Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ दर महिन्याला होणारा बाळाचा विकास ९ महिन्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे

९ महिन्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे

९ महिन्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे

तुमचं बाळ जन्मल्यापासून ते तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असते. तुम्ही बाळाबरोबर एकत्र घालवलेला प्रत्येक क्षण, बाळाच्या कानात तुम्ही कुजबुजलेला प्रत्येक गोड शब्द आणि तुम्ही बाळाला प्रेमाने कुरवाळलेला प्रत्येक क्षण आणि तुमच्या चेहऱ्यावरील प्रेमळ हावभाव बाळाला संवाद साधण्यास शिकवत असतो. बाळाच्या सामाजिक, भावनिक तसेच संवादकौशल्य विकासाच्या दृष्टीने हे महत्वाचे ठरते. ९ व्या महिन्यात तुमचे बाळ दुसऱ्या अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती दाखवू लागते.

९ महिन्यांच्या बाळाच्या विकासाच्या टप्प्यांचा तक्ता

बाळाने पार केलेले विकासाचे टप्पे बाळ लवकरच पार पाडेल असे विकासाचे टप्पे
थोडे अंतर रांगून बसते भरभर आणि जास्त अंतर रांगू लागेल
थोडी मदत घेऊन उभे राहते आधाराने पाऊल टाकेल
मामा” ” दादाह्या सारखे सोपे शब्द बोलते आणखी काही छोटे शब्द बोलू लागेल
नाहीहा शब्द समजतो हो” ” इकडे ये” “जाअसे शब्द समजतील
काही हावभावांचे अनुकरण करते अनेक क्रियांचे अनुकरण करेल
दृष्टी सुधारते दृष्टी सुधारल्यामुळे दूरचे पाहू शकेल
वस्तू धरते आणि सोडते वस्तू पकडणे आणि सोडून देणे ह्यास प्रतिसाद देईल
काही खेळणी विशेष आवडतात काही विशेष खेळणी किंवा लोक आवडतील
एका हातातून दुसऱ्या हातात वस्तू घेणे भांड्यात गोष्टी ठेवू शकेल

९ व्या महिन्यांपर्यंत तुमच्या बाळाने पार केले पाहिजेत असे विकासाचे टप्पे

९ व्या महिन्यांपर्यंत तुमच्या बाळाने पार केले पाहिजेत असे विकासाचे टप्पेतुमचे बाळ घरातील फर्निचरला धरून तर चालेलच परंतु तुम्हाला बाळाचे बोबड्या बोलांचे भाषण सुद्धा ऐकायला मिळेल. मदतीशिवाय खाली बसणे हे बाळासाठी अजूनही थोडे कठीण असू शकते परंतु तुमच्या बाळावर लक्ष ठेवा आणि नॅपी मध्ये जास्तीचे पॅडिंग लावा.

आकलन विषयक विकासाचे टप्पे

तुमच्या बाळाच्या मेंदूचा विकास खुप वेगाने होतो! ९ महिन्यांच्या तुमच्या बाळाने आकलनविषयक विकासाचे खालील टप्पे पार केले पाहिजेत.

  • तुम्ही तुमच्या बाळाकडे बघून त्याला एखादा आवाज काढण्यास सांगा किंवा एखादी क्रिया करण्यास सांगा. बाळाला तुम्हाला काय हवे आहे हे समजेल.
  • तुमचे बाळ मामाकिंवा दादाहे शब्द सतत म्हणेल, परंतु बाळ ते शब्द योग्य व्यक्तीलाच म्हणेल असे नाही. बाळ दुसरे शब्द जसे की बॉल” ” बायसुद्धा म्हणू लागेल.
  • तुमचे बाळाला वेगवेगळे आवाज आवडू लागतील आणि जमिनीवर किंवा टेबलावर वस्तू आपटून आवाज काढेल.
  • तुमच्या बाळाला लपवलेली वस्तू गायब होत नाही हे समजेल. वस्तू लपवून बाळाला ती शोधण्यास सांगण्यात खूप मजा येईल तसेच त्यामुळे बाळाचे स्मरण कौशल्य पण वाढेल.

सामाजिक आणि भावनिक विकासाचे टप्पे

तुमच्या बाळाचे सामाजिक आणि वर्तणूक कौशल्य विकसित होण्याची गरज आहे. इथे काही गोष्टी दिल्या आहेत ज्याकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे.

