Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ दर महिन्याला होणारा बाळाचा विकास तुमचे ४१ आठवड्यांचे बाळ – विकास, विकासाचे टप्पे आणि काळजी

तुमचे ४१ आठवड्यांचे बाळ – विकास, विकासाचे टप्पे आणि काळजी

तुमचे ४१ आठवड्यांचे बाळ – विकास, विकासाचे टप्पे आणि काळजी

तुमचे बाळ शेवटी ४१ आठवड्यांचे झाले आहे का? अभिनंदन! तुमच्या लहान बाळाने खूप मोठा टप्पा गाठलेला आहे. ४१ व्या आठवड्यात, तुमच्या बाळाला काही शब्द आणि साधी वाक्ये समजायला सुरुवात होईल. म्हणून सध्या सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही बाळाशी बोलत रहा. बाळाचा मेंदू आता खूप वेळ काम करेल, कारण बाळाची मोटर कौशल्ये विकसित होतात. तसेच बाळाचा शारीरिक आणि मानसिक विकास होतो. ह्या टप्प्यावर, बाळाला वेगळे होण्याची चिंता असते. दात येत असल्यामुळे बाळाची अस्वस्थता खूप वाढते, परंतु तुमच्या लहान बाळामध्ये अनेक रोमांचक घडामोडी असतील आणि त्या तुमच्या लक्षात येतील. अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

४१ आठवड्यांच्या बाळाचा विकास

ह्या टप्प्यावर तुमचे बाळ त्याच्या बोलण्याचे कौशल्य तपासून पहात असेल. त्यामुळे बाळाच्या बोलण्याची नक्कल करणे टाळा. बाळाच्या बडबडीला योग्य आणि पूर्ण वाक्यांसह प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करा. जसे तुम्ही खरंच?” असे उत्तर देऊ शकता. किंवा जेव्हा बाळ काहीतरी बडबड करते तेव्हा हे खूप छान आहेअश्या प्रतिक्रिया द्या. तुमचे बाळ हसत राहील आणि बडबड करत राहील, परंतु बाळाच्या भाषेच्या विकासाला चालना देण्यासाठी तसेच बाळाने योग्य शब्द निवडण्यासाठी आणि वाक्ये समजून घेण्यासाठी हा एक उत्कृष्ट मार्ग आहे.

बाळाच्या शारीरिक वाढीतही तुम्हाला खूप फरक दिसेल. होय, बाळाची वाढ खूप वेगाने होऊ लागेल, त्यामुळे बाळाचे वाढते शरीर सामावून घेण्यासाठी मोठ्या आकाराचे कपडे खरेदी करण्याची वेळ येऊ शकते. बाळ अधिक सक्रियपणे हालचाल करू लागेल. बाळ स्वतःचे स्वतः उभे राहून पुन्हा खाली बसू लागेल. ४१ आठवड्यांचे बाळ कशाचातरी आधार घेऊन सतत इकडे तिकडे फिरत असते.

४१ आठवड्याच्या बाळाचे विकासात्मक टप्पे

खाली ४१ आठवड्यांच्या बाळाच्या वाढीचे काही टप्पे दिलेले आहेत. ते तुमच्या बाळामध्ये दिसतात का ह्यावर तुम्ही लक्ष ठेवले पाहिजे.

  • तुमचे बाळ कशालातरी किंवा कुणालातरी धरून उभे राहण्यास सक्षम असेल.
  • तुमचे बाळ पीकबू गेममध्ये सहभागी होण्यास सक्षम असेल.
  • तुमचे बाळ ‘मम्मा’ आणि ‘पप्पा’ म्हणू शकेल.
  • तुमचे बाळ बसलेले असताना स्वतःचे स्वतः उठून उभे राहू शकेल.
  • तुमचे बाळ तुमच्यासारखेच हात वारे करू लागते.
  • तुमचे बाळ तुमच्या वागणुकीची आणि कृतींची नक्कल करू लागेल.
  • तुमचे बाळ अधिक सर्जनशील असेल आणि साधनांचा वापर करून जे हवे आहे ते कसे मिळवायचे हे बाळाला समजू लागेल. उदाहरणार्थ, जर बॉलपर्यंत पोहोचू शकत नसेल, तर बाळ कुठल्यातरी लांब गोष्टीने बॉल स्वतःकडे खेचून घेईल

तुमचे बाळ कशालातरी किंवा कुणालातरी धरून उभे राहण्यास सक्षम असेल.

