In this Article
गरोदरपण आणि प्रसूतीचा अनुभव हा एक असा अनुभव आहे की जो सर्वोच्च आनंदासोबत वेदना आणि तणाव सुद्धा घेऊन येतो. आतापर्यंत नऊ महिने पोटात सुरक्षित वाढवलेल्या बाळाची जबाबदारी प्रसूतीनंतर अचानक तुमच्यावर येते. ह्या बाहेरच्या जगात प्रवेश झाल्याबरोबर बाळाची बऱ्याच गोष्टींबाबत असुरक्षितता वाढते. तुमच्या बाळाची प्रतिकारप्रणाली हळूहळू विकसित होत असते आणि म्हणूनच जिवाणू आणि इतर हानिकारक गोष्टीचा बाळाच्या शरीरात प्रवेश होऊ नये म्हणून बाळाचे संरक्षण करणे जरुरी असते.
बाळाच्या बाटल्या निर्जंतुकीकरणाची कारणे
या जगात प्रवेश केल्यापासून लहान मुले बाह्य वातावरणास असुरक्षित असतात. बाटल्या निर्जंतुक करण्याची का आवश्यकता आहे ह्याची कारणे खाली दिली आहेत.
- हानिकारक सूक्ष्मजीव बाटलीवर जमा होतात. तुमच्या बाळाच्या शरीरात ह्या जिवाणू आणि विषाणूंच्या प्रवेशामुळे बाळाला उलट्या आणि अतिसार होऊ शकतो. म्हणून, बाळाला बाटली देण्यापूर्वी निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे
- जेव्हा बाळ जन्माला येते तेव्हा आई कडून मिळालेला प्रतिपिंडांचा साठा जन्मानंतर च्या काही महिन्यातच कमी होतो
- आपल्या घरात जे पाणी मिळते ते दूषित असू शकते आणि त्यामध्ये रोगास कारणीभूत सूक्ष्मजंतू असू शकतात. त्यामुळे आपण न विसरता बाटल्या निर्जंतुक केल्या पाहिजेत.
बाहेरील गोष्टी शरीरात सर्वप्रथम तोंडातून जातात त्यामुळे बाळाच्या तोंडात जाणाऱ्या गोष्टीची अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. निर्जंतुकीकरण केल्याने ह्या सूक्ष्मजंतूंना मारण्यास मदत होते आणि बाटली संपूर्णपणे स्वच्छ होते.
बाळाच्या बाटल्या किती वेळा निर्जंतुकीकरण कराव्यात?
प्रत्येकजण निर्जंतुकीकरण महत्वाचे आहे ह्यावर सहमत आहे, परंतु हे किती वेळा करावे ह्यावर तज्ञांचे मत भिन्न आहे. ह्या विषयवार तज्ञांची मते दोन भिन्न प्रकारात विभागली आहेत.
- फक्त एकदाः अमेरिकन अकॅडमी ऑफ़ पेडियाट्रिक्सच्या मते, आपल्याला प्रत्येक वेळेला बाळाला दूध पाजल्यावर बाळाची बाटली फक्त गरम पाण्याने आणि साबणाने धुवावी लागेल आणि त्यास सतत निर्जंतुकीकरण करण्याची आवश्यकता नाही. या सूचनेमागील तर्क आहे की, आपल्यासाठी पिण्यासाठी असलेले पुरेसे शुद्ध पाणी बाळासाठी तितकेच योग्य आहे.
- आठवड्यातून एकदा: काही डॉक्टरांना वाटते की फक्त एकदाच बाटल्या निर्जंतुक सुरक्षित करणे नाही. आपल्या अनमोल छोट्या बाळाच्या आरोग्यासंदर्भातील गोष्टी इतक्या सहज घेतल्या जाऊ शकत नाहीत. निर्जंतुकीकरणामुळे आपल्या बाळाची रोगप्रतिकारक शक्तीच्या वाढीस प्रतिबंधित होत नाही आणि आपल्या मुलास जीवघेणा रोगाचा प्रतिबंध करण्यास मदत करू शकते
बाळाच्या बाटल्यांचे निर्जंतुकीकरण कसे करावे?
