Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ आरोग्य बाळाला दात येत असताना ताप येणे

बाळाला दात येत असताना ताप येणे

बाळाला दात येत असताना ताप येणे

तुमचे बाळ चार ते सहा महिन्यांचे झाल्यावर त्याचे दात हिरड्यांमधून बाहेर येताना दिसू लागतात. बाळाला दात येताना इतर विविध लक्षणे सुद्धा दिसतात. बाळाला ताप येऊन बाळ चिडचिड करू लागते तसेच ते अस्वस्थ सुद्धा होते. ह्या अशा लक्षणांमुळे बाळ विक्षिप्त बनते. दात येत असताना बाळाला वेदना होतात. बाळाला दात येतानाची लक्षणे कोणती आहेत हे तुम्हाला माहिती असेल तर बाळाच्या वेदना कमी करण्यासाठी तुम्हाला त्याची मदत होईल.

दात येण्यामुळे बाळांना ताप येतो का?

बाळांना दात येताना ताप येतो का?” हा प्रश्न बऱ्याच पालकांना पडतो कारण अनेकांना त्यांच्या बाळांना दात येत असताना हलका ताप येत असल्याचे लक्षात आले आहे. परंतु, दात येण्यामुळे बाळाला ताप येतो ह्यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. दात येताना शरीराचे तापमान किंचित वाढू शकते, परंतु ताप आला आहे असे समजण्याइतपत हे तापमान नसते. जर तुमच्या बाळाचे गुदाशयाचे तापमान १००.४ अंश फॅरेनहाइटपेक्षा जास्त असेल, तसेच अतिसार, भूक न लागणे, उलट्या होणे इ. लक्षणे असतील तर बाळाला वेगळा आजार झालेला असू शकतो. अशा परिस्थितीत कोणतीही गंभीर गुंतागुंत टाळण्यासाठी वैद्यकीय सल्ला घेणे चांगले.

दात येण्यामुळे बाळांना ताप येतो का?

लहान मुलांना दात येत असताना ताप येण्याची कारणे काय आहेत?

बाळाला दात येत असताना ताप येण्याची काही कारणे आहेत. हिरड्यांमधून दात बाहेर येत असताना हिरड्यांना जळजळ होते. त्यामुळे हलका ताप येऊ शकतो. दात येत असताना ताप येणे म्हणजे जीवाणूंविरूद्ध शरीराच्या संरक्षणाचा परिणाम देखील असू शकतो. जेव्हा हिरडीतून दात बाहेर येतो तेव्हा काही जीवाणू बाळाच्या रक्तात प्रवेश करतात. ह्या जिवाणूंविरूद्ध शरीर लढा देते त्यामुळे हलका ताप येऊ शकतो.

या व्यतिरिक्त, लाळेची अतिरिक्त निर्मिती होते. ही लाळ आतड्यापर्यंत पोहोचते आणि तुमच्या बाळाला शौचास सैल होते. परंतु, अतिसार झाल्यावर जसे बाळास शौचास होते तसे दात येताना होत नाही.

लहान मुलांमध्ये दात येताना येणारा ताप किती काळ टिकतो?

दात येण्याआधी बाळांच्या हिरड्या फुगतात तसेच बाळाच्या हिरड्यांमध्ये जळजळ होते. बाळाला वेदना सुद्धा होतात. ताप कमी होण्यापूर्वी एक किंवा दोन दिवस टिकतो. दात येत असताना प्रत्येक वेळी, तुमच्या बाळाला सौम्य ताप येत असल्याचे तुमच्या लक्षात येईल.

नवजात बाळांमध्ये दात येत असताना येणाऱ्या तापावर कसा उपचार करावा?

दात येताना ताप आल्यावर, त्यावर उपचार करण्यासाठी तुम्हाला औषधे घ्यावी लागत नाहीत. बाळाला ताप आल्यावर गोळ्या घेण्याची शिफारस केली जाते परंतु त्याचा खरंच किती फायदा होतो ह्याचा कुठलाही पुरावा नाही.

बाळाला वेदना होत असल्याने बाळ हातात येईल त्या गोष्टी चावू शकते. ही त्याची इच्छा शांत करण्यासाठी तुम्ही त्याला सुरक्षित प्लास्टिक किंवा रबरची खेळणी द्यावीत. पॅसिफायर्स आणि गोठवलेल्या रिंगांमुळे तुमच्या बाळाच्या हिरड्यांची जळजळ कमी होते आणि त्यांचे लक्ष विचलित होते. लहान तुकडे होतील अशी कोणतीही खेळणी बाळाला देऊ नका. त्यामुळे तुमच्या बाळाला गुदमरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

तुम्ही तुमचे बोट थंड पाण्यात बुडवून तुमच्या बाळाच्या हिरड्यांना हळूवारपणे मसाज करू शकता. त्यामुळे बाळाच्या वेदना कमी होऊ शकतील. बाळाला होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी कुठली मलमे लावावीत ह्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

नवजात बाळांमध्ये दात येत असताना येणाऱ्या तापावर कसा उपचार करावा?

