Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ दर महिन्याला होणारा बाळाचा विकास तुमच्या ८ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

तुमच्या ८ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

तुमच्या ८ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

तुमचे बाळ आता मामा‘ ‘पापाअसे शब्द बोलू लागले आहे आणि तुमचे बाळ त्याच्या आजूबाजूच्या विश्वाविषयी जाणून घेण्यास खूप उत्सुक आहे. एक पालक म्हणून बाळाची शारीरिक, मानसिक आणि भावनिक वाढ होताना तसेच विकासाचे सगळे टप्पे वेळेवर पार पडताना बघणे खूप समाधानकारक असते.

बाळाची वाढ

तुमच्या बाळाची वाढ आणि विकास होताना बघणे ह्यासारखा दुसरा आनंद नाही. पुढच्या ४ आठवड्यात तुम्हाला बाळाची हालचाल वाढलेली दिसेल, तसेच बाळ इतरांचे चेहरे ओळखू लागेल आणि बरंच काही. तुमच्या ८ महिन्यांच्या बाळाच्या क्रियाकलापांवर नेमके कसे लक्ष ठेवले पाहिजे ते पाहुयात.

बाळाचा विकास

ह्या कालावधीमध्ये तुमच्या बाळाचे आकलन, सामाजिक आणि भावनिक कौशल्ये यांची खूप वेगाने वाढ होईल. बाळाच्या आजूबाजूला असलेली मुले रडू लागली तर बाळ सहानुभूती दर्शवेल आणि तुम्हाला बघितल्यावर बाळाला आनंद होईल! बाळ वेगवेगळे चेहरे ओळखू लागेल आणि आवाजातील फरक सुद्धा बाळाला समजेल. बाळाची हाताची पकड सुद्धा ह्या कालावधीत विकसित होईल आणि ह्या कालावधीत बाळाचा बोटांवर खूप संयम राहील. बाळ वस्तू उचलून भिंतीवर अचूकतेने फेकू शकेल.

  • ३२ आठवड्यांच्या बाळाचा विकास

तुमच्या ८ महिन्यांच्या बाळाचे वजन वाढेल आणि तुमचे बाळ रांगू लागेल. तुमचे बाळ स्वतःला हातांच्या साहाय्याने पुढे ढकलेल आणि घरातील फर्निचर चा आधार घेऊन गुडघ्यावर उभे राहील. बाळासाठी वॉकर वापरण्यासाठी हा कालावधी योग्य नाही कारण जमिनीवर हालचाल केल्याने बाळाचे हालचाल कौशल्य वाढेल आणि बाळाचे नितंबांचे स्नायू सुद्धा मजबूत होतील. तुमच्या बाळाला इकडे तिकडे फिरू द्या आणि घरातील केबल्स आणि वायर्स बाळापासून दूर ठेवा ज्यामुळे बाळाला अडथळे येणार नाहीत.

  • ३३ आठवड्यांच्या बाळाचा विकास

तुमच्या बाळाला काय आणि किती खायचे हे ते स्वतः निवडेल. बाळाला अजूनही स्तनपान सुरु ठेवण्याची गरज आहे. तथापि, आता बाळाला तुम्ही जे खाता ते अन्न खाऊंद्या कारण बाळाचे चावण्याचे दात विकसित होत असतात. बाळाच्या हालचालीविषयी सांगायचे झाले तर तुमचे बाळ हातांनी टाळ्या वाजवू लागले आहे आणि बाळाच्या हस्तकौशल्यामध्ये खूप सुधारणा झालेली आहे. बाळाला टाळ्या वाजवणाया शिकवा, त्याला प्रोत्साहन द्या आणि बाळासोबत ‘Pat-a-Cake’ सारखे खेळ खेळा आणि त्याला तुमची नक्कल करू द्या. सुरुवातीला, घरात खूप आवाज होईल कारण झांजेसारखी भांडी एकमेकांवर आपटली जातील. परंतु लक्षात असुद्या ही ह्या प्रक्रियेदरम्यान तुमच्या बाळाचा हालचालींवर खूप ताबा वाढणार आहे.

तसेच तुमचे बाळ मनगट वर आणि खाली किंवा बाजूला कसे हलवावे हे सुद्धा शिकेल. बाळाला तुमच्या कुटूंबातील सदस्यांना टाटा करण्यास शिकवा त्यासोबत बाय‘ ‘सी यू लेटरअसे शब्द तोंडाने म्हणा.