निर्जंतुकीकरण म्हणजे बाटल्या, झाकण, टिट्स, पॅसिफायर्स इत्यादींच्या पृष्ठभागास चिकटून राहणाऱ्या सूक्ष्मजंतूंची हत्या करण्याची प्रक्रिया होय. बाटल्यांचे निर्जंतुकीकरण वेगवेगळ्या पद्धतीने केले जाऊ शकते जसे की उकळणे, वाफवणे किंवा बाटल्या मायक्रोवेव्हमध्ये ठेवणे. वरील सर्व पद्धती तितक्याच प्रभावी आहेत त्यामुळे आपण वैयक्तिक प्राधान्य आणि उपलब्धतेच्या आधारावर निर्जंतुकीकरणाची आपली पद्धत निवडू शकता.
बाळाच्या बाटल्या निर्जंतुक करण्याच्या पद्धती
बाळाच्या बाटल्या निर्जंतुकीकरण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काही पद्धती
१. उकळणे:
बाळाच्या बाटल्या निर्जंतुक करण्यासाठी उकळत्या पाण्याचा वापर करणे ही पद्धत जगभरात वापरली जाणारी सर्वात सामान्य पद्धत आहे. ही सर्वात सोपी पद्धत देखील आहे आणि असे केल्याने तुम्ही बाटलीमध्ये आईचे दूध आणि अगदी फॉर्मुला सुद्धा ठेवू शकता. परंतु, तुम्ही सर्वात प्रथम बाटली स्वच्छ करावी. उकळवून बाटलीचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी खालील गोष्टी करा:
- प्रथम, तुम्ही सामान्य डिशवॉशिंग साबणाने निर्जंतुक करण्याच्या बाटल्या, झाकण आणि निप्पल धुवा.
- त्यांना पुरेश्या पाण्याने भरलेल्या मोठ्या भांड्यामध्ये ठेवा जेणेकरुन सर्व उपकरणे पूर्णपणे बुडतील. तसेच, त्यात हवेचे बुडबुडे नसावेत.
- एकदा पाणी उकळले की ते पाच मिनिटे वेगाने उकळत राहूद्या. नंतर, गॅस बंद करा आणि नैसर्गिकरित्या पाणी थंड होऊ द्या.
- बाळाला दूध देण्याआधी, आपले हात आणि जेथे तुम्ही बाटली ठेवून दूध तयार करणार आहात तो स्वयंपाकघर पृष्ठभाग स्वच्छ करा. नंतर बाटली बाहेर काढा. निर्जंतुकीकरण केलेल्या वस्तू कोरड्या करण्यासाठी कापड वापरू नका कारण दूषित गोष्टी कापडातून बाटलीकडे जातील. ठिबकणाऱ्या पाण्यापासून मुक्त होण्यासाठी फक्त बाटली हलवा.
- जर तुम्ही लगेच बाळाला दूध देणार नसाल तर , सर्व निर्जंतुकीकरण उपकरणे स्वच्छ, कोरड्या कंटेनरमध्ये ठेवा आणि कंटेनरला फ्रिजमध्ये ठेवा.
२. रासायनिक निर्जंतुकीकरण:
खासकरुन बाळाची आहार उपकरणे निर्जंतुक करण्यासाठी निर्जंतुकीकरण रसायने बाजारात उपलब्ध आहेत ती तुम्ही खरेदी करू शकता. निर्जंतुकीकरण द्रावण तयार करण्यासाठी ही रसायने विशिष्ट प्रमाणात पाण्यात मिसळली जातात. रासायनिक निर्जंतुकीकरणासाठी खोलीच्या तापमानाचे पाणी वापरते जाते आणि म्हणून ते बाटल्यांच्या निपल्स साठी अधिक सुरक्षित असते. दीर्घकाळापर्यंत उच्च तापमानाचे पाणी वापरल्यास विघटन होऊ शकते. रासायनिक निर्जंतुकीकरण प्रक्रिया खालीलप्रमाणे आहेः
- द्रावण तयार करताना सूचनांचे योग्य पालन करा, विशेष करून रसायनांचे प्रमाण किती घ्यायचे हे पहा.
- उकळण्याचा प्रक्रियेप्रमाणेच, उपकरणांमध्ये हवेचे बुडबुडे अडकू नयेत म्हणून उपकरणे पाण्यात पूर्णपणे बुडवली पाहिजे.
