Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home अन्य गणेश चतुर्थी २०२३: तुम्ही करून पहिले पाहिजेत असे मोदकांचे ७ वेगवेगळे प्रकार

गणेश चतुर्थी २०२३: तुम्ही करून पहिले पाहिजेत असे मोदकांचे ७ वेगवेगळे प्रकार

गणेश चतुर्थी २०२३: तुम्ही करून पहिले पाहिजेत असे मोदकांचे ७ वेगवेगळे प्रकार

सणासुदीचे दिवस सुरु झाले आहेत म्हणजेच ताव मारण्यासाठी बरीच मिठाई असणार आहे. जर तुम्हीही श्री गणेशभक्त असाल तर गणेश चतुर्थीला मोदकांचे विविध प्रकार करून आपल्या लाडक्या बाप्पाला कसे प्रसन्न करता येईल हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. वर्षाच्या शेवटाकडे जात असताना साजरे करण्यासाठी अनेक सण, उत्सव असतात. ऑगस्ट आणि सप्टेंबर हा उत्सवांचा हंगाम आपला हृदय, आत्मा आनंदमय करतो तसेच आपली गोड खाण्याची इच्छा सुद्धा पूर्ण होते. प्रसाद म्हणून गणेशोत्सवात मोदकाच्या विविध प्रकारांचा विचार करीत आहात ना. बरं, आम्ही तुमच्याबरोबर काही स्वादिष्ट मोदक रेसिपी शेअर करणार आहोत जे तुम्ही १० दिवसांच्या गणेशोत्सवात बनवू शकता. पण वेगवेगळ्या प्रकारांचे मोदक कसे बनवायचे हे सांगण्यापूर्वी आधी बाप्पाला मोदक का आवडतात हे जाणून घेऊयात.

गणपतीला मोदक आवडण्यामागे कारण आहे. पौराणिक कथेनुसार, जेव्हा श्रीगणेश श्रीशंकरांच्या दर्शनासाठी आले, तेव्हा पार्वती देवीने त्यांना दिव्य मोदक दिला. हा मोदक खूपच खास होता कारण जो हा मोदक खाईल तो शास्त्र, लेखन आणि कला या सर्व शास्त्रांमध्ये ज्ञात होईल असा होता. आख्यायिकेत म्हटल्याप्रमाणे भक्तीचा खरा अर्थ विचारला असता भगवान गणेशाने पालकांबद्दलची भक्ती व्यक्त केली होती. आपल्या उत्तरावर प्रभावित होऊन पार्वतीने गणेशाला हा खास मोदक दिला होता आणि पहिल्यांदाच बाप्पा ह्या गोड मोदकाच्या प्रेमात पडले होते.

घरी करून बघण्यासाठी ७ मधुर मोदक पाककृती

एकाच प्रकारचे मोदक करण्याऐवजी आम्ही इथे ७ प्रकारच्या मोदकांची पाककृती देत आहोत आणि ते करणे सुद्धा खूप सोपे आहे, आणि गणपती बाप्पाला ते आवडतील सुद्धा!

. उकडीचे/वाफवलेले मोदक

गणरायासाठी पारंपारिक महाराष्ट्रीय प्रसाद, म्हणजेच उकडीचे मोदक! उत्सवाच्या काळात हा नारळ आणि गूळ भरुन केलेला पदार्थ प्रत्येकाच्या आवडीचा असतो. तो केवळ दिसायला सुंदर नसतो तर चवदार देखील असतो. होय, उकडीचे मोदक अगदी परफेक्ट जमण्याची कला अवगत होण्यासाठी काही चाचण्या घ्याव्या लागतात, परंतु आम्हाला खात्री आहे की उकडीच्या मोदकांच्या सोप्या कृतीमुळे ते करणे बरेच सोपे होईल!

