Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ बाळाची काळजी बाळाच्या मालिशसाठी विविध तेलं : तुमच्या बाळासाठी कुठलं तेल योग्य आहे?

बाळाच्या मालिशसाठी विविध तेलं : तुमच्या बाळासाठी कुठलं तेल योग्य आहे?

बाळाच्या मालिशसाठी विविध तेलं : तुमच्या बाळासाठी कुठलं तेल योग्य आहे?

आपण सगळ्यांनी ऐकलंच असेल की बाळाला मालिश केल्याने बाळाची वाढ आणि विकास चांगला होतो. तुमच्या आजीपासून ते तुमच्या डॉक्टरांपर्यंत, एवढेच नव्हे तर टेलिव्हिजन मधल्या जाहिरातीत सुद्धा तुम्ही बाळाच्या मसाजसाठी कसा वेळ काढला पाहिजे हे सांगितले जाते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का हे तेल नक्की कसे मदत करते? आणि कुठलं तेल नक्की बाळाच्या नाजूक त्वचेसाठी योग्य आहे? हे जाणून घ्यायचे असेल तर हा लेख नक्की वाचा.

बाळाला तेलाने मालिश केल्याचे फायदे

कित्येक पिढ्यांपासून आई आपल्या बाळाला मालिश करत आली आहे आणि नवजात शिशूला त्याचे फायदे सुद्धा होताना आपण बघितले आहेत. आईच्या पोटात असतानांच बाळामध्ये स्पर्शाची संवेदना विकसित होते. स्पर्शातून आपलेपणा, स्विकार आणि विश्वासाची भावना विकसित होते. स्पर्शामुळे संप्रेरके तयार होतात आणि विशेषतः ऑक्सिटोसिन जे “लव्ह हॉर्मोन” म्हणून ओळखले जाते.

बाळाच्या मालिशसाठी कुठली तेलं चांगली आहेत?

बाळाच्या मालिशसाठी लोक तुम्हाला वेगवेगळी तेलं सुचवतील. पण कुठले तेल आपल्या बाळासाठी फायदेशीर आहे हे कसे कळणार? सगळ्या तेलांचे काही ना काही फायदे असले तरी तुम्ही हवामानानुसार योग्य तेल निवडण्याची काळजी घेतली पाहिजे.

उन्हाळ्यात तुमच्या बाळाच्या मालिशसाठी चांगली तेलं

१. नारळाचे तेल

हे उन्हाळ्यात वापरण्यासाठी सर्वात चांगलं तेल आहे. हे शरीराला थंड परिणाम देते तसेच त्याचा पोत हलका आहे आणि शरीरात सहजगत्या शोषले जाते.

२. तिळाचे तेल

आयुर्वेदामध्ये तिळाचे तेल हे सर्वात मौल्यवान समजले जाते. हे तेल हलके असून बाळाला आराम देते. ह्या तेलाने मालिश केल्यास हाडे मजबूत होतात.

हिवाळ्यात तुमच्या बाळाच्या मालिशसाठी चांगली तेलं

३. मोहरीचे तेल

हे तेल हिवाळ्यात वापरण्यासाठी सर्वात चांगले आहे. हे तेल दुसऱ्या तेलात मिसळून वापरा. उत्तर भारतात हे तेल लसूण, मेथ्या आणि ओवा घालून गरम करतात आणि गार झाल्यावर वापरतात.

४. बदाम तेल

हे तेल सगळ्या मातांना आवडते. परंतु लक्षात ठेवा की ज्या बाळांना आधीच त्वचेचे प्रश्न आहेत त्यांनी बाळासाठी हे तेल वापरू नये.

बदाम तेल

बदामाचे तेल वर्षभरात कुठल्याही महिन्यात वापरू शकता. आणि त्यामध्ये व्हिटॅमिन इ खूप जास्त प्रमाणात असते. ह्या तेलाचा वास खूप छान असतो आणि त्यामुळे बाळाची त्वचा मऊ होते. बाळाच्या मालिशसाठी शुद्ध बदामाचे तेल वापरावे. पारंपरिकरित्या सूर्यफूल तेल वापरले जाते, परंतु नुकत्याच सर्वेक्षणाद्वारे असे आढळले आहे की त्यामुळे एक्झिमा होतो. सूर्यफूल तेलाचा फायदा होण्यासाठी बाळासाठी तयार केलेलं सूर्यफूल तेल वापरा.