- द्रावणामध्ये उपकरणे कमीत कमी किती काळ ठेवावीत ह्याविषयीच्या सूचना (सहसा अर्धा तास) निर्दिष्ट केल्या जातील. आपल्याला बाळाला लगेच दूध द्यायचे नसल्यास उपकरणे द्रावणातच ठेवावीत.
- उपकरणे वापरण्यापूर्वी, ठिबकणारे पाणी काढून टाका आणि नैसर्गिकरित्या उपकरणे वाळू द्या. उपकरणे कोरडी करण्यासाठी डिशक्लोथ किंवा रुमाल वापरू नका, कारण यामुळे तुमची निर्जंतुक झालेली उपकरणे दूषित होऊ शकतात.
- निर्जंतुकीकरणाची ही पद्धत वापरण्यापूर्वी मोठे भांडे, दुधाच्या बाटल्या आणि झाकणे इत्यादी गरम पाणी आणि साबणाने स्वच्छ करा.
३. वाफेने (स्टीम) निर्जंतुकीकरण:
अनेक उत्पादक बाळाच्या आहाराच्या उपकरणासाठी स्टीम स्टिरिलिझरची विक्री करतात. उकळत्या पाण्याप्रमाणेच, ही प्रक्रिया हानिकारक सूक्ष्मजंतू नष्ट करण्यासाठी उष्णतेचा वापर करते. शहरी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या पालकांसाठी आणि जे गॅस स्टोव्ह वापरत नाहीत त्यांच्यासाठी हा पर्याय योग्य आहे. स्टीम निर्जंतुकीकरण प्लग इन केले जाऊ शकते आणि ते विजेवर चालू शकते! आपण स्टीम निर्जंतुकीकरण खाली दिल्याप्रमाणे वापरावे.
- निर्जंतुकीकरण प्रक्रियेपूर्वी बाटल्या, कॅप्स इत्यादी गरम पाण्याने आणि साबणाने स्वच्छ करा.
- त्यांना निर्जंतुकीकरणासाठी स्टेरिलिझरमध्ये ठेवताना खालच्या दिशेने तोंड करून ठेवा जेणेकरून आतल्या पृष्ठभागावर जास्तीत जास्त वाफेचा संपर्क होऊ शकेल.
- मशीनमध्ये घालण्याची आवश्यकता असलेल्या पाण्याचे प्रमाण उत्पादकाद्वारे दिले जाईल. स्टीमिंग प्रक्रियेनंतर मशीन स्वतः बंद होईल.
- जोपर्यंत आपल्याला त्याचा वापर करण्याची आवश्यकता नाही तोपर्यंत आपण स्टेरिलिझरमध्ये उपकरणे सोडू शकता. परंतु, निर्जंतुकीकरण न करता त्यांना निर्जंतुकीकरणामध्ये किती वेळ ठेवता येईल याबद्दलच्या सूचना तपासून पहा
४. मायक्रोवेव्ह:
आपल्या बाळाची आहार उपकरणे निर्जंतुकीकरण करण्यासाठी मायक्रोवेव्ह वापरल्यास ते स्टीम निर्जंतुकीकरणाच्या समान तत्त्वावर कार्य करते. तथापि, मायक्रोवेव्हच्या आतील भाग अत्यंत स्वच्छ असले पाहिजे, आणि हे घरगुती अन्न गरम करण्यासाठी नियमितपणे वापरत असलेल्या मायक्रोवेव्ह च्या बाबतीत जवळजवळ अशक्य आहे. मायक्रोवेव्हमध्ये निर्जंतुकीकरण करण्यासाठी या सूचनांचे अनुसरण करा:
- बाळाची बाटली पाण्याने अर्धी भरा आणि वेगळ्या काचेच्या भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये बाटलीची निपल्स,रिंग्स आणि इतर गोष्टी ठेवा. आता ते मायक्रोवेव्ह मध्ये ठेवा.
- आता, दीड मिनिटांसाठी हाय सेटिंगवर मायक्रोवेव्ह ठेवा.
- वापरण्यासाठी थंड होईपर्यंत ते आतच राहूद्या.
आपल्या बाळाची बाटली निर्जंतुकीकरण करण्यासाठी काय करावे?
बाळाच्या बाटल्या निर्जंतुकीकरण करणे हे काही कठीण काम नाही. जवळजवळ, कोणीही हे करू शकते. परंतु, ते करण्यापूर्वी काही मुद्दे लक्षात ठेवायला हवेत.