उकडीचे/वाफवलेले मोदक

साहित्य:

 • तांदळाचे पीठ २ कप
 • गूळ (किसलेला) – /२ कप
 • नारळ (किसलेला) – २ कप
 • वेलची पूड /२ टीस्पून १ टिस्पून
 • मळण्यासाठी आणि मोल्ड्सना लावण्यासाठी तूप
 • पाणी २ कप

कृती:

 • एका खोल पॅनमध्ये पाणी उकळण्यास ठेवा
 • एका भांड्यात तांदळाचे पीठ घ्या आणि हळूहळू त्यात उकळलेले पाणी घाला आणि मऊ पीठ मळून घ्या
 • झाकण ठेवून बाजूला ठेवा
 • आता सारणाची तयारी करा. त्यासाठी नॉनस्टिक पॅनमध्ये गूळ २ मिनिटे किंवा तो पूर्णपणे वितळत नाही तोपर्यंत मंद आचेवर गरम करा
 • त्यात किसलेले खोबरे आणि वेलची पूड घाला आणि चांगले मिक्स करा
 • वरील मिश्रण मंद आचेवर ५ मिनिटे किंवा पाण्याचे बाष्पीभवन होईपर्यंत शिजवा. एकदा झालं की, ज्योत बंद करा आणि थंड होऊ द्या
 • पुन्हा कणिक मळून घ्या आणि त्यामधून लहान गोळे बनवा
 • एक गोळा घ्या आणि त्याचा पुरीसारखा आकार करा. मध्यभागी एक चमचा सारण ठेवा. वर्तुळाभोवती तुमच्या बोटाने थोडे दूध लावा आणि वरुन सील करा. जास्तीचे पीठ काढून टाका बाजूला ठेवा
 • त्याचप्रमाणे आणखी मोदक बनवा
 • आता तयार केलेल्या मोदकांना वाफवण्याकरिता, २ कप पाणी उकळून घ्या. दरम्यान एखादी झाकणी किवा चाळणीवर थोडे तूप घालून त्यात मोदक ठेवा
 • सुमारे १० मिनिटे हे मोदक वाफवून घ्या
 • थंड होऊ द्या, मग प्रसाद ठेवा आणि सर्व्ह करा

. चॉकलेट मोदक

हा गोड पदार्थ करण्यासाठी तुम्हाला खूप काही करण्याची गरज नाही. त्याऐवजी, तुम्ही तुमच्या सोयीनुसार ही सोपी चॉकलेट मोदक कृती करून पहा. केवळ लहान मुलांमध्येच नाही तर प्रौढांमध्ये सुद्धा हे मोदक प्रसिद्ध आहेत. घरगुती चॉकलेट मोदकांचा एक बॉक्स गणेशोत्सव भेट देखील देऊ शकतो! गणेश चतुर्थीसाठी अशा आणखी सर्जनशील भेट कल्पना पहा!चॉकलेट मोदक

साहित्य:

 • गडद चॉकलेटचे एक बार (किसलेले) – १ कप
 • खवा (किसलेला) – २ कप
 • साखर १ कप
 • वेलची पूड /२ टीस्पून
 • दालचिनी पावडर /२ चमचा
 • साच्यांना लावण्यासाठी तूप
 • बारीक चिरून बदाम /४ कप

कृती:

 • कढई मंद आचेवर गरम करून त्यात किसलेला खवा घाला
 • खवा वितळण्यास सुरुवात होईपर्यंत चांगला परतून घ्या. साखर घालून परत ढवळा
 • आता किसलेले चॉकलेट घाला. तुम्ही चॉकलेटचे चिप्स सुद्धा वापरू शकता
 • चॉकलेट वितळवण्यासाठी मंद आचेवर ढवळत रहा
 • हे मिश्रण आता घट्ट होणे सुरू होईल
 • वेलची पावडर आणि दालचिनीची पावडर शिंपडा आणि छान ढवळा
 • मिश्रण पॅनच्या कडा सोडत नाही तोपर्यंत ढवळत रहा
 • गॅस बंद करा आणि मिश्रण एका डिश किंवा वाडग्यात ठेवा
 • थंड होऊ द्या; त्यादरम्यान, साच्यांना तूप लावून घ्या
 • मिश्रणातून लहान गोळे बनवा
 • मोदक मोल्डमध्ये एक गोळा ठेवून झाकण दाबा. काही सेकंदानंतर हळूवारपणे ते साच्यामधून काढा आणि ताटात ठेवा
 • उर्वरित मिश्रणासह वरील चरण पुन्हा करा
 • बारीक कापलेल्या बदामांनी चॉकलेट मोदक सजवा

3. तळणीचे मोदक

गोड आणि तळलेल्या गोष्टी करताना आपण कसे चुकू शकता? हे कुरकुरीत गोड डंपलिंग्ज खवा, ड्रायफ्रूट्स, नारळ आणि गूळ ह्यांनी बनलेले असते. ते छान दिसतात आणि त्याहूनही त्यांची चव चांगली असते. हे तळलेले मोदक बनवणे खूप सोपे आहे

तळणीचे मोदक

साहित्य:

मोदकासाठी

 • मैदा (मैदा / गव्हाचे पीठ) – १ कप
 • तूप २ चमचे
 • एक चिमूटभर मीठ (पर्यायी)
 • तळण्यासाठी तेल
 • कोमट पाणी

सारणासाठी

 • साखर /२ कप
 • नारळ (किसलेले) – १ कप
 • वेलची पूड /४ टीस्पून

कृती:

 • सारण तयार करुन सुरुवात करा. खोल सॉसपॅनमध्ये साखर पाण्यात घालून गरम करा. साखर पूर्णपणे विरघळली की त्यात नारळ आणि वेलची पूड घाला आणि चांगले ढवळा
 • सुमारे ४५ मिनिटे किंवा पाणी आटेपर्यंत मंद आचेवर शिजू द्या
 • पीठ मिक्सिंग भांड्यात घ्या, त्यात तूप घाला आणि चांगले मिक्स करा.नंतर हळूहळू पाणी घाला आणि चांगले मऊ मळून घ्या
 • झाकून १० मिनिटे बाजूला ठेवा
 • कणकेचे लहान गोळे करून बाजूला ठेवा. एक गोळा घ्या आणि त्याला पुरीसारखा आकार द्या
 • वर्तुळाकार पुरीच्या कडांना दूध लावा. मध्यभागी एक चमचा भरून सारण ठेवा आणि पाकळ्यांसाठी कडा दुमडून घ्या, नंतर सर्व पाकळ्या एकत्र आणा आणि वर सील करा. वरचे जास्त पीठ काढा
 • अशाच पद्धतीने आणखी मोदक तयार करा
 • तळण्यासाठी आता एका पॅनमध्ये थोडे तेल गरम करावे. एकदा तेल गरम झाले की तेलात हळुवारपणे मोदक सोडा आणि ते सोनेरी होईपर्यंत तळा
 • आपले तळलेले मोदक तयार आहेत

. डाएट मोदक

बरं, जर तुम्ही आरोग्याबद्दल जागरूक असाल आणि जास्त गोड पदार्थ तुम्हाला आवडत नसतील तर डाएट मोदक येथे तुमच्या बचावासाठी आहेत. ह्या मोदकांविषयी सर्वात चांगली गोष्ट अशी आहे की तुम्हाला चवीबद्दल तडजोड करण्याची आवश्यकता नाही परंतु त्याच वेळी आपण कॅलरीमध्ये लक्षणीय घट करू शकता!

डाएट मोदक

साहित्य:

 • ज्वारीचे पीठ २ कप
 • खजुराचे काप १ कप
 • ताजे किसलेले नारळ १ कप
 • तीळ १ टेस्पून
 • बदामाचे काप १ टेस्पून
 • काजूचे काप १ टेस्पून
 • एक चिमूटभर मीठ (पर्यायी)
 • तूप २ टीस्पून

कृती:

