Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण गर्भधारणेचे आठवडे गर्भधारणा: ३०वा आठवडा

गर्भधारणा: ३०वा आठवडा

गर्भधारणा: ३०वा आठवडा

तुम्ही अगदी यशस्वीरीत्या गर्भारपणाच्या ३०व्या आठवड्यात पदार्पण केले आहे. अभिनंदन! ही तिसरी तिमाही आहे आणि त्या मौल्यवान क्षणाकडे  तुमची वाटचाल सुरळीत सुरु आहे. दवाखान्यात जाताना नेण्याची तुमची बॅग भरून ठेवण्याची ही योग्य आणि चांगली वेळ आहे.

कुठल्या गोष्टी कराव्यात, कुठल्या करून नयेत, डॉक्टरांच्या भेटी इत्यादींविषयीची पुष्कळ माहिती तुमच्याकडे असेल. परंतु गोंधळून जाऊ नका आणि गर्भारपणाच्या ह्या टप्प्यावर नक्की काय होणार आहे ते पाहूयात.

गर्भारपणाच्या ३०व्या आठवड्यातील तुमचे बाळ

बाळाची वाढ झपाट्याने होताना दिसते. तुमच्या बाळाचे वजन वाढते आणि जसजसे बाळाची वाढ होते तसे बाळाभोवतीचे गर्भजल संकुचन पावते, बाळाच्या डोळ्यांची दृष्टी विकसित होते आणि तुमच्या हाडे मजबूत होऊ लागतात.

तुमच्या बाळाचा आकार केवढा असतो?

तुमच्या बाळाची उंची डोक्यापासून टाचेपर्यंत १६ इंच असते. गरदोरपणाच्या ३०व्या आठवड्यात बाळाचा आकार हा कोबी एवढा असतो आणि त्याचे वजन १.३ किलो असते (३ पौंड). बाळाची वाढ वेगाने होत असते आणि जरी बाळाची उंची थोडी वाढली असली तरी पुढच्या काही आठवड्यांमध्ये बाळाच्या वजनात लक्षणीय वाढ होईल.

शरीरात होणारे बदल

गर्भारपणाच्या ३०व्या आठवड्यात पोटाचा घेर खूप मोठा असून प्रसूतीची तारीख जवळ येत असल्याने तुम्हाला बाळाचा जन्म कुठल्या पद्धतीने व्हावा ह्या विषयीचे पर्याय निवडून ठेवले पाहिजेत.

गर्भारपणाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये होणारे शारीरिक बदल हे खूप वेगाने होत असतात. ३०व्या आठवड्याच्या शेवटी वजनातील वाढ ८-१३ किलो इतकी असते. शेवटच्या तिमाहीत वजन वाढीविषयी चिंता करू नका कारण ते खूप सामान्य आहे.

तुमचे शरीर तुम्हाला नेहमीपेक्षा जड वाटू लागते आणि नेहमीची कामे करणे कठीण जाते. परंतु तुमचे गोंडस बाळाला लवकरच तुम्ही मांडीवर घेणार आहात त्यामुळे सध्या ह्या काळाचा आनंद घ्या.

तुम्हाला वारंवार लघवीला जावे लागणार आहे कारण तुमच्या तुमच्या मूत्राशयावर खूप दाब पडतो आहे ह्याचे कारण म्हणजे तुमच्या गर्भाशयातील बरीचशी जागा तुमच्या बाळाने व्यापली आहे. तुमचे स्तन, स्तनपानासाठी दूध तयार करण्यात कार्यरत असल्याने ते आता हळुवार आणि नाजूक बनतील.