  • ३४ आठवड्यांच्या बाळाचा विकास

ह्या आठवड्यात तुमच्या बाळाची दृष्टी झपाट्याने वाढेल आणि बाळाची जवळची दृष्टी आता सर्वोत्तम असेल. बाळाचे दूरचे बघण्याची दृष्टी सुधारण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे,परंतु बाळ दूरवरच्या वस्तू आणि लोक ओळखेल आणि त्याकडे जाण्याचा प्रयत्न करेल. बाळाच्या डोळ्यांचा खरा रंग विकसित होईल. दृष्टीसोबतच बाळ वस्तू बोटांच्या चिमटीत पकडण्यास शिकेल. बाळाचे हस्तकौशल्य सुधारत असल्याने बाळ वस्तू उचलणे, खाली टाकणे, दूर फेकणे इत्यादी क्रिया खूप अचूकतेने करू लागेल. ह्या व्यतिरिक्त बाळ तर्जनीच्या साह्याने वस्तूंकडे बोट दाखवू लागेल.

  • ३५ आठवड्यांच्या बाळाचा विकास

ह्या टप्प्यावर तुमचे बाळ आता लवकरात लवकर स्वतःचे स्वतः चालू लागेल. तुम्ही बाळाचा हात धरून आणि दिशा दाखवून चालण्यास प्रोत्साहन देऊ शकता. लक्षात ठेवा की तुमच्या बाळाचे पायांचे स्नायू विकसित होत असतात आणि त्यामुळे त्यांना गुडघे टेकवून बसण्यासाठी मदत करणे चांगले. तुमच्या बाळाला उभे राहिल्यावर पुन्हा खाली बसण्याची सवय लागण्यास वेळ लागू शकतो पण ठीक आहे. तसेच तुम्ही बाळाच्या हालचालीला मदत करण्यासाठी ‘toddler truck’ वापरू शकता. ह्या टप्प्यावर घरात रांगणे किंवा पायऱ्या चढणे ह्या क्रियांना काही अडचण येऊ नये.

बाळाची तब्येत

तुमच्या बाळाच्या तब्येतीत सातत्याने सुधारणा होत आहे. बाळ स्तनपानासोबतच घन पदार्थ सुद्धा खाऊ लागेल. बाळाला स्वतःचे स्वतः खाण्यास प्रोत्साहित करा. बाळाला वेगवेगळ्या चवीचे अन्नपदार्थ खाऊ द्या. चीझ, गाजर ह्या सारख्या फिंगर फूड त्यांना चव कळ्यांशी (taste buds) परिचित होण्यास मदत करतील. बऱ्याच वेळा बाळ जवळ असलेल्या भांड्याशी खेळेल. आकलनकौश्यल्याच्या दृष्टीने तुमच्या बाळाला आता मूलभूत सूचना समजतील आणि बाळ वस्तू आणि त्या वस्तूच्या नावाचा संदर्भ लावू लागेल. कुटुंबातील सदस्य कामावरून घरी परतल्यावर बाळ त्यांचे हसून स्वागत करेल.

बाळाच्या विकासाचे टप्पे ८ वा महिना

तुमच्या ८ महिन्यांच्या बालकडून तुम्ही खालील विकासाच्या टप्प्यांची अपेक्षा करू शकता.

  • बोलणे सुधारणे तुमचे बाळ आता अनेक व्यंजनांवर आधारित आवाज करू लागेल आणि त्याचे शब्दांमध्ये रूपांतर करू लागेल. तुमच्या बाळाला आता दूध‘ , ‘मांजरआणि टेबलअसे शब्द समजू लागतील आणि बाळ वस्तूशब्द ह्यांचे संदर्भ मनात तयार करू लागेल.
  • पकड घट्ट होणे हाताने वस्तू पकडणारे बाळ आता दोन बोटांच्या चिमटीत वस्तू पकडू लागेल आणि बाळ बोटांच्या अवघड हालचाली करू लागेल. बाळाचे हस्त कौशल्य वाढेल आणि तुमच्या लक्षात येईल की बाळ आता वस्तूंवर चांगले नियंत्रण ठेऊन त्या अचूकतेने हाताळू लागेल.
  • हलणाऱ्या वस्तूंचा मागोवा घेणे यापुढे तुमचे बाळ हलणाऱ्या वस्तूंबाबत जागरूक तर असेलच परंतु त्या वस्तूंचा बाळ मागोवा घेईल आणि त्या पकडण्याचा प्रयत्न करेल.
  • तुम्ही बाळापासून दूर गेलात तर तुम्ही घरापासून किंवा बाळापासून दूर गेलात तर बाळ ठीक असेल. बाळ आधीसारखे आता रडून त्रास देणार नाही.
  • बाळ चावण्याचा प्रयत्न करेल बाळ वेगवेगळे अन्नपदार्थ चावून खायला सुरुवात करेल त्यामुळे तुमच्या बाळाच्या जबड्याच्या स्नायूंचा व्यायाम होईल.
  • स्वतःच्या पायांवर उभे राहणे तुमचे बाळ आता काही प्रमाणात स्वतःच्या पायांवर उभे राहू लागेल किंवा तसा प्रयत्न तरी करेल. बाळाचे खालच्या भागाचे स्नायू आता विकसित झालेले असतील आणि आता बाळ हालचाली करण्यासाठी सक्षम असेल.