 • तीळ पिवळसर तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या व थंड होऊ द्या. एकदा थंड झाल्यावर बारीक पावडर करा.
 • आवश्यक असल्यास थोडे पाणी घालून खजूर बारीक करून पेस्ट करा. खजूर पेस्ट, तीळ पावडर, ताजे किसलेले नारळ, बदामाचे तुकडे आणि काजूचे तुकडे एकत्र मिसळा. चांगले एकत्र करा आपले सारण तयार आहे!
 • पीठ तयार करण्यासाठी, ज्वारीचे पीठ मिक्सरच्या भांड्यात घ्या, तूप घाला आणि चांगले मिक्स करा. पीठ मऊ होण्यासाठी थोडेसे पाणी घाला
 • मलमलच्या कपड्याने झाकून ठेवा आणि १०१५ मिनिटे बाजूला ठेवा
 • पिठाचे लहान गोळे बनवा. एक गोळा घ्या आणि तो रोल करा. मध्यभागी काही सारण ठेवा
 • वरुन कडा सील करण्यास सुरुवात करा. ह्याचप्रमाणे आणखी मोदक बनवा
 • पुरेसे पाणी घालून १० मिनिटे स्टीमर गरम करून घ्या
 • इडली मोल्ड्सना तूप लावून त्यामध्ये तयार झालेले मोदक ठेवा
 • इडली स्टीमरमधील मोदक १०१५ मिनिटे वाफवून घ्या, नंतर ज्योत बंद करा
 • त्यांना थंड होऊ द्या नंतर गरम सर्व्ह करा!
 • निरोगी आणि चवदार मोदकांना प्राधान्य देणारे पीठ वापरू शकता

. मावा / खवा मोदक

खव्याची समृद्ध चव आणि पोत आपल्या मोदकाची चव बदलून ते दुसर्‍या पातळीवर नेतात. ते तयार करणे बर्‍यापैकी सोपे आहे. गणपती पूजेच्या वेळी प्रसाद म्हणून देण्यासाठी हे मोदक खूप लोकप्रिय आहेत. तुम्ही खवा मोदकाचे रूपांतर पेढ्यातसुद्धा करू शकता.

मावा / खवा मोदक

साहित्य:

 • मावा (खवा) – २ कप
 • साखर /२ कप
 • चिरलेले बदाम २ टेस्पून
 • वेलची पूड /४ टीस्पून
 • दूध १ टेस्पून

कृती:

 • खव्याचा चुरा आणि साखर एका खोल नॉनस्टिक पॅनमध्ये घाला
 • मिश्रण सतत एक मिनिटभर मंद आचेवर शिजू द्या
 • ज्योत मध्यम करा आणि साधारण ५ मिनिटे हे मिश्रण शिजू द्या
 • ज्योत बंद करा, नंतर मिश्रण एका वाडग्यात ठेवा, आणि ४५ तास बाजूला ठेवा
 • खव्याला बोटांनी चुरा आणि नंतर बदाम आणि वेलची पूड घाला आणि पुन्हा मिक्स करा आवश्यक असल्यास एक चमचा दूध घाला
 • मोदकाच्या साच्याला थोडेसे तूप लावा
 • खवा मिश्रणातून एक छोटा गोळा घ्या, तो मोदक साच्यात एका बाजूला ठेवा आणि मोदक साचा घट्ट बंद करा
 • मग मोदक काढून घ्या
 • वरीलप्रमाणे आणखी खव्याचे मोदक बनवा

. आंबा मोदक

आंबा मोदक मुलांमध्ये बर्‍यापैकी लोकप्रिय आहे आणि आम्हाला खात्री आहे की तुम्हाला हे करून पाहण्यास आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांसह त्यांचा आनंद घेण्यास आवडेल. आंबा मोदकाची पाककृती खवा मोदकासारखीच आहे, तुम्हाला त्यात फक्त मॅंगो पल्प घालणे आवश्यक आहे. त्याची झटपट रेसिपी इथे दिली आहे. आपल्या मिठाईच्या प्लेटमध्ये ह्या आंबा मोदकांद्वारे विविधता आणण्यासाठी आणि गणपती बाप्पांना या गणेश चतुर्थीला नेवैद्यासाठी ह्या अनोख्या आणि चवदार मोदकांचा समावेश करा.