- आपल्या बाळाची बाटली आणि उपकरणे निर्जंतुकीकरणाच्या करण्यापूर्वी साबण आणि स्वच्छ पाण्याने चांगल्या प्रकारे धुऊन घेतले खात्री करा.
- आपले हात धुवा आणि निर्जंतुक करा आणि बाळाची बाटली जिथे तयार करायची आहे तो पृष्ठभाग सुद्धा निर्जंतुक करून घ्या.
- टॉवेल किंवा नॅपकिन्सने ते कोरडे करणे टाळा.
- निर्जंतुकीकरण उपकरणे जो पर्यंत गरज भासत नाही तोपर्यंत निर्जंतुकीकरण मशीन किंवा पाण्यात ठेवणे चांगले. जर उकळत्या पाण्यात निर्जंतुकीकरण केले असेल तर सॉसपॅन बंद ठेवा.
- जर आपण बराच काळ निर्जंतुकीकरण केलेली उपकरणे वापरणार नसाल (१५ ते २४ तासांपेक्षा जास्त), तर कोरडे होईपर्यंत त्यांना निर्जंतुकीकरण केलेल्या पृष्ठभागावर ठेवणे चांगले. बाटल्यांची झाकणे आणि निपल्स एका निर्जंतुक केलेल्या भांड्यात ठेवून ते भांडे फ्रिज मध्ये ठेवा.
सुरक्षा टिप्स
बाटल्या निर्जंतुक करताना या सुरक्षितता सूचनांची नोंद घ्या:
- आपल्या बाळाला किंवा इतर मुलांना घरात उकळत्या भांड्यापासून किंवा निर्जंतुकीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या स्टीमर पासून दूर ठेवून अपघातांना टाळा. उकळत्या पाण्यापेक्षा वाफ जास्त उष्ण आहे.
- बाटलीच्या निपल्सचे तपशील आधी वाचा. ते लवचिक साहित्याने बनविलेले असल्यामुळे निर्जंतुकीकरणाची उष्णता सहन करण्याची त्यांची क्षमता बाटलीपेक्षा कमी असू शकते. खूप उष्णता बाटलीच्या निपल्सचे विघटन करू शकते.
- नेहमी टॉक्सिन फ्री बाटल्या खरेदी करा.बीपीए आणि इतर रसायने अन्नात मिसळून हॉर्मोनल असंतुलन होऊ शकते.
- काचेच्या बाटल्या जास्त काळ टिकतात आणि प्लास्टिकच्या बाटल्यांपेक्षा त्यांचे उष्णतेने निर्जंतुकीकरण करणे अधिक सुरक्षित आहे. तथापि, काचेच्या बाटलीला थोडा जरी तडा गेला तर ती बदलणे गरजेचे आहे.
- जर तुमच्या बाळाला विशिष्ट बाटली आणि निपल्स सूट होत नसेल तर ती बदलणे चांगले. सतत वापर केल्याने देखील खराब झालेल्या निप्पलमधून दुधाचा वेगवान स्त्राव होऊ शकतो.
बाळाच्या बाटल्यांचे निर्जंतुकीकरण कधी थांबवावे?
बाळाची आहार उपकरणे दर आठवड्याला निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. जर तुमचा पाणीपुरवठा दूषित झाला असेल तर दोन किंवा तीन दिवसांत एकदा निर्जंतुकीकरण केले जाऊ शकते. आपले मूल १२ महिन्यांचे होईपर्यंत निर्जंतुकीकरण नियमितपणे करणे आवश्यक आहे. त्यानंतर, तुमच्या बाळाचे आरोग्य आणि वातावरणानुसार निर्जंतुकीकरण शिथिल किंवा पूर्णपणे बंद केले जाऊ शकते.
आपल्या बाळाच्या दुधाच्या बाटल्या आणि उपकरणे निर्जंतुक करणे आवश्यक आहे. नवीनच आई बाबा झालेल्या पालकांना रात्रीची शांत झोप मिळणे अवघड होते. तुमच्यापैकी काहींनी हे ऐकले असेल तर काही जण ते अनुभवत असतील! योग्य वेळापत्रक, सुयोग्य संसाधने आणि पद्धतशीर दृष्टिकोन ठेवल्यास तुम्ही हे करू शकता!
आणखी वाचा: