Firstcry Parenting
Parenting Firstcry
Home अन्य बाळांना उष्णतेमुळे उठणारे पुरळ – कारणे, उपचार आणि घरगुती उपाय

बाळांना उष्णतेमुळे उठणारे पुरळ – कारणे, उपचार आणि घरगुती उपाय

बाळांना उष्णतेमुळे उठणारे पुरळ – कारणे, उपचार आणि घरगुती उपाय

उष्ण आणि दमट वातावरण असलेल्या देशांमध्ये बाळाच्या अंगावर उष्णतेमुळे उठणारे पुरळ खूप सामान्य आहे. ह्या उष्णतेमुळे होणाऱ्या पुरळांमुळे त्रास होत असेल तर तुम्हाला त्याच्यापासून सहज सुटका मिळू शकते. बाळांमध्ये उष्णतेमुळे होणारे पुरळ सहज ओळखता येऊ शकतात आणि त्यावर कारणे, लक्षणे आणि उपचार ह्यांचा शोध घेतला जाऊ शकतो.

उष्णतेचे पुरळ म्हणजे नक्की काय?

उष्णतेमुळे अंगावर होणारे हे पुरळ मिलिआरिआ रुबरा, मिलिआरिआ क्रिस्टेलिना, समर रॅश ह्या इतर नावानी सुद्धा ओळखले जातात. नावाप्रमाणेच ते लहान, लाल फोड असतात जे बाळाच्या शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे दिसू लागतात.

पोट, छाती, मान, कुल्ले आणि त्याच्या आजूबाजूच्या भागावर हे पुरळ आढळतात. जर तुम्ही बाळाला टोपी घालत असाल तर हे पुरळ कपाळावर आणि डोक्यावर सुद्धा आढळतात. मानेवर सुद्धा ही पुरळ सर्रास आढळते. जर तुमच्या बाळाच्या अंगावर ही पुरळ आढळली तर त्यापासून होणाऱ्या खाजेपासून सुटका करून घेणे महत्वाचे आहे.

उष्णतेमुळे होणारे पुरळ कसे दिसतात?

उष्णतेमुळे होणारे पुरळ कसे दिसतात?

उष्णतेमुळे होणारे पुरळ हे लाल रंगाचे छोटे फोड असतात. शरीराच्या विविध भागावर ते समूहात आढळतात.


उष्णता पुरळ होण्याची कारणे काय आहेत?

जर तुमच्या बाळाला खूप घाम येत असेल तर हे पुरळ उठतात. खूप घाम आल्याने त्वचेवरील रंध्रे बंद होतात आणि घाम बाहेर पडू शकत नाही. लहान मुले आणि छोट्या बाळांना असे पुरळ होण्याची खूप शक्यता असते कारण मोठ्या माणसांच्या तुलनेत त्यांच्या त्वचेवरील छिद्रे सारखी असतात.

जर तुम्ही उष्ण आणि दमट वातावरणात रहात असाल तर तुमच्या बाळाला असे पुरळ उठण्याची खूप शक्यता असते. जर तुमच्या बाळाला ताप आला असेल किंवा जर तुम्ही बाळाला एकावर एक असे खूप कपडे घातले असतील तर हिवाळ्याच्या दिवसात सुद्धा असे पुरळ उठू शकतात.

बाळांसाठी उष्णतेमुळे होणारी पुरळ वेदनादायी असते का?

उष्णतेमुळे होणारे हे पुरळ बाळासाठी वेदनादायी नसते. त्यामुळे फक्त बाळाला थोडी अस्वस्थता जाणवते. तथापि, हे सगळे पुरळ किती प्रमाणात आहे ह्यावर अवलंबून असते. जर ही रॅश खूप जास्त प्रमाणात असेल आणि बाळ सतत ते खाजवत असेल तर बाळासाठी ते वेदनादायी होऊ शकते.

एक महत्वाचे लक्षात घेतले पाहिजे की त्रास होतो आहे हे सांगण्यासाठी रडण्याशिवाय बाळाकडे अन्य कुठलाही मार्ग नसतो. उष्णतेमुळे खूप जास्त पुरळ आले असतील तर त्यामुळे स्ट्रोक सुद्धा येऊ शकतो.

