Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण आहार आणि पोषण गरोदरपणात किवी हे फळ खाणे

गरोदरपणात किवी हे फळ खाणे

गरोदरपणात किवी हे फळ खाणे

गरोदरपणात खाण्याची तीव्र इच्छा निर्माण होते. हे नैसर्गिक आहे, कारण आईला स्वतःसाठी तसेच बाळासाठी पौष्टिक अन्न खाणे आवश्यक असते. गर्भाच्या विकासासाठी काही पदार्थ चांगले असतात. होणाऱ्या आईला वेगवेगळे पदार्थ खावेसे वाटू शकतात. विशेषतः साखरेचीही लालसा असणाऱ्या गर्भवती स्त्रियांना नेहमी चॉकलेट किंवा इतर गोड पदार्थांपेक्षा फळे खाण्यास सांगितले जाते.

गर्भवती महिला किवी खाऊ शकतात का? जर तुम्हाला हिरव्यागार आणि रसाळ किवीचा मोह होत असेल, तर तुम्ही ह्या स्वादिष्ट फळाचा आनंद घेऊ शकता का हे जाणून हा लेख घेण्यासाठी वाचा.

गरोदरपणात किवी खाणे सुरक्षित आहे का?

किवी किंवा चायनीज गुसबेरी हे एक मांसल, हिरवे फळ आहे आणि ते गरोदर स्त्रियांसाठी भरपूरपौष्टिक घटकांनी भरलेले आहे, तसेच ते चविष्ट देखील आहे!

किवीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. तसेच त्यामध्ये साखर आणि चरबी कमी असते. गरोदरपणात खाण्यासाठी किवी हे एक आदर्श फळ आहे. तसेच, त्यात कोलेस्ट्रॉल नसते. जर तुम्हाला गॅस्ट्र्रिटिस किंवा अनुवांशिक ऍलर्जीची शक्यता असेल तर तुम्हाला ते टाळण्याची गरज असते. दररोज २३ किवी फळे खाणे पूर्णपणे सुरक्षित आहे.

किवी फळातील पौष्टिक घटक

हे सुपरफ्रूट महत्त्वपूर्ण पोषक घटकांनी भरलेले आहे: व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, पोटॅशियम, फोलेट, आहारातील फायबर, तांबे, कोलीन, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस हे सर्व घटक किवीमध्ये असतात. हे सर्व घटक व्हिटॅमिन सी च्या दैनिक शिफारस केलेल्या डोसच्या १४०% पेक्षा जास्त व्हिटॅमिन सी पुरवते

किवी फळातील पौष्टिक घटक

१ मध्यम आकाराच्या किवी फळामध्ये पोषक घटक असतात

  कॅलरीज    42
  प्रथिने    0.8 ग्रॅम
  एकूण चरबी    0.4 ग्रॅम
  फायबर    2.1 ग्रॅम
  व्हिटॅमिन ए    3 मायक्रोग्रॅम
  लोह    0.2 मिलीग्रॅम
  पोटॅशियम    252 मिलीग्रॅम
  फोलेट    17 मायक्रोग्रॅम
  व्हिटॅमिन सी    64 मिलीग्रॅम

गर्भवती महिलांसाठी किवी फळ खाण्याचे आरोग्य विषयक फायदे

किवीचे काही आरोग्यविषयक फायदे खाली सूचीबद्ध केलेले आहेत:

1. फोलेट:

फॉलिक ऍसिडची गर्भाच्या संज्ञानात्मक विकासामध्ये अविभाज्य भूमिका असते. फॉलिक ऍसिड मेंदू तसेच मज्जासंस्थेचा विकास करण्यास मदत करते आणि न जन्मलेल्या बाळामध्ये आढळणारे तांत्रिक दोष टाळते. पेशींची निर्मिती आणि देखभालीसाठी फोलेट हा एक महत्त्वपूर्ण पौष्टिक घटक आहे. हा घटक बाळाच्या महत्वाच्या अवयवांच्या विकासासाठी देखील जबाबदार आहे. फोलेट स्पायना बिफिडा सारख्या बाळांमध्ये जन्मजात आढळणारे अपंगत्व प्रतिबंधित करते. ही एक वैद्यकीय स्थिती आहे. ह्यामध्ये पाठीचा कणा पूर्णपणे विकसित होत नाही. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात किवी खाल्ल्याने गर्भपात होण्याची शक्यता कमी होते.

