Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home अन्य बाळांना दात येतानाची लक्षणे आणि घरगुती उपाय

बाळांना दात येतानाची लक्षणे आणि घरगुती उपाय

बाळांना दात येतानाची लक्षणे आणि घरगुती उपाय

बाळ झाल्यावर विविध टप्पे असलेल्या एका सुंदर प्रवासास सुरुवात होते. प्रत्येक क्षण वेगळा असतो आणि तुम्ही प्रत्येक टप्प्यावर नवीन काहीतरी शिकत असता. तुम्ही मातृत्वाच्या ह्या प्रवासात नवीन आहात, त्यामुळे बाळाच्या प्रत्येक गोष्टीविषयी तुम्हाला काळजी वाटणे साहजिक आहे. दात येताना बाळ अस्वस्थ होते आणि त्यामुळे आईला काळजी वाटते. बाळाचे दात येतानाचा काळ कसा हाताळावा ह्याविषयी लोक तुम्हाला खूप सल्ले देतील, परंतु तरीही तुम्ही विश्वसनीय स्रोत शोधात असाल तर ह्या लेखामुळे तुम्हाला हा टप्पा कसा हाताळावा ह्याविषयी मदत होईल. इथे आम्ही त्याविषयी मार्गदर्शिका देत आहोत. दात येणे म्हणजे काय इथपासून घरगुती उपायापर्यंत तुम्हाला इथे सगळी माहिती मिळेल. मग, वाट कसली बघताय? चला तर मग सुरुवात करूयात!

तुमच्या बाळाचा पहिला दात येणे हा तुमच्या आईपणाच्या प्रवासातील सर्वात आनंदाचा टप्पा आहे. तथापि, ह्या कालावधीत सुद्धा बाळ अस्वस्थ होणार आहे आणि जेव्हा बाळ रडत असेल किंवा चिडचिडे होत असेल तर तुम्हाला त्याला शांत करणे जरुरीचे आहे.

बाळाचे दात येण्यास केव्हा सुरुवात होते?

प्रत्येक बाळाच्या वाढीचा स्वतःचा असा वेग असतो आणि तुमच्या बाळाला दात येण्यास सुरुवात होण्याचे असे कोणतेच विशिष्ट वय नसते.

बाळाला कुठल्या महिन्यात दात येतात?

बाळ जेव्हा ४ते ७ महिन्यांचे होते तेव्हा बाळाचा पहिला दात येण्यास सुरुवात होते. खूप कमी वेळा असे आढळते की बाळाच्या दात येण्याची सुरुवात बाळ एक वर्षांचे झाल्यावर सुरु होते. असेही काही वेळा आढळले आहे की जन्माच्या वेळेला बाळाचा पहिला दात दिसतो परंतु ह्या दोन्ही गोष्टी खूप दुर्मिळ आहेत.

बाळाची दात येण्याची सुरुवात लवकरात लवकर केव्हा होऊ शकते?

बाळाला दात येण्याची सुरूवात ४ थ्या महिन्यात होते, परंतु तुमच्या बाळाला लवकरात लवकर म्हणजे तिसऱ्या महिन्यात सुद्धा दात येण्यास सुरुवात होऊ शकते. दुसऱ्या महिन्यात दात येण्यास सुरुवात झालेले बाळ सुद्धा तुम्हाला दिसू शकते. ज्या बाळांना लवकर दात येण्यास सुरुवात होते त्यांना जन्मतःच हिरड्यांवर छोटा उंचवटा असतो. त्यास इंग्रजीत ‘Pre – teeth’ असे म्हणतात. जर तुमच्या बाळाला दुसऱ्या किंवा तिसऱ्या महिन्यात दात येताना आढळले तर घाबरून जाऊ नका ते अजिबात असामान्य नाही.

हे महत्वाचे आहे की जेव्हा बाळ पोटात असते तेव्हा बाळाला दात विकसित होण्यास सुरुवात होते. किंबहुना, ह्या काळात हिरड्यांमधून दात बाहेर येऊ लागतो. बाळाला दात येण्याची प्रक्रिया सुरु झाल्यावर पहिला दात येतो, सगळे दात दिसू लागण्यास एक महिन्याचा कालावधी लागतो.

