Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण गर्भधारणेचे आठवडे गर्भधारणा: १०वा आठवडा

गर्भधारणा: १०वा आठवडा

गर्भधारणा: १०वा आठवडा

गर्भारपणाच्या ९ व्या आठवड्यात तुमच्या बाळाची भ्रूण ते गर्भ अशी प्रगती झाली आहे. गर्भारपणाच्या १०व्या आठवड्यानंतर पहिली तिमाही संपण्यासाठी फक्त २ आठवडे राहिले आहेत. १० व्या आठवड्याची सर्वात रोमांचक गोष्ट म्हणजे तुम्ही गरोदर आहात हे आता दिसू लागेल. होय माझ्या प्रिय मैत्रिणींनो, जर तुम्ही आणि तुमचे सुहृद तुम्ही गरोदर दिसण्याची वाट पाहत असाल, तर तुम्ही आता आई होणार आहात हे सगळ्यांना दिसणार आहे. खूप अभिमान वाटावा असे हे दिवस आहेत. गर्भधारणेला १० आठवडे झाल्यानंतरच्या माहितीसाठी हा लेख वाचा.

गर्भारपणाच्या १०व्या आठवड्यातील तुमचे बाळ

तुमच्या बाळाचे हृदय आता पूर्ण तयार झालेले आहे आणि कार्यरत सुद्धा आहे, किंबहुना तुमच्यापेक्षा तुमच्या बाळाच्या हृदयाचे ठोके वेगाने पडत असतात. तुमचे बाळ आता पुढच्या आठवड्यांमध्ये मनुष्याप्रमाणे  दिसू लागेल आणि १० वा आठवडा सुद्धा त्याला अपवाद नाही.

बाळाच्या वाढीत होणारे बदल म्हणजे, जबड्यांची हाडे तयार होतात तसेच मेंदू आणि डोक्याचा विकास होतो.

हात पाय, पोट तसेच श्रोणी (pelvis) आणि हाडे आता विकसित होतात.

बाळाचा आकार केवढा असतो?

आधी सांगितल्याप्रमाणे तुमच्या बाळाची सगळी ठळक वैशिठ्ये दिसत असली तरी, तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण अजून ही बाळाचा आकार स्ट्रॉबेरी इतकाच असतो आणि तुमच्या बाळाची लांबी १.२ इंच इतकी असते, वजन ४ ग्रॅम्स इतके असते. १०व्या आठवड्याच्या प्रत्येक दिवसागणिक तुमच्या बाळाची वाढ होत असते.

शरीरात होणारे बदल

आधी चर्चा केल्याप्रमाणे गर्भावस्थेत तुमच्या शरीरात बदल होत असतात. तुम्हाला आधीसारखा मॉर्निंग सिकनेसचा त्रास होत नसेल तर, तुमच्या वजनात कमीत कमी एक किलोची वाढ होईल. जेव्हा गर्भाशय विस्तृत होत असते तेव्हा तुमचे पोट गोलाकार होऊ लागते आणि प्रत्येक आठवड्यागणिक ते वाढत रहाते.

खूप घट्ट कपडे घालणे टाळा कारण तुमच्या शरीराची गोलाई वाढत जाणार आहे. तसेच तुम्हाला लक्षात येईल की, आता रक्तवाहिन्या सुद्धा स्पष्ट दिसत आहेत. परंतु घाबरण्याचे काहीच कारण नाही कारण तुमच्या शरीरातील रक्ताची पातळी वाढल्यामुळे तुमच्या पोटाभोवती आणि स्तनांच्या भागात रक्तवाहिन्या स्पष्ट दिसू लागतात. तसेच ते तुमच्या त्वचेवर आणि रक्ताच्या पातळीवर अवलंबून असते.

