In this Article
तुमचा आणि तुमच्या बाळाच्या भेटीचा दिवस अगदी जवळ आला आहे. २१व्या आठवड्यात तुम्ही नेहमीपेक्षा तुमच्या बाळाचा जास्त अनुभव घेऊ शकाल. तुम्ही अजून काही नवे क्षण अनुभवता आणि त्यासाठी तुम्हाला मदतीची गरज आहे. इथे काही सूचनांची यादी आहे तसेच तुम्हाला २१ व्या आठवड्यात पडणाऱ्या प्रश्नाची उत्तरे सुद्धा तुम्हाला इथे सापडतील.
गर्भारपणाच्या २१व्या आठवड्यातील तुमचे बाळ
२१ व्या आठवड्यात तुमच्या बाळाला अन्नपदार्थांची चव कळू लागेल कारण बाळाच्या स्वाद कालिका विकसित होऊ लागतात. जरी बाळाचे पोषण गिळलेल्या पाण्यावर होत असले तरी तुम्ही जे पदार्थ खाता त्याचा स्वाद त्यास येतो. काही अभ्यासानंतर निष्कर्ष निघाला आहे की गर्भावस्थेदरम्यान आई जे पदार्थ खाते तेच पदार्थ बाळ प्राधान्याने खाते. चव विकसित होण्याव्यतिरिक्त बाळाचे हात पाय प्रामाणितपणे विकसित होतात, तसेच बाळाला हालचालींवर नियंत्रण ठेवता येते उदा: लाथ किंवा धक्का मारणे इत्यादी.
अजूनही गर्भ लहान असल्यामुळे तुम्हाला बाळ त्याच्या शरीराच्या कुठल्या भागाने तुमच्या पोटावर दाब देत आहे ते कळणार नाही. आवाज आणि दृष्टी विकसित होत असल्यामुळे बाळाला तुमच्या दैनंदिन सवयीची कल्पना येते आणि बाळ तुमचा आवाज सुद्धा ओळखू लागते. बाळाच्या भुवया, पापण्या सुद्धा तयार होतात, तथापि डोळ्याच्या बुबुळांचा रंग अजून निश्तिच झालेला नसतो.
बाळाचा आकार केवढा असतो?
गर्भारपणाच्या २१ व्या आठवड्यात तुमच्या बाळाची डोक्यापासून ते पायाच्या अंगठ्यांपर्यंतची लांबी २४-२५ सेंमी इतकी असते. अगदी थोडक्यात सांगायचे म्हणजे मोठ्या आकाराच्या गाजरासारखंच! बाळाचे वजन ४५०-५०० ग्रॅम्स इतके असते आणि हळू हळू तुमच्या अवयवांवर बाळाच्या ह्या वाढत्या वजनामुळे दाब पडू लागतो.
शरीरात होणारे बदल
गर्भारपणाच्या २१ व्या आठवड्यात खालीलप्रमाणे काही शारीरिक बदल होतात.
वेरीकोस व्हेन्स:
तुमचे बाळ मोठे होत असल्याने, तुमच्या पायाच्या रक्तवाहिन्यांवर जास्त दाब पडू लागतो. शरीरातील प्रोजेस्टेरॉनच्या वाढत्या पातळीमुळे परिस्थतीत अजून वाढ होते आणि परिणामी व्हेरिकोज व्हेन्स दिसू लागतात.
स्ट्रेच मार्क्सस:
तुमच्या वाढत्या पोटाच्या आकाराचा ताण पोट, मांड्या,कुल्ले इत्यादींवर पडतो. त्वचेखालील काही टिशू फाटले गेल्यामुळे स्ट्रेच मार्क्सच्या गडद रेषा दिसतात. तुमचा रंग जितका जास्त उजळ तितके जास्त स्ट्रेच मार्क्स दिसण्याची शक्यता वाढते. बाळाच्या जन्मानंतर ते जात नाहीत परंतु तितके ठळक दिसत नाहीत.
स्पायडर व्हेन्स
झाडाच्या फांद्यांसारखे अगदी छोट्या रक्तवाहिन्यांचे जाळे हात, पाय आणि चेहऱ्यावर दिसतात. परंतु एक चांगली गोष्ट म्हणजे बाळाच्या जन्मानंतर ते नाहीसे होतात.
