Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भधारणा होताना प्रजननक्षमता डेपो प्रोव्हेरा – एक गर्भनिरोधक इंजेक्शन

डेपो प्रोव्हेरा – एक गर्भनिरोधक इंजेक्शन

डेपो प्रोव्हेरा – एक गर्भनिरोधक इंजेक्शन

In this Article

स्त्रियांसाठी संततिनियमनाच्या अनेक पद्धती अस्तित्वात आहेत. डेपो प्रोव्हेरा त्यांच्यापैकीच एक आहे. हे संतती नियमनासाठीचे इंजेक्शन आहे जे खांद्यावर किंवा कुल्ल्यावर दिले जाते. परिणामकारक निकालासाठी तीन महिन्यांमधून एकदा घेतले जाते, परंतु ते २ वर्षांपेक्षा अधिक काळ वापरता कामा नये कारण त्याचे बरेचसे दुष्परिणाम आहेत.

डेपो प्रोव्हेरा काय आहे?

मेड्रोओक्सीप्रोजेस्टेरॉन चे हे ब्रॅंडनेम आहे. प्रोजेस्टोजेन, हे स्त्री संप्रेरक असून ते शरीरात इंजेक्शनद्वारे दिले जाते त्यामुळे स्त्रीबीज सोडले जाण्यापासून रोखले जाते तसेचगर्भाशयाच्या मुखाजवळील श्लेष्मा घट्ट होतो आणि स्त्रीबीज आत जाऊ शकत नाहीत आणि अंड्यांचे फलन होत नाही. गर्भाशयाच्या आवरणावर फलित अंड्याचे रोपण होणे अवघड असते कारण इंजेक्शन मध्ये असलेल्या संप्रेरकांमुळे गर्भाशयाचे आवरण पातळ होते.

हे सुरक्षित आहे का?

बऱ्याच जणांसाठी हे सुरक्षित आहे. परंतु, ह्या गर्भनिरोधक साधनाचे काही दुष्परिणाम सुद्धा आहेत. हाडांची घनता कमी होते परंतु वापर थांबवल्यावर पुन्हा ती पहिल्यासारखी होते. रजोनिवृत्तीच्या जवळ पोहोचलेल्या स्त्रिया ह्यास अपवाद आहेत.

काही स्त्रियांना तीव्र औदासिन्य येते. काही स्त्रियांना खूप डोकेदुखी किंवा जिथे इंजेकशन घेतले तिथे वेदना, पू किंवा रक्तस्त्राव होऊ शकतो. खूप जास्त रक्तस्त्राव किंवा त्वचा आणि डोळे पिवळसर होणे हे गर्भनिरोधक इंजेक्शनचे दुष्परिणाम आहेत.

स्तनपान करताना हे सुरक्षित आहे का?

ज्या स्त्रिया स्तनपान करतात अशा स्त्रिया फक्त प्रोजेस्टेरॉन असलेल्या गर्भनिरोधकाला प्राधान्य देतात. तसेच जर प्रसूतीनंतर ६ ते ८ आठवडयांनी योग्य डोस घेतल्यास, डीपो प्रोव्हेरा सारखे प्रोजेस्टेरॉन असलेल्या गर्भनिरोधकांमुळे दुधाच्या पुरवठ्यावर कुठलाही परिणाम होत नाही. इस्ट्रोजेन असलेल्या गर्भनिरोधकामुळे स्तनपानाच्या दुधाचा पुरवठा कमी होतो

डेपो प्रोव्हेराचे काम लवकरात लवकर केव्हा सुरु होते?

डेपो प्रोव्हेरा जर योग्य वेळेला वापरण्यास सुरुवात केली तर ते खूप परिणामकारक होते. परंतु जर ते मासिक पाळीच्या पहिल्या पाच दिवसात घेतले तर ते २४ तासानंतर काम करण्यास सुरुवात करते. जर मासिक पाळीच्या पहिल्या ५ दिवसांनंतर ते इंजेक्शन दिले तर ते १४ दिवसांनंतर काम करण्यास सुरुवात करते आणि जर ते नुकतीच प्रसूती झालेल्या किंवा गर्भपात झालेल्या स्त्रीला दिल्यास तात्काळ काम करण्यास सुरुवात करते.