३०व्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणे

  • जळजळ: अन्ननलिकेत आम्लाचा प्रवेश होऊ नये म्हणून कार्यरत असलेली झडप शिथिल झाल्यामुळे अन्ननलिकेत आम्लाचा प्रवेश होतो.
  • बाळाचा दाब फुप्फुसावर पडल्यामुळे बाळाला श्वसनास त्रास होतो.
  • स्नायू शिथिल झाल्यामुळे पचनास त्रास होतो.
  • स्नायूंची हालचाल कमी होत असल्याने गॅस होतो आणि पोट फुगते.
  • स्नायू शिथिल झाल्यामुळे बद्धकोष्ठता आणि मूळव्याधीचा त्रास सुरूच राहतो.
  • तुम्हाला चालताना तोल सावरणे कठीण होते कारण गुरुत्व मध्यभाग बदलतो.
  • पायांमध्ये पेटके येतात किंवा वेरिकोस व्हेन्सचा त्रास सुरु होतो तसेच पाठदुखी होते कारण बाळाचा दाब पाठीवर पडतो. तसेच गर्भाशयाचा दाब, पायाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांवर पडतो.
  • पोटावर खाज सुटते कारण बाळाची पोटात वाढ होत असल्याने पोट ताणले जाते.
  • पोटाचा आकार मोठा असल्याने झोपताना अस्वस्थता जाणवते.
  • मूत्राशयावर दाब पडल्याने वारंवार लघवीला जाण्याची भावना होते.
  • बाळाच्या वजनामुळे तसेच संप्रेरकांमधील बदलांमुळे थकवा जाणवतो.

गर्भधारणेच्या ३०व्या आठवड्यात पोटाचा आकार

तुमच्या पोटावचा आकार आता कलिंगडासारखा झाला आहे. तुम्हाला खाली वाकणे किंवा खाली पडलेल्या गोष्टी उचलणे तसेच बुटांच्या लेस बांधणे इत्यादी गोष्टी करणे कठीण जाईल. तुम्हाला सरळ चालणे सुद्धा त्रासदायक होईल परंतु त्याची काळजी करण्याचे काही कारण नाही. जेव्हा बाळ ओटीपोटात येते आणि बाळाच्या जन्माची तयारी तुमचे शरीर करू लागते तेव्हा तुम्हाला श्वासास होणारा त्रास कमी होतो. बाळाचे पाय मारणे आणि हालचाली आता ठळक जाणवू लागतात कारण बाळाचा आकार वाढल्यामुळे गर्भाशय पूर्णतः व्यापून गेले आहे. तुम्हाला सराव कळांचा (Braxton Hicks Contractions) अनुभव येऊ शकतो. त्यामुळे, तुम्ही तुमच्या स्त्रीरोगतज्ञांशी बोला आणि सराव कळा आणि खऱ्या प्रसूती कळा ह्यातील फरक जाणून घ्या.

बरीचशी जोडपी ह्या काळात शारीरिक संबंध ठेवण्यास टाळाटाळ करतात, परंतु डॉक्टरांनी तसे काही सांगितले नसल्यास संभोग करण्यास काहीही नाही.

गर्भधारणेच्या ३०व्या आठवड्यातील सोनोग्राफी

तुमच्या बाळाचे वजन वेगाने वाढत आहे आणि बाळाची फुप्फुसे आणि पचनसंस्था पूर्णपणे विकसित झालेले असतात. बाळाला आता प्रकाश समजू लागतो आणि बाळ डोळ्यांची उघडझाप करू लागते. जर तुम्ही तुमच्या बाळाच्या पोटावर टॉर्चने प्रकाश टाकला तर ते बाळाला समजते आणि तो पकडण्यासाठी सुद्धा ते प्रयत्न करते. आता बाळ मुठीत बोट सुद्धा पकडू शकते.

आता बाळाची अस्थिमज्जा सुद्धा स्वतःचे स्वतः तांबड्या पेशी तयार करू लागते, आणि त्यामुळे तुमचे बाळ जन्मानंतर स्वतःचे स्वतः जगू शकते. बाळाच्या शरीरावरील लव कमी होते कारण बाळाच्या शरीरावरील  चरबी आणि बाळाचा मेंदू बाळाच्या शरीराचे तापमान नियंत्रित करते.

आहार कसा असावा?

गर्भारपणाच्या ३० व्या आठवड्यातील आहारात बऱयाच लोहयुक्त पदार्थांचा समावेश होतो.