मुरूम आणि पुटकुळ्या:
तुमच्या शरीरातील संप्रेरकांचा प्रवाह अचानक उचंबळून येत असल्याने तुमच्या त्वचेतील तेलाची पातळी लक्षणीय रित्या वाढते आणि त्यामुळे मुरूम आणि पुटकुळ्यांचा उद्रेक होतो तथापि ह्या मुरुमांसाठी कुठल्या गोळ्या खाऊ नका त्यामुळे तुमच्या गर्भावस्थेत गुंतागुंत वाढण्याची शक्यता निर्माण होते.
गर्भारपणाच्या २१ व्या आठवड्याची लक्षणे
२१व्या आठवड्यांच्या लक्षणांवरून तुमची तिसरी तिमाही कशी जाणार आहे ते समजते. त्यापॆकी काही लक्षणे खालीलप्रमाणे
सराव कळा: (Braxton Hicks Contractions): प्रसूतीच्या आधी तुम्ही सराव कळा अनुभवाल, प्रसूतीच्या वेळेसाठी सराव म्हणून त्या येतात. पण तुम्हाला खूपच अस्वस्थता जाणवत असेल तर तात्काळ तुमच्या डॉक्टरांना फोन करा.
स्तनांमधून स्त्राव गळणे: स्तनांमधून दूध किंवा पिवळा स्त्राव येऊ लागतो कारण दुग्ध वाहिन्या आता पूर्णपणे कार्यरत असतात. हा स्त्राव गळत असताना वेदना होत नाहीत परंतु बेचैन वाटू शकते, त्यामुळे सोबत टिश्यू किंवा ओले वाईप्स ठेवा.
त्वचेला खाज सुटणे: तुमच्या पोटाची त्वचा ताणली गेल्यामुळे नेहमीपेक्षा कोरडी पडते त्यामुळे भरपूर मॉइश्चरायझर लावा त्यामुळे तुमच्या कोरड्या त्वचेचा प्रश्न सुटेल.
पायांमध्ये पेटके येणे: हे खूप सामान्यपणे आढळणारे लक्षण असून तुमचे पाय नेहमीपेक्षा जास्त वजन पेलत असल्यामुळे असे होते. पाय ताणण्याचे व्यायाम करा आणि तुम्हाला आराम मिळावा म्हणून तुम्ही ‘leg massager’ विकत आणू शकता.
हिरड्यांना सूज येणे: नेहमीपेक्षा तुमच्या हिरड्या खूपच संवेदनशील झाल्या असल्याने हळुवार ब्रश करा.
गर्भधारणेच्या २१व्या आठवड्यात पोटाचा आकार
२१ आठवडे बाळ पोटात वाढवल्यामुळे तुमच्या संपूर्ण शरीरावर ताण येतो. तुमच्या पोटाचा घेर वाढत असताना तुमच्या लक्षात येईल की तुमची बेंबी आधी सारखीच राहील किंवा काही वेळा बाहेर येते.
नेहमीपेक्षा तुमचे वजन ५-६ किलोंनी वाढले आहे. ह्यामध्ये बाळाचे वजन, गर्भजल, नाळ, वाढलेला रक्तप्रवाह, चरबी आणि स्तनांमधील प्रथिनांचा साठा आणि इतर द्रव्ये ह्यांचा समावेश होतो. kegel ह्या व्यायाम पद्धतींचा अवलंब करून तुम्ही तुमच्या गर्भाशय आणि श्रोणीच्या स्नायूंना आकारबद्ध ठेऊ शकता.
गर्भधारणेच्या २१व्या आठवड्यातील सोनोग्राफी
जर तुम्ही ह्या आठवड्यात म्हणजेच तुमच्या गर्भावस्थेतील मध्यावर अल्ट्रासाऊंड करून घेतल्यास तुम्हाला तुमच्या बाळाच्या शरीराचे अगदी जटिल तपशील सुद्धा दिसतील जसे की हृदयाचे कप्पे, मेंदू चे अर्धगोल इत्यादी. तुमच्या बाळाच्या हातापायांचे तपशील, पंचेंद्रिये आणि केस सुद्धा दिसू लागतील. तसेच तुमचे बाळ मुलगा आहे की मुलगी हे सुद्धा कळू शकते परंतु भारतामध्ये स्त्रीभ्रूण हत्येचा दर खूप जास्त असल्याने ते जाणून घेणे बेकायदेशीर आहे.