ते कसे काम करते?

डेपो प्रोव्हेराचे इंजेक्शन घेतल्यानंतर प्रोजेस्टेरॉन हे संप्रेरक ओव्यूलेशनला प्रतिबंध करते. डेपो प्रोव्हेरा मुळे फलित न झालेल्या अंड्याच्या सानिध्यात शुक्राणू येत नाहीत कारण डेपो प्रोव्हेरा मुळे गर्भाशयाच्या मुखातून येणारा स्त्राव घट्ट होतो. ह्या गर्भनिरोधकामुळे गर्भाशयाचे आवरण पातळ होते त्यामुळे फलित अंड्याचे रोपण नीट होत नाही.

हे गर्भनिरोधकाचे इंजेक्शन किती परिणामकारक आहे?

हे गर्भनिरोधक इंजेक्शन जर वेळेवर घेतले तर परिणामकारक होते. ज्या स्त्रिया डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे म्हणजेच १२ आठवड्यातून एकदा, इंजेक्शन्स घेत नाहीत, त्यांच्याबाबतीत ह्या गर्भनिरोधकांची परिणामकता ९४% पर्यंत खाली येते.

डेपो प्रोव्हेरा इंजेक्शन तुमच्यासाठी सर्वोत्तम रित्या कार्यरत होईल ह्यासाठी काय कराल?

वेळेवर म्हणजेच १२ आठवड्यातून एकदाच घेतल्यास डेपो प्रोव्हेरा इंजेक्शन तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. तुमच्या मासिक पाळीच्या पहिल्या ५ दिवसांमध्येच ते घेतले पाहिजे त्यामुळे २४ तासात ते कार्यरत होईल. जर तुम्ही ते पाळीच्या पहिल्या ५ दिवसांनंतर घेतले तर तुम्हाला कॉन्डोमसारखे गर्भनिरोधकाचे दुसरे साधन वापरावे लागेल.

सर्वात महत्वाचा मुद्धा म्हणजे दुसरे इंजेक्शन १२ आठवड्यांनांतर किंवा ३ महिन्यांनंतर घेतले पाहिजे. प्रत्येक १२ आठवड्यांनंतर इंजेक्शन घ्यावे लागत असल्याने इंजेक्शन्सची तारीख लक्षात राहण्यासाठी तुम्ही ऍप किंवा डेट रिमाइंडर वापरू शकता. तुम्ही तुमच्या पतीला सुद्धा सांगू शकता किंवा कॅलेंडरवर तारखेवर खूण करून ठेवू शकता त्यामुळे तुम्हाला तारीख लक्षात राहण्यास मदत होऊ शकते.

डेपो प्रोव्हेरा वापरल्यास लैंगिक संबंधांपासून पसरणाऱ्या आजारांपासून संरक्षण मिळू शकते का?

दुर्दैवाने, डेपोप्रोव्हेराची इंजेक्शन्स वापरल्यास लैंगिक संबंधांपासून पसरणाऱ्या आजारांपासून संरक्षण मिळत माही. लैंगिक संबंधापासून पसरणाऱ्या आजारांपासून संरक्षण मिळण्यासाठी कॉन्डोमचा वापर करणे सर्वात चांगले. असे केल्याने तुमचे ह्या आजारांपासून संरक्षण तर होतेच नको असलेली गर्भधारणा सुद्धा रोखली जाते.

डीएमपीए च्या इंजेक्शन्सचे दुष्परिणाम काय आहेत?

डीएमपीए च्या इंजेक्शन्सचे दुष्परिणाम काय आहेत?

