Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ आरोग्य बाळांना होणाऱ्या डायपर रॅश साठी ९ परिणामकारक घरगुती उपाय

बाळांना होणाऱ्या डायपर रॅश साठी ९ परिणामकारक घरगुती उपाय

बाळांना होणाऱ्या डायपर रॅश साठी ९ परिणामकारक घरगुती उपाय

बाळांना डायपर रॅश येणे हे खूप सामान्य आहे. डायपर रॅश म्हणजे जननेंद्रिय आणि कुल्ल्यांजवळील भागात लाल पुरळ येतात. जरी डायपर रॅश येणे सामान्य असले तरीसुद्धा त्यावर उपचार होणे आवश्यक आहेत. तुमच्या घरात जर एखादे लहान बाळ असेल आणि तुम्ही त्याला बरेचदा डायपर लावत असाल तर डायपर रॅशवर उपचार कसे करावेत ते आपण शिकले पाहिजे कारण तुमच्या बाळाला डायपर रॅश होण्याची शक्यता आहे.

बाळांना डायपर रॅश होण्याची कारणे काय आहेत?

बाळांना डायपर रॅश होण्याची काही सामान्य कारणे खाली सूचीबद्ध आहेत.

  1. डायपर त्वचेवर घासला जाणे
  2. खूप वेळ ओले झालेले डायपर तसेच ठेवणे
  3. यीस्ट संसर्ग
  4. जिवाणू संसर्ग
  5. साबण, सुगंधित डायपर आणि वाईप्स

डायपर रॅशवर उपचार करण्याचे ९ नैसर्गिक मार्ग

ओले आणि गलिच्छ डायपर हे बाळांमध्ये डायपर रॅश होण्याचे मुख्य कारण आहे. फोड येऊन खाज सुटण्यापासून ते लहान पुरळ येईपर्यंतची ही सर्व लक्षणे डायपर रॅशची आहेत त्यामुळे जर डायपर रॅशवर वेळीच उपचार केले नाहीत तर त्यामुळे जिवाणूंचा संसर्ग होऊन डायपर रॅश होते आणि बाळांना अस्वस्थता वाटू शकते. डायपर रॅश वर इथे काही नैसर्गिक उपाय दिलेले आहेत ते तुम्ही करून बघू शकता.

. नारळ तेल

नारळ तेल

नारळ तेल बुरशी आणि जिवाणूंची वाढ रोखते. बाळांमधील डायपर रॅशवर तो एक सर्वात प्रभावी उपाय आहे. बाळाचा डायपर रॅश झालेला भाग कोमट पाण्याने धुवा आणि मऊ टॉवेलने कोरडे करा. पुढे, अर्धा चमचा नारळ तेल घ्या आणि बाळाला धुतल्यानंतर त्यास बाधित भागावर लावा. यीस्ट डायपर रॅशवर देखील नारळ तेल हा प्रभावी उपाय आहे.

. बाळाच्या अंघोळीच्या पाण्यात ओट्स घालणे

बाळाच्या अंघोळीच्या पाण्यात ओट्स घालणे

जाडेभरडे ओट्स हा बाळांच्या डायपर रॅशवर चाचणी करून बघितलेला उपाय आहे. ओट्स वेदनांपासून आराम देते. तुम्ही वाळलेल्या ओट्सचे पीठ एक चमचा घेऊ शकता आणि ते अंघोळीच्या पाण्यात मिसळू शकता. १० मिनिटांसाठी तुमच्या बाळास बाथटब मध्ये बसवा (तो खूप लहान असेल आणि समतोल राखू शकला नाही तर त्याला धरुन ठेवा) मग त्वचा हळूवारपणे कोरडी करा आणि घासू नका कारण घासण्यामुळे समस्या आणखी वाढेल. जर डायपर रॅश तीव्र असेल तर सर्वोत्तम परिणामासाठी दिवसातून दोनदा हा उपाय करून पहा.

. स्तनपान

स्तनपान

डायपर रॅशवर स्तनपान एक प्रभावी उपाय आहे. तुम्ही फक्त पुरळ आलेल्या भागावर आईच्या दुधाचे काही थेंब लावावे आणि ते कोरडे होऊ द्यावेत. हा उपाय करून झाल्यावर फ्रेश डायपर लावा.