  • तुमच्या बाळाला जवळ घेऊन मिठी मारलेली आवडेल आणि बाळ त्याच्या क्रियांनी तुम्हाला खुश करेल. ह्या वयाची बाळे आई बाबांना चिकटून राहतात आणि त्यांच्यापासून दूर गेल्यास रडू लागतात.
  • जर अनोळखी व्यक्ती दिसली आणि ती बाळाबरोबर कितीही चांगली खेळली आणि तरीही बाळ रडू लागले तर काळजीचे काहीही कारण नाही कारण ते नॉर्मल आहे. ह्या वयात अनोळखी व्यक्तींविषयी बाळाला चिंता वाटते.
  • तुमच्या ९ महिन्यांच्या बाळाला काही विशिष्ट गोष्टींविषयी प्राधान्यक्रम विकसित होतात आणि सुरक्षेसाठी एखादा आवडता टेडी किंवा ब्लॅंकेटवापरू शकतात.
  • ह्या वयात बाळांना कुटुंबाची संकल्पना समजते आणि कौटुंबिक काळात बाळे खुश असतात.

हालचाल कौशल्य आणि शारीरिक विकासाचे टप्पे

तुमच्या बाळाचा शारीरिक विकास होत आहे आणि हालचाल कौशल्ये सुद्धा विकसित होत आहेत. इथे काही शारीरिक विकासाचे टप्पे दिले आहेत त्यावर तुम्ही लक्ष ठेवले पाहिजे.

  • तुमचे बाळ ह्या वयात रांगू लागेल आणि म्हणून तुम्ही घर बाळासाठी सुरक्षित करून घेतले पाहिजे.
  • तुमच्या बाळामध्ये पॅराशूट रिफ्लक्सविकसित होईल. म्हणजेच ही एक प्रकारची मानवी प्रवृत्ती असते ज्यामध्ये इजा होऊ नये म्हणून डोके खाली आणि हात पसरवले जातात.
  • पायाचे स्नायू बळकट होतात आणि तुमचे बाळ कशाचातरी आधाराने वरती उभे राहते आणि काही पावले टाकण्याचा सुद्धा ते प्रयत्न करू लागेल.
  • तुमच्या बाळाच्या डोळ्यांच्या हालचाली सुद्धा सुधारतील आणि बाळ हलणाऱ्या गोष्टींवर नजर ठेवेल,. दृष्टी अजून विकसित होईल.

मज्जातंतूंच्या विकासकौशल्याचे टप्पे

बाळाच्या मज्जातंतूंचा विकास हा जन्मपूर्व काळापासून होतो आणि तो ३ वर्षापर्यत सुरु राहतो. ९ महिन्यांपर्यंत

तुमच्या बाळाने पार केलेले मज्जातंतूंच्या विकासाचे टप्पे खालीलप्रमाणे

  • तुमचे बाळ आधाराशिवाय बसू शकते
  • तुमचे बाळ खेळणे उचलून एका हातातून दुसऱ्या हातात घेऊ शकते
  • तुमचे बाळ तर्जनी आणि अंगठ्यामध्ये छोट्या गोष्टी पकडू शकेल
  • व्यंजने आणि स्वर बाळ बडबडू लागते आणि त्यांचा ते आवाजाची पातळी बदलून सराव करतात.

संवाद कौशल्ये

ह्या वयात बाळाने संवाद साधावा म्हणून काही मार्ग दिले आहेत.

  • तुमचे बाळ काही क्रियांमधूनतुम्हाला नकार दर्शवेल. उदा: बाळाला भरवताना नको असेल तर बाळ तोंड बंद करते किंवा मान वळवते. अशा पद्धतीने तुमचे ९ वर्षांचे बाळ त्याच्या भाषेत नाही असे म्हणते.
  • आता तुमच्या बाळाला तुम्ही नाहीम्हटलेले समजेल. आणि ज्या गोष्टीना तुम्ही बाळाला नाहीम्हणाल त्या गोष्टी करण्याचे बाळ टाळेल.
  • तुमचे बाळ हाताने टाटा करेल तसेच तोंडाने बायम्हटलेले सुद्धा बाळाला कळेल.
  • ह्या वयात बाळाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्याकडे ते बोट दाखवू लागेल.

