Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भधारणा होताना गर्भधारणा कशी टाळाल: गर्भ निरोधक पर्याय, काळजी आणि बरंच काही

गर्भधारणा कशी टाळाल: गर्भ निरोधक पर्याय, काळजी आणि बरंच काही

गर्भधारणा कशी टाळाल: गर्भ निरोधक पर्याय, काळजी आणि बरंच काही

मातृत्वासारखी अमूल्य भेट बऱ्याच स्त्रियांना त्यांच्या आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्प्यावर हवीहवीशी वाटते. परंतु गर्भारपण ही स्त्रीच्या आयुष्यातील एक मोठी पायरी आहे आणि त्याचा विचार गांभीर्यपूर्वक केला पाहिजे. एक चांगलं आहे गर्भधारणा होऊ देणे, न देणे आपल्या हातात असते आणि आपली त्यासाठी तयारी नसल्यास गर्भधारणा टाळली जाऊ शकते.

त्यासाठी लैंगिक संबंध ठेवताना संरक्षणात्मक उपाय आणि सामान्य गर्भनिरोधक पद्धती जबाबदार जोडप्यांद्वारे वापरल्या जातात. चला गर्भधारणा रोखण्यासाठी पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठी उपलब्ध पर्याय पाहूयात.

महिला आणि पुरुषांसाठी गर्भनिरोधक पद्धती

गर्भधारणा रोखण्यासाठी अनेक पर्याय अवलंबले जाऊ शकतात. यातील काही पर्याय खाली दिलेले

महिलांसाठी जन्म नियंत्रण पर्याय

चला तर मग स्त्रियांसाठी उपलब्ध जन्म नियंत्रणाचे काही सुरक्षित पर्याय पाहुयात

. इंट्रायूटरिन डिव्हाइस स्त्रियांसाठी एक चांगला जन्म नियंत्रण पर्याय आहे. असुरक्षित संभोगानंतर पाच दिवसांच्या आत तुमच्या डॉक्टरांकडून ते बसवून घेऊ शकता. ही पद्धत सुरक्षित आहे. हे साधन आपल्या शरीरात ५ ते १० वर्षांच्या कालावधीपर्यंत ठेवले जाऊ शकते आणि ते नको असलेली गर्भधारणा टाळण्यास मदत करू शकते.

. मॉर्निंगआफ्टर पिल ही आणखी एक पद्धत आहे जी गरोदरपण दूर ठेवण्यासाठी वापरली जाऊ शकते. असुरक्षित संभोगानंतर ७२ तासांच्या आत याचा वापर केला जाऊ शकतो, तो वापरण्यासाठी आपल्याला पुरेसा वेळ द्या.

. डेपोप्रोव्हरा आजकाल बरेच लोकप्रिय होत आहे. हे हार्मोनआधारित गर्भनिरोधक इंजेक्शन आहे जे दर तीन महिन्यांनी दिले जाते. सहसा, हात किंवा नितंबांमधील स्नायूंवर हे गर्भनिरोधक इंजेक्शन दिले जाते. हे अत्यंत महत्वाचे आहे की प्रभावी होण्यासाठी हे इंजेक्शन प्रत्येक तीन महिन्यांनी दिले जाणे आवश्यक आहे.

. नसबंदी ही आणखी एक सामान्य पद्धत आहे ज्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागते. ही कायमस्वरूपी पद्धती आहे आणि म्हणूनच, त्यास निवडण्यापूर्वी विचार करणे आवश्यक असते.

. शुक्राणूनाशक असलेले डायफ्राम हे आणखी एक साधन आहे जे डॉक्टरांकडून बसवून घ्यावे लागते. हे साधन गर्भाशय ग्रीवाचे संरक्षण करते आणि कमीतकमी ६ तास गर्भधारणा रोखण्यास मदत करते. २४ तासांपेक्षा जास्त वेळ न ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

. गर्भनिरोधक गोळ्या सुद्धा गर्भधारणेपासून संरक्षण मिळण्यासाठी उत्तम पर्याय आहे. पण त्यासाठी गोळी चुकवणार नाही याची दक्षता घ्यावी लागते. ह्या गोळ्यांच्या नियमित वापरामुळे काही दुष्परिणाम होऊ शकतात.

