In this Article
आजारी पडल्यावर खरोखर सगळ्या गोष्टींमधली मजा जाते, अगदी गरोदरपणातील सुद्धा! औषध गोळ्या खाणे कोणालाही आवडत नाही आणि गरोदरपणात औषधांचे दुष्परिणाम अगदी गंभीरपणे घेतले पाहिजेत. गरोदरपणात सर्दी खोकला झाल्यास त्याबद्दल चिंता करण्याचे कारण नाही कारण बाळ त्याच्या त्रासापासून संरक्षित असते. परंतु आपल्या शरीरात होणारे हे बदल शरीराच्या प्रतिकारशक्तीच्या कार्यावर परिणाम करू शकतात आणि त्याद्वारे, सर्दीची लक्षणे तीव्र करतात. टॉयलेनॉल सारखी सामान्य सर्दी आणि खोकल्याची औषधे मुलांमधील एडीएचडीच्या वाढीव जोखमीशी निगडित असल्याने गरोदरपणात सर्दीसाठी औषधे काळजीपूर्वक घेणे आवश्यक आहे.
काळजी करण्याची गरज नाही, खोकला आणि सर्दी च्या उपचारांसाठी आजीच्या बटव्यातील औषधांमागे खूप शास्त्रशुद्ध तर्क आहे. म्हणूनच, जर तुम्ही आई असाल आणि तुम्हाला खोकल्याचा त्रास होत असेल तर, त्या जंतुनाशकांशी लढण्यासाठी काही प्रभावी घरगुती उपाय शोधण्यासाठी हा लेख वाचा.
गरोदरपणात खोकल्यावर उपचार करण्यासाठी १० साधे नैसर्गिक उपाय
१. लसूण
लसूण एक अँटिऑक्सिडेंट आहे आणि त्यामध्ये अँटीवायरल आणि प्रतिजैविक गुणधर्म आहेत. लसूण बारीक केल्यानंतर ऍलिसीन नावाचा प्रतिजैविक पदार्थ सोडला जातो. त्याची चव चांगली नसली तरीसुद्धा तुमच्या छातीचा क्षय कमी होण्यास त्याची नक्कीच मदत होईल. लसणाची कच्ची चव कमी होण्यासाठी त्यामध्ये थोडा मध मिसळून ते खा. दिवसातून दोन ते तीन वेळा ते खाण्याचा सल्ला दिला जातो.
२. ऍपल सायडर व्हिनेगर
ऍपल सायडर व्हिनेगरमुळे शरीर अधिक क्षारयुक्त बनते. सर्दी आणि खोकला निर्माण करणार्या विषाणूंविरूद्ध लढाई करण्यासाठी अधिक अल्कधर्मी असलेले शरीर अधिक प्रभावी आहे. तसेच ह्या पेयामुळे नैसर्गिकरित्या गरोदरपणात खोकला बरा होऊ शकतो. सर्दीची सुरुवातीची काही लक्षणे दिसल्यास तुम्ही हे पिण्यास सुरुवात करू शकता आणि लक्षणे कमी होईपर्यंत ते पीत राहू शकता. १–२ चमचे ऍपल सायडर व्हिनेगर, तुम्ही थोडे पाणी किंवा ब्लॅक टी सोबत घेऊ शकता आणि दिवसातून दोन किंवा तीन वेळा ते घेऊ शकता.
३. मध
सर्दी आणि खोकला ह्यावर मध हा सर्वमान्यपणे स्वीकारलेला उपाय आहे. मधामुळे खोकला कमी होतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि घशाला सुद्धा आराम पडतो. मध सहजरित्या उपलब्ध असतो आणि चवदार देखील आहे. म्हणूनच गरोदरपणातील खोकला घरगुती उपचारांनी कसा बरा करावा ह्या प्रश्नाचे उत्तर जर तुम्ही शोधात असाल तर मध वापरून पहा. ह्या उपायाने बऱ्याच जणांना फरक पडलेला आहे.
४. पाणी
सर्दी खोकल्यापासून तुम्हाला जर सुटका हवी असेल तर सजलीत राहणे महत्वाचे आहे. सर्दी खोकला झाल्यावर शरीरातून नेहमीपेक्षा पाण्याचा जास्त ऱ्हास होतो. म्हणून डिहायड्रेशन टाळण्यासाठी भरपूर प्रमाणात कोमट पाणी प्या आणि त्यामुळे नाक मोकळे होण्यास मदत होते. मटणाचे सूप किंवा कोमट पाण्यात लिंबू पिळून घेतल्याने त्याचा फायदा होतो.
५. लिंबू
लिंबामध्ये व्हिटॅमिन–सी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, जे एक नैसर्गिक अँटीऑक्सिडेंट आहे तसेच त्यामध्ये प्रतिविषाणू आणि प्रतिजीवाणू गुणधर्म देखील आहेत. लिंबामध्ये पोटॅशिअम समृद्ध प्रमाणात असते, जे मूत्रपिंडाच्या योग्य कार्यासाठी महत्वाचे आहे. मूत्रपिंड शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकतात आणि त्यामुळे सर्दीपासून सुटका होण्यास मदत होते. लिंबू देखील शरीरात क्षारीकरण करते आणि सर्दीच्या विषाणूंशी सामना करण्यास मदत करते.
