Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home अन्य ३ महिन्यांच्या बाळाची काळजी – तुम्हाला नक्कीच मदत होईल अशा टिप्स

३ महिन्यांच्या बाळाची काळजी – तुम्हाला नक्कीच मदत होईल अशा टिप्स

३ महिन्यांच्या बाळाची काळजी – तुम्हाला नक्कीच मदत होईल अशा टिप्स

तुमचे बाळ ३ महिन्यांचे झाल्यावर, तुम्ही सुटकेचा निःश्वास सोडाल. बाळ लहान असताना त्याचे सततचे रडणे आता पुष्कळ कमी होईल आणि बाळाचा मूक संवाद तुम्हाला आता बराचसा समजू लागला असेल. बाळ त्याला काय वाटते आहे हे वेगवेगळ्या हावभावांवरून दाखवू लागेल. बाळाची वाढ सुरळीत व्हावी म्हणून तीन महिन्यांच्या बाळाची काळजी कशी घ्यावी ह्याबाबत काही टिप्स दिल्या आहेत. जर काही समस्या आल्यास तुम्ही त्यांचा वापर करू शकता.

तुमच्या ३ महिन्यांच्या बाळाची काळजी कशी घ्याल?

तुम्ही तुमच्या लहान बाळाची काळजी घेताना खालील गोष्टी लक्षात घ्या.

. तुमच्या बाळाला जेव्हा भूक लागेल किंवा झोप येईल त्यावर लक्ष ठेवा

बरीच बाळे १२ आठवड्यांची झाल्यावर त्यांना भूक आणि झोप ह्या संकल्पना समजू लागतात. तुमचे बाळ रडताना आता वेगवेगळ्या पद्धतीने रडू लागेल आणि त्यावरून बाळाला भूक लागली आहे का किंवा ते फक्त चिडचिड करत आहे किंवा बाळाचे डायपर ओले झाले आहे हे तुम्हाला समजण्यास मदत होईल. जर तुमच्या बाळाला तुम्ही बाटलीने दूध देत असाल तर ते नेहमीपेक्षा जास्त दूध घेते आणि त्यामुळे ते जास्त वेळ झोपते. कधी कधी तर बाळ संपूर्ण रात्रभर झोपते. स्तनपान घेणारी बाळे झोपेतून एकदा दोनदा उठतात, परंतु बाळाला बाटलीचे दूध सुरु करण्याचे हे काही कारण नाही.

. तुमचे बाळ संपूर्ण वेळ सुरक्षित आहे ह्याची खात्री करा

तुमचे बाळ संपूर्ण वेळ सुरक्षित आहे ह्याची खात्री करा

तुमचे बाळ आता स्वतःच्या हातपायांकडे बघत राहील. आणि ते विशेषकरून हातांकडे जास्त बघेल. नंतर बाळाच्या असेही लक्षात येईल की ज्या हातांकडे ते बघत आहे, त्या हातांवर त्याचे नियंत्रण सुद्धा आहे. आणि त्यामुळेच बघेल ती वस्तू घेऊन बाळ तोंडात घालण्यास सुरुवात करेल. बाळाच्या क्रिबच्या आसपास कुठल्याही टोकदार वस्तू किंवा अस्वच्छ गोष्टी नाहीत ना ह्याची काळजी घ्या. छोट्या गोष्टी घशात अडकून त्यामुळे बाळ गुदमरण्याची शक्यता असते. प्रवास करताना, कार सीट मधून बाळाचा हात कुठल्याही वस्तूंपर्यंत पोहचत नाही ना ते पहा आणि बाळ सुरक्षित आहे ना ह्याकडे सुद्धा लक्ष द्या.

. कुठलाही व्यत्यय न येता संवाद व्हायला हवा

तुमच्या ३ महिन्यांच्या बाळाची काळजी घेणे हा एक भाग झाला परंतु त्याचे सामाजिक व्यक्तिमत्व घडवणे हा संपूर्णतः वेगळा विषय आहे. बऱ्याच अभ्यासांद्वारे असे निदर्शनास आले आहे की बरेचसे पालक जे बाळांशी संवाद साधतात किंवा त्यांच्याशी बोलत राहतात त्यांच्या मुलांना सामाजिक संकेत चांगले समजतात, त्यांचा आय. क्यू. चांगला असतो तसेच त्यांचा शब्दसंग्रह सुद्धा चांगला असतो. तुमच्या बाळाशी संवाद साधत रहा. तुम्ही डायपर बदलत असाल तर ते त्यास समजू द्या आणि त्याने शी करून ठेवली आहे हे सुद्धा त्याला सांगा. आणि आता नवीन आणि स्वच्छ डायपर लावणार आहे हे त्यास समजू द्या. बाळाला रंगीबेरंगी पुस्तके दाखवा आणि त्यावरून गोष्टी तयार करून सांगा.