. गर्भधारणा टाळण्यासाठी गोळ्यांव्यतिरिक्त बर्थ कंट्रोल इम्प्लांट हा महिलांसाठी आणखी एक पर्याय आहे. हे इम्प्लांट्स म्हणजे आगपेटीतील काडीच्या आकाराचे रबर रॉड्स असतात आणि डॉक्टरांकडून खांद्याजवळ बसवून घ्यावे लागतात.

. जेव्हा गर्भधारणा रोखण्याची वेळ येते तेव्हा ट्यूबक्टॉमी हा कायमस्वरूपी उपाय असतो. ट्यूबल नसबंदी म्हणून देखील ही शस्त्रक्रिया ओळखले जाते. ही एक शस्त्रक्रिया आहे ज्यायोगे एखाद्या महिलेच्या बीजवाहिन्या कापल्या जातात आणि नंतर बंद केल्या जातात. ही बऱ्यापैकी सुरक्षित पद्धत आहे आणि आधी बाळ असलेल्या जोडप्यांसाठी ती प्रभावी आहे

पुरुषांसाठी जन्म नियंत्रण पर्याय

गर्भधारणा टाळण्यासाठी पुरुषांसाठीचे जन्मनियंत्रण पर्याय खालीलप्रमाणे

. कंडोम ही संरक्षणाची सर्वात सोपी आणि सर्वोत्तम पद्धत आहे जी पुरुष लैंगिक संबंधात वापरू शकतात.

. संततिनियमनासाठी पुरुषांसाठी एक कायमस्वरूपी पर्याय म्हणजे पुरुष नसबंदी. ह्यासाठी शस्त्रक्रिया करून घ्यावी लागेल. जननेंद्रिय ताठ होणे किंवा स्खलन ह्यामुळे थांबणार नाही.

. पुरुषांकरिता कुठलेही साधन न वापरता संतती नियमनाचा आणखी एक पर्याय आहे आणि तो म्हणजे स्खलनाआधी शिश्न बाहेर काढून घेणे. परंतु ह्या पद्धतीची शिफारस केली जात नाही कारण ही पद्धती विश्वासार्ह नाही.

वर सांगितलेले सर्व पर्याय गर्भधारणा टाळण्यासाठी वापरले जाऊ शकतात, हे निश्चित आहे की काही पद्धती इतर पद्धतींपेक्षा जास्त परिणामकारक आहेत.प्रत्येक पद्धतीचा प्रभावीपणा जाणून घेण्यासाठी खाली एक तक्ता दिला आहे त्याची नक्कीच तुम्हाला मदत होईल.

गर्भनिरोधक पद्धती % मध्ये अचूक प्रभावशीलता
पुरुषांसाठी कंडोम ८५८७%
महिलांसाठी कंडोम ७७८०%
डायफ्राम व शुक्राणूनाशक ७८८१%
गर्भ निरोधक गोळ्या ९५% आणि त्यापेक्षा जास्त
डेपोप्रोवेरा इंजेक्शन्स ९९% आणि त्याहून अधिक
इटोनोजेस्ट्रेल जन्म नियंत्रण ९९% आणि त्याहून अधिक
इंट्रायूटरिन उपकरणे जवळजवळ ९९%
शस्त्रक्रिया / कायमस्वरुपी नसबंदी ९९% आणि त्याहून अधिक
मॉर्निंग आफ्टर पील / आपत्कालीन जन्म नियंत्रण ७४७६%

गर्भधारणा टाळण्यासाठी इतर खबरदारी

उपचारांपेक्षा गर्भधारणा टाळण्यासाठी आधी काळजी घेणे केव्हाही चांगले. तसेच हे सुद्धा लक्षात घ्या की कदाचित यापूर्वी चर्चा झालेल्या गोष्टींचा हा सारांश देखील असू शकतो. परंतु, गर्भधारणा रोखण्यासाठी काही नवीन पर्यायांची माहिती घेऊयात.