डॉक्टरांशी केव्हा संपर्क साधावा?

जर तुमच्या बाळाची वाढ नीट होत नसेल तर बाळाच्या भविष्यातील विकासावर परिणाम होतो. इथे काही गोष्टी आहेत त्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे:

  • ह्या वयाची बाळे रांगतात आणि स्वतःचे स्वतः बसतात. जर तुमचे बाळ रांगत नसेल किंवा आधार देऊन सुद्धा बसत नसेल तर तुम्हाला तज्ञांची भेट घेणे गरजेचे आहे.
  • जर तुमचे बाळ खूप शांत असेल आणि कुठलीही बडबड करत नसेल तर बाळाच्या विकासास उशीर होत आहे.
  • जर तुम्ही किंवा बाळाची काळजी घेणारी घेणारी व्यक्तीला बघून बाळ हसत नसेल आणि त्याऐवजी चेहरा भावनाशून्य ठेवत असेल तर बाळाने विकासाचा टप्पा चुकवला आहे असे समजावे.
  • ह्या वयात तुमच्या बाळाने खांदे आणि हातांचा वापर चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. त्यामुळे जर बाळ वस्तू पकडत नसेल किंवा पकड खूप सैल असेल तर तुमच्या डॉक्टरांच्या लक्षात ही गोष्ट आणून द्या.

तुमच्या बाळाने ९ महिन्यांचे विकासाचे टप्पे पार करावे म्हणून मदतीसाठी काही टिप्स

इथे काही सध्या टिप्स दिल्या आहेत त्यामुळे तुमच्या बाळाच्या विकासास मदत होईल आणि बाळ ९ महिन्यांच्या विकासाच्या टप्प्यांपर्यंत पोहोचेल.

  • तुमच्या बाळाशी जास्तीत जास्त खेळा त्यामुळे बाळाचा शारीरिक विकास होईल आणि आकलनशक्ती कौशल्ये वाढतील. छोटी छोटी विनंती वजा वाक्ये वापरा. उदा: ” आईकडे चेंडू टाकआणि बाळाला बसून खेळण्यास प्रोत्साहन द्या त्यामुळे बाळाच्या कंबरेचे स्नायू बळकट होतील.
  • गडद रंगाची चित्रे असलेली पुस्तके वाचल्याने बाळाची दृष्टी सुधारण्यास मदत होईल. तुमच्या बाळाला बाहेर खेळण्यास नेऊन किंवा बाळाला जगातील वेगवेगळ्या रंगाची ओळख करून देऊन सुद्धा करता येईल.
  • बाळाशी बोलत राहा आणि बाळाला बायकसे करायचे हे शब्द आणि क्रियेतून दाखवा. वेगवेगळ्या गोष्टींकडे बोट दाखवून त्या कुठल्या आहेत हे बाळाला दाखवा. उदा: “तो पलंग आहे
  • बाळाला फिंगर फूड द्या म्हणजे बाळ ते स्वतःचे स्वतः खाईल. त्यामुळे बाळाची पिंचर ग्रास्प म्हणजेच तर्जनी आणि अंगठा ह्यामध्ये वस्तूची पकड पक्की होईल. फक्त बाळावर लक्ष ठेवणे जरुरी आहे तसेच घशात अडकतील अशा कुठल्याही गोष्टी बाळाला देऊ नका.

सर्वात महत्वाची आणि लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट म्हणजे तुमच्या बाळासोबत कौटुंबिक वेळ घालवा. त्यामुळे बाळाला सामाजिक नाती समजतील तसेच तुमच्या सोबत बाळाचा बंध घट्ट होईल. आणि त्यामुळे बाळ आनंदी राहील. बरेचसे विकासाचे टप्पे हे कुठल्याही समस्येशिवाय पार पडतात जेव्हा बाळाच्या जवळची मंडळी त्याच्या सोबत असतात आणि त्याला प्रोत्साहन देत असतात. आनंदी आणि निरोगी बाळे चांगली विकसित होतात आणि विकासाचा कुठलाही टप्पा पार करायचा रहात नाही. तथापि, जर तुम्हाला बाळाच्या विकास होताना समस्यांची छोटीशी लक्षणे जरी आढळली तर तुम्ही लगेच तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. लवकर निदान होणे म्हणजे उपचारासारखे असते.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article