बाळाची त्वचा जर कोरडी आणि संवेदनशील असेल तर बाळाच्या मालिशसाठी कुठले तेल वापरावे?

कुठलंही तेल ज्यामध्ये जास्त प्रमाणात polyunsaturated fatty acids जास्त प्रमाणात असतील ते बाळाच्या त्वचेसाठी सर्वात चांगले आहे. ह्या तेलांमध्ये जास्त प्रमाणात लीनोलेइक ऍसिड असते जे बाळासाठी सर्वात चांगले असते. अशी काही  तेलं खालीलप्रमाणे :

५. कॅमोमाइल तेल

हे तेल संवेदनशील त्वचेच्या बाळासाठी किंवा  त्वचेवर पुरळ असलेल्या बाळांसाठी सर्वात चांगले आहे. जर तुमच्या बाळाच्या पोटाला मुरडा बसला असेल तर ह्या तेलाने मालिश केल्यास मदत होते आणि बाळाला छान झोप लागते.

६. टी ट्री तेल

हे नैसर्गिक तेल त्याच्या जंतुनाशक गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे. ह्या तेलाचे काही थेम्ब तुम्ही दुसऱ्या तेलात मिसळून तुम्ही बाळाच्या त्वचेवर लावू शकता.

७. कॅलेंडुला तेल

हे देखील एक essential oil आहे ज्यामुळे आपल्या बाळाच्या त्वचेवर चांगला परिणाम होतो आणि सौम्य वास येतो ज्यामुळे आपल्या मुलाच्या नाकाला त्रास होणार नाही.

८. एरंडेल तेल

बाळाला अंघोळ घालायच्या आधी वापरण्यासाठी हे तेल चांगले आहे. कोरडे केस आणि नखांवर उपाय म्हणून सुद्धा हे तेल वापरू शकता.

तुम्ही कुठलेही तेल वापरण्याआधी बाळाच्या त्वचेची संवेदनशीलता चाचणी करून पहा. थोडंसं तेल आधी बाळाच्या त्वचेच्या छोट्या भागावर लावून पहा. जर  ३ तासांनंतर त्वचेवर कुठलीही प्रतिक्रिया आढळली नाही तर ते तेल तुमच्या बाळासाठी सुरक्षित आहे.

तुमच्या बाळाच्या मालिशसाठी कुठले तेल चांगले हे कसे ठरवाल?

इथे काही टिप्स आहेत ज्यामुळे तुम्हाला तुमच्या बाळाच्या मालिशसाठी योग्य तेल निवडण्यास मदत होईल.

१. तुम्ही कुणाचाही सल्ला ऐकण्याआधी तुम्ही तुमच्या डॉक्टरशी बाळासाठीच्या मालिश तेलाविषयी बोलणे सर्वात उत्तम.

२. फक्त बाळांसाठी असलेली उत्पादने वापरा. मोठ्यांसाठीची उत्पादने बाळासाठी वापरल्यास बाळाच्या नाजूक त्वचेला हानी पोहोचू शकते.

३. ज्या तेलांचा वास खूप उग्र असतो अशी तेलं वापरू नका. नेहमी फूड ग्रेड तेलच वापरा कारण जरी चुकून ते बाळाच्या तोंडात गेले तरी त्यामुळे बाळाला हानी पोहोचणार नाही.

४. जर तुम्ही essential oil वापरत असाल तर ते दुसऱ्या तेलात मिसळून वापरत आहात ह्याची खात्री करा. कॅरिअर ऑइल कुठले वापरावं ह्याबाबत तुम्ही तुमच्या डॉक्टरचा सल्ला घ्या.

५. मिनरल ऑईल  वापरणे टाळा.

बाळाच्या त्वचेसाठी कुठले तेल चांगले नाही?