१०व्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणे

गर्भारपणात प्रत्येक आठवड्यात बदल होत असतात आणि कुठलेही २ आठवडे एकसारखे नसतात. खाली काही लक्षणे दिली आहेत ती तुम्ही अनुभवत असलेल्या लक्षणांशी जुळतात का ते पहा:

 • मॉर्निंग सिकनेस चा त्रास बंद होईल. (जर तुम्ही भाग्यवान असाल तर)
 • योनिमार्गाच्या स्रावामध्ये वाढ होईल, त्यामुळे संसर्गापासून तुमचे संरक्षण होईल.
 • पोट फुगणे आणि गॅस होणे: प्रोजेस्टेरॉन मुळे पचनक्रिया मंदावते आणि त्यामुळे तुम्हाला पोट फुगल्यासारखे वाटेल आणि गॅसेस होतील.
 • थकवा आणि मनःस्थितीत बदल होतील, हे संप्रेरकांच्या बदलत्या पातळीमुळे होते.
 • स्तनांच्या आकारात वाढ होईल: संप्रेरकांमुळे स्तनांच्या आकारात वाढ होते तसेच ते तुमच्या स्तनांना दूधनिर्मितीसाठी मदत करतात. स्तनांचा फक्त आकारच वाढत नाही तर, स्तनाग्रे सुद्धा गडद होतात आणि तुमचे स्तन जास्त हळुवार होतात आणि तुम्हाला स्तनाग्रांभोवती काही रक्तवाहिन्या सुद्धा दिसू लागतात.

गर्भधारणेच्या १०व्या आठवड्यात पोटाचा आकार

आधीच सांगितल्याप्रमाणे गर्भारपणाच्या १०व्या आठवड्यात तुमचे पोट गोलाकार वाढणार आहे. ९ व्या आठवड्यापेक्षा आता पोटाचा आकार जास्त उठून दिसणार आहे. बऱ्याचदा गर्भारपणाच्या १०व्या आठवड्यात स्तनांबरोबरच तुमच्या पोटावर सुद्धा रक्तवाहिन्या दिसणार आहेत.

गर्भधारणेच्या १०व्या आठवड्यातील सोनोग्राफी

तुमचे बाळ आता अगदी छोटंसं माणूस आहे, तुमच्या १०व्या आठवड्यातील सोनोग्राफीमध्ये तुम्हाला दिसेल की मोठ्या माणसासारखेच ह्या छोट्या बाळामध्ये सगळी कार्ये सुरळीत सुरु आहेत.

तुमच्या बाळाचे सगळे अवयव तयार झाले आहेत आणि कार्यरत आहेत. तुमच्या बाळाचे हाताचे सांधे कार्यरत आहेत आणि त्यामुळे ते वळवता येऊ शकतात. हाडे आणि कूर्चा (cartilage) सुद्धा तयार झालेले असतात. ह्या सोनोग्राफीचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला बाळाचे केस आणि नखे सुद्धा दिसतात.

आहार कसा असावा?

काय खावे हा प्रश्न कधी कधी निराशाजनक वाटू शकतो आणि तो अडथळाही ठरू शकतो. गर्भारपणाच्या १०व्या आठवड्यात तुम्ही काय खाऊ शकता हे पाहूयात.

 • लोह: ह्या पुढच्या आठवड्यात तुमच्या बाळाचा मेंदू विकसित होणार आहे, तुमचा आहारात लोहयुक्त अन्न पदार्थांचा समावेश करावा. चरबीयुक्त मासे, अंडी, लाल मांस, संपूर्ण धान्य ब्रेड, आणि हिरव्या पालेभाज्या, सुकामेवा वगेरे हे सगळे अन्नपदार्थ फक्त लोह नाही तर इतर पोषकमूल्यांचे स्रोत आहेत.
 • व्हिटॅमिन सी: लोहाबरोबरच व्हिटॅमिन-सी असलेल्या अन्नपदार्थांचा आहारात समावेश करणे चांगले कारण व्हिटॅमिन सी, लोह रक्तात शोषण्यास मदत करते. मोसंबी सारखी फळे व्हिटॅमिन-सी चे उत्तम स्त्रोत आहेत, फळांच्या रसाचा सुद्धा तुम्ही आहारात समावेश करू शकता.
 • नाश्ता: जरी तुम्हाला विशिष्ट अन्नपदार्थ खावेसे वाटत असतील किंवा काही अन्न पदार्थांविषयी तिटकारा वाटत असला तरी, भुकेच्या वेळी खाण्यासाठी स्नॅक्स जवळ ठेवणे गरजेचे आहे. शक्यतो सुकामेवा जवळ ठेवा.