बाळाच्या विकासाचे टप्पे - ८ वा महिनावर्तुणूक

तुमच्या बाळाच्या वर्तणुकीत बराच बदल होईल. ह्या वयात बाळाला त्याच्या आजूबाजूच्या गोष्टी समजतील, तथापि स्वतःला हव्या त्या गोष्टी घेण्यासाठी तुमच्या बाळाचे शरीर किंवा स्नायू पूर्णपणे विकसित झालेले नाहीत. तुमचे बाळ आता संपूर्ण दिवस बडबड करत राहील आणि स्वतःच्या आव आवाजाचा वापर करून वेगवेगळे प्रयोग करेल. काही शब्दांवर सौम्यपणे जोर देऊन वस्तू आणि शब्द किंवा लोक आणि शब्द ह्याचा संबंध बाळास समजून सांगा, असे केल्याने बाळाचा शब्दसंग्रह वाढेल आणि त्या शब्दांचा अर्थ शुद्ध बाळाला समजेल.

जर तुम्ही बाळाला कुटुंबातील व्यक्तींसोबत बोलायला लावले आणि त्यांना घरातच सामाजिक क्रियाकल्पांमध्ये समाविष्ट करून घेतलेत तर बाळाचे बोलण्याचे कौशल्य सुद्धा विकसित होईल

८ महिन्यांच्या बाळाचे क्रियाकलाप

तुमच्या बाळासाठी खाली दिलेले क्रियाकलाप तुम्ही करू शकता ज्यामुळे बाळाची वाढ आणि विकास वेगाने होण्यास मदत होईल

  1. बोलण्याचा खेळ:  ह्या खेळामुळे तुमच्या बाळाला वेगवेगळ्या शब्दांची ओळख होईल, बाळाचा शब्दसंग्र वाढेल आणि बाळ त्या शाब्दिक माहितीवर प्रक्रिया करण्यास सुद्धा शिकेल. जो बाळासोबत खेळाल तेव्हा त्या विशिष्ट खेळाविषयी बाळाशी बोला त्यामुळे बाळाला त्याविषयी की माहिती कळेल.
  1. नवीन लोकांना भेटणे: नवीन मित्रमैत्रिणी, लोक किंवा कुटूंबातील सदस्यांना भेटल्याने बाळाची अनोखळी लोकांविषयीची चिंता कमी होईल. समाजात मिसळल्याने बाळाचे सामाजिक कौशल्य सुद्धा सुधारेल.
  1. बाळाला गोष्टी वाचून दाखवणे: बाळाला मोठी आणि रंगीबेरंगी चित्रांची उदाहरणे असलेली गोष्टीचे पुस्तके आवडतात. बाळासाठी गोष्टी वाचण्यासाठी ही योग्य वेळ आहे आणि त्यामुळे बाळाचा रंगांचा दृष्टिकोन सुधारेल तसेच बाळाला भाषा सुद्धा चांगली समजू लागेल.
  1. बाळाला रांगू द्या:  बाळाला रांगत तुमच्या कडे यायला सांगा किंवा बाळाला एखादी वस्तू आणायला सांगा जेणेकरून बाळ एका खोलीतून दुसऱ्या खोलीत रांगत जाईल. रांगल्यामुळे बाळाच्या पायाचे स्नायू मजबूत होतील ज्यामुळे भविष्यात बाळाला चालण्यासाठी त्याची मदत होईल.
  1. बाळाच्या खेळण्यांना नावे द्या: बाळाच्या खेळण्यांना नावे द्या आणि ती बाळाला सांगत राहा. खेळण्यांना नावे दिल्याने बाळाच्या मनात ह्या वस्तूचे हे नाव आहे असे समीकरण तयार होईल. जेंव्हा तुम्ही पुन्हा पुन्हा ते बाळाला सांगत रहाल तेव्हा बाळाला वस्तू आणि त्याचा संबंध लावता येईल.
  1. वेगवेगळे अन्नपदार्थ एकत्र करणे: वेगवेगळ्या रंगांच्या भाज्यांमध्ये थोडी स्पगेटी घाला आणि बाळाला वेगवेगळ्या चवींचा अनुभव घेऊ द्या. बाळाला स्वतःच्या हाताने खाऊ द्या त्यामुळे बाळाच्या बोटांच्या हालचाली होतील आणि त्यामुळे बाळाचे हस्तकौशल्य वाढेल. तसेच त्यांना मजा येईल आणि काही काळासाठी बाळ व्यस्त राहील.

