गर्भधारणा: २२वा आठवडा

तुमच्या गोंडस बाळाची आणि तुमची भेट होण्यासाठी फक्त काही आठवडे राहिले आहेत! परंतु तिथपर्यंत पोहोचण्यासाठी काही मार्ग आहेत. ह्या लेखामध्ये आम्ही काही सूचना आणि तुम्हाला गर्भावस्थेच्या २२व्या आठवड्यात पडणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे देत आहोत.

गर्भारपणाच्या २२व्या आठवड्यातील तुमचे बाळ

बाळाला आता बाहेरचे जग जास्तीत जास्त समजू लागले आहे, कारण बाळाची ऐकण्याची, बघण्याची आणि स्पर्शाची भावना विकसित होत आहे. बाळाची नाळेला घट्ट धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि आणि बाळ त्याच्या आयुष्यासाठी ह्या नाळेला घट्ट धरून ठेवते परंतु काळजी करण्याचे काहीही कारण नाही कारण हे सामान्य आहे. गर्भाचे शरीर “lanugo” ह्या आवरणाने आच्छादित असते आणि आत बाळाच्या त्वचेवर सुरकुत्या असतात. बाळाची  फुप्फुसे सुद्धा विकसित होत असतात आणि स्वतंत्र रित्या श्वास घेण्याची तयारी करीत असतात. तुमचे बाळ आता दिवस आणि रात्र ह्यामधील फरक ओळखू शकते, तसेच वेगवेगळे आवाज ओळखू शकते जसे की तुमचा आवाज, हृदयाचे ठोके, तुम्ही बाळासाठी लावलेले संगीत इत्यादी. संपूर्णतः विकसित झालेले ओठ, तसेच हिरड्यांच्या खाली दंतकळ्या सुद्धा विकसित झालेल्या असतात आता तुम्ही तुमच्या पोटावर थोडा दाब दिल्यास तुम्हाला कळेल की बाळ सुद्धा आतून दाब देत आहे किंवा वळवळ करीत आहे.

बाळाचा आकार केवढा असतो?

तुमच्या बाळाचे वजन आता जवळजवळ ०.५ किलो इतके झाले आहे, आणि बाळ आता अंदाजे पपई एवढे झाले आहे. गर्भावस्थेच्या २२व्या आठवड्यात डोक्यापासून ते पायाच्या अंगठ्यापर्यंतचा आकार पायाच्या पावलाएवढा झाला आहे आणि हा गर्भ आता छोटुकल्या बाळाएवढा दिसू लागला आहे.

शरीरात होणारे बदल

२२ व्या आठवड्यानंतर तुम्ही तुमच्या बाळाला सगळीकडे घेऊन जात आहात आणि गर्भावस्थेच्या ह्या आठवड्यात तुमच्या शरीरात तुम्हाला नवीन बदल अनुभवता येतील.

केसांमध्ये बदल: तुमचे डोक्यावरील केस आणि दात चमकदार दिसू लागतील. ह्याचे कारण म्हणजे तुमच्या शरीरातील संप्रेरके होय.  गर्भावस्थेदरम्यान तुमच्या शरीरातील संप्रेरकांमुळे तुमची केसगळती कमी होते. ह्याच अनुषंगाने तुमच्या शरीरातील टेस्टेरॉन सारख्या पुरुष संप्रेरकांमुळे शरीरावरील इतर भागातील केसांमध्ये वाढ होईल. प्रामुख्याने तुमच्या चेहऱ्यावर, पोटावर, हात पाय,छाती आणि पाठीवर तुम्हाला केस दिसतील.

