In this Article
- वोटिंग साठी उपलब्ध असलेल्या इंडियन आयडॉल गायकांची यादी
- इंडियन आयडॉल २०२० चे परीक्षक आणि होस्ट कोण आहेत?
- इंडियन आयडॉल मधील स्पर्धकांना फर्स्ट क्राय वर कसे वोटींग करावे?
- वोट करण्यापूर्वी लक्षात ठेवण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे
- फर्स्टक्राय वर वोटिंग: अटी व शर्ती
- इंडियन आयडॉल सीझन ११चे विजेते
- इंडियन आयडॉल विजेत्यांची यादी
इंडियन आयडॉलचा १२ वा सिझन सुरु आहे. देशात अविश्वसनीय संगीताची प्रतिभा आहे हे पुन्हा एकदा, रिऍलिटी टीव्ही शो ने सिद्ध केले आहे! तुम्ही हा कार्यक्रम बघत असाल तर आम्ही कशाबद्दल बोलत आहोत हे तुम्हाला समजेल. तुम्ही हा कार्यक्रम बघत नसाल तर तुम्ही तो बघण्यास लगेच सुरुवात करा. ह्या स्पर्धेच्या परीक्षकांनी त्यांच्या पात्र स्पर्धकांची यादी तयार केलेली आहे. हे स्पर्धक तुमच्या मतांसाठी प्रत्येक आठवड्यात छान छान गाणी गाणार आहेत आणि तुम्ही तुमच्या आवडत्या स्पर्धकाला आता फर्स्ट क्राय वेबसाईट किंवा फर्स्ट क्राय ऍप वर सुद्धा वोट करू शकणार आहात.
मतदान कसे करावे हे आम्ही सांगू पण पहिले १५ स्पर्धक कोण आहेत ते बघूया!
वोटिंग साठी उपलब्ध असलेल्या इंडियन आयडॉल गायकांची यादी
इंडियन आयडॉल १२ मधील स्पर्धकांना मतदान कसे करावे हे जाणून घेण्याआधी स्पर्धक कोण कोण आहेत ते बघूया. इथे इंडियन आयडॉल सीझन १२ च्या स्पर्धकांची यादी दिलेली आहे!
इंडियन आयडॉल २०२० स्पर्धकांची यादी – सीझन १२
अनुक्रमांक | स्पर्धकाचे नाव | शहर |
१. | पवनदीप राजन | उत्तराखंड,चंपावत |
२. | शानमुख प्रिया | आंध्रप्रदेश, विजाग |
३. | सवाई भट्ट | राजस्थान, नागौर |
४. | अंजली गायकवाड | अहमदनगर, महाराष्ट्र |
५. | आशिष कुलकर्णी | पुणे, महाराष्ट्र |
६. | सायरेशा भागवतुला | विजग, आंध्र प्रदेश |
७. | सम्यक प्रसाना | दिल्ली |
८. | वैष्णव गिरीश | त्रिशूर, केरळ |
९. | मोहम्मद डॅनिश | मुझफ्फरनगर, उत्तर प्रदेश |
१०. | निहाल टॉरो | मंगलोर, कर्नाटक |
११. | अरुणिता कांजिलाल | कोलकाता, पश्चिम बंगाल |
१२. | सायली कांबळे | मुंबई, महाराष्ट्र |
१३. | अनुष्का बॅनर्जी | चंदीगड |
१४. | साहिल सोलंकी | हिसार, हरियाणा |
१५. | नचिकेत लेले | कल्याण, महाराष्ट्र |
स्पर्धेचे परीक्षक आणि स्पर्धकांसह म्युझिकल रोलर कोस्टरचा आनंद घ्या, परंतु आपल्या आवडत्या स्पर्धकांना मतदान करण्यास विसरू नका.
इंडियन आयडॉल २०२० चे परीक्षक आणि होस्ट कोण आहेत?
नेहा कक्कड़, हिमेश रेशमिया आणि विशाल दादलानी अशी भारतीय संगीत उद्योगातील काही नामांकित नावे परीक्षकांच्या समितीमध्ये आहेत. या हंगामाचे आयोजन आदित्य नारायण करत आहेत, जे स्वतः एक प्रसिद्ध कलाकार आहेत.
इंडियन आयडॉल मधील स्पर्धकांना फर्स्ट क्राय वर कसे वोटींग करावे?
फर्स्ट क्राय वेबसाइट आणि फर्स्ट क्राय अॅपद्वारे आपल्या आवडत्या स्पर्धकांसाठी मतदान करणे आता सोपे झाले आहे. इंडियन आयडॉल १२ मधील स्पर्धकांना कसे वोट करावे ते इथे दिलेले आहे.