डीएमपीए च्या दुष्परिणामांमध्ये खालील लक्षणांचा समावेश होतो

 • हाडांची घनता कमी होते त्यामुळे ऑस्टिओपोरोसिस होण्याची शक्यता असते
 • पोटदुखी होते आणि काही वेळा ती गंभीर स्वरुपात होऊ शकते
 • जिथे इंजेक्शन दिलेले असते तिथे बराच वेळ तीव्र वेदना होऊ शकतात
 • जिथे इंजेक्शन दिलेले असते तिथून पू किंवा रक्त येऊ शकते
 • मुरूम
 • दुखरे स्तन
 • लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा कमी होणे
 • औदासिन्य
 • चक्कर येणे आणि मळमळ
 • खूप डोके दुखणे आणि उष्ण वाफा
 • अनियमित पाळी
 • वजनात वाढ
 • श्वसनाच्या समस्या
 • तीव्र स्वरूपाच्या ऍलर्जिक प्रतिक्रिया
 • पुन्हा प्रजननक्षमता पूर्ववत होण्यासाठी १० महिने लागू शकतील किंवा ओव्यूलेशन सुरु होण्यासाठी त्या पेक्षा सुद्धा जास्त वेळ लागू शकतो

तुम्ही डीएमपीए इंजेक्शन केव्हा घेतले पाहिजे?

जेव्हा तुम्हाला गर्भधारणा हवी असेल तेव्हा डेपो इंजेक्शन घेणे बंद करा. ही इंजेक्शन्स तुम्ही १२ आठवडे/ ३ महिन्यातून एकदा घेतली पाहिजेत म्हणजे तुम्हाला हवा तसा रिझल्ट मिळू शकतो

जर तुम्ही हे गर्भनिरोधक इंजेक्शन वेळेवर घेण्याचे विसरलात तर काय?

गर्भनिरोधक इंजेक्शन वेळेवर घेण्याचे विसरल्याने गर्भधारणेचा धोका वाढू शकतो. जर तुम्ही बरेच आठवडे किंवा महिने हा डोस घेण्याचे विसरलात तर तुम्ही इंजेक्शन घेण्यास सुरुवात केली तेव्हा जसे दुष्परिणाम दिसून आले होते तशा लक्षणांचा पुन्हा अनुभव येईल.

जर तुम्ही हे गर्भनिरोधक इंजेक्शन उशिरा घेतले तर काय?

जर तुम्ही हे इंजेक्शन घेण्याचे विसरलात तर त्यामुळे ओव्यूलेशन कमी होते. जरी इंजेक्शन घेणे थांबवल्यानंतर ३६ महिन्यांनी ओव्यूलेशन सुरु होते तरी सुद्धा त्याआधी गर्भधारणा राहण्याची शक्यता असते.

सगळ्या स्त्रिया डीएमपीएचे इंजेक्शन वापरू शकतात का?

बऱ्याच स्त्रिया डीएमपीए चे इंजेक्शन वापरतात परंतु त्याचा १८५० वर्षाच्या स्त्रियांसाठी चांगला परिणाम होतो. परंतु, ज्या स्त्रियांची प्रसूती होऊन ६ आठवड्यांपेक्षा कमी काळ झाला आहे आणि त्या स्तनपान करीत आहेत (जरी प्रोजेस्टेरॉन असलेले गर्भनिरोधक स्तनपान देणाऱ्या स्त्रियांसाठी सर्वोत्तम असले तरी त्यामुळे स्तनपानाचा पुरवठा वाढत नाही), ज्या स्त्रियांना सध्या किंवा आधी स्तनाच्या कर्करोगाचा इतिहास आहे, किंवा ज्या स्त्रियांना २० वर्षांपेक्षा जास्त काळ हृदयरोग, उच्चरक्तदाब, मधुमेह, यकृतामध्ये साध्या किंवा कर्करोगाच्या गाठी किंवा विषाणूजन्य हिपॅटिटिस असेल तर अशा स्त्रियांनी हे वापरू नये.

डेपो प्रोव्हेराचे फायदे काय आहेत?

जगभरातील स्त्रियांसाठी डेपो प्रोव्हेरा फायद्याचे ठरले आहे आणि त्यामागे खालील कारणे आहेत.

. दीर्घकाळ संरक्षण

स्त्रियांना गर्भधारणा होण्यापासून दीर्घकाळ संरक्षण मिळू शकते (३ महिने). त्यांना दररोज गर्भनिरोधक गोळी घ्यावी लागत नाही.

