Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण गर्भधारणेचे आठवडे गर्भधारणा: २९वा आठवडा

गर्भधारणा: २९वा आठवडा

गर्भधारणा: २९वा आठवडा

तुम्ही यशस्वीरीत्या गर्भारपणाच्या २९व्या आठवड्यात पदार्पण केले आहे. ही तिसरी तिमाही आहे आणि तुम्ही तुमच्या गोंडस बाळाला लवकरच जन्म देणार आहात. अशावेळी तुमच्या मनात एकीकडे काळजी आणि दुसरीकडे खूप आनंद अशा संमिश्र भावना असतील.

तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या सल्ल्याने भारावून जाऊ नका. आरामात आणि शांत राहा. तुमच्या गर्भारपणाच्या ह्या टप्प्यावर असताना प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवा.

गर्भारपणाच्या २९व्या आठवड्यातील तुमचे बाळ

तुमच्या पोटातील बाळाची वाढ होत आहे आणि हालचाल सुद्धा सुरु आहे आणि मध्येच हळूच पाय मारून तुमच्याशी ते संवाद साधत आहे!  तुम्ही ज्याची आतुरतेने वाट पाहत होतात त्याचा अनुभवही तुम्ही आता घेत आहात.

बाळाचा मेंदू विकसित होत असल्याने बाळाच्या डोक्याचा आकार वाढत आहे आणि त्यामुळे बाळाचे वजन सुद्धा आता जास्त आहे. बाळाची फुप्फुसे आणि स्नायू परिपक्व होत आहेत. तसेच बाळाच्या हाडांचा साचा विकसित होण्यास सुरुवात होते आहे. हाडे मजबूत होत आहेत  आणि त्यामुळे बाळास जास्त कॅल्शिअम ची गरज भासते.

बाळाचा आकार केवढा असतो?

जेव्हा तुम्ही २९ आठवड्यांचे गरोदर असता तेव्हा बाळाचा आकार हा साधारणपणे १५.२ इंच लांब आणि वजन २.५ पौंड (१.१ किलो) इतके असते, म्हणजे बाळ अंदाजे लालभोपळ्याच्या आकाराचे असते. बाळाची लांबी पुढच्या ११ आठवड्यात थोडी वाढू शकते, परंतु वजनात मात्र दुप्पटीने किंवा तिपटीने वाढ होते.

शरीरात होणारे बदल

२९ व्या आठवड्यात तुमच्या पोटाचा आकार लक्षात येण्याइतका मोठा असतो त्यामुळे तुम्हाला संपूर्णपणे खाली वाकता येणार नाही. तुमच्या वजनात सामान्यपणे ८ – ११ किलो इतकी वाढ झालेली असली पाहिजे, परंतु ही वाढ व्यक्तिपरत्वे  बदलते. तुम्हाला खालील गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत.

  • तुमचे स्तन खूप मोठे आणि जड झाले आहेत, म्हणून स्पोर्ट ब्रा किंवा नर्सिग ब्रा वापरा.
  • मॅटर्निटी पॅंटी मध्ये खूप पर्याय उपलब्ध आहेत, तुम्हाला आरामदायक वाटेल असा योग्य पर्याय निवडा.

२९व्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणे

खाली काही लक्षणे दिली आहेत जे तुम्ही २९ व्या आठवड्यात अनुभवू शकता

  • तुम्हाला जळजळ जाणवत राहील.
  • बाळाचा आकार वाढल्यामुळे पोटाचा दाब बरगड्यांच्या स्नायूंवर पडल्यामुळे तुम्हाला श्वसनास त्रास होऊ शकतो.
  • बाळाच्या वाढत्या वजनामुळे बद्धकोष्ठता आणि मूळव्याध (गुदद्वाराला सूज) होऊ शकतो.
  • संप्रेरकांच्या वाढलेल्या पातळीमुळे डोके हलके होणे, विसरभोळेपणा तसेच लक्ष केंद्रित होण्यास त्रास होऊ शकतो.
  • तुम्हाला पाठदुखी होऊ शकते किंवा तुमचे पाय दुखू शकतात.
  • त्वचा ताणली गेल्यामुळे तुमच्या पोटाभोवतीच्या भागाला खाज सुटू शकते.
  • पोटाचा घेर वाढल्यामुळे अस्वस्थता येऊ शकते.
  • वारंवार लघवीला होते.