बाळांमध्ये दिसणारी मिलिआरिआची लक्षणे

उष्णतेमुळे उठणारे पुरळ हे तुमच्या बाळाच्या त्वचेवर छोट्या लाल फोडांप्रमाणे दिसतात. इतर लक्षणे म्हणजे खाज सुटणे, बाळाची चिडचिड होऊन रडणे इत्यादी होय. खाजवल्यामुळे किंवा कपड्यांमुळे हे पुरळ आणखी वाढतात. ह्यातून दुय्यम संसर्ग वाढण्याची सुद्धा शक्यता असते परंतु हे खूप दुर्मिळ आहे.

उष्णतेमुळे होणाऱ्या पुरळचे निदान कसे करावे?

मिलिआरिआ हे आपण लगेच ओळखू शकतो आणि त्याची वैद्यकीय काळजी घेण्याची गरज नसते. तथापि, जर हे पुरळ तीन ते चार दिवसांमध्ये गेले नाहीत किंवा बाळाला ताप आला तर तुम्ही डॉक्टरांशी फोन वर संपर्क साधा.

जर बाळाला पुरळ उठले असतील तर खालील लक्षणांकडे लक्ष द्या:

उष्णतेमुळे होणाऱ्या पुरळचे निदान कसे करावे?

 • खूप जास्त प्रमाणात त्वचा लाल होणे, सूज येणे किंवा पुरळ आलेल्या भागात उष्णता जाणवणे
 • पू तयार होणे
 • ताप येणे
 • मान, हात किंवा मांडीच्या सांध्यात लसीका गाठींना सूज येणे
 • लाल चट्टे उमटणे

बाळांना उष्णतेचे पुरळ होण्यास कारणीभूत असलेले धोकादायक घटक

अशी काही कारणे आहेत ज्यामुळे मुलांना उष्णता पुरळ होण्याचा धोका असतो

. उष्ण वातावरणात राहणे

उष्ण आणि दमट वातावरणात राहिल्यामुळे शरीरातील उष्णता वाढते आणि त्यामुळे उष्णता पुरळ तयार होतात. तथापि, दमट वातावरणामुळे बाळाला घाम येतो आणि पुरळ येते. जर तुम्ही उष्ण वातावरणात रहात असाल तर तुम्ही योग्य ती काळजी घ्या आणि बाळाला उष्णतेमुळे पुरळ उठणार नाही ते पहा.

. प्रतिबंधात्मक कपडे

आपल्या बाळाला जाड कपड्यांमध्ये किंवा ज्या कपड्यांमध्ये गरम होते असे कपडे घालून उष्णतेचा त्रास होऊ शकतो. हवामानानुसार आपल्या मुलास कपडे घाला आणि नायलॉन किंवा रेयॉनसारखे फॅब्रिक टाळा. त्याऐवजी, मऊ कपड्यांची निवड करा.

. बाळाला गुंडाळणे

उष्ण वातावरणात बाळाला गुंडाळून ठेवल्याने बाळाला पुरळ येऊ शकतात. बाळाला खूप वेळ गुंडाळून ठेवणे टाळा.

. उष्णतेचे स्रोत

उष्णतेचे स्रोत जसे की दिवा किंवा हिटर बाळाजवळ ठेवल्यास त्यामुळे बाळाला उष्णता पुरळ होऊ शकतात. बाळाला थंड वातावरणात ठेवा आणि घरात प्रकाशासाठी मंद दिव्याचा वापर करावा.

उपचार

उष्णतेमुळे उठणाऱ्या पुरळ साठी काही विशेष उपचारांची गरज नसते. तथापि, बाळाला आराम पडावा म्हणून खालील गोष्टी करू शकता

. उष्णता कमी करा

बाळाचे कपडे काढा किंवा ते सैल करा. घाम निघून जाण्यासाठी बाळाला थंड पाण्याने अंघोळ घाला आणि बाळाच्या त्वचेवरील सगळी रंध्रे मोकळी करा. तुम्ही बाळाला स्वच्छ आणि ओल्या कापडाने पुसून घेऊ शकता ज्यामुळे बाळाच्या त्वचेचे तापमान कमी होईल

. बाळाची त्वचा कोरडी ठेवा

तुमच्या बाळाची त्वचा कोरडी करण्यासाठी टॉवेलचा वापर करू नका. बाळाची त्वचा नैसर्गिकरित्या कोरडी होऊ द्या आणि बाळाला थंड वाटावे म्हणून पंख्याचा वापर करा. तुमच्या बालरोगतज्ञांच्या सल्ल्याशिवाय कुठलेही क्रीम ह्या पुरळ किंवा फोडांवर लावू नका.