बाळाला पहिले दात कुठले येतात?

बाळाला आधी खालचे दात येतात. खालच्या बाजून दोन दात पहिल्यांदा दिसू लागतात.

बाळाचे दात कुठल्या क्रमाने येतात?

इथे बाळाचे दात येण्याचे वेळापत्रक दिले आहे ते तुम्ही लक्षात घेतले पाहिजे जेणेकरून तुम्ही वेगवेगळ्या टप्प्यांसाठी तयार रहाल

  • ७ महिने: दात येण्यास सुरुवात होते. पहिल्यांदा खालचे दोन दात एकाच वेळेला येतात
  • १२ महिने: वरचे दात येण्यास सुरुवात होते आणि ते स्पष्ट दिसू लागतात
  • १६ महिने: मधले दात वर येऊ लागतात
  • १३१९ महिने: बाळाला वरच्या आणि खालच्या दाढा येतात
  • १६२३ महिने: ह्या कालावधीत टोकदार दात येतात ज्यांना सुळे म्हणतात
  • २३३१ महिने: खालच्या दाढा येतात (Second Molar)
  • २५३३ महिने: वरच्या दाढा येतात (Second Molar)

तीन वर्षांनंतर, तुमच्या बाळाला साधारणपणे २० दात येतात. ४थ्या वर्षी जबड्याचे आणि चेहऱ्याचे हाड वाढते, अशाप्रकारे नवीन दात येण्यास जागा तयार होते.

जर तुम्हाला दात येण्याच्या प्रक्रियेच्या टप्प्यांबद्दल माहिती हवी असेल किंवा जर तुम्हाला बाळाचा कुठला दात केव्हा आला ह्याची नोंद ठेवायची असेल तर तुम्ही बेबी टीदिंग टूल वापरू शकता. तुम्हाला दात येण्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांची माहिती तर मिळेलच, परंतु तुम्हाला प्रत्येक टप्प्याचा सामना कसा करावा ह्याबद्दल टिप्स सुद्धा मिळतील. तुम्हाला माहितीच असेल की दात येण्याची प्रक्रिया ही खूप मोठी आहे आणि तुमच्या बाळासाठी ती वेदनादायी ठरू शकते. परंतु तयारी असायला काय हरकत आहे, हो की नाही?

बाळाला दात येत असल्याची १३ लक्षणे

आई म्हणून, तुम्ही स्वतःला दात येण्याच्या लक्षणे माहिती करून घेऊन स्वतःला तुम्ही लवकरात लवकर तयार करू शकता. ह्यामुळे तुमच्या बाळाला वेळेवर तयार करण्यास तुम्हाला मदत होईल. म्हणून, खालील १३ लक्षणांची ओळख तुम्हाला करून देऊ जी लक्षणे तुम्हाला तुमच्या बाळामध्ये दिसतील.

बाळाला दात येत असल्याची १३ लक्षणे

. लाळ येत असल्यास

बाळाच्या तोंडातून लाळ येत असल्यास दात येण्यास सुरुवात होते. हे सर्वात सुरुवातीचे लक्षण आहे. जेव्हा बाळे १० आठवड्यांची होतात तेव्हा त्यास सुरुवात होऊ शकते. तुमच्या लाळ गाळणाऱ्या बाळाला लाळेरं (बीबी) लावून तुम्ही मदत करू शकता. ओलसर कपड्यांमुळे बाळाला त्रास होतो कारण आधीच दात येण्याच्या त्रासामुळे बाळ अस्वस्थ असते.

. सुजलेल्या हिरड्या

जर बाळाच्या हिरड्या लाल झाल्या आणि त्यांना सूज आली असेल तर ह्याचा अर्थ तुमच्या बाळाला दात येत आहेत . तुमच्या तर्जनीने सूज आलेल्या भागाला थोडा मसाज केल्यास आराम पडू शकतो.

. हिरड्यांमध्ये दात येताना दिसू लागणे

तुमच्या बाळाच्या हिरड्यांच्या खाली फिकट पांढरट मांस दिसत असल्यास ते दात येण्याचे चांगले लक्षण आहे.

