In this Article
बाळ साधारणपणे सहा महिन्यांचे असताना बाळाचा पहिला दात दिसू लागतो. प्रत्येक बाळ वेगळे असते, त्यामुळे काही बाळांना उशीरा दात येण्यास सुरुवात होऊ शकते. परंतु, जर तुमचे बाळ पंधरा महिन्यांचे झाले असेल आणि तरीही दात येण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसतील, तर ते चिंतेचे कारण असू शकते.
व्हिडिओ: लहान मुलांमध्ये उशीरा दात येणे– कारणे आणि गुंतागुंत जाणून घ्या
उशीरा दात येणे म्हणजे काय?
जेव्हा बाळाला दुधाचा पहिला दात येतो तेव्हा बाळाला दात येत आहेत असे म्हटले जाते. तुमचे बाळ जेव्हा साधारणपणे ६ महिन्यांचे होते तेव्हा त्याला पहिला दुधाचा दात येतो. बाळाच्या पहिल्या वाढदिवसानंतर बाळाला दुधाचा दात येणे हे काही असामान्य नाही. परंतु काही बाळांना ते १५ महिन्यांचे झाल्यावर पहिला दात येतो आणि तेव्हा बाळाला उशिरा दात आले असे म्हणतात.
दात येण्याच्या कालावधीचा तक्ता
वरचा जबडा | दात येण्याचा कालावधी |
दात पडण्याचा कालावधी
|
मधले पटाशीचे दात | ८-१२ महिने | ६-७ वर्षे |
कडेचे पटाशीचे दात | ९-१३ महिने | ७-८ वर्षे |
सुळे | १६-२२ महिने | १०-१२ वर्षे |
दाढा | १३-१९ महिने | ९-११ वर्षे |
उपदाढा | २५-३३ महिने | १०-१२ वर्षे |
खालचा जबडा | दात बाहेर येण्याचा कालावधी |
दात पडण्याचा कालावधी
|
उपदाढा | २३-३१ महिने | १०-१२ वर्षे |
दाढा | १४-१८ महिने | ९-११ वर्षे |
सुळे | १७-२३ महिने | ९-१२ वर्षे |
कडेचे पटाशीचे दात | १०-१६ महिने | ७-८ वर्षे |
मधले पटाशीचे दात | ६-१० महिने | ६-७ वर्ष |
आणखी वाचा: बाळाला दात येतानाची ९ लक्षणे
बाळांना उशीरा दात येण्याची कारणे
काही बाळांचा विकास उशिरा होतो त्यामुळे त्यांना दात काही कारणाने उशिरा येतात. याशिवाय, बाळांना उशीरा दात येण्याची काही इतर कारणे खाली दिलेली आहेत.
१. आनुवंशिक घटक
जर तुमच्या कुटुंबात उशिरा दात येण्याची अनुवंशिकता असेल, तर तुमच्याही मुलाला दात उशिरा आल्यास त्यात काही आश्चर्य वाटायला नको. तुमच्या मुलाला पहिला दात उशिरा येण्यास तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी तसेच तुमच्या पतीची कौटुंबिक पार्श्वभूमी जबाबदार असू शकते. तुमच्या पालकांना किंवा नातेवाईकांना हीच समस्या आली होती का हे विचारा आणि जर त्याचे उत्तर होय असेल तुमच्या मुलाला दात उशिरा येण्यामागचे ते एक कारण असू शकते.
आणखी वाचा: बाळाला दात येतानाचा क्रम
२. कुपोषण
जर तुमच्या बाळाला पुरेसे आईचे दूध मिळत नसेल, किंवा तो घेत असलेल्या फॉर्म्युल्यामध्ये त्याच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी पौष्टिक मूल्ये नसतील तर बाळाला दात येण्यास उशीर होऊ शकतो. आईच्या दुधात कॅल्शियम असते आणि तुमच्या बाळाला त्याचे दात आणि हाडांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी त्याची गरज असते. बाळाच्या फॉर्म्युलामध्ये सामान्यत: कॅल्शियम, फॉस्फरस आणि ए, सी, डी सारखी जीवनसत्वे असे पोषक घटक असतात. ही जीवनसत्वे हाडे आणि ऊतकांची वाढ, दुरुस्ती, प्रतिकारशक्ती आणि तुमच्या मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी मदत करतात. मजबूत आणि निरोगी दातांसाठी कॅल्शियम विशेष महत्वाचे आहे. परंतु तुम्ही वापरत असलेल्या फॉर्म्युल्यामध्ये हे सर्व पौष्टिक घटक नसतील किंवा तुमचे बाळ ते पुरेश्या प्रमाणात सेवन करत नसेल, तर बाळाला दात येण्यास विलंब होऊ शकतो.