आहार देणे

४१ आठवड्यांतील बहुतेक बाळे त्यांना पूर्वी आवडत असलेले प्युरीसारखे घन पदार्थ नाकारू शकतात. तुमच्या बाळाला विविध खाद्यपदार्थांची ओळख करून देण्याची ही महत्त्वाची वेळ आहे, परंतु बाळाला ह्या कालावधीत मर्यादित पदार्थ आवडतील. त्यामुळे बाळाच्या पोषणाच्या गरज भागत नाहीत असे तुम्हाला वाटू शकेल परंतु पहिले वर्षभर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही कारण स्तनपानातून किंवा फॉर्मुला दुधातून बाळाच्या पोषणासाठी पुरेशी पौष्टिक मूल्ये त्याला मिळत असतात. तुमच्या बाळाच्या आवडीनुसार बाळाला अन्नपदार्थांची निवड करा नाहीतर बाळ ओरडू शकते. बाळाला विविध पर्यायांमधून अन्नपदार्थ निवडण्याची परवानगी द्या आणि शिफारस केलेल्या सर्व्हिंगची चिंता न करता बाळाला पाहिजे ते खाऊ द्या. फ्रोझन टरबूज दातदुखीसाठी उत्तम आहे, त्याशिवाय, तुम्ही मासे किंवा चिकनचे मऊ तुकडे देखील बाळाला देऊन पाहू शकता. बाळासाठी काय सोयीस्कर आहे ते शोधा आणि मगच ते बाळाला द्या.

बाळाची झोप

४१ व्या आठवड्यात, तुमचे बाळ झोपेच्या वेळी गडबड करेल. या कालावधीत, दात येण्यासारख्या वेगवेगळ्या कारणांमुळे बाळाला त्रास होतो आणि रात्रीचे अस्वस्थ वाटते. बाळाला त्रास होत असल्यामुळे तुम्हाला त्रास होत असला तरी, बाळाच्या वेदना कमी करण्यासाठी जेल किंवा औषधे वापरण्यापासून दूर रहा. दात येण्याच्या लक्षणांमध्ये चावणे, लाळ येणे, कान घासणे, चेहऱ्यावर पुरळ येणे, जागे होणे, भूक कमी लागणे आणि सौम्य ताप इत्यादी लक्षणांचा समावेश होतो. दात येण्याशी थेट संबंध नसलेल्या लक्षणांमध्ये अस्वस्थ झोप, शौचास पातळ होणे, खोकला, नाक बंद होणे, अंगावर पुरळ उठणे, उलट्या आणि ताप इत्यादी लक्षणांचा समावेश होतो. तुमच्या बाळामध्ये ही लक्षणे का आहेत याची तुम्हाला खात्री नसल्यास, तुम्ही तुमच्या बालरोगतज्ञांकडून बाळाला तपासून घेऊ शकता.

४१आठवड्याच्या बाळाची काळजी घेण्याविषयी टिप्स

४१ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी येथे काही टिप्स दिलेल्या आहेत

  • तुमच्या बाळाच्या विकासाला चालना देण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे संवाद. तुमचे बाळ ज्या वस्तू दाखवते त्यांना नावे द्या किंवा बाळाने नावे सांगण्यासाठी तुम्ही बाळाला वस्तू दाखवा जेणेकरून बाळ शिकेल. बाळाला त्याच वस्तूंबद्दल दररोज विचारा. अशा प्रकारे, बाळ ती नावे लक्षात ठेऊ लागेल.
  • तुमच्या लहान बाळाशी बोबडे बोलू नका. योग्य शब्द आणि वाक्ये वापरून तुमच्या बाळाशी बोला आणि उत्तर द्या. त्यामुळे बाळाच्या विकासात मदत होईल.
  • तुम्ही काय करत आहात हे बाळाला सांगा. उदाहरणार्थ, तिला पार्कमध्ये घेऊन जाण्यासाठी स्ट्रोलरमध्ये ठेवताना, बाळाला सांगा – “मी तुला स्ट्रोलऱ मध्ये बसवत आहे म्हणजे तुला आरामात बसता येईल आणि आता आपण बागेत जात आहोत.”
  • तुम्ही तुमच्या बाळासाठी बालगीते म्हणा आणि संबंधित क्रियांसाठीचे शब्द वापरा जेणेकरुन बाळाला मुख्य वाक्ये आणि शब्दांसह असलेल्या क्रिया लक्षात राहतील.
  • तुमच्या बाळासाठी वारंवार पुस्तके वाचा आणि प्रत्येक वर्णनाविषयी पुस्तकातील चित्रे दाखवा जेणेकरून तुमचे बाळ वस्तू, लोक आणि प्राणी ओळखू शकेल.
  • तुमच्या बाळासाठी काही पुशअँडवॉकखेळणी मिळवा. त्यामुळे बाळ स्वतःहून चालायला सुरुवात करेपर्यंत मदतीशिवाय सुरक्षितपणे फिरू शकेल.
  • तुमच्या बाळाला झोपण्यापूर्वी मिठी मारा, हलका मसाज करा आणि हलकेच झुलवत रहा. त्यामुळे झोपण्यापूर्वी बाळ रिलॅक्स होईल.