जर तुम्हाला तुमच्या बाळाच्या चेहऱ्यावर, विशेषत: हनुवटीवर लाळेमुळे जास्त पुरळ दिसत असतील तर, त्यावर उपचार करण्यासाठी तुम्ही सौम्य क्रीम किंवा पेट्रोलियम जेली वापरू शकता. परंतु वापरण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे जरुरीचे आहे. लाळ काढून टाकण्याचे लक्षात ठेवा. पुरळ आलेला भाग चोळू नका कारण त्यामुळे रॅश जास्त वाढेल.

लवकर बरे वाटण्यासाठी खालील चुका टाळा

आपल्या बाळाला लवकरात लवकर बरे वाटावे अशी पालकांची इच्छा असते आणि त्यासाठी पालक सर्व काही करतात. परंतु, दात येताना आपल्या बाळाला त्रास होऊ नये म्हणून खालील गोष्टी टाळा.

  • खोलीचे तापमान खूप कमी ठेवा: तुमच्या बाळाच्या खोलीचे तापमान नेहमी ६५ ते ७० डिग्री फॅरेनहाइट दरम्यान असावे. ह्या तापमानामुळे त्याला आरामदायक वाटण्यास मदत होऊ शकते
  • प्रौढांसाठी औषधे: तुमच्या बाळाला कोणत्याही परिस्थतीत प्रौढांसाठी असलेली औषधे कधीही देऊ नका. तुमच्या बाळाला कोणतीही औषधे देण्या आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या
  • थंड पाणी: तुमच्या बाळाला बरे वाटण्यासाठी त्याला थंड पाणी देऊ नका. ६ महिन्यांपेक्षा लहान बाळांना पाणी देऊ नका. त्याऐवजी तुम्ही त्याला स्तनपान किंवा फॉर्म्युला देऊ शकता. जर तुमच्या बाळाचे वय ६ महिन्यांपेक्षा जास्त असेल, तर तुम्ही त्याला साधे पाणी देऊ शकता, कारण थंड पाण्यापेक्षा तो आरोग्यदायी पर्याय आहे

डॉक्टरांना कधी फोन कराल?

दात येत असताना बाळ विक्षिप्त होणे किंवा त्याचा मूड चांगला नसणे हे सामान्य आहे. त्याला वेदना होत असल्याने ते साहजिकच आहे. परंतु, दात येताना तुमच्या बाळामध्ये खालील लक्षणे दिसल्यास, ते आणखी कशाचेतरी लक्षण असू शकते आणि म्हणूनच लवकरात लवकर वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे.

  • तुमचे बाळ 3 महिन्यांपेक्षा लहान आहे आणि त्याच्या शरीराचे तापमान १००.४ डिग्री फॅरेनहाइट किंवा त्याहून अधिक असल्यास
  • तुमचे बाळ ३ महिन्यांपेक्षा मोठे आहे आणि त्याच्या शरीराचे तापमान १०२ अंश फॅरेनहाइट किंवा त्याहून अधिक असल्यास
  • ताप २४ तासांपेक्षा जास्त काळ टिकत असल्यास
  • तुमच्या बाळाला तापासोबत उलट्या, पुरळ आणि जुलाब होत असल्यास
  • तुमचे बाळ खूप थकलेले आणि आजारी दिसत असल्यास
  • जर टिथिंग रिंग वापरून किंवा इतर उपाय करूनही बाळ शांत होत नसल्यास

जोपर्यंत बाळाच्या शरीराचे तापमान नमूद केलेल्या मर्यादेखाली असते तोपर्यंत बाळांना दात येताना ताप येणे ही गंभीर आणि चिंता करण्यासारखी गोष्ट नसते. परंतु, जर इतर लक्षणांसह बाळाला ताप सुद्धा जास्त येत असेल, तर तुमच्या बाळाला कोणतीही गंभीर समस्या नाही ना ह्याची खात्री करण्यासाठी वैद्यकीय मदत घेणे गरजेचे आहे.

आणखी वाचा:

बाळाला दात येतानाची ९ लक्षणे
बाळांना उशिरा दात येण्यामागची कारणे आणि गुंतागुंत

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article