In this Article
जर तुमच्या मुलाची पावले नेहमी दुखत असेल तर, त्याच्या वेदनांमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. परंतु, काहीवेळा बाळाला फक्त वेदनांमुळे अस्वस्थता येत नाही तर त्यामागे काही वैद्यकीय समस्या सुद्धा असू शकतात. जर तुम्ही लहान मुलांची पावले दुखण्याची कारणे आणि उपाय ह्याविषयीची माहिती शोधत असाल तर हा लेख संपूर्ण वाचा.
मुलांचे पाय कशामुळे दुखतात?
लहान मुले खूप सक्रिय असतात आणि त्यांचा बहुतेक वेळ घरामध्ये तसेच बाहेर धावण्यात जातो आणि त्यामुळे त्यांचे पाय दुखू शकतात. परंतु, याव्यतिरिक्त मुलांची पावले दुखण्यामागे अनेक कारणे आहेत.
1. दुखापत
पाय मुरगळणे, फ्रॅक्चर किंवा इतर अशा कोणत्याही दुखापतीमुळे तुमच्या मुलाच्या पावलांमध्ये वेदना होऊ शकतात. जर अशा प्रकारच्या दुखापतींमुळे तुमच्या मुलाची पावले दुखत असतील, तर तुम्ही त्यासाठी तत्काळ वैद्यकीय मदत घेणे महत्त्वाचे आहे.
2. ऍथलेटिक्स फूट
बोटांच्या दरम्यान तीव्र खाज सुटते. पायाची त्वचा कोरडी पडून खवले निघू शकतात. हा एक बुरशीजन्य संसर्ग आहे, स्विमिंग पूल मधून हा संसर्ग होऊ शकतो किंवा अस्वच्छ मोजे घातल्यामुळे हा त्रास होऊ शकतो.
3. सिव्हर्स डिसीज
मुलाची वेगाने वाढ होत असताना ही समस्या उद्भवू शकते. वाढीच्या वेगामुळे मुलाच्या पावलांमध्ये खूप वेदना होऊ शकतात. त्याला टाचांमध्ये तीव्र वेदना होऊ शकतात. मैदानी खेळ खेळणाऱ्या मुलांमध्ये ही समस्या अधिक सामान्य आहे.
4. सपाट पाऊल
जर तुमच्या मुलाची पावले दुखण्याची तक्रार असेल तर वेदना घोट्यापासून पोटरीपर्यंत जातात. अश्या प्रकारच्या वेदना जर होत असतील तर तुमच्या मुलाला सपाट पायांची समस्या असण्याची शक्यता असते.
5. अयोग्य शूज
काही वेळा मुले योग्य शूज घालत नाहीत किंवा खूप घट्ट शूज घालतात. त्यामुळे त्यांची पावले दुखू शकतात. घट्ट शूजमुळे तुमच्या मुलाच्या पावलांवर फोड येतात आणि पायाच्या त्वचेवर सुद्धा परिणाम होतात. त्यामुळे जास्त वेदना होऊ शकतात.
6. गाठ
जर तुमचे मूल त्याच्या पायाच्या कमानदार भागाचा अधिक वापर करत असेल, तर पायाच्या अंगठ्याजवळ एक मोठा उंचावटा दिसू शकतो. हा उंचावटा पायाच्या एका बाजूने बाहेर येऊ शकतो. ही स्थिती जन्माच्या वेळी किंवा अनुवांशिक कारणांमुळे कोणत्याही प्रकारच्या पायाच्या विकृतीमुळे उद्भवू शकते आणि त्यामुळे वेदना होऊ शकतात.
7. आतल्या बाजूला नखांची वाढ होत असल्यास
काहीवेळा पायाची नखे नीट कापली जात नाहीत. अश्या वेळी नखांची वाढ आतील दिशेने होते आणि ही नखे त्वचेत रुततात. यामुळे आजूबाजूची त्वचा लाल आणि खरखरीत होते. तसेच त्या भागात वेदना होतात.
8. प्लांटर वॉर्ट्स
ह्यांना अनेकदा चुकून कुरूप समजले जाते. प्लांटार वॉर्ट्स विषाणूजन्य संसर्गामुळे होतात आणि ते अत्यंत संसर्गजन्य असतात. या चामखीळांची मुळे त्वचेत खोलवर असतात आणि चालताना खूप वेदना होऊ शकतात आणि अस्वस्थता येऊ शकते.
9. प्लांटर फॅसिटायटिस
प्लांटर फॅसिटायटिसला सूज आल्यामुळे ही स्थिती निर्माण होऊ शकते. प्लांटर फॅसिटायटिस संयोजी ऊतकांची जाड पट्टी आहे. चालताना अडचण निर्माण होणे, पाय दुखणे आणि तीव्र टाचदुखी इत्यादींचा समावेश होऊ शकतो. ही लक्षणे सहसा सकाळी जास्त दिसून येतात.
10. ऍचिलीस टेंडोनिटिस
शारीरिक हालचाल वाढलेल्या मुलांमध्ये ही स्थिती दिसून येते. वाढलेल्या कामांमुळे टाचेवर आणि पायाच्या मागील भागावर दाब येऊ शकतो. त्यामुळे वेदना होऊन अस्वस्थता निर्माण होते.