  • संरक्षणाशिवाय कधीही लैंगिक संबंध ठेवू नका.
  • उपलब्ध गर्भनिरोधकांच्या विविध निवडींपैकी सूज्ञपणे निवड करा.
  • संरक्षणाशिवाय आपल्या मासिक पाळी दरम्यान लैंगिक संबंध टाळणे आवश्यक आहे.
  • गर्भधारणा दूर ठेवण्यासाठी योग्य ते प्रयत्न करा आणि पूल आउट पद्धती वापरू नका कारण शुक्राणू स्त्रीबीजांपर्यंत पोहोचणार नाही ह्याची कुठलीही गॅरंटी ह्या पद्धतीमध्ये नसते.
  • सुरक्षित कालावधी दरम्यान संरक्षणाशिवाय लैंगिक संबंध ठेवणे देखील काहीवेळा त्रासदायक ठरू शकते. जर ह्या सुरक्षित कालावधीची चुकीच्या पद्धतीने गणना केलेली असेल तर गर्भारपणाची शक्यता असते.
  • संरक्षणाशिवाय आपल्या जोडीदाराच्या संपर्कात उघडे गुप्तांग आणण्यापासून स्वतःला परावृत्त करा कारण काही शुक्राणुंमुळे अंड्याचे फलन होण्याची दाट शक्यता असते.
  • जर आपण आधीच गर्भनिरोधक गोळ्या घेत असाल तर नियमितपणे घेत राहा आणि खात्री करा की तुम्ही दररोज एकाच वेळी त्या घेतल्या आहेत.
  • जेव्हा एखादी व्यक्ती लैंगिक उत्तेजन घेत असते, तेव्हा पुरुषाच्या जननेंद्रियातून सामान्यतः द्रव येतो त्यास पूर्व स्खलन म्हणून ओळखले जाते. परंतु , ह्या स्रावामध्ये शुक्राणू असू शकतात त्यामुळे हे सुनिश्चित करा की तुमच्या जोडीदाराने जननेंद्रियला स्पर्श केल्यानंतर तुमच्या योनीला स्पर्श केलेला नाही. नाहीतर तुम्ही गर्भवती होण्याची शक्यता असते.
  • त्याचप्रमाणे, कंडोम हाताळल्यानंतर योनीला स्पर्श केल्याने गर्भधारणेचा धोका वाढू शकतो कारण कंडोमला चिकटलेले काही शुक्राणू आपल्या गर्भाशयातील स्त्रीबीजांपर्यंत पोहोचू शकतात.
  • स्खलनानंतर (आपण कंडोम घातला असला तरीही) जास्त काळ व्यस्त रहाणार नाही हे सुनिश्चित करा. असे आढळून आले आहे की कॉन्डोम मधील वीर्य योनिमार्गामध्ये सांडते कारण पुरुषाचे जननेंद्रिय स्खलनानंतर कोमल होते.
  • दररोज खाऊ शकणारी अशी काही फळे आणि औषधी वनस्पती आहेत ज्यामुळे तुम्हाला गर्भधारणेपासून संरक्षण मिळू शकते किंवा संतती नियमनाची साधने वापरण्यात निष्काळजीपणा केला असला तरीही गर्भधारणेचा धोका कमी होईल. पपई हे असेच एक फळ आहे.

  • कंडोम फाटल्यास किंवा गर्भनिरोधक गोळी घेण्याचे विसरल्यास आपत्कालीन गर्भनिरोधक गोळी घ्या ज्यामुळे तुम्हाला गर्भधारणा होणार नाही.

नैसर्गिकरित्या गर्भधारणा टाळण्यासाठी काही स्टेप्स

जर गर्भधारणा टाळण्यासाठी शस्त्रक्रिया किंवा वैद्यकीय पद्धतीं आवडत नसतील तर काही नैसर्गिक पर्याय आहेत ज्याद्वारे तुम्ही गर्भवती होण्यापासून परावृत्त होऊ शकता.

सुरुवातीला सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःचे शरीर समजून घेणे आणि मासिक पाळी कालावधीचे परीक्षण करणे. तुमच्या मासिक पाळी चक्रादरम्यान मोठ्या प्रमाणात प्रजनन कालावधीमध्ये गर्भधारणा नियंत्रित केली जात असल्याने, ज्या कालावधीत तुमची प्रजननक्षमता जास्त असते त्या कालावधीत संभोग करणे टाळावे किंवा अशी पद्धती वापरा ज्यामुळे गर्भधारणेची शक्यता कमी होईल. त्यानंतर, तुम्ही “कमी जोखीम” असलेल्या कालावधीत लैंगिक संबंध ठेवू शकता. तुमच्या ओव्हुलेशनच्या तारखा तुमच्यासाठी समजून घेणे कठीण होऊ शकते म्हणून ओव्यूलेशनच्या काही दिवस आधी आणि ओव्हुलेशन नंतर काही दिवस गर्भधारणा टाळण्यासाठी संयम किंवा सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. एकदा आपण ट्रॅक करण्यास सुरवात केली की एक नमुना तयार होण्यासाठी काही मासिक चक्रांचा कालावधी जाऊ द्या. आपले शरीर आपल्याला देत असलेल्या चिन्हांकडे लक्ष द्या आणि त्यानंतर माहिती योग्य निर्णय घ्या. नैसर्गिकरित्या गर्भधारणा रोखण्यास मदत करण्याचे काही मार्ग खाली दिलेले आहेत