तुमच्या बाळासाठी वारंवार पुस्तके वाचा

चाचण्या आणि लसीकरण

बरेच डॉक्टर या टप्प्यावर नियमित तपासणी च्या वेळा ठरवत नाहीत, परंतु तुम्हाला काही चिंता असल्यास तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.

. चाचण्या

तुमच्या बाळाच्या विकासाचा मागोवा घेण्यासाठी तुमच्या बाळाचे बालरोगतज्ञ बाळाची उंची आणि वजन तपासतील. बाळाच्या रक्तातील हिमोग्लोबिन, लोह आणि शिसे यांची पातळी तपासण्यासाठी डॉक्टर बाळाच्या रक्ताची तपासणी करू शकतात.

. लसीकरण

तुमच्या बाळाला हिपॅटायटीस बी लसीचा डोस ४१ आठवडे किंवा थोड्या काळानंतर घ्यावा लागेल. बाळाला ह्याच कालावधीच्या आसपास पोलिओ (IPV) लसीचा तिसरा डोस घेणे देखील आवश्यक असेल. बालरोगतज्ञ बाळाला इन्फ्लूएंझा लस देण्याचा सल्ला देखील देऊ शकतात.

खेळ आणि उपक्रम

तुम्ही तुमच्या ४१ आठवड्यांच्या बाळासोबत खालील खेळ खेळू शकता:

. फर्स्ट स्टेप गेम

तुम्ही दुसऱ्या एका व्यक्तीसमोर बसा आणि तुमच्या बाळाला तुमच्या दोघांच्या मधून चालण्यासाठीप्रोत्साहित करा. जर बाळाने आतापर्यंत चालण्यास सुरुवात केलेली नसेल, तर बाळाला रांगू द्या किंवा कशाला तरी धरून चालायला लावा. ह्यामुळे तुमच्या बाळाला तिचे मुख्य स्नायू विकसित करण्यास आणि चालण्याच्या हालचालीचा सराव करण्यास प्रोत्साहन मिळेल.

. पीकबू

तुमचे बाळ आता तुमच्यासोबत पिकाबू खेळू लागेल आणि बाळ ह्या खेळाला सक्रिय प्रतिसाद देईल.

. नृत्य आणि गाणे

संगीत लावा, तुमच्या बाळाला उभे करा आणि बाळासोबत काही हालचाली करा. ह्या टप्प्यावर लहान मुलांना गाण्याच्या तालावर डोलायला आवडते.

. लपा आणि शोधा

तुम्ही तुमच्या बाळासोबत लपाछपी देखील खेळू शकता. परंतु, तुम्ही बाळाला एका मिनिटापेक्षा जास्त काळ एकटे सोडू नका.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

खालील गोष्टींसाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता:

  • या टप्प्यावर तुमच्या बाळाला स्लीप एपनियाचा अनुभव येऊ शकतो. हा एक असा विकार ज्यामध्ये झोपेत श्वास घेणे थांबवू शकते. हे श्वास घेणे तात्पुरते किंवा वारंवार थांबू शकते. एलर्जी, टाळूला फाटणे, आजारपण, एडेनोइड्स, वाढलेले टॉन्सिल्स किंवा मज्जासंस्था पूर्णपणे विकसित झालेली नसणे ह्या कारणांमुळे असे होऊ शकते. स्लीप एपनिया असलेल्या बाळाला झोपेच्या वेळी खोकला येऊ शकतो, श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो आणि भरपूर घाम येऊ शकतो. अशी बाळे रात्री अनेक वेळा उठू शकतात. तुम्हाला ही चिन्हे दिसल्यास, तुमच्या बाळाच्या बालरोगतज्ञांचा सल्ला घ्या.
  • जर दात येणे हे बाळाचे रात्री न झोपण्याचे कारण नसेल आणि बाळाला शौचास पातळ होत असेल, ताप येत असेल किंवा अंगावर पुरळ येऊन उलट्या होत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तुमच्या ४१ आठवड्यांच्या बाळाच्या विकासाचा मागोवा ठेवा. तुमचे बाळ आता शब्द तयार करून लक्षात ठेऊ लागेल. ह्या टप्प्यावर बाळाच्या झोपेत व्यत्यय येईल. बाळाची बडबड करण्याची प्रवृत्ती वाढली असल्याचे तुमच्या लक्षात येईल. आपल्या बाळाशी सारखे बोलत राहिल्याने त्याची भाषा कौशल्ये विकसित होण्यास मदत होते. जेव्हा तुमचे लहान बाळ तुम्ही जे काही करता त्याची नक्कल करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा तुम्हाला ते खूप गोड वाटेल, म्हणून बाळासोबत ह्या टप्प्याचा आनंद घ्या.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article