. वेदना

बाळांचे दात येण्याचे अजून एक लक्षण म्हणजे बाळाला वेदना होतात. दात बाहेर येताना हिरड्या भेदून बाहेर येतो त्यामुळे बाळाला अस्वस्थता येणे आणि बाळ चिडचिडे होते.

. झोपताना बाळ चिडखोर होते

हो, दात येत असताना तुमचे बाळ रात्रभर जागे राहते. ह्या दात येण्याच्या अस्वस्थतेमुळे तुमचे बाळ रात्रभर जागे राहते.

. चावण्यास तयार होते

जेव्हा बाळाला दात येण्यास सुरुवात होते तेव्हा बाळे जे हातात येईल ते चावण्यास सुरुवात करतात.

. खाण्याचे प्रश्न

ह्या अस्वस्थतेमुळे दात येताना बाळ अन्न खाण्यास तयार होत नाही

. कान ओढणे

बऱ्याच वेळा कान ओढणे हे कान दुखीचे कारण असू शकते परंतु ते बाळाला दात येऊ लागल्यामुळे सुद्धा असू शकते

. रॅशेस

दात येताना चेहऱ्याजवळ रॅशेस येऊ लागतात (इंग्रजीमध्ये Dribble Rashes म्हणून सुद्धा ओळखल्या जातात)

१०. रडणे

जेव्हा कानाचे दुखणे असह्य होते तेव्हा मुलांना ते सहन होत नाही आणि मुले वारंवार रडू लागतात. जर तुम्हाला लक्षात आले की तुम्हाला बाळ रडण्याचे नक्की कारण कळत नाहीये तर तुम्ही दात येण्याची इतर लक्षणे तपासून पाहू शकता

११. गाल चोळणे

दातांच्या नसा गालापर्यंत जातात. ह्या नसा दात येताना दुखू शकतात त्यामुळे बाळ गाल चोळू लागते

१२. खोकला

काही बाळे दात येत असताना थोडे खोकताना

१३. ताप

काही बाळांना दात येत असताना ताप येतो. जर ताप खूप जास्त आला तर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधू शकता.

दात येताना ताप येऊन जुलाब होतात का?

तुम्हाला आई म्हणून हे लक्षात येत असेल की दात येताना पोट बिघडते आणि ताप येतो आणि तुम्हाला प्रश्न पडतो की दात येताना नेहमीच ताप आणि जुलाब होतात का. तथापि, प्रत्येक दात येणाऱ्या बाळामध्ये असे होण्यासाठी काहीही ठोक कारण नाही. बऱ्याच बाळांना दात येताना ताप येतो, परंतु बरीचश्या बाळांना अगदी सहजपणे दात येण्याची प्रक्रिया होते. जुलाब होण्यामागे असेही कारण असू शकते की बाळाने एखादी घाणेरडी वस्तू चावली असेल आणि त्यामुळे बाळाचे पोट बिघडले असेल. जर ताप आणि जुलाब सुरूच राहिले तर डॉक्टरांशी संपर्क साधू शकता.

दात येणाऱ्या बाळाला कसे शांत करावे?

तुम्ही तुमच्या बाळाला शांत करण्याचे अनेक मार्ग आहेत आणि त्यामुळे बाळाला आराम पडू शकतो. इथे आम्ही तुम्हाला काही टिप्स देत आहोत.

दात येणाऱ्या बाळाला कसे शांत करावे?

दात येणाऱ्या बाळाला मदत करण्यासाठी काही मार्ग

  • बाळाच्या हिरड्यांवर स्वच्छ बोट फिरवा. त्यामुळे तुम्हाला बाळाचे दुखणे कमी होण्यास मदत होईल.
  • हिरड्यांवर चोळण्यासाठी थंड कापड घ्या. तुम्ही थंड केलेली रिंग किंवा थंड केलेला चमचा हिरड्यांना आराम पडावा म्हणून वापरू शकता, तुम्ही जे वापरता त्यातील काहीच फ्रोझन नसावे.
  • तुमच्या बाळाने गोष्टी कुरतडायला सुरुवात केली असेल तर तुम्ही त्यांना चावता येईल अशा गोष्टी देऊ शकता उदा:काकडी
  • लाळ गळत असल्यास त्वचेला रॅशेस येऊ शकतात. लाळ स्वच्छ करण्यासाठी तुम्ही स्वच्छ कपडा हातात ठेवा आणि त्यामुळे बाळाची अस्वस्थता कमी होईल.