. बाळाचे रडणे आणि विव्हळण्याकडे दुर्लक्ष करू नका

काही पालकांचा असा विश्वास आहे की जर बाळ अनावश्यकपणे रडत असेल तर त्याला तसेच रडू द्यावे थोड्या वेळाने बाळ आपोआप शांत होईल. परंतु हे फक्त ३महिने वयाच्या छोट्या बाळांना लागू होत नाही. ही मुले फक्त भूक, अस्वस्थता किंवा झोपेसारख्या कारणास्तव रडत असतात. या सर्वांकडे कोणत्याही परिस्थितीत पालकांनी लक्ष देणे आवश्यक आहे कारण आपले बाळ आपल्याशीच बोलू शकते. जर बाळ रडत असेल आणि कोणीही त्याच्याजवळ जात नसेल तर, त्याला असुरक्षित वाटू लागेल आणि बाळ खूप थकेपर्यंत आणखी रडत राहू शकेल. या वयात जास्त लक्ष वेधून घेण्याची सवय लागण्याची शक्यता नसते. कधीकधी एखाद्या बाळाला फक्त दुपट्यामध्ये गुंडाळण्याची इच्छा असते आणि ती देखील बाळाची एक गरज आहे.

बाळाचे रडणे आणि विव्हळण्याकडे दुर्लक्ष करू नका

. बाळाला बाहेर घेऊन जाण्यासाठी संपूर्ण तयारी आवश्यक आहे

तुम्हाला कदाचित आपल्या बाळास फेरफटक्यासाठी बाहेर घेऊन जायचे असेल, किंवा सहलीसाठी किंवा कदाचित एखाद्या वेगळ्या शहरात जायचे असेल तर बाळाला कुठल्या वेळेला काय लागेल हे सांगता येत नाही त्यामुळे आवश्यक त्या सर्व गोष्टी आपल्याबरोबर प्रत्येक वेळी घेऊन जाणे आवश्यक आहे.बाळाला सोबत घेऊन जाताना काहीच तयारी नसण्यापेक्षा जास्त तयारी असणे अधिक चांगले. जर आपण बाळाला जवळपास घेऊन जात असाल तर बाळाची प्रॅम वापरा ज्यामध्ये बर्‍याच वस्तू तुम्ही ठेवू शकाल. उन्हाळ्यात एखाद्या शहराचा प्रवास करीत असल्यास, उन्हापासून वाचवण्यासाठी बाळाला सैल कपडे आणि टोपी घाला. डायपर, खेळणी, बाटल्या आणि वाईप्स इत्यादी आवश्यक वस्तू नेहमी आपल्याबरोबर ठेवा.

. बाळ खेळत असताना सुद्धा काळजी घ्या

१२ आठवड्यांचे बाळ आता आधीपेक्षा जास्त वेळ जागे राहते. बाळ स्वतःला व्यस्त ठेऊ शकते परंतु त्यासाठी बाळाला सतत प्रोत्साहन द्यावे लागते. दररोज, तुमच्या बाळाशी खेळण्यासाठी काही वेळ राखून ठेवा. ह्या वेळात बाळ स्वतःच्या खेळण्यांसोबत खेळू शकते किंवा तुम्ही बाळाला गोष्ट सुद्धा सांगू शकता. तुमचे आवडते संगीत ऐका आणि त्यासोबत ते तुम्ही सुद्धा म्हणा. तुम्ही गुणगुणत असलेले गाणे बाळाला ऐकू द्या. हे सगळे क्रियाकलाप केल्यास तुमच्या दोघांमध्ये विश्वास आणि प्रेमाचा बंध तयार होईल.

बाळ खेळत असताना सुद्धा काळजी घ्या

. चांगल्या नित्यक्रमाचा सगळ्यांना फायदा होतो

बाळाला किंवा त्याच्या आई बाबांना अनपेक्षित गोष्टी आवडत नाहीत. त्यामुळे बाळाला दूध देण्याची, झोपवण्याची किंवा बाळासोबत खेळण्याची वेळ ठरलेली असेल तर त्यानुसार बाळ त्याची वाट बघते. तसेच त्यामुळे बाळाला खूप सुरक्षित वाटते. आणि त्यामुळे बाळाच्या वाढीस त्याचा फायदा होतो.

बाळांची खूप काळजी घेण्याची आणि त्यांच्याकडे सतत लक्ष ठेवण्याची गरज असते. जेव्हा १२ आठवड्यांच्या मुलाची काळजी घेण्याची वेळ येते तेव्हा, गोष्टी पाहिजे तशा सुव्यवस्थित नसतात. आपण शांत राहून जास्त काळजी न केल्यास येणार्‍या कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यात त्याची मदत होऊ शकते. मातृत्वाच्या भावनेचा आनंद घ्या आणि प्रत्येक परिस्थितीत आपण आपल्या बाळाची चांगली काळजी घेणार आहातच!

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article