. दही

दही

साधे दही (साखर आणि कॉर्नस्टार्च घातलेले नसावे ) डायपर रॅश आणि जळजळ होण्यावर उपचार करण्यासाठी वापरले जाऊ शकते. पुरळ आलेल्या भागावर दह्याचा जाड थर लावा आणि काही दिवसात पुरळ अदृश्य होईल. डायपर रॅश क्रीम जसे तुम्ही वापरता तसे साधे दही वापरू शकता. सामान्य तापमानाचे दही पुरळ आलेल्या भागावर लावून त्यावर तुम्ही डायपर लावू शकता.

. कोरफड

कोरफड

जर तुमच्या बाळाला डायपर रॅश सोबत सूज आलेली असेल तर कोरफड जेल वापरावा. तुम्ही एकतर ताजे कोरफड जेल किंवा बाजारात मिळणारे कोरफड जेल वापरू शकता दोन्ही नैसर्गिक आहेत आणि त्यामुळे तुमच्या बाळाला आराम पडेल.

. एप्सम सॉल्ट

एप्सम सॉल्ट

एप्सम सॉल्ट उच्च मॅग्नेशियम सामग्री आणि विरोधी दाहक गुणधर्मांकरिता ओळखले जाते. अंघोळीच्या कोमट पाण्यात अर्धा कप एप्सम सॉल्ट मिसळा आणि तुमच्या बाळाला त्यात १०१५ मिनिटे भिजवा. त्यानंतर बाळाला अंघोळ घाला आणि डायपर रॅशची समस्या कमी ठेवण्यासाठी आठवड्यातून दोन ते तीन वेळा त्याची पुनरावृत्ती करा.

. बेकिंग सोडा

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा पीएच पातळी संतुलित करण्यास मदत करते आणि बाळाच्या त्वचेतून नको असलेले जिवाणू आणि बुरशी काढून टाकते. कोमट पाण्यात दोन चमचे बेकिंग सोडा मिक्स करा आणि या द्रावणाने तुमच्या बाळाचे पुरळ नियमितपणे धुवा. ते कोरडे होऊ द्या आणि हा उपाय उत्तमरीत्या कार्य करेल.

. बाळाचे डायपर स्वच्छ ठेवा

बाळाचे डायपर स्वच्छ ठेवा

डायपर पुरळ सामान्यतः ओलसर डायपरमुळे उद्भवते. म्हणून तुमच्या बाळाला आंघोळ घातल्यावर किंवा बाळाचा डायपरकडील भाग स्वच्छ केल्यावर (आणि नवीन डायपर घालण्यापूर्वी) कोरडा करा. तसेच, बाळाला सौम्य साबण वापरा आणि बाळाचे डायपरचे क्षेत्र चांगले स्वच्छ करा (घर्षण नको!). डायपर वारंवार बदलण्याचे लक्षात ठेवा आणि अल्कोहोलआधारित वाइप्स वापरू नका.

9. डायपरमुक्त वेळ

डायपर-मुक्त वेळ

बाळांमध्ये डायपर पुरळ होण्याचे एक मुख्य कारण म्हणजे बाळाला डायपर लावल्यावर त्या भागाला हवा लागत नाही . म्हणून, काही डायपरमुक्त वेळ देणे आवश्यक आहे. डायपर बदलल्यानंतर तुमच्या बाळाला डायपरमुक्त होऊ द्या. त्यामुळे रॅश लवकर बरी होण्यास मदत होते.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

डायपर रॅश सामान्यत: बरी होते आणि काही दिवसातच नाहीशी होते. बहुतेक पालक डायपर रॅशसाठी घरगुती उपचारांचा अवलंब करतात, परंतु ते नेहमीच प्रभावी नसतात. तुम्हाला तुमच्या बाळामध्ये खालील लक्षणे दिसल्यास तुम्ही त्यास डॉक्टरकडे न्यावे:

  • ताप
  • फोड
  • सतत पुरळ
  • सूज

डायपर रॅश वर घरी सोप्या घरगुती उपायांच्या मदतीने उपचार करता येतात. वर नमूद केलेले उपाय वापरून पहा. तुमच्या बाळाला लवकरच बरे वाटेल. तथापि, जर डायपर रॅश तीव्र असेल (म्हणजेच तुम्हाला वरील लक्षणे दिसत असतील) आणि एका आठवड्यात ही लक्षणे नाहीशी झाली नाहीत तर बालरोगतज्ञाचा सल्ला घ्या.

आणखी वाचा:

केळं बाळांसाठी चांगले आहे का?
बाळांसाठी अद्रक – आरोग्यविषयक फायदे आणि सुरक्षिततेचे उपाय

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article