गर्भधारणेच्या २९व्या आठवड्यात पोटाचा आकार

ह्या टप्प्यावर तुमच्या पोटाचा आकार लक्षणीयरीत्या वाढला असून पुढेही वाढत राहणार आहे. बाळ आता पोटात हालचाल करत आहे आणि तुम्ही तुमच्या पोटावर हात ठेवल्यास तुम्हाला बाळाच्या हालचालींचा अनुभव घेता येईल.

खरंतर बाळ ह्या दिवसांमध्ये बाळ खूप कार्यरत असते. बाळाच्या पाय मारण्याच्या वेळांवर लक्ष ठेवले पाहिजे. बाळाने कमीत कमी २ तासात १० वेळा पाय मारला पाहिजे. जर तुमच्या लक्षात आले की बाळाची हालचाल मंदावली असेल तर लगेच घाबरून जाण्याचे कारण नाही. तुमच्या पोटाला अलगद मालिश करा किंवा थंड पाणी प्या आणि कुशीवर झोपा. तरीही तुम्हाला वाटले की बाळ हालचाल करत नाही तर तुमच्या डॉक्टरना फोन करा आणि हॉस्पिटलच्या तात्काळ विभागाला भेट द्या.

गर्भधारणेच्या २९व्या आठवड्यातील सोनोग्राफी

ह्या आठवड्यातील सोनोग्राफी मध्ये तुम्हाला दिसेल की तुमच्या बाळाची किती जलद गतीने वाढ झाली आहे. बाळाची हालचाल किती वारंवार आणि ठळक झाली आहे कारण बाळाला पोटामध्ये हालचालीसाठी कमी जागा आहे. कधी कधी तुम्हाला तुरळक आखडल्यासारख्या हालचाली जाणवतील, पण ते म्हणजे तेव्हा बाळाला उचक्या येत असतात.

या वेळेच्या सोनोग्राफीमध्ये बाळ थोडे गुबगुबीत दिसेल आणि बाळाच्या त्वचेखाली आता थोडी पांढरी चरबी दिसेल जी बाळामध्ये असलेल्या विटकरी रंगाच्या चरबी पेक्षा वेगळी असेल. बाळाची सुरकुत्या पडलेली त्वचा आता गुळगुळीत होत चालली आहे. शरीराचे तापमान संतुलित राखण्यासाठी चरबीची गरज असते. तसेच  वेगवेळ्या क्रियांसाठी लागणाऱ्या ऊर्जेचा तो स्रोत असते.

बाळ आता विकासाच्या टप्यावर आहे, आणि बाळाच्या वाढीमध्ये लक्षणीय बदल होत आहेत. बाळाचा मेंदू, महत्वाचे अवयय, आणि दात विकसित होत आहेत. त्यामुळे आरोयपूर्ण आणि पोषक आहार घेणे हे अतिशय महत्वाचे आहे. तुमच्या बाळाचे जननेंद्रिय ह्या अल्ट्रासाऊंड मध्ये अगदी स्पष्ट दिसते.

बाळ किती वेळा लाथ मारते हे मोजणे आता महत्वाचे आहे. तुम्हाला दररोज बाळाच्या हालचालींची नोंद ठेवली पाहिजे. बाळ खूप जोरात लाथ मारते तेव्हा तुम्ही दोघे बाळाच्या ह्या छोट्या हालचालींचा आनंद घेऊ शकता आणि बाळाशी तुमचा बंध अधिक घट्ट होतो.

आहार कसा असावा?

निरोगी गर्भारपणासाठी योग्य आहार घेणे हे अतिशय महत्वाचे आहे, तुम्ही काय खाऊ शकता आणि काय नाही हे माहित असणे जरुरीचे आहे. तुमच्या बाळाची खूप वेगाने वाढ होत आहे त्यामुळे बाळाच्या वाढीसाठी लागणारी पोषणमूल्ये बाळाला मिळणे आवश्यक आहे. गर्भारपणातील २९व्या आठवड्यातीळ आहारात लोह, कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन सी चा समावेश आवश्यक आहे.