त्वचेतील बदल: काही गरोदर स्त्रियांमध्ये त्वचा चमकदार आणि तेजस्वी दिसू लागते तर काहींची त्वचा तेलकट असते आणि मुरुमे असतात. काही वेळेला मेलॅनिनची पातळी वाढल्याने चेहऱ्यावर गडद पट्टे दिसतात. सनस्क्रीन क्रीम वापरणे किंवा उन्हात जाणे टाळणे हे प्रतिबंधात्मक उपाय आहेत. अजून नेहमी आढळणारा प्रश्न म्हणजे स्ट्रेच मार्क्स, पोटाचा आकार वाढल्यामुळे ते तयार होतात. स्ट्रेच मार्क्स वर असा काही उपाय नाही परंतु खूप खाज सुटत असेल असेल तर तुम्ही आराम पडावा म्हणून क्रीम वापरू शकता.

नखांमधील बदल: केसांप्रमाणेच गर्भावस्थेत नखांची सुद्धा वेगाने वाढ होते. परंतु ते कठीण, मऊ, खरबरीत, गुळगुळीत किंवा ठिसूळ कसे होतात ते तुमच्या शरीरावर अवलंबून आहे.

स्तनांमधील बदल: तुमच्या  लक्षात येईल की तुमची स्तनाग्रे आणि त्याभोवतालचा भाग नेहमीपेक्षा जास्त गडद होतील. त्यावर छोटे फोड सुद्धा दिसतात. ह्याचे कारण म्हणजे तुमच्या तैलग्रंथी प्रतिजैवक तेल तयार करतात त्यामुळे तुम्ही जेव्हा स्तनपानास सुरुवात करता तेव्हा तुमच्या स्तनाग्रांचे भेगा पडण्यापासून संरक्षण होते.

पावलांमधील बदल: पाणी धरून ठेवण्याची क्षमता (oedema) वाढल्यामुळे तुमच्या पायांचा आकार वाढतो किंवा पाण्यामुळे पायांना सूज येते किंवा रिलॅक्सिन नावाच्या संप्रेरक, जे तुमचे घट्ट सांधे  सैल आणि आरामदायक करण्यासाठी निर्माण केले जाते, त्यामुळे सुद्धा पावलांना सूज येऊ शकते.

२२व्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणे

ह्या आठवड्यात तुम्हाला मागील २ आठवड्यांसारखीच लक्षणे दिसतील, कारण तुम्ही दुसऱ्या तिमाहीचा मध्य पार केला आहे.

अपचन: हे लक्षण अगदी सामान्य आहे आणि गर्भारपणातील विशिष्ठ अन्नपदार्थांच्या लालसेमुळे वाढते, विशेषतः जर तुम्ही तेलकट आणि मसालेदार पदार्थ ह्यांचा समावेश तुमच्या मध्यरात्रीच्या खाण्यात केला असेल तर अपचन होऊ शकते.

बद्धकोष्ठता: तुमच्या बाळाची वाढ होत आहे आणि त्यामुळे तुमच्या मोठ्या आतड्यावर दाब पडतो आणि त्यामुळे मल बाहेर टाकणे कठीण होते.

पेटके: तुम्हाला तुमच्या पायांमध्ये पेटके जाणवतील. तुमच्या आहारातील खनिजद्रव्याच्या कमतरतेमुळे पेटके येतात. तुमच्या डॉक्टरांना मल्टीव्हिटॅमिन्स लिहून देण्यास सांगा.

पोटाचा वाढणारा घेर: तुमच्या पोटाचा घेर खूप जास्त वाढणार आहे. ह्याबरोबरच सामान्यपणे आढळणारे लक्षण म्हणजे बेंबी बाहेर येणे, परंतु बाळाच्या जन्मानंतर ती पुन्हा नॉर्मल होते.

सुस्तपणा: तुम्हाला आधीपेक्षा खूप सुस्तपणा जाणवेल तसेच तुम्हाला खूप थकल्यासारखे वाटेल. कारण तुमच्या मेंदूच्या रक्तवाहिन्यांवर गर्भाशयामुळे दाब पडतो. त्यामुळे तुम्हाला चक्कर आल्यासारखे वाटेल.

