Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण आहार आणि पोषण गरोदरपणात सफरचंद खाणे

गरोदरपणात सफरचंद खाणे

गरोदरपणात सफरचंद खाणे

जेव्हा एखादी स्त्री गरोदर असते तेव्हा बाळाचा निरोगी विकास होण्यासाठी तिने पौष्टिक अन्नपदार्थ खाणे आवश्यक आहे. तुम्ही गरोदर असताना भरपूर फळे आणि भाज्यांचा समावेश असलेला संतुलित आहार घेतल्यास, तुम्ही आणि तुमचे बाळ निरोगी राहाल. ह्या लेखात आपण एका विशिष्ट फळाबद्दल बोलूयात आणि ते म्हणजे सफरचंद!. सफरचंद चवीला स्वादिष्ट आणि आरोग्यदायी असते हे तुम्हाला चांगलेच माहीत आहे. पण ते गर्भवती स्त्रीसाठी देखील सफरचंद खाणे चांगले आहे का? सफरचंदाचा गरोदर स्त्रीला काही फायदा होतो का? हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा

गरोदरपणात सफरचंद खाणे सुरक्षित आहे का?

गरोदरपणात सफरचंद खाणे सुरक्षित आहे का?

गरोदरपणात सफरचंद खाण्याचे कोणतेही दुष्परिणाम माहित नसल्यामुळे गर्भवती स्त्री सफरचंद खाऊ शकते. सफरचंद हे पौष्टिकतेचा एक उत्तम स्रोत आहे. आई होणारी स्त्री आणि तिच्या पोटात वाढणारे बाळ दोघांसाठीही सफरचंद अत्यंत फायदेशीर आहे.

जर तुम्हाला सफरचंदाचा समावेश तुमच्या आहारात करायचा असेल तर तुम्ही तसे करू शकता. फक्त लक्षात ठेवा की सफरचंद खाण्यापूर्वी, ते चांगले धुवून घ्या. त्यावर कीटकनाशके मारले असण्याची शक्यता असते. शक्य असल्यास सेंद्रिय सफरचंद खा कारण ते कीटकनाशक आणि मेण मुक्त असतात.

सफरचंदाच्या बिया खाणे टाळा कारण बियांमध्ये सायनाइड असते. सायनाईड विषारी असते. बिया खाल्ल्यावर बियांचे पचत होत असताना सायनाइड हळूहळू पोटात सोडले जाते. त्यामुळे सायनाइडच्या विषबाधाची लक्षणे दिसायला थोडा वेळ लागू शकतो. म्हणूनच, गर्भवती स्त्रियांनी सफरचंद खाताना बिया पोटात जात नाहीत ना ह्याची खात्री केली पाहिजे.

सफरचंदांचे पौष्टिक मूल्य

सफरचंदांचे पौष्टिक मूल्य

सफरचंदामध्ये प्रामुख्याने पाणी आणि कर्बोदके असतात. तसेच त्यामध्ये ग्लुकोज आणि फ्रक्टोज सारख्या साध्या शर्करांचं प्रमाणही जास्त असतं. सफरचंद आहारातील तंतूंचे समृद्ध स्रोत देखील आहेत आणि त्यामध्ये थायामिन, रिबोफ्लेव्हिन, नियासिन, पायरीडॉक्सिन आणि पॅन्टोथेनिक ऍसिड आणि फोलेट यांसारख्या बीकॉम्प्लेक्स जीवनसत्त्वांचा दैनिक आरडीए (शिफारस केलेला आहार भत्ता) % आणि ३% च्या दरम्यान असतो.

सफरचंदांमध्ये व्हिटॅमिन सी (% आरडीए) आणि व्हिटॅमिन ए, ई आणि के कमी प्रमाणात असते. तसेच सफरचंदामध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस यासारखी आवश्यक खनिजे देखील कमी प्रमाणात आहेत. सफरचंद हे बीटाकॅरोटीन, क्रिप्टोक्सॅन्थिन, फ्लेव्होनॉइड्स आणि अँथोसायनिन यांसारख्या फायटोन्यूट्रिएंट्सचा उत्तम स्रोत आहेत.