आंबा मोदक

साहित्य:

 • कुस्करलेला खवा १ कप
 • मँगो पल्प /२ कप
 • साखर /२ कप
 • वेलची पूड /४ टीस्पून
 • तूप १ टिस्पून

कृती:

 1. खवा २ मिनिटे भाजून घ्या व त्यात साखर घालून मिक्स करा
 2. ५ मिनिटे सतत ढवळत रहा आणि मग त्यामध्ये मँगो पल्प घाला
 3. चांगले मिक्स करा आणि आणखी ५ मिनिटे शिजवा
 4. आता वेलची पूड घाला आणि पुन्हा चांगले मिक्स करा
 5. १० मिनिटे किंवा घट्ट होईपर्यंत शिजवा
 6. गॅस बंद करा आणि मिश्रण थंड होऊ द्या
 7. मोदक मोल्डला थोडेसे तूप लावा, त्यात थोडे आंबा मोदक मिश्रण साच्याच्या एका बाजूला ठेवा आणि मोल्ड घट्ट बंद करा
 8. तयार मोदक काढून घ्या. अशा प्रकारे आंबा मोदक तुम्ही घरी बनवू शकता

७. बेसन मोदक

सर्व मोदकांच्या प्रकारांपैकी बेसनाचे मोदक  गणपतीला खूप आवडतात. गणेशोत्सवाचा 10 दिवसांपैकी कोणत्याही एका दिवशी हे करा. हे मोदक करायला  खूप सोपे आहेत  आणि ह्या मोदकांची  चवही खूप छान असते.हे मोदक करण्यासाठी आपल्याला फक्त बेसन आणि साखर लागेल.ह्यामध्ये   तुम्ही तुमच्या आवडीचे ड्राय फ्रूट्सही घालू शकता. आणि सजवण्यासाठी थोडे किसलेले खोबरे सुद्धा घाला.या स्वादिष्ट मोदकाची रेसिपी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

साहित्य

 • बेसन 1वाटी
 • पिठी साखर 1/2कप
 • तूप 1/4कप
 • वेलची पावडर 1/2टीस्पून

कृती:

 • एक कढ़ई गरम होण्यासाठी ठेवा .
 • त्यामध्ये तूप घालून ते वितळू द्या.
 • तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये बेसन घाला.
 • मंद आचेवर बेसन भाजून घ्या
 • बेसन खरपूस भाजून झाल्यावर त्यामध्ये 1/4कप पाणी घाला
 • पाणी घातल्यावर बेसन चांगले भाजून घ्या
 • फेस येणे बंद झाल्यावर बेसन चांगले भाजून झाले आहे असा त्याचा अर्थ होतो
 • आता गॅस बंद करा.
 • थंड होण्यासाठी बेसन दुसऱ्या भांड्यात काढून घ्या
 • बेसन थंड होईपर्यंत साखर मिक्सर मध्ये बारीक करून घ्या
 • बेसन थोडे थंड झाल्यावर त्यामध्ये  योग्य प्रमाणात मीठ, साखर आणि किसलेले खोबरे घाला.
 • सगळे मिश्रण छान एकत्र करून घ्या.
 • मोदक तयार करण्यासाठी मिश्रण तयार आहे .
 • आता मोदकाच्या साच्याला तूप लावा  आणि मिश्रणाचे गोल लाडू तयार करून मोदकाच्या साच्यामध्ये ठेवा आणि आजूबाजूचे जास्तीचे मिश्रण काढून टाका.
 • अश्या प्रकारे मोदक तयार करा.
 • उरलेले खोबरे मोदकाला लावून घ्या.

सणासुदीचे दिवस म्हणजे म्हणजे तुमच्या प्रियजनांशी बंध निर्माण करण्याचा काळ. ह्या गणेश चतुर्थीला घरी मोदक करण्याचा प्रयत्न करा. बाप्पा आपल्या जीवनात आरोग्य आणि समृद्धी घेऊन येऊदे हीच सदिच्छा!

आणखी वाचा:

गणेश चतुर्थी – शुभेच्छासंदेश आणि मेसेजेस
गणेश चतुर्थीसाठी तुमच्या घराची सजावट कशी कराल?

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article