शारीरिक संबंध: संप्रेरकांच्या वाढत्या पातळीमुळे, कामेच्छा जागृत होईल.

योनीमार्गातून स्त्राव: तुमच्या शरीराच्या खालच्या बाजूला रक्तस्त्राव वाढल्याने तुमचे शरीर नेहमीपेक्षा जास्त द्रव तयार करेल. तथापि, हे संपूर्णपणे नॉर्मल असून योनीमार्गाचा संसर्गापासून बचाव होतो.

पाठदुखी: आता तुम्हाला बाळाच्या वजनाचा दाब पाठीच्या मणक्यावर जाणवायला लागेल. थोडासा हलक्या हाताने मसाज केल्यास तुम्हाला फरक पडेल.

गर्भधारणेच्या २२व्या आठवड्यात पोटाचा आकार

तुमच्या गरोदरपणाच्या २२ व्या आठवड्यात, तुमच्या पोटाचा वरून खालपर्यंत आकार साधारतः २५ सेंमी इतका असतो. आता तुम्ही दोघांसाठी खाण्याची वेळ अली आहे. परंतु तज्ञांच्या मते तुम्ही दररोज ३०० कॅलरीज पेक्षा जास्त खाता कामा नये. तसेच तुम्ही थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने आरोग्यपूर्ण आणि कमी प्रमाणात खाल्ले पाहिजे, त्यामुळे तुमची ऊर्जा वाढेल आणि अपचन व बद्धकोष्ठता होण्याची शक्यता कमी होईल.

गर्भधारणेच्या २२व्या आठवड्यातील सोनोग्राफी

अल्ट्रासाऊंड दरम्यान, विशेषतः थ्री डी अल्ट्रासाऊंड दरम्यान तुम्हाला दिसेल की तुमचा गर्भ बाळासारखा दिसू लागतो, तुम्हाला तुमचे बाळ त्याच्या आवडत्या स्थितीत झोपलेले सुद्धा आढळेल. जरी तुम्हाला बाळाची काही हालचाल जाणवली नाही किंवा बाळाने लाथा मारल्या नाहीत तरी काळजी करण्याचे काही कारण नाही कारण ह्या कालावधीत तुमचे बाळ दिवसातून १६ तास झोपते. अजून एक महत्वाची आणि नोंद घेण्याजोगती गोष्ट म्हणजे यकृत आणि प्लिहा ह्यांचा वापर तांबड्या पेशींच्या निर्मितीसाठी करण्याऐवजी तुमचे बाळ स्वतःच्या अस्थिमज्जेतून स्वतः तांबड्या पेशी तयार करू लागते.

आहार कसा असावा?

तुमच्या गर्भावस्थेचा पोषण हा सर्वात महत्वाचा भाग आहे. तुमच्या गर्भावस्थेच्या २२ व्या आठवड्यात कुठल्याही परिस्थितीत तुम्ही काही पोषक पदार्थ टाळता कामा नयेत. २२ व्या आठवड्यातील  अन्नपदार्थांमध्ये काही महत्वाच्या पोषणमूल्यांचा समावेश होतो जसे की, कॅल्शिअम, लोह, मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि झिंक आणि ह्या सगळ्याचे स्रोत हे ऑरगॅनिक असावेत. कीटकनाशके फवारलेले अन्नपदार्थ टाळा कारण ते तुमच्या वाढणाऱ्या बाळासाठी हानिकारक ठरू शकतात. तसेच ओमेगा ३ फॅटी ऍसिडस ना विसरू नका,जे तुम्हाला मासे आणि सुकामेवा हे त्याचे स्रोत आहेत. बाळाच्या मानसिक विकासासाठी हे अतिशय महत्वाचे आहे. परंतु काही प्रकारचे मासे हे पाऱ्याने समृद्ध असतात आणि ते टाळले पाहिजेत. उदा: स्वार्डफिश आणि मॅकेरेल. तसेच रस्त्यावर मिळणारे अन्नपदार्थ खाणे टाळा कारण ते हानिकारक जिवाणूंनी दूषित असण्याची शक्यता असते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही मद्यपान, धूम्रपान, कॉफीपान पूर्णतः बंद केले पाहिजे आणि शेवटचे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही स्वतःला सजलीत ठेवले पाहिजे आणि त्यासाठी दिवसातून कमीत कमी ३ लिटर  पाणी प्यायले पाहिजे.