सफरचंदांमध्ये पोटॅशियम हे मुख्य खनिज आहे, आणि ते हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी ओळखले जाते. सफरचंदांमध्ये पेक्टिन नावाचे फायबर देखील भरपूर प्रमाणात असते. साखरेची पातळी कमी करण्यास आणि पचन सुधारण्यास पेक्टिन मदत करते.

गरोदरपणात सफरचंद खाण्याचे फायदे

गरोदरपणात सफरचंद खाण्याचे आई आणि वाढणारे बाळ दोघांसाठीही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. सफरचंदातील व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्सचे नुकसान कमी करतात. सफरचंदातील बीकॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे लाल रक्तपेशी निरोगी ठेवण्यास मदत करतात. गरोदरपणात सफरचंद खाणे बाळासाठी देखील फायदेशीर ठरू शकते कारण त्यामुळे ऍलर्जी आणि दम्याचा धोका कमी होतो. गरोदरपणात सफरचंद खाण्याचे आरोग्य विषयक फायदे जाणून घेण्यासाठी वाचा.

1. ऍनिमिया प्रतिबंधित करते

सफरचंद लोहाचा एक चांगला स्रोत आहे त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे उत्पादन वाढते आणि अॅनिमियापासून बचाव होतो. गर्भवती महिलांना लोहाच्या कमतरतेमुळे ऍनिमिया होण्याचा धोका जास्त असतो. त्याची शक्यता टाळण्यासाठी, लोहयुक्त पदार्थ खाण्याची शिफारस केली जाते. ह्या समस्येचा सामना करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात सफरचंदाचा समावेश करू शकता.

2. पचनास मदत करते

गरोदरपणात हार्मोनल बदलांमुळे पचन प्रक्रिया मंद होऊ शकते आणि बद्धकोष्ठता होऊ शकते. पण सफरचंद खाल्ल्याने फायदा होऊ शकतो. सफरचंदांमध्ये आहारातील फायबर असते त्यामुळे मल मऊ होते परंतु जर तुम्ही जास्त सफरचंद खाल्ले तर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. आपण गरोदरपणात दररोज १२ सफरचंद घेऊ शकता.

3. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते

सफरचंद हे व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहे, आणि ते रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात मदत करू शकते. त्यामुळे सफरचंद खा आणि संसर्ग होण्याची शक्यता कमी करा.

4. ऊर्जा प्रदान करते

सफरचंदांमध्ये ग्लूकोज, सुक्रोज आणि फ्रक्टोज सारख्या साध्या शर्करा असतात त्यामुळे आपल्याला त्वरित ऊर्जा मिळते. म्हणून, जर तुम्हाला भूक लागली असेल किंवा रक्तातील साखर कमी असण्याची समस्या असेल तर तुम्ही बाहेर जाताना तुमच्या पर्समध्ये सफरचंद घेऊन जाणे ही चांगली कल्पना आहे.

5. हृदय निरोगी ठेवू शकते

दररोज सफरचंद खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉलची पातळी, प्लेक्स आणि धमनीच्या भित्तिकांमधील जळजळ कमी होण्यास मदत होते. होय, सफरचंद खाल्ल्याने तुमचे हृदय निरोगी राहू शकते. सफरचंद खाल्ल्याने छातीत जळजळीपासून आराम मिळतो.

6. श्वासोच्छवासाच्या समस्यांना प्रतिबंध करते

गरोदरपणात सफरचंद खाल्ल्याने तुमच्या बाळाला दमा होण्याचा धोका कमी होतो. सफरचंदात अँटिऑक्सिडेंट असतात आणि ते आईच्या फुफ्फुसांना मजबूत करतात. मजबूत फुफ्फुसे श्वास आणि श्वासोच्छवासाच्या समस्या दूर ठेवण्यास मदत करतात.

