Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ आरोग्य बाळांच्या चोंदलेल्या नाकावर १४ सर्वोत्तम घरगुती उपचार

बाळांच्या चोंदलेल्या नाकावर १४ सर्वोत्तम घरगुती उपचार

बाळांच्या चोंदलेल्या नाकावर १४ सर्वोत्तम घरगुती उपचार

लहान मुले सर्दीसारख्या किरकोळ आजारांना लढा देऊ शकत नाहीत. जर बाळांचे नाक चोंदलेले असेल तर बाळे अस्वस्थ होऊ शकतात. त्यामुळे बाळाची सर्दी आणि चोंदलेले नाक ह्या दोन्हीमुळे तुम्हाला रात्रीची झोप लागणार नाही. बरेच पालक आपल्या लहान बाळाला घेऊन बालरोगतज्ञांकडे धाव घेतात. तथापि, काहीजण बाळाला फक्त सर्दी झाली आहे असा विचार करतात आणि त्यांना डॉक्टरांचा सल्ला घेण्याची इच्छा होत नाही. परंतु, तुम्हाला हे माहित असलेच की मोठ्या माणसांपेक्षा लहान मुले सर्दीमुळे जास्त अस्वस्थ होतात. सर्दी आणि कफ कमी करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपचार करून बघू शकता अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

बाळांच्या चोंदलेल्या नाकासाठी नैसर्गिक उपाय

भारतात बरेच पालक प्रतिजैविके (ज्याचे दुष्परिणाम होऊ शकतात) आणि औषधांपेक्षा (जे अर्भकांना दिले जाऊ नयेत)घरगुती उपचार करतात. बाळांसाठी चोंदलेल्या नाकासाठी काही उत्तम घरगुती उपचार इथे दिलेले आहेत

. आपल्या बाळाला स्तनपान देण्यावर भर द्या. स्तनपानामध्ये आवश्यक पोषण आणि प्रतिपिंडे असतात जे आपल्या मुलाची रोगप्रतिकारक शक्ती विकसित करतात आणि मजबूत करतात. एक चांगली रोगप्रतिकार प्रणाली आपल्या बाळाला सर्दी आणि खोकला विरूद्ध लढायला मदत करेल.

बाळांच्या चोंदलेल्या नाकासाठी नैसर्गिक उपाय

. चोंदलेले नाक उघडण्यासाठी आपण बाळाच्या नाकात दुधाचे काही थेंब देखील टाकू शकता.

. तुम्ही घरी तुमच्या बाळासाठी नाकात घालण्याचे थेंब बनवू शकता. ८ चमचे पाणी घेऊन त्यात एक चमचा मीठ घाला आणि एका निर्जंतुकीकरण केलेल्या चमच्याने हे चांगले मिक्स करावे. हे मिश्रण थंड झाल्यावर त्याचे काही थेंब बाळाच्या नाकपुडीत सोडा.

. बाळाचे डोके उशांचा आधार घेऊन उंचावर ठेवा, त्यामुळे श्लेष्मा बाहेर येण्यास मदत होते आणि चोंदलेले नाक उघडते.

. जेव्हा बाळाला सर्दी असते तेव्हा तुमच्या बाळाला सजलीत ठेवणे महत्वाचे आहे. द्रव पदार्थ श्लेष्मा सौम्य करतात आणि नाक मोकळे होण्यास मदत होते. तुम्ही बाळाला कोमट आणि साखर न घातलेला सफरचंद रस आणि कॅमोमाइल चहा मध घालून देखील खाऊ शकता.

. खोकला आणि सर्दीसाठी चिकन सूप हा आणखी एक उपयुक्त घरगुती उपाय आहे. चिकनमध्ये एंटीइंफ्लेमेटरी गुणधर्म असतात त्यामुळे नाक मोकळे होते आणि तुमच्या बाळाची प्रतिकारशक्ती सुधारते.

. जर बाळाचे नाक खूप चोंदलेले असेल तर बाथरूम मध्ये गरम पाण्याचा नळ सोडा आणि गरम पाण्याने बाथरूममध्ये स्टीम तयार होऊ द्या. मग, काही मिनिटांसाठी आपल्या बाळाला बाथरूममध्ये घ्या. तुम्ही बाळाला उबदार पाण्याने आंघोळ देखील देऊ शकता.