. तुमची प्रजननक्षमता तपासून पहा

तुमच्या प्रजननक्षमतेचे मूल्यांकन करताना आपण प्रयत्न करू शकता असे बरेच उपाय आहेत. सुरुवातीला प्रजनन क्षमता जास्त असणे म्हणजे काय हे तुम्हाला समजले पाहिजे. ओव्हुलेशनच्या पाच दिवस आधी आणि पुन्हा स्त्रीबिजांचा आरंभ होईपर्यंत संरक्षणाशिवाय लैंगिक संबंध ठेवल्यास तुम्ही गर्भवती होण्याची शक्यता जास्त असते. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या काळात संरक्षणाशिवाय लैंगिक संबंध ठेऊ नयेत एकदा आपल्याला प्रजनन क्षमता काय आहे हे समजल्यानंतर आपण ओव्हुलेशनबद्दल देखील जाणून घेतले पाहिजे. पुनरुत्पादक वयाच्या स्त्रीमध्ये, अंडाशय दरमहा स्त्रीबीज सोडते जे बीजवाहिनी मधून खाली प्रवास करते. या कालावधीत, जर स्त्रीबीज आणि शुक्राणूंचे मीलन झाले तर फलन होऊ शकते आणि तुम्ही गर्भवती होऊ शकता. एकदा तुम्हाला सर्व आवश्यक तारखा आणि कालावधी माहिती झाल्यास तुम्ही चिंता न करता संभोग करू शकता. ही गणना करता आली की नैसर्गिक गर्भनिरोधक आश्चर्यकारकपणे कार्य करू शकते.

. आपल्या शरीराच्या मूलभूत तापमानाचे परीक्षण करा

या पद्धतीचा अवलंब करण्यासाठी, सर्वप्रथम बेसल थर्मामीटर खरेदी करणे. सर्वोत्तम परिणामासाठी महिन्यात तुमच्या शरीराचे मूलभूत तापमान (आपल्या शरीराचे सर्वात कमी तापमान ) चार्ट करणे महत्वाचे आहे. ओव्हुलेशन दरम्यान,तुमच्या शरीराचे तापमान थोडे जास्त असते ज्यामुळे तो काळ प्रजनन काळ असल्याचे सूचित होते. लक्षात ठेवण्यासाठी काही मुद्दे म्हणजे शरीराचे तापमान सकाळी सर्वप्रथम घेणे आणि नंतर दररोज त्याच वेळी तापमानाची नोंद घेत रहाणे. तुमच्या शरीराच्या पायाभूत तापमानाची नोंद अचूक नोंदवून त्याचे चार्टिंग किमान तीन महिने केल्यावरच तुम्हाला योग्य परिणाम दिसतील. ज्या दिवशी आपल्या शरीराचे तापमान नेहमीपेक्षा जास्त दिसते त्या दिवसांमध्ये असुरक्षित संभोग टाळला पाहिजे त्यामुळे गर्भधारणा टाळता येईल.

. तुमच्या ग्रीवाच्या श्लेष्माची तपासणी करा

गर्भधारणा टाळण्याची ही एक अवघड पद्धत आहे, परंतु योग्य प्रकारे केल्यास तुम्हाला पाहिजे असलेले परिणाममिळण्यास मदत करू शकते. गर्भाशयाच्या श्लेष्मा म्हणजे तुमच्या योनीमार्गातून येणारा स्त्राव होय. हा स्त्राव महिन्यात अनेक वेळा बदलतो. हा स्त्राव तपासण्यासाठी, तुमच्या योनीच्या आत दोन बोटे घाला आणि स्वाइप करा. तुम्ही त्यासाठी सूती लोकर देखील वापरू शकता. तुम्ही तुमची मासिक पाळी संपल्यानंतर ह्या श्लेष्माची तपासणी सुरू केली पाहिजे. रंग, पोत, सुसंगततेची योग्य प्रकारे नोंद घ्यावी आणि प्रजनन क्षमता जास्त असतानाचा कालावधी योग्यरित्या जाणून घेण्यासाठी चार्ट लावला पाहिजे.