काय काळजी घ्याल आणि त्यासाठी काही टिप्स

तुम्ही २२ व्या आठवड्यात खालील गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत जेणेकरून तुमचा गर्भावस्थेच्या हा काळ काळजीपूर्वक पार पडेल.

हे करा

  • २२ व्या आठवड्यात तुमचे पोट दिसू लागेल, आजूबाजूचे लोक तुमची त्वचा कशी चमकदार दिसत आहे ह्याविषयी टिपणी करतील तसेच तुमच्या बाळाची हालचाल जाणून घेण्यासाठी त्यांना तुमच्या पोटाला हात लावावासा वाटेल. तुम्हाला ते ठीक वाटले तरी जेव्हा तुम्हाला त्याचा त्रास होईल तेव्हा त्यांना शांतपणे तसे सांगा. आपले वैयक्तिक आयुष्य हे स्वतःचे आहे आणि अनोळखी लोकांना त्यात येण्याची परवानगी देणे उचित नाही.
  • तुमच्या रक्तातील साखरेची पातळी योग्य ठेवा म्हणजे तुम्हाला थकल्यासारखे वाटणार नाही. तोंडात टाकण्यासाठी तुमच्या सोबत पोषक अन्नपदार्थ ठेवा.

हे करू नका

  • सराव कळांवर (Braxton Hicks contractions) लक्ष ठेवा, सराव कळांमुळे तुमच्या ओटीपोटात पिळवटून गेल्याची भावना होते. परंतु काळजी करण्याचे काही कारण नाही कारण त्याने काही हानी होत नाही परंतु ते खूप काळ तसेच चालू राहिल्यास मात्र तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा किंवा त्यांना भेट द्या.
  • ताण घेऊ नका: खूप जास्त ताण घेऊ नका, कारण तुमच्या आयुष्यात खूप मोठे बदल होत आहेत आणि त्यात चिंतेची भर नको. जर तुम्हाला खूपच जास्त उदास वाटत असेल तर स्वतःसाठी सुट्टी काढा, आरामात राहा, टी. व्ही. बघा. तुमच्या मित्र-मैत्रिणींना भेट द्या. तुमच्या पार्टनरच्या कुशीत पडून रहा.

कुठल्या गोष्टींची खरेदी कराल?

तुमच्या पायाची सूज झपाट्याने वाढत आहे  त्यामुळे आरामदायी शूज ची खरेदी करणे योग्य होईल.

मॅटर्निटी ड्रेसेस आणि ब्रा घेण्याची गरज आहे कारण तुमच्या शरीराचा आकार वादात राहणार आहे. कोरड्या त्वचेसाठी मॉइश्चराझर्स आणून ठेवा. तसेच तुम्हाला आणि तुमच्या बाळाला मजबूत ठेवण्यासाठी प्रीनेट्ल व्हिटॅमिन्स आणून ठेवा.

तणाव आणि शंका टाळण्यासाठी सर्व प्रासंगिक माहिती गोळा करणे महत्वाचे आहे आणि हा गर्भावस्थेच्या एक भाग आहे जेणेकरुन आपण मातृत्वासाठी सुरक्षित आणि स्वस्थ प्रवास करू शकाल.

मागील आठवडा: गर्भधारणा: २१वा आठवडा

पुढील आठवडा: गर्भधारणा: २३वा आठवडा