. बाळाच्या चोंदलेल्या नाकावर नेझल ऍस्पिरेटर उपयोगी ठरतो. नेझल ऍस्पिरेटर मधली हवा ब्लब दाबून काढून टाकून त्याचे टोक नाकामध्ये घाला. आता ब्लब हळूहळू सैल करा जेणेकरून नाकामधील श्लेष्मा खेचला जाईल. दोन्ही नाकपुड्यांसाठी अशीच क्रिया करा. प्रत्येक वेळेला वापरून झाल्यावर नेझल ऍस्पिरेटर धुवून निर्जंतुक करा.

. ह्युमिडिफायर हवेत आर्द्रता निर्माण करेल आणि तुमच्या बाळाचे चोंदलेले नाक दूर करेल.

१०. जर तुमच्याकडे ह्युमिडिफायर नसेल तर, बाळाच्या खोलीत खोलीत उबदार पाण्याची एक बादली ठेवा. उबदार पाणी तुमच्या बाळाचे चोंदलेले नाक मोकळे करण्यास मदत करेल.

११. मोहरीच्या तेलाची मालिश हा सर्दी आणि चोंदलेल्या नाकावर उपचार करण्याचा आणखी एक प्रभावी मार्ग आहे. /४ वाटी मोहरीचे तेल घ्या त्यामध्ये ३४ पाकळ्या लसूण घ्या आणि त्यामध्ये मेथीचे बियाणे टाकून उकळून घ्या. तेल थंड झाल्यावर तुमच्या बाळाला त्याने मसाज करा. हे तेल नाक, कपाळ, गालाची हाडे, छाती आणि पाठीवर हलक्या हाताने लावा.

१२. नाक चोंदण्याचे मुख्य कारण म्हणजे नाकातील कोरडा श्लेष्मा हे आहे. आपल्या बाळाच्या नाकपुड्यांमधील आतील भाग स्वच्छ करण्यासाठी कापूस कोमट पाण्यात भिजवा आणि बाळाचे नाक स्वच्छ करा. आपल्या लहान मुलाला दुखापत होऊ नये म्हणून हे सावधगिरीने आणि काळजीपूर्वक करा.

१३. तुमच्या लहान बाळाला गुडघ्यावर ओढून घ्या आणि बाळाच्या पाठीवर हळूवारपणे थाप द्या. यामुळे छातीमधून श्लेष्मा वर येतो आणि खोकल्याद्वारे तो बाहेर पडतो.

१४. आपल्या बाळाला एक उबदार कॉम्प्रेस द्या. उबदार पाण्यात कपड्याचा एक छोटा तुकडा भिजवा आणि जास्तीचे पाणी पिळून काढा. आणि बाळाच्या नाकावर आणि गालांवर ठेवा. असे पुन्हा पुन्हा करा.

तुम्ही बालरोगतज्ञांकडे कधी जावे?

घरगुती उपचारांचा बाळाला उपयोग होत नसेल तर बाळाला वैद्यकीय तपासणीची आवश्यकता असू शकते.

बालरोगतज्ञांना भेट देण्याचा विचार करा जर:

  • तीन आठवड्यात सर्दी बरी होत नसेल
  • आपले बाळ वेगाने श्वास घेत असेल
  • बाळाला खूप ताप येत असेल
  • बाळाच्या खोकल्यातून रक्त पडत असेल
  • आपल्या बाळाची प्रकृती खालावत असेल
  • तुमच्या लहान मुलाचा घसा खवखवत असेल
  • बाळाला घरघर लागून बाळाची त्वचा फिकट गुलाबी किंवा निळी दिसत असेल

निदान कसे होते?

बालरोगतज्ञ आपल्या बाळाचे तापमान तपासतील आणि तिच्या श्वासोच्छवासाचा नमुना पाहतील. बाळाच्या आरोग्याच्या स्थितीबद्दल अधिक स्पष्टतेसाठी, एक्सरे काढून घेण्यास सांगितले जाऊ शकते.

सर्दी, खोकला आणि चोंदलेल्या नाकासाठी घरगुती उपचारांचा अभ्यास प्रत्येक भारतीय घरात केला जातो. तथापि, चोंदलेल्या नाकावर अनेकदा घरगुती उपचारांचा उपयोग होत नाही. बाळांच्या बाबतीत काळजी आणि सावधगिरी बाळगली पाहिजे. लक्षणे कमी होत नसल्यास बालरोगतज्ञांस त्वरित भेट देणे आवश्यक आहे.

आणखी वाचा:

बाळांना होणाऱ्या बद्धकोष्ठतेवर १२ घरगुती उपाय
बाळांना होणाऱ्या डायपर रॅश साठी ९ परिणामकारक घरगुती उपाय

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article