८ महिन्यांच्या बाळाची काळजी

तुमचे बाळ त्याची खेळणी चावत बसेल आणि घरातील सगळी धूळ किंवा घरात खाली पडलेल्या गोष्टी डिटेक्टिव्ह सारख्या शोधून काढेल. तुम्ही बाळासाठी घर सुरक्षित करून घ्या आणि औषधे तसेच विषारी गोष्टी बाळापासून दूर ठेवा. घरातील हलवता येण्याजोगे फर्निचर, झाडे लावलेल्या कुंड्या आणि इतर काहीही जे जागेवरून हलवता येईल अशा गोष्टी नीट आहेत ना ते बघा कारण वस्तू पडून इजा होऊ शकते. ह्या वयामध्ये बाळाला कारणे आणि परिणाम समजत नाही त्यामुळे तुम्हाला अजिबात अपेक्षित नसताना बाळाने घरातील पाळीव प्राण्याचा चावा घेतला तर घाबरून जाऊ नका.

बाळाला भरवणे

घन पदार्थ सुरु करण्याआधी तुमचे बाळ जसे स्तनपान घेण्यास त्रास द्यायचे तसे आता देणार नाही. बाळाच्या पोषणाच्या गरजा नीट भागाव्यात म्हणून बाळाला दिवसातून २३ वेळा घनपदार्थ द्या आणि ह्या टप्प्यावर कमीत कमी ४ वेळा स्तनपान द्या. जे पालक बाळाला बाटलीने दूध देतात त्यांनी सुद्धा बाळाला ४ वेळा स्तनपान दिले पाहिजे.

बाळाची झोप

ह्या वयात तुमचे बाळ खूप झोपते. रात्रीचे १०१२ तास आणि दिवसा १३ तास बाळ झोपते आहे असे तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे चिडचिड करू नका कारण हे संपूर्णतः नॉर्मल आहे आणि तुमच्यासाठी ही खूप चांगली बातमी आहे कारण तुम्हाला थोडी झोप मिळेल आणि तुम्ही दिवसाचे रुटीन सुद्धा ठरवू शकाल. तुमच्या बाळाच्या झोपेचे रुटीन आणि पॅटर्नचा अंदाज तुम्हाला लावता येईल.

बाळाची झोप

पालकांसाठी टिप्स

ज्या पालकांना आपल्या बाळाचा विकास वेगाने व्हावा असे वाटत असेल किंवा ज्यांना बाळाच्या विकासात उशीर होऊ नये असे वाटत असेल तर त्यांच्यासाठी खाली काही टिप्स दिल्या आहेत

  • तुमच्या बाळाला ह्या काही आठवड्यांमध्ये वॉकर वापरू देऊ नका. कसे रांगावे, बसावे किंवा थोडे उभे राहून चालावे हे शिकण्यासाठी जमीन म्हणजे चांगला शिक्षक आहे.
  • रंगीत चित्रे असलेली पुस्तके आणि कॉमिक्स द्वारे तुमच्या बाळाला रंग आणि आकाराच्या विश्वाशी ओळख करून द्या.
  • उशा एकावर एक ठेवून त्यावर बाळाला चढायला सांगा त्यामुळे बाळाची शक्ती वाढेल.
  • बाळाची शारीरिक क्रिया वाढायला प्रोत्साहन देण्यासाठी थोडे म्युझिक सुरु करा आणि डान्स करून त्यासोबत गाणे म्हणा. तुम्ही पपेट किंवा इतर गोष्टी वापरून ते अधिक मनोरंजक करू शकता आणि तुमच्या बाळाला त्या गीतांची आणि शब्दांची नक्कल करू द्या.

दिवसाच्या शेवटी, तुमचे बाळ खूप मार्गानी भोवतालच्या जगाचा अभ्यास करीत असते. बाळाला वेगवेगळ्या गोष्टी हाताळू द्या आणि लक्षात ठेवा मध्येच काही मजेदार आवाज आल्यास चिडून जाऊ नका. (जसे की चमच्याने कप वर आपटल्याचा आवाज) हे फक्त उत्सुक मनाचे खेळ आहेत!

ह्या आठवड्यांदरम्यान तुमच्या बाळाची रांगण्यापासून ते काही पावले टाकण्यापर्यंतची झालेली प्रगती बघणे हे खूपच आश्चर्यकारक आहे. बाळाला नवीन अन्नपदार्थांची ओळख करून द्या. बाळाला मग्न ठेवा आणि बाळाचे मनोरंजन करा आणि तुम्ही तुमची पालकत्वाची यशस्वी वाटचाल सुरु ठेवा. तसेच तुम्ही थोडा धीर धरला पाहिजे कारण कधीतरी रांगताना किंवा फिरत असताना तुमचे बाळ खाली पडेल किंवा घसरू शकेल आणि त्यास कसे सामोरे जावे हे आपण त्याला शिकवले पाहिजे.

मागील महिना: तुमच्या ७ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास
पुढील महिना: तुमच्या ९ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article