जर तुमच्या बाळाला एक्झिमा असेल किंवा बाळाची त्वचा कोरडी आणि संवेदनशील असेल तर मोहरीचे तेल, ऑलिव्ह तेल वापरणे टाळा. ह्या तेलांमध्ये ओलेईक ऍसिड  खूप जास्त प्रमाणात असते. त्यामुळे त्वचेचा सर्वात वरचा थर पातळ होतो  आणि त्यामुळे त्वचा अजून कोरडी होते.

बाळाला मालिश करताना लक्षात ठेवाव्यात अशा टिप्स

इथे काही गोष्टी दिल्या आहेत ज्या तुम्ही बाळाला मालिश करताना लक्षात ठेवल्या पाहिजेत.

  • मालिशची वेळ नीट निवडा कारण बरीच बाळे मालिश नंतर झोपून जातात त्यामुळे तुम्ही निवडलेली मालिशची वेळ बाळाच्या झोपेच्या वेळे अनुसार आहे ना ह्याची खात्री करून घ्या.
  • बाळाला मालिश ची जबरदस्ती करू नका.
  • जर तुम्ही essential oil वापरत असाल तर त्यामध्ये पुरेसे carrier oil मिसळले आहे ह्याची खात्री करा.
  • बाळाची मालिश करताना खूप जास्त दाब देऊ नका. लक्षात ठेवा ह्या कृतीमध्ये फक्त स्पर्श अपेक्षित आहे.
  • तेलाचे तापमान तपासून पहा. ते खूप जास्त गरम किंवा गार नको.
  • तुमचे हात उबदार, स्वच्छ आणि कोरडे आहेत ह्याची खात्री करा.
  • घाण्याचे तेल वापरा, कारण ते रिफाइंड केलेले नसते आणि त्यामध्ये कुठलीही भेसळ नसते.
  • बाळाला मालिश कशी करावी ह्याविषयी तुमच्या विश्वासातल्या मोठ्या व्यक्तीचा सल्ला घ्या. हे ज्ञान एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे दिले जाते आणि ते खूप मौल्यवान आहे.
  • एकाच वेळेला तेलाचे मोठे पॅक आणून ठेऊ नका, ते खराब होण्याची शक्यता असते.
  • तेल कुठल्या तारखेपर्यंत वापरावे ती तारीख तपासून पहावी.

बाळाला तेलाने मालिश करण्याचे खूप फायदे आहेत. सर्वात छान म्हणजे तुमचा तुमच्या बाळाशी बंध तयार होतो, हा अनुभव खूप मौल्यवान आहे. बाळाला आईच्या स्पर्शाची भूक असते आणि ही बाळाची तब्बेत आणि विकास चांगला होण्याची एक खूप छान संधी असते. हवामानाप्रमाणे तेल वापरा आणि ह्याबाबत तुम्हाला कुठलीही शंका असेल तर त्याविषयी तुमच्या डॉक्टरांशी बोलण्यास जरासुद्धा संकोच बाळगू नका.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

१. मी माझ्या बाळाला गरम आणि दमट हवामानात तेल लावू शकते का?

तुम्ही तुमच्या बाळाला गरम आणि दमट हवामानात तेल लावू शकता पण ते अंघोळीच्या आधी लावून नंतर स्वच्छ धुवून टाकत आहात ना तसेच अंघोळीनंतर बाळाला आरामदायी वाटत आहे ना ह्याची खात्री करा.

२. बाळाला अंघोळीच्या आधी की नंतर तेल लावणे योग्य आहे?

भारतामध्ये परंपरेनुसार तेलाने मालिश केल्यानंतर अंघोळ घालतात. विशेषतः काही तेलांचा थर बाळाच्या त्वचेवर रहातो. जर बाळाची त्वचा कोरडी असेल तर बाळासाठी स्पेशल तेल वापरणे चांगले त्यामुळे त्वचेची आर्द्रता कायम राखली जाईल.

बाळाला मालिश करणे ही भारतातील जुनी पद्धत आहे. त्यामुळे बाळाची निरोगी वाढ होते तसेच मालिश करताना बाळाबरोबर बंध तयार होतो. बाळाची त्वचा खूप नाजूक असल्याने बाळासाठी शुद्ध तेल वापरात आहेत ना ह्याची खात्री करा. तुम्ही जे तेल बाळासाठी निवडाल त्याला तुमच्या डॉक्टरांची संमती घ्या.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article