आहार कसा असावा?
तुम्हाला आता लोहाची खूप जास्त गरज भासते कारण बाळाच्या गरजांसाठी तुम्हाला खूप जास्त रक्ताची गरज आहे. जर तुमच्या रक्तातील लोहाची पातळी कमी झाली तर तुम्हाला ऍनिमिक वाटू शकते, त्यामुळे थकवा, श्वासोच्छवासास त्रास आणि शुद्ध सुद्धा हरपते. लोह समृद्ध अन्नपदार्थ जसे की पालक, लाल मांस, भाज्या आणि मांस खाण्याचा सल्ला दिला जाते. अशा परिस्थितीत लोहयुक्त गोळ्या सुद्धा बऱ्याचदा लिहून दिल्या जातात.
कॅफेन टाळल्यास लोहाचे शोषण वाढते, त्यामुळे रोज कॉफी घेणे टाळा.
व्हिटॅमिन सी युक्त अन्नपदार्थ खा, उदा: लिंबू, द्राक्षे, कलिंगड वगैरे. जर तुमचे वजन जास्त असेल किंवा लठ्ठ असाल तर तुमच्या आहारात संपूर्ण धान्य, फळे, भाज्या यांचा समावेश करणे आवश्यक आहे तसेच प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ आणि साखर टाळणे आवश्यक आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सजलीत राहा आणि कमीत कमी २-३ लिटर्स पाणी दररोज प्या.
काय काळजी घ्याल आणि त्यासाठी काही टिप्स
खूप सामान्यपणे आढळणारे प्रश्न जसे की जसे की जळजळ, पाठदुखी, मूळव्याध वगैरे कसे हाताळावेत हे जाणून घेणे गरजेचे आहे. तुमच्या डॉक्टरांना नियमित भेट द्या आणि तुमची आणि तुमच्या बाळाची सुरक्षितता जास्तीत जास्त कशी राखता येईन ह्याविषयी माहित करून घ्या.
हे करा
- पायांना पेटके येऊ नयेत म्हणून तुमच्या पायाचे स्नायू ताणा आणि आरामात ठेवा. गरज भासल्यास तुमच्या फिजिओथेरपिस्टला अवश्य भेट द्या.
- दररोज तुमच्या बाळाशी किमान दोन तास बोला आणि बाळासाठी गाणी सुद्धा गा. त्यामुळे बाळ तुमचा आवाज ओळखू लागेल आणि तुमच्या आवाजाशी बंध तयार होईल. बाळासाठी संगीत चालू केल्यास बाळाला आराम मिळेल.
हे करू नका
- तुमचे नियमित व्यायाम करण्यास विसरू नका, तसेच डाव्या कुशीवर झोपू नका.
- गर्भवती महिलांना खोकल्यासाठी लसीकरणाचा सल्ला दिला जातो, ह्या विषयी सल्ला आणि मार्गदर्शनासाठी तुमच्या डॉक्टरांशी जरूर संपर्क साधा.
कुठल्या गोष्टींची खरेदी कराल?
सर्वात महत्वाची गोष्ट ज्यावर तुम्ही पैसे खर्च करू शकता ती म्हणजे मॅटर्नीटी कपडे. हे कपडे आरामदायी असतात आणि गर्भावस्थेच्या मध्यावर त्यांची मदत होते. हे कपडे मिळण्यासाठी बहुतांश ऑनलाईन साईट्स आहेत त्यापैकी एक तुम्ही निवडू शकता. गर्भावस्थेविषयी चांगली पुस्तके, मॅटर्निटी ब्रा तसेच बाळाच्या खोली साठी लागणाऱ्या विविध गोष्टींची खरेदी तुम्ही करू शकता.
गरोदरपणातील आणि बाळंतपणातील सहजतेसाठी सगळी तयारी लवकर आणि आधीच करून ठेवणे चांगले त्यामुळे त्याच्याबरोबर येणारा ताण कमी होण्यास मदत होते.
मागील आठवडा: गर्भधारणा: २०वा आठवडा
पुढील आठवडा: गर्भधारणा: २२वा आठवडा