2. व्हिटॅमिन सी:

मेंदूच्या कार्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या न्यूरोट्रांसमीटरच्या निर्मितीसाठी व्हिटॅमिन सी महत्वाचे आहे. अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेले अन्न मुक्त रॅडिकल्सच्या हानिकारक प्रभावापासून आईचे रक्षण करते. ऊर्जा पातळी वाढवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन सी उत्कृष्ट आहे.

3. नैसर्गिक शर्करा:

सर्व फळांप्रमाणेच किवीमध्येही नैसर्गिक साखर असते. त्यामुळे तुमची गोड खाण्याची इच्छा नियंत्रित होते. ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे इन्सुलिनच्या पातळीत मोठी वाढ होत नाही. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी हे आवश्यक आहे कारण गरोदरपणात गर्भावस्थेतील मधुमेह होणे सामान्य आहे.

4. पचन सुधारते:

गरोदरपणात बद्धकोष्ठता होणे सामान्य असते. अतिसार, गोळा येणे, मळमळ, पोटात अस्वस्थता वाटणे, ओटीपोटात दुखणे आणि जठराची सूज टाळण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात प्रोबायोटिक्सचा समावेश करावा लागेल. किवीमध्ये आहारातील फायबर भरपूर प्रमाणात असते. हे फायबर आतडे निरोगी ठेवते. फायबर समृध्द अन्न हे नैसर्गिक रेचक आहेत आणि त्यामुळे पचनास मदत होते.

5. लोह:

रक्तातील हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे गर्भवती स्त्रियांना लोहाची कमतरता, तसेच ऍनिमियाचा त्रास होतो. कमी लोहाची इतर लक्षणे म्हणजे त्वचा पांढरी पडणे, भूक नीट न लागणे आणि मळमळ होणे इत्यादी होत. लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी लोह आवश्यक आहे. हे लोह पेशींमध्ये ऑक्सिजन देखील वाहून नेते तसेच ते ऊर्जा उत्पादनासाठी आवश्यक आहे. किवी प्रत्येक सर्व्हिंगमध्ये 4% लोह प्रदान करते. किवी लोहाचे शोषण देखील सुलभ करते, अशा प्रकारे लोह हे अशक्तपणा प्रतिबंधित करते.

6. कॅल्शियम:

बाळाची हाडे, स्नायू, दात आणि हृदयाच्या विकासासाठी कॅल्शियम आवश्यक असतात . किवी फळामध्ये 5.5% कॅल्शियम असते, जर तुमचा दुग्धजन्य पदार्थाचा वापर कमी असेल किंवा तुम्ही लैक्टोज असहिष्णु असाल, तर तुमच्या आहारात कॅल्शियम युक्त किवीचा समावेश करणे योग्य ठरेल. त्यात मॅग्नेशियम देखील असते, आणि ते कॅल्शियमचे शोषण सुधारते.

7. जीवनसत्त्वे आणि खनिजांचा समृद्ध स्रोत:

व्हिटॅमिन सी समृद्ध असण्याव्यतिरिक्त, किवीमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ई असते आणि ते तुमचे आणि तुमच्या बाळाच्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते. तसेच किवीमुळे त्वचा निरोगी राहण्यास प्रोत्साहन मिळते.

8. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते:

किवीमध्ये असलेले तांबे मुलाच्या मेंदूच्या विकासास मदत करते आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करते.

9. संप्रेरक संतुलन:

गरोदरपणात संप्रेरकांमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो कारण तुम्हाला नैराश्य, थकवा किंवा तणाव जाणवू शकतो. किवी खाल्ल्याने संप्रेरकांचे संतुलन राखण्यास मदत होते त्यामुळे मनःस्थिती मध्ये होणारा बदल टाळता येतो.

10. कमी कॅलरीज:

किवी हा कमी कॅलरीजचा, नैसर्गिकरीत्या गोड पर्याय आहे आणि त्यामुळे कॅलरीज न वाढता लालसा आणि भूक भागवली जाते.

किवी फळ कसे खावे?

किवी फळ कसे खावे?