जसजशी तुमच्या बाळाशी हाडे मजबूत होत असतात, तुम्ही दररोज २० मिलिग्रॅम इतके कॅल्शिअम घेतले पाहिजे. खूप लोहयुक्त अन्नपदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करा, जेणेकरून तुमच्या बाळाला तांबड्या रक्तपेशी तयार करण्यासाठी त्यातुन लोह मिळू शकेल.

तुम्हाला गोड, केक, चॉकलेट्स आणि इतर जंक फूड खावेसे वाटतील, परंतु ते वरचे वर खाणे टाळा. कधीतरी खाणे ठीक आहे.

व्हिटॅमिन सी ने समृद्ध आहार बाळासाठी चांगला असतो, रक्तवाहिन्यांसाठी लागणारे ऊतक (tissue ) ते तयार करीत असते. धान्य, आंबे, रताळे आणि गाजर ही काही व्हिटॅमिन सी समृद्ध फळे आहेत.

नियमित चौरस आहार आणि हलका व्यायाम हा नियम गर्भारपणात पाळणे जरुरी आहे.

काय काळजी घ्याल आणि त्यासाठी काही टिप्स

गर्भारपणातील अस्वस्थता तुम्ही खालील गोष्टी पाळल्यास कमी होऊ शकते.

हे करा

  • भरपूर आराम करा आणि ह्या जादुई काळाचा आनंद घ्या.
  • खूप जास्त वेळ उभे राहणे किंवा बसणे टाळा कारण त्यामुळे तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत होत नाही.
  • तुमच्या डाव्या कुशीवर झोपा त्यामुळे रक्ताभिसरण चांगले होते.
  • तुमच्या कोरड्या आणि खाजणाऱ्या त्वचेवर चांगले मॉइश्चराझर लावा.
  • भरपूर पोषक आहार घ्या.
  • भरपूर पाणी प्या आणि मूत्रमार्गाच्या संसर्गाकडे लक्ष द्या.
  • पाय वर घेऊन बसा.
  • हलके आणि साधे व्यायाम करा.

हे करू नका

  • भूक मारू नका. तुम्हाला जेव्हा भूक लागेल तेव्हा खाणे महत्वाचे आहे.
  • पाय एकावर एक ठेवून बसू नका कारण त्यामुळे तुमच्या पायांच्या रक्ताभिसरणामध्ये अडथळा येऊ शकतो. आणि त्यामुळे पायांना सूज येऊ शकते तसेच व्हेरिकोज व्हेन्स चा त्रास होऊ शकतो.
  • खूप जड वस्तू उचलणे टाळा किंवा शरीरास ताण येईल अशा क्रिया करू नका.
  • खूप घट्ट कपडे घालू नका, सैल कपडे घातल्यास अस्वस्थता कमी होईल.
  • खूप जास्त खाऊ नका त्यामुळे जास्त वजन वाढण्याची शक्यता आहे.
  • पाठीवर झोपू नका कारण त्यामुळे तुमच्या शरीरास कमी रक्तपुरवठा होईल.

कुठल्या गोष्टींची खरेदी कराल?

खरेदी करायला जाणे ह्यासारखा दुसरा आनंद नाही!

इथे काही गोष्टी दिल्या आहेत त्यांची तुम्ही खरेदी करू शकता:

  • आरामदायी आणि चांगले कपडे, तसेच झोपताना घालावयाचे कपडे आणि अंतर्वस्त्रे.
  • बाळाची खोली सजवण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी.
  • डायपर,बाळाचे कपडे,टॉवेल्स इत्यादी.
  • मॅटर्निटी कपडे.

काही आठवड्यातच बाळ येणार आहे आणि तुम्ही स्वतः निरोगी ठेवण्यासाठी ह्या माहितीचा वापर करू शकता आणि जन्मानंतर बाळाला उबदार घरटं देऊ शकता.

मागील आठवडा: गर्भधारणा: २८वा आठवडा

पुढील आठवडा: गर्भधारणा: ३०वा आठवडा

संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article