बाळांची वेदना कमी करणे

औषधांच्या दुकानात वेदना कमी करण्यासाठी काही औषधे मिळतील ती तुमच्या बाळाला देण्याचा विचार करू शकता. असिटॅमिनोफेन, आयबुप्रोफेन किंवा ऍडविल ही औषधे बाळाला वेदनेचा सामना करण्यासाठी मदत करू शकतात. मुलांसाठी मोट्रीन दिल्यास त्यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते. ही औषधे विकत घेण्याआधी तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधने महत्वाचे आहे. तसेच दात येणाऱ्या बाळासाठी अनेक घरगुती उपचार आहेत आणि ज्यामुळे ह्या टप्प्यावरील ताण कमी होतो.

  • तुमच्या बाळाला असा आहार द्या ज्यामुळे सूज येणार नाही. ताजी फळे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या देणे ही एक चांगली कल्पना आहे.
  • बाळाला पुरेसा आराम मिळतो आहे ह्याची खात्री करा. जे बाळ आरोग्यपूर्ण आणि पोषक आहार घेते आणि छान विश्रांती घेते ते बाळ हा टप्पा नीट पार करू शकते.
  • तुमच्या बाळाची प्रतिकार यंत्रणा मजबूत आहे ह्याची खात्री करा. तुमच्या बाळाच्या आहारात तुमच्या बालरोगतज्ञांशी संपर्क साधून व्हिटॅमिन डी च्या पूरक गोळ्यांचा समावेश करा.
  • तुम्ही स्तनपान देत रहा त्यामुळे सुद्धा मदत होते!
  • तुमच्या बाळाला थंड भाज्या चावण्यास द्या आणि त्यामुळे हिरड्यांना आराम पडण्यास मदत होईल.

तुम्ही बाळाला चावण्यास देण्यासाठी नैसर्गिक लाकडाचा वापर करू शकता.

बाळांना उशिरा दात येणे

तुमचे बाळ वर्षाचे होऊनसुद्धा जर तुमच्या बाळाला दात येण्यास सुरुवात झालेली नसेल तर बाळाला उशिरा दात येण्याची बरीच कारणे आहेत. हे आनुवंशिक असू शकते किंवा पोषण नीट झालेले नसते. हायपरथायरॉईडीसम हे सुद्धा बाळाला उशिरा दात येण्याचे कारण असू शकते. तुमच्या बालरोगतज्ञांना भेटून उशिरा दात येण्याची कारणे जाणून घ्या. काळजी करण्याजोगा हा प्रश्न नाही परंतु असे का होते हे माहिती केल्याने तुम्हाला मदत होईल

बाळाच्या दातांची काळजी काळजी कशी घ्याल

बाळाच्या दातांची काळजी घेणे हा बाळाच्या दैनंदिनीचा नियमित भाग करा. ओला कपडा किंवा कापसाचे तलम कापडाने तुमच्या बाळाच्या हिरड्यांना दिवसातून दोन वेळा मसाज द्या, विशेषकरून स्तनपान दिल्यानंतर आणि बाळाला झोपवण्याआधी हे करा. जेव्हा पहिला दात येतो तेव्हा छोटा हॅण्डल असलेला छोटा मऊ ब्रश खरेदी करा जो सहजपणे बाळाच्या तोंडात जाईल. बाळ तीन वर्षांचे झाल्यानंतर फ्लोराईड टूथपेस्ट वापरा.

जेव्हा तुमचे बाळ एक वर्षांचे होते तेव्हा तुमच्या दंतवैद्यांची भेट घ्या

दात येणे हा तुमच्या बाळासाठी महत्वाचा टप्पा आहे. तुमच्या बाळाची अस्वस्थता संयमाने घेत आहात ह्याची खात्री करा म्हणजे हा प्रवास तुमच्यासाठी आणि बाळासाठी सोपा होईल.

आणखी वाचा:

बाळाने तोंडात हात घालण्याची कारणे आणि उपाय
बाळांना होणारी सर्दी: कारणे, उपचार आणि घरगुती उपाय

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article