. दिनदर्शिकेवर तुमच्या मासिक पाळी चक्राचा मागोवा घ्या

बहुधा सर्वात सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या पद्धतीची सुरुवात मासिक पाळीविषयी जाणून घेण्यापासून सुरू होते.तुमचे मासिक पाळी चक्र किती दिवस चालते हे समजून घेण्यासाठी मासिक पाळीच्या कालावधीचा मागोवा घ्या. ते करताना मासिक पाळी सुरु झाल्याच्या दिवसाला पहिला दिवस म्हणा. एक नमुना स्थापित करण्यासाठी तुम्ही किमान ८९ चक्र अचूकपणे चार्ट करणे महत्वाचे आहे. या नमुन्याचा वापर करून, तुम्ही तुमच्या सर्वात कमी दिवसांच्या चक्रातील दिवसांमधून १८ किंवा आपल्या प्रदीर्घ चक्रातील दिवसांच्या संख्येमधून ११ वजा करून प्रजनन क्षमता जास्त असलेला कालावधी शोधू शकता. हे सांगण्याची गरज नाही की त्या काळात गर्भनिरोधकांशिवाय लैंगिक संबंध ठेवल्यास गर्भधारणा होऊ शकते.

. जे शोधता ते लागू करा

केवळ एक पद्धती वापरल्याने नैसर्गिक मार्गानी चांगले परिणाम मिळत नाहीत. योग्य निकाल मिळविण्यासाठी वर सांगितलेल्या पद्धती एकत्रितपणे वापरणे चांगले. हे सुद्धा लक्षात घ्या की जर आपली गणना चुकली तर आपण संरक्षणासाठी इतर पद्धती सुरक्षितता म्हणून वापरत असल्याची खात्री करा. वरील पद्धती वापरण्याचा उद्धेश प्रजनन कालावधी शोधणे आणि त्या तारखांमध्ये असुरक्षित लैंगिक संबंध टाळणे आहे. मोजणीच्या आधारावर, कोणत्या दिवसांमध्ये असुरक्षित संभोग केला तरी चालेल हे तुम्हाला समजेल.

गर्भधारणा टाळण्यासाठी १४ घरगुती उपचार

आपल्यापैकी ज्यांना गर्भधारणा टाळण्याच्या कृत्रिम किंवा वैद्यकीय पद्धती आवडत नसतील त्यांच्यासाठी काही नैसर्गिक गर्भधारणा प्रतिबंधक पद्धती आहेत ज्या केवळ प्रभावी नाहीत तर त्या घरच्या घरीच केल्या जाऊ शकतात.

औषधी वनस्पती, मसाले, झाडे इत्यादींचा वापर करून कुठल्याही दुष्परिणामांशिवाय भविष्यात नको असलेली गर्भधारणा प्रभावीपणे कशी रोखता येईल हे जाणून घेण्यासाठी वाचा.

. कडुलिंब

ह्या औषधी वनस्पतीचे अनेक उपयोग आहेत, आणि त्यापैकीच एक म्हणजे गर्भधारणा रोखणे. निंबोळ खरं तर शुक्राणूंची गती कमी करून फलनाची शक्यता कमी करणारा एक उपाय मानली जाते. गर्भधारणेस आळा घालण्यासाठी याचा उपयोग अनेक प्रकारात केला जाऊ शकतो. पुरुषांमध्ये, कडुनिंबाच्या गोळ्या घेतल्यामुळे तात्पुरते निर्जंतुकीकरण होते, ज्यामुळे गर्भधारणेची शक्यता कमी होते. गर्भधारणा टाळण्यासाठी घरगुती उपाय म्हणून कडुनिंबाच्या पानांचा अर्क किंवा तेलाचा वापर प्रभावी आहे.

. पपई

हे फळ हा एक अष्टपैलू नैसर्गिक उपाय आहे ज्यामुळे गर्भधारणा रोखली जाऊ शकते. असुरक्षित संभोगानंतर कमीतकमी ४५ दिवस कोणत्याही रूपात पपईचे सेवन केल्याने गर्भवती होण्याची शक्यता कमी होईल.

. वाळलेल्या जर्दाळू

लैंगिक संबंधानंतर लगेच वाळलेल्या जर्दाळूचे सेवन केल्यास गर्भधारणेची शक्यता होते. ह्यासाठी वाळलले जर्दाळू मध आणि पाण्यासोबत घेतात. उत्तम परिणामांसाठी हे सुखदचवयुक्त पेय कमीतकमी एका आठवड्यात घ्यावे.