मुलांची पावले दुखण्याची काही कारणे वरती सांगितलेली आहेत. तुम्हाला तुमच्या मुलामध्ये वरीलपैकी कोणतीही परिस्थिती आढळल्यास, वेदना कमी करण्यासाठी तुम्ही विविध उपायांचा अवलंब करू शकता.
मुलांची पावले दुखत असतील तर त्यावर घरगुती उपचार
जर तुम्ही तुमच्या मुलाच्या पावलांचे दुखणे बरे करण्यासाठी काही घरगुती उपाय शोधत असाल तर खालील गोष्टी उपयुक्त ठरू शकतात
- जर तुमच्या मुलाने पावले दुखत असल्याची तक्रार केली आणि ते बुटांच्या चुकीच्या सोलमुळे आहे हे तुमच्या लक्षात आले तर तुमच्या मुलाच्या बुटात इनसोल घालणे चांगली कल्पना असेल. त्यामुळे दुखणे कमी होण्यास मदत होईल. परंतु जर हे दुखणे अयोग्य शूजमुळे होत असेल, तर तो बूट बदलून मुलासाठी चांगले बूट घ्यावेत.
- दिवसभर खेळल्यानंतर आपल्या मुलाला त्याचे पाय कोमट पाण्यात ठेवण्यास सांगा. कोमट पाण्याने आंघोळ केल्याने देखील मदत होऊ शकते. गरम पाण्याने आंघोळ केल्यास थकलेल्या स्नायूंना आराम मिळतो आणि वेदना कमी होण्यास मदत होते.तसेच चांगली झोप देखील लागते.
- तुमच्या मुलाच्या आहाराकडे लक्ष द्या कारण काही वेळा तुमच्या मुलामध्ये पौष्टिकतेच्या कमतरतेमुळे काही आजार उद्भवतात. तुमच्या मुलाचे लोहाचे सेवन वाढवा कारण शरीरात लोहाचे प्रमाण उच्च असल्यास विविध आरोग्य विषयक समस्या दूर ठेवण्यास मदत होऊ शकते.
- तुमच्या डॉक्टरांनी वेदनांवर उपचार करण्यासाठी काही औषधे लिहून दिलेली असल्यास, तुमच्या मुलाला ती औषधे वेळेवर द्या. तुमच्या मुलाला कोणतीही ओव्हर-द-काउंटर औषधे देऊ नका. त्याला औषधे देण्याआधी डॉक्टरांची परवानगी घ्या.
- जर तुमच्या मुलाचे पाय दुखत असतील, तर त्याला आरामदायक पादत्राणे घालण्यास द्या.
- जर पायांवर सतत दाब पडल्यामुळे वेदना होत असतील तर I.C.E करून पाहणे योग्य ठरेल. याचा अर्थ विश्रांती, बर्फ, कॉम्प्रेशन आणि एलिव्हेशन असा आहे. असे केल्याने तुमच्या मुलाला वेदनांपासून काही काळ आराम मिळू शकतो.
- जेव्हा तुमच्या मुलाला बरे वाटते आणि वेदना कमी होतात, तेव्हा त्याला हलक्या ते मध्यम शारीरिक हालचाली करण्यास सांगा. तुमचे डॉक्टर तुमच्या मुलासाठी काही व्यायाम प्रकार सुचवू शकतात.
- काही गंभीर समस्या असल्यास, तुमचे डॉक्टर क्रॅचेस वापरण्यास सांगू शकतात. ते सुद्धा तुम्ही वापरू शकता.
काही दिवसांनंतरही पाय दुखणे कमी होत नसेल तर त्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. केस अधिक क्लिष्ट वाटत असल्यास, तुमचे डॉक्टर पोडियाट्रिस्टला भेटण्यास सांगू शकतात.
डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
काहीवेळा घरगुती उपचार करून फायदा होत नाही. अशा वेळी तुमच्या मुलाला वैद्यकीय मदतीची आवश्यकता असू शकते. खालील परिस्थितीत तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.
- तुमच्या मुलाच्या पायात कोठेही पू होणे, लालसरपणा, तीव्र वेदना, ताप इत्यादी लक्षणे आढळल्यास
- जर तुमच्या मुलाचा पाय बधिर झालेला असेल तर
- जर तुमच्या लक्षात आले की तुमच्या मुलाचा पाय मूळ स्थितीत नाही किंवा वळलेला दिसत असेल तर
- तुमच्या मुलाचा पाय जमिनीवर ठेवल्यावर तो स्थिर नसल्यास.
- जर तुमच्या मुलाला त्याच्या पायावर उभे राहताना अडचण येत असेल तर
तुम्हाला वर नमूद केलेल्या अटी लक्षात आल्यास, आम्ही तुम्हाला वैद्यकीय मदत घेण्याचा सल्ला देतो.
मुलांचे पाय दुखणे खूप सामान्य आहे आणि ते विविध कारणांमुळे होऊ शकते. वेदनांचे खरे कारण कळण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले.
आणखी वाचा:
मुलांमधील टाईप २ मधुमेह
मुलांना होणाऱ्या डोकेदुखीचा सामना कसा करावा?