Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण गर्भधारणेचे आठवडे गर्भधारणा: ३७वा आठवडा

गर्भधारणा: ३७वा आठवडा

गर्भधारणा: ३७वा आठवडा

गरोदरपणाच्या ३७व्या आठवड्यात प्रसूतीकळा केव्हाही सुरु होऊ शकतात. बाळाचे जवळ जवळ सगळे अवयव परिपक्व झाले असून बाळ  बाहेरच्या जगात कुठल्याही अडचणीशिवाय राहू शकते.

गर्भारपणाच्या ३७व्या आठवड्यातील तुमचे बाळ

३७व्या आठवड्यात बाळाचा विकास खालीलप्रमाणे झालेला दिसून येतो.

१. पायांच्या बोटांची नखे

आतापर्यंत पायांची बोटे आच्छादित होण्याइतपत नखांची वाढ झालेली आहे आणि नखांची ही वाढ होत राहणार आहे त्यामुळे बाळाच्या जन्मानंतर तुम्ही बघितलेत तर बाळाची नखे थोडी जास्त वाढलेली आढळून येतात.

२. स्तन ग्रंथींना सूज

दूध निर्मितीची प्रक्रिया सुरु करण्याचा रासायनिक संदेश गर्भवती आईला संप्रेरकांद्वारे नाळेमधून दिला जातो आणि ह्या संप्रेरकांमुळे बाळाच्या स्तनग्रंथींना सूज येण्यास सुरुवात होते. बाळाच्या जन्मानंतर त्या नॉर्मल होतात.

३. प्रतिपिंडांनी (Antibodies) सज्ज

बाळाला जन्मानंतर कुठल्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये म्हणून, नाळेद्वारे बाळाच्या शरीराला अँटीबॉडीजचा पुरवठा जातो. बाळाच्या जन्मानंतर स्तनपानातून बाळाला मिळतात.

४. संपूर्णपणे विकसित फुप्फुसे

फुप्फुसे पूर्णपणे विकसित झाल्यामुळे बाळाचे आता केव्हाही आगमन होऊ शकते. फुप्फुसे लिपोप्रोटीन ची निर्मिती करतात आणि त्यामुळे बाळाला श्वसनास मदत होते.

बाळाचा आकार केवढा असतो?

जेव्हा तुम्ही ३७ आठवड्यांच्या गर्भवती असता तेव्हा बाळाचा आकार हा रोमन लेट्युस एवढा असतो. बाळाची लांबी १९.१ इंच इतकी असते आणि वजन आता पर्यंत २.८ किलोग्रॅम पर्यंत पोहोचलेले असते. म्हणजेच जवळपास बेबी कांगारू इतके हे वजन असते!

शरीरात होणारे बदल

गर्भारपणाच्या ३७व्या आठवड्यात आढळणारे शारीरिक बदल खालीलप्रमाणे

१.सराव कळा

गर्भारपणाच्या ३७व्या आठवड्यात ह्या सराव कळांची वारंवारिता वाढते.

२.गर्भजल

बाळाचा आकार वाढल्याने गर्भजलात घट होते.

गर्भारपणाच्या ३७व्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाच्या लक्षणे

ह्या काळात काही लक्षणे जी सामान्यपणे महिला अनुभवतात ती खालीलप्रमाणे

१. जळजळ होणे

बाळाला सामावून घेण्यासाठी गर्भाशयाची वाढ होते आणि त्यामुळे शरीरातील अवयवांवर दाब पडतो उदा: पोट, त्यामुळे पचनसंस्थेवर ताण येतो आणि त्यामुळे जळजळ होण्याची शक्यता असते.

२. हलके डाग

गर्भाशयाच्या मुखाच्या संवेदनशीलतेमुळे हलके डाग किंवा रक्तस्त्राव होणे हे गर्भारपणाच्या ३७व्या आठवड्यातील सामान्य लक्षण आहे. हा रक्तस्त्राव शारीरिक संबंध ठेवल्यामुळे सुद्धा होऊ शकतो.