  • मांस आणि मासे
  • ब्रोकोली आणि इतर हिरवाय पालेभाज्या
  • संपूर्णधान्य सीरिअल
  • मसूर आणि डाळी
  • सुकामेवा
  • अंडी

तुमच्या गर्भारपणात लोह अतिशय महत्वाचे आहे आणि लोहामुळे तुमच्या शरीराकडून रक्तवाहिन्यांकडे ऑक्सिजन चा पुरवठा होतो. ज्या पदार्थांमुळे लोहाचे शोषण होत नाही असे पदार्थ टाळा त्याऐवजी व्हिटॅमिन सी युक्त फळे खा तसेच व्हिटॅमिन सी युक्त फळांचा रस घ्या, त्यामुळे लोहाचे शोषण होण्यास मदत होईल.

कॅल्शिअम खूप महत्वाचे आहे आणि तुम्ही कॅल्शिअम आणि लोह पूरक गोळ्या एकत्र घेतल्यास लोहाच्या शोषणावर त्याचा परिणाम होतो. लोहाच्या अभावामुळे बाळाच्या विकासावर परिणाम होतो आणि त्यामुळे आईला ऍनिमिया होण्याची सुद्धा शक्यता असते, तसे झाल्यास बाळंतपणात गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असते.

काय काळजी घ्याल किंवा त्यासाठी काही टिप्स

इथे काही सोप्या आणि सहज सूचना दिल्या आहेत ज्याची तुम्हाला ह्या आठवड्यात मदत होईल

हे करा

  • तुम्ही “Stem cell storage ” करणार आहात किंवा नाही हे ठरवून ठेवा कारण पुढील वैद्यकीय कारणांसाठी ते तुम्हाला उपयोगी पडेल.
  • बाळाच्या हालचालींवर नियंत्रण ठेवा.
  • साधे व्यायाम करा.
  • लोहयुक्त अन्नपदार्थ खा.

हे करू नका

  • कळा येत असतील किंवा योनीमार्गातून पाण्यासारखा स्त्राव गळत असेल तर दुर्लक्ष करू नका.
  • कुठलीही कठीण क्रिया करू नका.
  • जर बाळाची हालचाल नेहमीपेक्षा मंदावलेली जाणवल्यास, लगेच घाबरून जाऊ नका जवळच्या इस्पितळातील तात्काळ विभागास भेट द्या.

कुठल्या गोष्टींची खरेदी कराल?

इथे काही गोष्टी दिल्या आहेत त्या तुम्हाला आणून ठेवल्या पाहिजेत

  • Cord banking ( जर तुम्ही stem cell स्टोरेज चा विचार करत असाल तर).
  • मॅटर्निटी कपडे आणि नर्सिग ब्रा.
  • बाळासाठी लागणाऱ्या गोष्टी (साबण, टॉवेल, बाळाला गुंडाळण्याची टॉवेल्स, तसेच वाईप्स इत्यादी).

तुमचे बाळ तुमचे बोल ऐकत आहे आणि बाळ तुमच्याकडे येण्यासाठी फक्त काही आठवड्यांचा कालावधी राहिला आहे. बाळाने ह्या जगात येण्याआधी, तुमचा बाळाशी बंध निर्माण होण्यासाठी हा काळ उत्तम आहे. अस्वस्थता आणि संप्रेरकांमधील बदलांमुळे तिसऱ्या तिमाहीमध्ये होणाऱ्या आईला नैराश्य येऊ शकते. जर तुम्हाला खूप उदास वाटत असेल तर तुमच्या डॉक्टरांशी तुमच्या चिंतेविषयी जरूर बोला. तुमचे डॉक्टर ह्या औदसिन्याविषयी तुम्हाला जरूर मार्गदर्शन करतील. जरी तिसरी तिमाही वेदनादायी असली तरी सुद्धा तुमच्या प्रियजनांच्या जवळ जात आहात. तुम्ही तुमच्या डोहाळेजेवणाचा आनंद तुम्ही घेऊ शकता, रोमँटिक ‘Pre-baby shoot’ सुद्धा तुम्ही करू शकता.

मागील आठवडा: गर्भधारणा: २९वा आठवडा

पुढील आठवडा: गर्भधारणा: ३१वा आठवडा

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article