काय काळजी घ्याल आणि त्यासाठी काही टिप्स

आता तुम्ही गरोदर आहात हे दिसू लागले आहे, त्यामुळे स्वतःची तब्येत चांगली ठेवण्याचे चांगले काम तुम्ही केले पाहिजे त्यामुळे तुमची प्रसूती सुलभ होईल. खाली काही सूचना दिल्या आहेत त्यांचा तुम्हाला स्वतःला आणि तुमच्या बाळाला सुरक्षित ठेवण्यास मदत होईल.

हे करा

खाली काही गोष्टी दिल्या आहेत ज्या तुम्ही तुमच्या गरोदरपणात पाळल्या पाहिजेत,

 • भरपूर पाणी प्या. तुम्ही सजलीत राहणे हे अत्यंत गरजेचे आहे.
 • कॅल्शिअम, फोलेट, तंतुमय पदार्थ, लोहयुक्त अन्नपदार्थ खा.
 • अँटिऑक्सिडंटयुक्त अन्नपदार्थ खा, एकुणातच तुमच्या आरोग्यासाठी ते चांगले असते.
 • गर्भारपणामुळे थकवा येऊ शकतो व त्यामुळे तुमच्या शरीराला विश्रांतीची आवशक्यता आहे. विश्रांती घ्या.
 • सैलसर कपडे घाला, घट्ट कपड्यांमुळे रक्तप्रवाह सुरळीत होण्यास अडथळा येतो, आणि स्तनांमध्ये सुद्धा वेदना जाणवतात.
 • आपल्या दंतवैद्यांना भेट द्या. संप्रेरकांच्या वाढलेल्या पातळीमुळे दातदुखीचा सामना करणे गरोदर स्त्रीला कठीण होते.

हे करू नका

खाली दिलेल्या टिप्स लक्षत घ्या म्हणजे तुमचे शरीर निरोगी राहील तसेच गर्भारपण सुकर होईल,

 • खूप अवघड व्यायाम करू नका कारण त्यामुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो.
 • कुठल्याही अस्वच्छ ठिकाणी किंवा गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, त्यामुळे तुम्हाला संसर्ग होऊन ताण वाढण्याची शक्यता असते.
 • कुठल्याही जंतुनाशकांजवळ जाऊ नका तुम्हाला त्याची ऍलर्जिक प्रतिक्रिया येऊ शकते.

कुठल्या गोष्टींची खरेदी कराल?

मोठ्या साईजच्या ब्रा आणून ठेवा. आत्ता बाळ आणि पालकत्व ह्या विषयावरच्या पुस्तकांची खरेदी करा.तुम्ही सैल कपडे आणि मोठ्या साईझच्या पँट्स सुद्धा आणून ठेऊ शकता.

तुम्ही तुमच्यासाठी एक वेस्ट एक्सटेंडर खरेदी करू शकता. आरामदायी बूट आणा, खासकरून तुमच्या पायाला सूज येऊ शकते त्यामुळे पॅडिंग असलेले बूट आणून ठेवा. ही वेळ खरं तर छान छान मॅटर्निटी कपडे खरेदी करण्याची आहे कारण लवकरच तुम्हाला ते लागणार आहेत.

काही अन्नपदार्थांची खरेदी करण्यास विसरू नका कारण तुमचं खाण्यापिण्याचे वेळापत्रक बदलले आहे आणि ते बदलत राहणार आहे. तसेच चांगले लोशन आणि मॉइश्चराझर्स सुद्धा घेऊन ठेवा, कारण तुमच्या त्वचा कोरडी असणार आहे. तुमच्या दातांची काळजी घ्या, चांगले टूथब्रश आणि माऊथवॉश आणून ठेवा. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आरामदायक उशांची खरेदी करा कारण तुम्हाला ह्या काळात आरामाची गरज आहे.

कुठल्या गोष्टींची खरेदी कराल?

गर्भारपणाच्या १० व्या आठवड्यात मॉर्निंग सिकनेस कमी होऊ लागतो आणि मॉर्निंग सिकनेस पासून सुटका होते. तुमच्या बाळाची निरोगी वाढ होत असते आणि मग आपण किती दूरपर्यंत आलो आहोत ह्या विचाराने तुम्ही आनंदी होता, हो ना?

मागील आठवडा: गर्भधारणा: ९वा आठवडा

पुढील आठवडा: गर्भधारणा: ११वा आठवडा

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article