. त्वचेला मोकळा श्वास घेऊ द्या

बाळाची काळजी घेताना हा सर्वात महत्वाचा मुद्धा आहे आणि बरेचसे पालक ह्याकडे दुर्लक्ष करतात. तुमच्या बाळाची त्वचा ही जास्तीत जास्त नैसर्गिक हवेत राहिली पाहिजे ह्याची खात्री करा. बाळाला उघडे ठेवा किंवा बाळाला काहीतरी मऊ किंवा सैलसर घाला.

उष्णतेचे पुरळ घरगुती उपाय

बाळांना होणाऱ्या त्वचेवरील पुरळांच्या त्रासावर तुम्ही खालील घरगुती उपचार करू शकता

. बर्फ

उष्णतेच्या पुरळांवर बर्फ लावल्यास चांगला फायदा होतो. तुम्ही कापडामध्ये बर्फ गुंडाळून जिथे पुरळ उठले आहे तिथे हळूहळू फिरवू शकता. बराच वेळ एकाच जागी बर्फ दाबून ठेऊ नका.

. बेकिंग सोडा

बेकिंग सोड्यामध्ये मृत त्वचा काढून टाकण्याचे तसेच प्रतिजीवाणू आणि विरोधीदाहक गुणधर्म असतात ज्यामुळे त्वचेवर रॅश किंवा पुरळ उठत नाहीत. बेकिंग सोडा आणि पाण्याचे द्रावण तयार करा. वॉशक्लॉथ त्या द्रावणात घाला आणि ज्या भागावर पुरळ उठले आहेत तिथे ते फिरवा. ह्यामुळे त्याची तीव्रता कमी होईल. तुम्ही बाळाच्या अंघोळीच्या पाण्यात १ टेबलस्पून बेकिंग सोडा घालू शकता आणि त्या पाण्याने बाळाला अंघोळ घालू शकता.

. ओटमील

ओट्समुळे त्वचेतील जास्तीचे तेल शोषून घेतले जाते. ओट्समध्ये अँटिऑक्सिडंट आणि अँटीइंफ्लामेटरी गुणधर्म असतात. त्यामध्ये नैसर्गिक स्किन क्लिन्झर सॅपोनीन सुद्धा असते. पाण्याच्या बाथटब मध्ये १ कप ओटमील घाला आणि तुमच्या बाळाला त्या पाण्याने अंघोळ घाला. त्यामध्ये ओटमील घातल्यावर ते दुधाळ होते. परंतु ह्यासाठी ऑरगॅनिक ओटमील वापरा. संरक्षक पदार्थ घातलेले ओटमील वापरू नका. तुमच्या बाळाला १५२० मिनिटांसाठी अंघोळ घाला आणि बाळाला नुसते कापडाने टिपून कोरडे करा.

. चंदन पावडर

चंदनामध्ये प्रतिजीवाणू आणि अँटीइंफ्लामेंटरी गुणधर्म आहेत तसेच त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्याचा गुणधर्म सुद्धा चंदनामध्ये आढळतो. त्यामध्ये असणाऱ्या इसेन्शिअल ऑइल मुळे त्वचेला पोषण मिळते आणि त्वचेचे मॉइश्चरायझिंग होते. गुलाब पाणी आणि चंदन पावडर सारख्या प्रमाणात घेऊन त्याची पेस्ट तयार करा. लक्षणांची तीव्रता कमी होण्यासाठी ते सगळ्या रॅशेस वर लावा.

चंदन पावडर

. मुलतानी माती

मुलतानी माती त्वचेतून जादाचे तेल शोषून घेते, आणि रक्ताभिसरण आणि त्वचेचा पोत सुधारण्यास मदत करते. त्यामुळे रॅश आणि त्वचेवरील पुरळ ह्यावर उपचारांसाठी मदत होते. तुम्हाला त्यासाठी गुलाब पाणी घालून मुलतानी मातीची घट्ट पेस्ट करावी. लागेल. ही पेस्ट जिथे पुरळ आहे तिथे लावलास बाळाला खाजेपासून लागेच आराम मिळतो.