६. मिठाच्या पाण्याने गुळण्या
कोमट पाण्याने गुळण्या केल्याने संसर्ग ४०%ने कमी होतो. खारट द्रावण घशात सूजलेल्या ऊतींमधून जास्त द्रवपदार्थ येऊ शकतात, ज्यामुळे त्यांना कमी दुखापत होईल. ह्यामुळे श्लेष्मा देखील सैल होतो आणि गळ्यातील ऍलर्जीन, बॅक्टेरिया आणि बुरशी काढून टाकले जातात. परिणाम पाहण्यासाठी दिवसातून दोन ते तीन वेळा हे करून पहा.
७. ह्यूमिडिफायर
ह्युमिडिफायर्स हवेत आर्द्रता वाढवतात आणि अनुनासिक, घसा आणि फुप्फुसांना आर्द्रता देण्यास मदत करतात. त्यामुळे हवेचे वाहणे सुलभ होते आणि अवरोधित नाकाला आराम मिळतो.
८. व्हिटॅमिन सी
व्हिटॅमिन सी एक महत्त्वपूर्ण अँटिऑक्सिडेंट आहे ज्यामुळे शरीर निरोगी आणि मजबूत राहते. तुमच्या दैनंदिन आहारामध्ये या व्हिटॅमिनचे समृद्ध स्त्रोत असलेले अधिक खाद्य पदार्थ समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा. लिंबूवर्गीय फळांमध्ये संत्री, द्राक्षे ह्यासारख्या फळांमध्ये हे जीवनसत्व असते. हिरव्या भाज्या, टोमॅटो आणि स्ट्रॉबेरी ह्यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन सी असते.
९. जस्त
बहुतेकवेळा नाकामध्ये होणारी सर्दी ही नाकामध्ये आणि घशामध्ये वाढणाऱ्या राइनोव्हायरसमुळे होते. जस्त हे विषाणूचे गुणाकार रोखण्याचे कार्य करते. जस्तामुळे हे विषाणू घसा आणि नाकाच्या श्लेष्मल त्वचेमध्ये रहात नाहीत. झिंक असलेले लाझेंजेस आणि सिरपमुळे गर्भवती महिलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. म्हणून, झिंक घेण्याचा सर्वात सुरक्षित मार्ग म्हणजे पालक, व्हीट जर्म तेल, भोपळा, कोकरू आणि मटण ह्यासारखे पदार्थ होत.
१०. आले
गरोदरपणात कोरड्या खोकल्यासाठी घरगुती उपचार शोधत आहात? मग, आले हा एक चांगला पर्याय आहे. कोरड्या खोकल्यामध्ये कोणताही कफ तयार होत नाही. थोडक्यात, कोरडा खोकला इतर खोकल्यासारखे काही चांगले काम करत नाही. कफयुक्त खोकल्यामुळे तुमच्या शरीरातून अवांछित कफ काढून टाकला जातो. विषाणूंमुळे आणि ऍलर्जीमुळे हा खोकला होतो. आल्यामुळे कफ आणि दाह कमी होतो. आले घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तो चहाच्या स्वरूपात घेणे. उकळण्यासाठी दोन ग्लास पाणी घ्या, दोन चमचे किसलेले आले घाला आणि १५ मिनिटे उभे रहा. एकदा ते थंड झाले की थोडे मध घालून प्या.
थंडीपासून बचाव करण्यासाठी तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याचे मार्ग
आपण सर्वांनी ‘Prevention is better than cure’’ हा शब्दप्रयोग ऐकला आहे आणि हे खरे आहे, गरोदरपणात हे जास्त खरे आहे. एक विकसनशील बाळ पोषण आणि काळजी घेण्यासाठी आपल्यावर विसंबून असते. त्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती बळकट होते आणि तुम्ही व तुमचे बाळ दोघेही निरोगी होऊ शकता. सर्दी आणि खोकला इत्यादीसारख्या समस्या टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीस कशी चालना देऊ शकता ते येथे आहे.
१. मल्टी–व्हिटॅमिन घ्या
कधीकधी, रोग टाळण्यासाठी फक्त आहार पुरेसा नसतो. अशा वेळी, मल्टी–व्हिटॅमिन तुम्हाला दररोज पोषण आहार देतात आणि तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतात.
२. हायड्रेटेड रहा
पाण्यामुळे ऑक्सिजन तुमच्या पेशींपर्यंत पोहोचतो आणि तुमचे स्नायू तयार होण्यास आणि मजबूत राहण्यास मदत होते. पाण्यामुळे तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात अन्यथा तुमच्या शरीरावर परिणाम होऊ शकतो. म्हणून, दिवसभर पुरेसे पाणी पित असल्याची खात्री करा.
३. योग्य स्वच्छता ठेवा
आपले हात स्वच्छ ठेवणे हा आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्याचा मुख्य मार्ग आहे. तुमच्या हातावर सर्वात जास्त जिवाणू असतात, जे तुम्ही खाताना, स्वयंपाक करताना किंवा भाज्यांना आणि फळांना स्पर्श करताना अधिक प्रमाणात घेण्याची शक्यता असते. सार्वजनिक पृष्ठभागाला स्पर्श झाल्यावर, खोकला, शिंका येणे इ. नंतर आपले हात साबणाने व पाण्याने धुणे सुनिश्चित करा.
सर्दी आणि खोकला अप्रिय आहेत, परंतु त्यावर घरी प्रभावीपणे उपचार केला जाऊ शकतो. औषधांपासून दूर रहा. जर आपला आजार वाढत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या
आणखी वाचा:
गरोदरपणात छातीत जळजळ होणे: लक्षणे, कारणे आणि उपचार
गरोदरपणात होणारी सर्दी: कारणे, लक्षणे आणि उपचार