३. झोप न लागणे (Insomnia)

गरोदरपणात कुठल्यातरी टप्प्यावर झोप न लागण्याचा त्रास गर्भवती महिलांना झालेलाच असतो. ह्याचे कारण वारंवार लघवीला जावे लागणे, झोपण्याची स्थिती आरामदायक नसणे आणि चिंताग्रस्तता ह्यापैकी कुठलेही असू शकते.

प्रसूतीची लक्षणे कुठली असतात?

गर्भारपणाच्या ३७व्या आठवड्यात प्रसूतीकळा सुरु होऊ शकतात आणि जन्माला आलेले बाळ हे संपूर्ण विकसित झालेले असते. इथे काही लक्षणे दिली आहेत ज्यामुळे तुम्हाला प्रसूती वेदना सुरु झाल्या आहेत किंवा कसे हे जाणून घेण्यास मदत होईल.

१. नियमित येणाऱ्या कळा

प्रसूती दरम्यान नियमित कळा येण्यास सुरुवात होते आणि त्या सराव कळा (Braxton Hicks Contraction) असल्याचे समजले जाते. ह्या सराव कळांची तीव्रता जरी सारखीच असली तरी, प्रसव कळा आणि सराव कळांमधील प्रमुख फरक म्हणजे प्रसव कळा नियमित असतात. जर कळा अनियमित झाल्या किंवा तुम्ही आराम केल्यावर त्या येणे बंद झाले तर त्या सराव कळा असू शकतात.

२. गर्भजल पिशवी फुटणे

तुमच्या बाळासाठी पाळण्यासारखी असणारी तसेच आतापर्यंत बाळाला सुरक्षित ठेवणारी गर्भजल पिशवी फुटते/ फाटते. जेव्हा असे होते तेव्हा प्रत्येक स्त्री चा वेगळा अनुभव असतो आणि तो गर्भजल पिशवी किती फाटली आहे ह्यावर अवलंबून असतो. म्हणजेच गर्भाशयाच्या मुखातून किंवा योनीतुन गर्भजल टिपकत राहील किंवा उसळून बाहेर येईल हे अवलंबून असते.

३. श्लेष्मा

बाळाचे जिवाणूंच्या संसर्गापासून संरक्षण व्हावे म्हणून, गर्भाशयाच्या मुखाशी असलेले श्लेष्मा हे प्रतिजैविक गुणधर्मांनी समृद्ध असते, जेव्हा बाळ खाली सरकते तेव्हा हे श्लेष्म बाहेर पडते आणि बऱ्याच स्त्रियांना त्यानंतर १२ तासांनी प्रसूतीकळा सुरु होतात.

गर्भारपणाच्या ३७ व्या आठवड्यात प्रसूती प्रवृत्त करणे

जर तुम्हाला, प्रसूती प्रवृत्त करायची असेल तर तुम्ही खालील तंत्र करून बघू शकता, परंतु ते करून बघण्याआधी तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा, कारण तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला योग्य ते तंत्र तुम्हाला ते सुचवतील.

१. स्तनाग्रांना उत्तेजित करणे

ही पद्धत पूर्वापार चालत आली असून, स्तनाग्रांना उत्तेजित केल्याने ऑक्सिटोसिन ची निर्मिती होते आणि त्यामुळे प्रसूती प्रवृत्त होण्यास मदत होते. प्रसूती कळा सुरु करण्यासाठी ही खूप परिणामकारक पद्धती असून ह्या कळा तीव्र आणि जास्त कालावधी साठी असतात.

२. शारीरिक संबंध

पुरुषांच्या स्खलनामध्ये (Ejaculation), prostaglandins असतात आणि त्यामुळे प्रसूती प्रवृत्त होण्यास मदत होते. परंतु पोटाचा आकार खूप जास्त वाढला असल्याने काही स्त्रियांना शारीरिक संबंध ठेवणे कठीण जाते. परंतु संभोगाच्या योग्य स्थिती वापरून प्रसूती प्रवृत्त करता येऊ शकेल.

गर्भधारणेच्या ३७व्या आठवड्यात पोटाचा आकार

ह्या काळात बाळ ओटीपोटाकडे खाली सरकते. हे बाळाचे खाली सरकणे म्हणजे प्रसूतीची तयारी असते. परंतु बाळ खाली सरकले आहे हे कुणालाही नुसते बघून लक्षात येत नाही.