आणखी वाचा: बाळांना दात येतानाची लक्षणे आणि घरगुती उपाय
३. हायपोथायरॉईडीझम आणि हायपोपिट्युटारिझम
हायपोथायरॉईडीझम ह्या आरोग्यविषयक समस्येमध्ये थायरॉईड ग्रंथी शरीराला सामान्यपणे कार्य करण्यासाठी पुरेशा प्रमाणात थायरॉईड संप्रेरक तयार करत नाहीत. हायपोथायरॉईडीझम सहसा हृदयाची गती, चयापचय आणि शरीराचे तापमान प्रभावित करते. जर तुमच्या बाळाच्या थायरॉईड ग्रंथींचे काम नीट होत नसेल, तर बहुधा त्याला चालणे, दात येणे आणि अगदी बोलणे ह्यासारखे अनेक टप्पे गाठण्यास उशीर होतो.
हायपोपिट्युटारिझम ह्या समस्येमध्ये पिट्यूटरी ग्रंथीद्वारे तयार होणाऱ्या आठ संप्रेरकांपैकी एक किंवा एकापेक्षा जास्त संप्रेरके योग्य प्रमाणात तयार होत नाहीत. त्यामुळे संप्रेरकांच्या कमतरतेशी संबंधित अनेक रोग आणि समस्या उद्भवू शकतात उदा: लठ्ठपणा, उच्च कोलेस्टेरॉल इत्यादी.
आणखी वाचा: अतिसार (जुलाब होणे) हे दात येण्याचे लक्षण आहे का?
४. इतर कारणे
दात उशिरा येण्यामागे काही विकार किंवा वैद्यकीय समस्या असू शकतात. उदा: डाऊन सिंड्रोम. हा सिंड्रोम हिरड्या किंवा जबड्याच्या हाडातील शारीरिक अडथळ्यामुळे देखील होऊ शकतो. ह्यामुळे दात बाहेर पडत नाहीत.
उशीरा दात येण्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या
- दात उशिरा आल्यास ते वाकडे वाढतात
- तुमच्या बाळाला त्याचे अन्न नीट चावता यावे यासाठी दुधाचे दात देखील आवश्यक असतात. दात उशिरा आल्यास बाळाला घनपदार्थ नीट चावता येत नाहीत
- काहीवेळा, बाळाला उशीर झालेल्या दातांसोबत कायमस्वरूपी दातांचा संच दिसून येतो, त्यामुळे बाळांच्या जबड्यामध्ये दातांच्या दोन ओळी दिसतात
डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
उशिरा दात येण्याची समस्या आनुवंशिक नाही ना हे माहिती करून घेण्यासाठी आपल्या पालकांशी आणि नातेवाईकांशी संपर्क साधा. जर तसे नसेल आणि तुमचे बाळ १५ महिन्यांपेक्षा मोठे असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वजन वाढणे (जेव्हा तुमचे बाळ खात नाही), सर्वांगीण विकासास विलंब, असामान्य चयापचय आणि आळस यासारखी लक्षणे बाळामध्ये आढळतात का ते पहा. बरेच लोक उशीरा दात येणे हे बुद्धिमत्तेचे लक्षण मानतात, परंतु ते तसे असेलच असे नाही. काहीवेळा, उच्च बुद्ध्यांक असलेल्या बाळांची वाढ वेगाने होते, तर इतर बाळांची वाढ हळू होते.
तुमच्या बाळाला दात उशिरा येत असल्यास तुम्हाला चिंता वाटू शकते. तुमच्या बाळाकडे लक्ष द्या. बाळाचे कर्कश रडणे, बद्धकोष्ठता किंवा असामान्य हृदय गती यांसारख्या कोणत्याही असामान्य लक्षणांवर लक्ष ठेवा. तुमचा कौटुंबिक इतिहास बघा. उशिरा दात आलेल्या नातेवाईकांची नोंद ठेवा. जर ही सर्व लक्षणे सकारात्मक असतील तर तुमच्या मुलाला उशिरा दात येण्याची शक्यता आहे असे समजा. आणि तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
आणखी वाचा: तुमच्या बाळाचे दात कसे स्वच्छ करावेत: दात घासण्यास कधी सुरुवात करावी आणि ते कसे घासावेत?