7. हाडांच्या विकासास सफरचंद मदत करते

सफरचंदांमध्ये कॅल्शियम असते आणि ते बाळाच्या मजबूत हाडांच्या विकासासाठी आवश्यक असते. कॅल्शियम गरोदरपणात तुमची हाडे मजबूत करण्यास देखील मदत करू शकते. सफरचंद शरीरातील कॅल्शियम कमी होण्यास मदत करते. अँटिऑक्सिडंट्स आणि दाहक संयुगे समृद्ध असल्याने, ते हाडांची घनता आणि ताकद वाढवण्यास मदत करतात.

8. स्मरणशक्ती वाढवते

सफरचंदाच्या त्वचेमध्ये क्वेर्सेटिन हे अँटिऑक्सिडंट असते आणि ते स्मरणशक्ती आणि संज्ञानात्मक कार्य सुधारते. त्यामुळे मेंदूच्या पेशींचे नुकसान टाळते आणि अल्झायमर रोग आणि स्मृतिभ्रंशाचा धोका कमी होतो. सफरचंदाचा रस रोज प्यायल्याने मेंदूतील एसिटाइलकोलीन नावाचे न्यूरोट्रांसमीटर उत्तेजित होऊन स्मरणशक्ती सुधारते. आहारातील कमतरता किंवा अनुवांशिक अपुरेपणामुळे होणार्‍या ऑक्सिडेशनच्या नुकसानीपासून त्यामुळे मेंदूचे रक्षण होते.

गरोदरपणात तुम्ही हिरवी सफरचंद खाऊ शकता का?

गरोदरपणात तुम्ही हिरवी सफरचंद खाऊ शकता का?

हिरव्या सफरचंदाचे आरोग्यविषयक फायदे लाल सफरचंदांसारखेच आहेत. तुम्ही गरोदरपणात हिरवे सफरचंद खाऊ शकता कारण तेही खूप पौष्टिक असतात. लाल सफरचंदाच्या तुलनेत हिरव्या सफरचंदात कमी साखर आणि जास्त तंतुमय पदार्थ असतात. ह्या सफरचंदाचे साल जाड आणि कुरकुरीत असते. कार्बोहायड्रेट आणि साखरेच्या सेवनाबद्दल काळजी करणाऱ्या स्त्रियांसाठी गरोदरपणात हिरवे सफरचंद खाणे चांगले असते. लाल सफरचंदात अँथोसायनिन सारखे अधिक अँटीऑक्सिडंट असतात आणि ते शरीरातून मुक्त रॅडिकल्स बाहेर काढून टाकतात आणि त्यामध्ये दाहकविरोधी गुणधर्म असतात परंतु हिरव्या सफरचंदांमध्ये अँटीऑक्सिडंट देखील भरपूर असतात. हिरवे सफरचंद रक्तदाब नियंत्रित देखील करू शकतात. त्यामुळे तुम्ही लाल तसेच हिरवे सफरचंद खाऊ शकता, तेही आरोग्यासाठी तितकेच चांगले आहेत!

काही दुष्परिणाम आहेत का?

जरी सफरचंद तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी गरोदरपणात खूप चांगले असले तरी तुम्ही त्यांचे कमी प्रमाणात सेवन केले पाहिजे कारण सफरचंदांच्या जास्त सेवनाने बद्धकोष्ठता, आम्लपित्त इत्यादीसारख्या काही समस्या उद्भवू शकतात.

गरोदरपणात किंवा अन्यथा सफरचंद खाणे चांगले आहे. गरोदरपणात, तुम्ही दररोज १२ सफरचंद खाऊ शकता सफरचंदाचे मध्यम प्रमाणात सेवन केल्याने तुम्हाला किंवा तुमच्या बाळाला इजा होणार नाही. तसेच, गरोदरपणात संतुलित आहार घ्या त्यामुळे तुम्ही आणि तुमचे बाळ सुरक्षित आणि निरोगी रहाल!

आणखी वाचा:

गरोदरपणात अंजीर खाणे
गरोदरपणात अननस खाणे सुरक्षित आहे का?

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article