. खूप परिणामकारक

जर ही इंजेक्शन्स वेळेवर (मासिक पाळीच्या पहिल्या ५ दिवसात १२ आठवड्यातून एकदा) घेतल्यास गर्भधारणेस प्रतिबंध घालण्यास ९९% यश येते.

. स्तनपानाच्या दुधाच्या पुरवठ्यात घट येत नाही

ह्या इंजेक्शन मध्ये प्रोजेस्टिन नावाचे संप्रेरक असते त्यामुळे स्तनपानाच्या दुधाच्या पुरवठ्यावर परिणाम होत नाही. म्हणून स्तनपान देणाऱ्या मातांसाठी हा सर्वात चांगला संततिनियमनाचा पर्याय आहे.

. धोरण

धोरण

तुम्ही डिएमपीए वापरत आहात हे कुणालाही लक्षात येणार नाही

. मासिक पाळी येत नाही

डेपो इंजेक्शन्स दिल्यानंतर मासिक पाळी दरम्यान हलका रक्तस्त्राव होतो आणि काही काळानंतर मासिक पाळी थांबते. (जो पर्यंत स्त्री हे गर्भनिरोधक इंजेक्शन घेत आहे तो पर्यंत)

डेपो प्रोव्हेराचे तोटे काय आहेत?

फायद्यांसोबतच डेपोप्रोव्हेराचे तोटे सुद्धा आहेत

. वेळापत्रक

हे इंजेक्शन १२ आठवड्यांमध्ये एकदा घेतलेच पाहिजे. असे न केल्यास नको असलेली गर्भधारणा राहू शकते.

. हाडांची घनता कमी होते

हे गर्भनिरोधक सतत वापरत राहिल्यास काही काळानंतर कॅल्शिअमचा ऱ्हास होऊ शकतो आणि त्यामुळे ऑस्टिओपोरोसिस होऊ शकतो. परंतु, एकदा तुम्ही ते वापरणे बंद केले आणि तुम्ही मेनोपॉझ च्या जवळ नसाल तर तुमच्या हाडांची घनता सामान्य होऊ शकते

. वेदना

वेदना

इंजेक्शन घेतलेल्या जागी खूप वेदना होऊ शकतात आणि त्या ठिकाणी पू होऊ शकतो

. वजनात वाढ

ज्या स्त्रिया गर्भनिरोधक वापरतात त्यांच्या वजनात वाढ होऊ शकते

डेपो प्रोव्हेराचे इंजेक्शन घेतल्यानंतर तुम्हाला गर्भधारणा होऊ शकते का?

जर योग्य वेळी घेतले तर डेपो प्रोव्हेरा हे ९९% परिणामकारक असते. परंतु, १०० पैकी एका व्यक्तीला डेपो प्रोव्हेराचे इंजेक्शन घेऊन सुद्धा गर्भधारणा होऊ शकते.

डेपो प्रोव्हेराच्या इंजेक्शनची किंमत किती असते?

डेपो प्रोव्हेराच्या इंजेक्शनची किंमत भारतात २५० ते ३०० रुपये इतकी असते

तुम्हाला ते फुकट मिळू शकते का?

भारत सरकारने असे ठरवले आहे की डिएमपीए सारखी इंजेक्शन्स नॅशनल फॅमिली प्रोग्रॅमच्या अंतर्गत सर्व वैद्यकीय महाविद्यालये किंवा जिल्ह्यातील दवाखान्यांमध्ये फुकट दिली जावीत.

जरी डेपो प्रोव्हेराचे खूप तोटे जाणवले असले तरी गर्भनिरोधक वापरणाऱ्या स्त्रिया त्याबाबत समाधानी आहेत. हि संततिनियमनाची खूप परिणामकारक आणि सोयीची पद्धत आहे.

 आणखी वाचा:

पॉलिसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम (पीसीओएस) – आढावा
ओव्युलेशन प्रेडिक्टर किट (ओ. पी. के.)

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article