. शिंगाडे

पाण्यासोबत घेतल्यास फलनाची क्रिया रोखली जाते त्यामुळे गर्भधारणा रोखली जाते. . सर्वोत्तम परिणाम मिळविण्यासाठी आपण दररोज कोमट पाण्यामध्ये कमीतकमी ५०० ग्रॅम शिंगाडे खा.

. व्हिटॅमिन सी

आपल्या त्वचेसाठी चांगले असणारे घटक गर्भारपण दूर ठेवण्यास देखील मदत करू शकतात. गर्भवती होण्याची शक्यता कमी करण्यासाठी कॅप्सूलच्या स्वरूपात सुमारे १५०० ग्रॅम व्हिटॅमिन सी घ्या.

. दालचिनी

हा मसाला केवळ आपल्या अन्नामध्ये चव वाढविण्यासच मदत करत नाही तर गर्भधारणा रोखण्यासाठी एक अद्भुत घरगुती उपाय म्हणून देखील चांगले कार्य करतो. दालचिनीचे पाणी गर्भाशयाला उत्तेजित करते आणि म्हणूनच लैंगिक संबंधानंतर ते घेण्याचा सल्ला दिला जातो.रात्रीच्या वेळी दालचिनीच्या काड्या पाण्यात भिजत ठेवा.

. ओवा

ही विलक्षण औषधी वनस्पतीं पाण्यात गरम करा आणि उकळवा. हे पाणी असेच प्याले जाऊ शकते किंवा चव वाढवण्यासाठी थोडी साखर घालू शकता

. एंजेलिका

याला डोंग क्वाई असेही म्हणतात. आपले गर्भाशय विस्तृत करण्यासाठी आणि आकुंचनांना उत्तेजन देण्यासाठी कमीतकमी एक पंधरवडा याचा वापर करा.

. गाजर बिया

गर्भवती होण्यापासून परावृत्त करण्याची एक जुनी पद्धत आहे ह्यासाठी तुम्ही बियाणे बारीक करा, पाण्यात मिसळा आणि प्या. उत्तम परिणाम मिळण्यासाठी पुढील काही दिवस पाण्याचे सेवन करा.

१०. कॉटन रूट बार्क

हे अतिशय प्रभावी असून सुकवून गरम चहा किंवा कोमट पाण्यात चांगले मिसळून प्या. सर्वोत्तम परिणामासाठी कमीतकमी सात दिवस हा काढा घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

११. आले

किसलेले आले घातलेले २ कप पाणी उकळून प्यायल्यास गर्भधारणा रोखण्यास मदत होते.

१२. थिस्टल

काटेरी पाने असलेले हे एक रानटी रोप एक गर्भनिरोधक असल्याचे मानले जाते. कडू चव उतरेपर्यंत पाण्यात उकळा आणि मग प्या.

१३. भारतीय किंवा वन्य सलगम

ही एक औषधी वनस्पती आहे ज्याचे मूळ गर्भधारणेस नियंत्रित करण्यासाठी वापरले जाऊ शकते. मुळाची वाळलेली पूड एक कप कोमट पाण्यात मिसळून ठेवली पाहिजे. दिवसातून दोनदा प्याल्याने इच्छित परिणाम मिळतात.

१४. क्वीन अँन्स लेस

ह्यास वन्य गाजर देखील म्हणतात, या वनस्पतींमध्ये बियाणे तयार होतात जे चहामध्ये घालून किंवा तसेच गर्भनिरोधक म्हणून वापरले जाऊ शकतात.परंतु जर तुम्हाला मूत्रपिंडाचा आजार किंवा पित्ताशया च्या काही समस्या असल्यास किंवा तुम्ही बाळाला स्तनपान देत असाल तर हे घेणे टाळा.

जेव्हा आपण गर्भधारणा टाळण्याचा प्रयत्न करीत असाल, तेव्हा गर्भधारणेचा धोका कमी करण्यासाठी एक पद्धत किंवा वर दिलेल्या एकापेक्षा जास्त पद्धती निवडा. लक्षात ठेवा की कोणतीही पद्धत संपूर्णपणे सुरक्षित नाही. गर्भधारणा होऊ नये म्हणून घरगुती उपचार आणि नेहमीच्या गर्भनिरोधक पद्धती एकत्र वापरल्यास उत्तम परिणामांची खात्री होते.

आणखी वाचा: सर्व्हायकल कॅप – एक जन्म नियंत्रण पद्धत

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article