किवीचे अनेक प्रकारे सेवन केले जाऊ शकते, जसे की:

  • फळ कापून घ्या, साल काढा आणि फळाचा आनंद घ्या
  • इतर फळांसह तुमच्या सॅलडमध्ये त्याचा समावेश करा
  • किवी स्मूदी किंवा योगर्टमध्ये घाला
  • स्लाइस किंवा लगदा गोठवा आणि त्याचे पोपसिकल्स करा

गरोदरपणात किवी फळ खाण्याशी संबंधित धोके

किवीची ऍलर्जी सहसा होत नाही. परंतु एखाद्याला किवीची ऍलर्जी होऊ शकते किंवा खूप जास्त प्रमाणात किवी खाल्ल्याने त्याचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात. तुमच्या नियमित आहार योजनेत किवीचा समावेश करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले असते. गर्भवती महिलांसाठी किवी फळाचे दुष्परिणाम खालीलप्रमाणे आहेत:

  • तोंडाला ऍलर्जी: किवीचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने तोंडाला खाज सुटणे किंवा मुंग्या येणे अशा संवेदना होऊ शकतात. त्यामुळे ओठ आणि जिभेला सूज येऊ शकते. काही वेळेला, यामुळे दमा, पुरळ आणि अंगावर पित्ताच्या गाठी होऊ शकतात.
  • त्वचेचे आजार: किवी जास्त खाल्ल्याने तीव्र युरटीकॅरीया , क्रॉनिक युरटीकॅरीया, डरम्याटीटीस किंवा अगदी कॉन्टॅकट डरम्याटीटीस होऊ शकतो. तुम्हाला ऍलर्जी असल्यास धोका जास्त असतो.
  • पचनाच्या समस्या: काही प्रकरणांमध्ये, किवी जास्त खाल्ल्याने अतिसार, उलट्या किंवा मळमळ होऊ शकते.
  • लेटेक्स ऍलर्जी: लेटेक्सची ऍलर्जी असलेल्या लोकांना किवी ऍलर्जी होण्याची शक्यता असते. अशा वेळी किवीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो.
  • स्वादुपिंडाचे नुकसान: किवी व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, सेरोटोनिन आणि पोटॅशियमचा समृद्ध स्रोत आहे. मोठ्या प्रमाणात घेतल्यास, किवी रक्तातील ट्रायग्लिसराइडचे स्तर बदलू शकते आणि दीर्घकाळापर्यंत स्वादुपिंडासाठी हानिकारक असू शकते.
  • साइड इफेक्ट्स: किवी फळामध्ये बुरशीविरोधी गुणधर्म असतात आणि ते बुरशीविरोधी औषधांसोबत घेतल्यास अतिरिक्त परिणाम होऊ शकतात. जर तुम्ही अँटीकोआगुलंट्स, हेपरिन, ऍस्पिरिन, नॉनस्टेरॉइडल, अँटीइंफ्लेमेटरी किंवा अँटीप्लेटलेट औषधे घेत असाल, तर किवी हे फळ खाण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

गरोदरपणात तुम्ही किवीचे किती सेवन करावे?

गर्भवती स्त्रीला दिवसातून १ कप चिरलेली फळे किंवा मोठ्या फळांचा एक तुकडा द्यावा. निरोगी आणि सुरक्षित गर्भारपणासाठी, तुम्ही दररोज सुमारे 2-3 किवी फळे खाऊ शकता. जर तुम्हाला गॅस्ट्र्रिटिस, ऍलर्जी किंवा पचनाशी संबंधित कोणत्याही समस्या असतील तर, तुमच्या आहारात किवीचा समावेश करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुम्हाला आम्लपित्त किंवा रॅशेस आणि ऍलर्जी होण्याची शक्यता असल्यास, किवीमुळे आम्लयुक्त प्रतिक्रिया होऊ शकते आणि तोंडात किंवा जिभेत वेदना होऊ शकतात.

गरोदरपणात आपल्या आहारावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे कारण ह्या काळात आपले शरीर असुरक्षित होते. किवी शरीराला काही पोषक तत्व प्रदान करण्यात मदत करू शकतात त्यामुळे गर्भाची वाढ होण्यास मदत होईल. परंतु, किवी माफक प्रमाणात खाल्ली पाहिजे कारण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो.

आणखी वाचा:

गरोदरपणात केळी खाणे
गरोदरपणात पेरू खाणे सुरक्षित आहे का?

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article