फर्स्ट क्राय अॅपद्वारे वोटींग
जे फर्स्ट क्राय अॅप वापरण्यास प्राधान्य देतात त्यांच्यासाठी
- अॅप स्टोअर किंवा गुगल प्ले द्वारे फर्स्टक्राय अॅप डाउनलोड करा. आपण या वेबपृष्ठावर दिलेल्या डाउनलोड पर्यायांपैकी एक वापरू शकता.
- फर्स्टक्राय अॅप वर साइन अप/लॉग इन करा.
- आपल्या आवडत्या इंडियन आयडॉल सीझन १२ मधील स्पर्धकाला मत द्या.
फर्स्ट क्राय च्या वेबसाइटवर वोटींग
वेबसाइटवर आपल्या आवडत्या इंडियन आयडॉल सीझन १२ मधील स्पर्धकाला मत देण्यासाठी आपण हे करू शकताः
- फर्स्टक्राय वेबसाइटवर जाऊन साइन अप करा.
- आपल्या क्रेडेन्शियल्ससह लॉग इन करा.
- आपल्या आवडत्या स्पर्धकाला मत देण्यासाठी त्याच्या फोटोवर क्लिक करा.
वोट करण्यापूर्वी लक्षात ठेवण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे
आम्हाला माहित आहे की तुम्हाला तुमच्या पसंतीच्या आयडॉल सीझन १२ मधील स्पर्धकांना जिंकण्यासाठी मदत करण्यासाठी, वारंवार “वोट” बटन दाबावेसे वाटेल, परंतु यामुळे तुमचा बराच वेळ जाईल आणि इतर स्पर्धकांच्या दृष्टीने सुद्धा ते योग्य ठरणार नाही. म्हणून, शहाणपणाने मतदान करण्यासाठी आणि आपल्या मतांची गणना करण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा.
- आपल्या पसंतीच्या इंडियन आयडॉल सीझन १२ मधील आवडत्या स्पर्धकाला मत देण्यासाठी तुम्ही फर्स्टक्राय अॅप आणि फर्स्टक्राय वेबसाइटवर साइन इन केले पाहिजे.
- तुम्हाला जास्तीत जास्त ५० मते मिळतील, म्हणून सुज्ञतेने वोटिंग करा.
- जेव्हा वोटिंग लाईन ओपन असतात तेव्हाच वोटिंग स्वीकारले जाते.
फर्स्टक्राय वर वोटिंग: अटी व शर्ती
फर्स्टक्राय वेबसाइट किंवा फर्स्टक्राय अॅपवर इंडियन आयडॉल १२ मधील स्पर्धकांना मतदान करण्यासाठी अटी व शर्ती लागू आहेत.
आता तुम्हाला इंडियन आयडॉल १२ मधील स्पर्धकांना मत कसे द्यायचे हे माहिती आहे, जेव्हा व्होटिंग लाईन्स उघडल्या जातात तेव्हा सरळ फर्स्टक्राय वेबसाइट किंवा फर्स्टक्राय अॅपवर जा. तुमच्या मतामुळे सर्वात प्रतिभाशाली गायकाला/गायिकेला त्याचे/तिचे इंडियन आयडॉल सीझन १२ चे विजेते होण्याचे स्वप्न साकार करण्यास तुम्ही मदत करू शकता!
इंडियन आयडॉल सीझन ११चे विजेते
इंडियन आयडॉल ११ ची ट्रॉफी भटिंडा येथील सनी हिंदुस्थानी ह्यांनी जिकंली होती. २५ लाखांची रोख रक्कम, कार त्यांना बक्षीस म्हणून मिळालेले होते. तसेच टी सिरीज सोबत गाण्याचे कंत्राट सुद्धा त्यांना मिळालेले होते.
इंडियन आयडॉल विजेत्यांची यादी
आतापर्यंतच्या सर्व इंडियन आयडॉलच्या विजेत्यांची यादी इथे देत आहोत
सीझन | विजेत्याचे नाव |
सीझन १ | अभिजीत सावंत |
सीझन २ | संदीप आचार्य |
सीझन ३ | प्रशांत तमंग |
सीझन ४ | सौरभी देबारामा |
सीझन ५ | श्रीराम चंद्र म्यानमपती |
सीझन ६ | विपुल मेहता |
इंडियन आयडॉल ज्युनिअर सीझन १ | अंजना पद्मनाभन |
इंडियन आयडॉल ज्युनिअर सीझन २ | अनन्या नंदा |
सीझन ९ | एल. व्ही. रेवंत |
सीझन १० | सलमान अली |