. लिंबाची पाने

लिंबाची पाने बारीक वाटून त्याची पेस्ट तयार करा आणि लावा. ही पेस्ट कोरडी होऊ द्या आणि थंड पाण्याने धुवून काढा

. कोरफडीची पाने

कोरफडी मुळे सुद्धा बाळाला उष्णतेमुळे होणाऱ्या रॅशेस पासून आराम मिळतो. जर तुमच्या घरी कोरफड असेल तर तुम्ही पानांमधील गर काढून घेऊ शकता. जर तुम्ही दुकानातून तो आणणार असाल तर कुठलीही संरक्षक रसायने न घातलेली कोरफड विकत आणली पाहिजे. चेहऱ्यावरील किंवा शरीराच्या इतर भागावर कोरफड लावा.

. काकडी

काकडीचे अनेक काप करा आणि तुमच्या बाळाच्या त्वचेवर ते लावा. तुम्ही काकडी बारीक करून त्याची पेस्ट ह्या उष्णतेमुळे येणाऱ्या पुरळांवर लावू शकता त्यामुळे बाळाला लगेच थंड वाटेल.

उष्णतेचे पुरळ होऊ नयेत म्हणून काय कराल?

बाळांना उष्णतेचे पुरळ होऊ नयेत म्हणून इथे काही मार्ग दिले आहेत

 • तुमच्या बाळाला उन्हापासून दूर ठेवा. खूप तीव्र ऊन असेल तेव्हा बाळाला घरात ए. सी. खोलीत ठेवा. जेव्हा तुम्ही बाळाला बाहेर घेऊन जाल तेव्हा बाळ सावलीत राहील असे पहा. तसेच बाळाला पुरेसे पाणी मिळत आहे ना त्याकडे लक्ष द्या.
 • बाळाला आरामदायक आणि सैल कपड्यांमध्ये ठेवा, विशेषकरून उन्हाळ्यात हे पाळा. कॉटनचे कपडे बाळास घालणे सर्वात उत्तम.
 • बाजारात मिळणारे डायपर हे पीव्हीसी प्लास्टिक आणि इतर घटकांपासून बनलेले असतात त्यामुळे त्वचेतून उष्णता बाहेर पडत नाही आणि त्यामुळे पुरळ होतात.
 • मान आणि काखेतील भागात खूप घाम येतो. त्यामुळे हा भाग थंड पाण्याने स्वच्छ धुवा आणि तो नीट कोरडा करा.
 • तुमच्या बाळाला खूप जास्त गरम होत नाहीये ना हे नियमित वेळेच्या अंतराने तपासून पहा. जर त्वचा ओली आणि गरम लागली तर बाळाला अंघोळ घाला आणि त्वचा ओल्या फडक्याने पुसून घ्या.
 • बाळाला ए. सी. खोलीत झोपवा आणि त्या खोलीत पंखा लावा. पंख्याचा किंवा ए. सी. चा गारवा बाळाच्या तोंडावर येणार नाही ह्याची काळजी घ्या. बाळ झोपण्यासाठी फक्त वाऱ्याची हलकी झुळूक बाळापर्यंत पोहोचेल असे पहा.

उष्णकटिबंधीय, दमट प्रदेशात राहण्याने नेहमीच उष्णतेची, पुरळ होण्याची शक्यता वाढते. मुलं संवादासाठी खूपच लहान असल्याने पुरळ उठल्यावर अस्वस्थता व्यक्त करू शकणार नाहीत. पालकांनी बाळाच्या संपूर्ण शरीरावर लक्ष ठेवून जागरूक राहिले पाहिजे. जर आपल्या मुलास उष्णेतेमुळे पुरळ आले असतील तर वरील टिप्स मुळे आपल्याला उपचार करण्यास मदत होईल.

आणखी वाचा:

डायपर रॅश – ओळख, कारणे आणि उपाय
बाळाची अंघोळ : पद्धती, टिप्स आणि बरंच काही

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article