट ब्लेंडरमध्ये फिरवून घ्या. एका ग्लासमध्ये रस घाला आणि चव वाढवण्यासाठी लिंबाचा रस घाला.

गरोदरपणात टाळायची फळे

खाली दिलेली काही फळे संपूर्णपणे खाणे किंवा त्याचा ज्यूस करून पिणे गरोदरपणात पूर्णपणे टाळले पाहिजे.

1. पपई

पपईमुळे तुमच्या शरीराचे तापमान वाढते, परिणामी गरोदरपणात गुंतागुंत निर्माण होऊ शकते आणि गर्भपात देखील होतो.

2. अननस

अननसामध्ये ब्रोमेलेन असते. ते एकप्रकारचे एन्झाइम आहे. ह्यामुळे गर्भाशयाचे आकुंचन होऊन गर्भपात होण्याची शक्यता असते.

3. द्राक्षे

द्राक्षे

द्राक्षांमध्ये रेझवेराटोल नावाचे एक संयुग असते आणि गर्भवती महिलांसाठी ते विषारी असू शकते आणि त्यांची पचनसंस्था कमकुवत करू शकते.

गरोदरपणात योग्य प्रमाणात फळांचे ज्यूस घेतल्यास तुम्हाला अत्यावश्यक खनिजे आणि जीवनसत्त्वे मिळू शकतात आणि तुम्ही हायड्रेटेड राहता. लक्षात ठेवा की तुम्ही गरोदर असताना फक्त फळांचे रस घेऊन उपास करू नका. तुम्हाला आणि तुमच्या बाळाला जास्तीत जास्त फायद्यासाठी हे हेल्दी ज्यूस गरोदरपणाच्या आहाराचा भाग असले पाहिजेत.

आणखी वाचा:

गरोदर असताना नारळपाणी पिणे
गरोदरपणात लिंबू पाणी पिणे – सुरक्षितता, फायदे आणि दुष्परिणाम

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article