गर्भावस्थेच्या ३७व्या आठवड्यातील सोनोग्राफी

गर्भावस्थेच्या ३७व्या आठवड्यातील सोनोग्राफी मध्ये तुम्ही बघू शकाल की बाळाचे डोके खाली आहे. बाळाच्या हृदयाचे ठोके आणि गर्भाशयाची स्थिती सुद्धा तुम्हाला ह्या अल्ट्रासाऊंड मध्ये कळते. या वेळी बाळांचे लिंग निश्चित करणे कठीण आहे कारण बाळ जवळजवळ येथून पुढे जात नाही.

आहार कसा असावा?

जेव्हा तुम्ही गर्भारपणाच्या ३७व्या आठवड्यात पदार्पण करता तेव्हा ३ घटकांना अनुसरून तुम्ही अन्नपदार्थांचे वर्गीकरण करू शकता.

सर्वात प्रथम तुमचे गर्भारपणाचे पूर्ण दिवस भरल्याने तुम्ही प्रसूती प्रवत्त अन्नपदार्थ खाल्ले पाहिजेत ज्यामध्ये एरंडेल तेल, मसालेदार अन्नपदार्थ, तसेच प्राइमरोस ऑइल ह्यांचा समावेश होतो.

दुसरे म्हणजे तुम्हाला अजूनही जळजळ होत असल्याने अल्कोहोल, चरबीयुक्त अन्नपदार्थ तसेच तेलकट अन्नपदार्थ खाणे टाळा आणि शेवटचे म्हणजे तुमच्या बाळाचा वेगाने विकास होतो आहे त्यामुळे प्रथिनांनी समृद्ध अन्नपदार्थ जसे की मासे, अंडी आणि दूध ह्यांचा तुमच्या आहारात समावेश असणे गरजेचे आहे.

काय काळजी घ्याल आणि त्यासाठी काही टिप्स

खाली काही गोष्टी दिल्या आहे आणि तुम्ही ३७ आठवड्यांच्या गर्भवती असताना  त्या विचारात घेतल्या पाहिजेत.

हे करा

  • प्रसुतीसाठी हॉस्पिटल मध्ये जाण्यासाठी जो रस्ता कमी रहदारीचा असतो तो रस्ता शोधून ठेवा.

हे करू नका

  • गर्भवती स्त्रीला ह्या टप्प्यावर बाळाचा जन्म लवकर होऊन लवकर सुटका व्हावी असे वाटू शकते. आजूबाजूला फिरणे हालचाल करणे सुद्धा कठीण होऊन बसते त्यामुळे थोडा अराम करणे योग्य होईल. ह्यावर उपाय म्हणजे तुम्ही तुमची कामे दुसऱ्या कुणाला तरी करायला सांगू शकता!
  • कॅफेन घेणे टाळा कारण त्यामुळे तुम्हाला झोप लागणार नाही.

कुठल्या गोष्टींची खरेदी कराल?

गरोदरपणाच्या ३७व्या आठवड्यात तुमचे पूर्ण दिवस भरले असून तुम्ही खालील गोष्टींची खरेदी करू शकता,

१. बाळाचे आगमन

बाळ येताना काही त्याच्या सामानाची बॅग घेऊन येणार नाही त्यामुळे तुम्ही बाळाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टींची खरेदी केली पाहिजे. त्यामध्ये बाळासाठी नॅपी, ब्लॅंकेट, आणि मुलगा किंवा मुलगी दोघांना घालता येतील असे कपडे ह्यांचा समावेश होतो.

२. तुमचा आराम

प्रसूतीच्या प्रक्रियेला वेळ लागणार आहे आणि तुम्हाला अस्वस्थ वाटणार आहे त्यामुळे तुम्ही पुस्तके, आरामदायक उशा तसेच तुम्हाला लागणारे टॉयलेटरी सेट्स आणून ठेवा.

आता तुम्ही गर्भावस्थेच्या अगदी शेवटी आहात. त्यामुळे आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही प्रसूतीच्या लक्षणांकडे लक्ष ठेवणे ही होय.

मागील आठवडा: गर्भधारणा: ३६वा आठवडा

पुढील आठवडा: गर्भधारणा: ३८वा आठवडा

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article