जरी आपले मूल अगदी साध्या सर्दी आणि खोकल्याने आजारी असले, तरीही आपल्यासाठी तसेच आपल्या लहानग्यासाठी हा काळ कठीण असू शकतो. अशा वेळी खूप भूक लागलेली असताना देखील मुले खायला नकार देतात आणि त्यामुळे पुरेसे पोषण मिळत नसल्यामुळे त्यांच्या शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती कमी होते. म्हणूनच अशावेळी आपल्या मुलासाठी कोणते पदार्थ चांगले आहेत हे जाणून घेणे आवश्यक […]
गरोदरपणात गरोदर स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होत असतात. त्यातील एक बदल म्हणजे गरोदरपणात संप्रेरकांची पातळी सतत वर खाली असते, त्यामुळे पचनसंस्थेचे कार्य बिघडते आणि त्याचाच परिणाम म्हणजे बद्धकोष्ठता. बद्धकोष्ठतेमुळे मूळव्याध होऊ शकतो. आणि गुदद्वाराजवळील भागातील रक्तवाहिन्यांना सूज येऊन रक्तस्त्राव होऊ शकतो. हा रक्तस्त्राव होण्याची नेमकी कारणे काय आहेत आणि त्यावर कुठले उपाय तुम्ही करू शकता […]
गर्भावस्थेच्या १६व्या आठवड्यात तुमच्या शरीरात, आकार आणि कार्यक्षमता ह्या दोन्ही दृष्टीने फरक होतो. तुमच्या गर्भावस्थेचा अजून एक रोमांचक भाग म्हणजे तुमच्या पोटात बाळाच्या हालचालींचा अनुभव आता तुम्ही केव्हाही घेऊ शकता. तुम्हाला अजूनही काही प्रमाणात पोट फुगल्यासारखे वाटेल त्यामुळे बाळ केव्हा हालचाल करत आहे हे पटकन कळणार नाही. आनंदाची गोष्ट म्हणजे बाळाच्या हालचालीचा एक विशिष्ट नमुना […]
मुलांची वाढ होत असताना त्वचेच्या समस्या होणे सामान्य आहे कारण त्यांची त्वचा अजूनही संवेदनशील असते आणि आजूबाजूच्या जीवाणूंपासून स्वतःचे संरक्षण करते. बहुतेक त्वचेच्या समस्यांमुळे अस्वस्थता येते. कुठल्या भागाच्या त्वचेची समस्या आहे त्यावर हा त्रास अवलंबून असतो. डोक्यातील कोंड्याची समस्या आपल्या मुलाच्या टाळूवर परिणाम करते. मुलांना होणारा हा सर्वात सामान्य आणि व्यापक संसर्ग आहे. कोंडा म्हणजे […]