Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भधारणा होताना गर्भधारणेसाठी प्रयत्न करताना साखर गर्भधारणा चाचणी – नक्की कसे कार्य करते?

साखर गर्भधारणा चाचणी – नक्की कसे कार्य करते?

साखर गर्भधारणा चाचणी – नक्की कसे कार्य करते?

तुम्ही गरोदर आहात की नाही हे जाणून घेण्यासाठी अनेक घरगुती युक्त्या आणि तंत्रे आहेत. कुणी त्यासाठी शाम्पूचा वापर करते तर कुणी साखर वापरून पाहते. ह्या चाचण्या कमीत कमी तयारीसह घरच्या घरी केल्या जाऊ शकतात. अशा चाचण्या गर्भधारणेची प्राथमिक कल्पना देऊ शकतात, परंतु ह्या चाचण्या वैद्यकीय चाचणी इतक्या अचूक नसतात. असे म्हटल्यावर, साखरेचा वापर करून गर्भधारणेची चाचणी केली जाऊ शकते का आणि कशी हे जाणून घेण्यास तुम्ही उत्सुक असाल. आपल्या डॉक्टरांशी बोलण्यापूर्वी एकदा हा लेख वाचून पहा.

साखर गर्भधारणा चाचणी म्हणजे काय?

साखर वापरून गर्भधारणेची चाचणी ही साखर आणि तुमच्या लघवीच्या मदतीने केली जाते. इतर अनेक चाचण्यांप्रमाणे, ही चाचणी एचसीजी हार्मोन (मानवी कोरिओनिक गोनाडोट्रोपिन) च्या उपस्थितीवर अवलंबून असते. हे संप्रेरक प्लॅसेंटाद्वारे तयार होते. आणि हे संप्रेरक आढळल्यास तुम्ही गरोदर असल्याचे ते चिन्ह असते.

ही चाचणी घेण्यासाठी तुम्हाला काय आवश्यक आहे आणि ही चाचणी कशी करायची ते पाहू या.

साखरेची घरगुती गर्भधारणा चाचणी करण्यासाठी आपल्याला काय आवश्यक आहे?

आधी सांगितल्याप्रमाणे, चाचणी करण्यासाठी तुम्हाला फक्त तीन गोष्टींची आवश्यकता असेल:

  • कुठलीही अशुद्धता नसलेली पांढरी शुभ्र साखर.
  • दोन निर्जंतुकीकरण केलेल्या आणि कोरड्या वाट्या ज्या वापरल्यानंतर टाकून दिल्या जाऊ शकतात.
  • दिवसाच्या पहिल्या लघवीचा नमुना.

ही चाचणी कशी करावी?

पहाटेच्या पहिल्या लघवीसोबत ही चाचणी उत्तम प्रकारे कार्य करते कारण त्यात एचसीजी हार्मोनचे प्रमाण जास्त असण्याची शक्यता जास्त असते.

तुम्ही चाचणी कशी करू शकता ते येथे दिले आहे:

  1. निर्जंतुक केलेल्या भांड्यात एक चमचा साखर घ्या.
  2. दुसरी वाटी घ्या आणि त्यात तुमच्या लघवीचा नमुना घ्या.
  3. आपल्या लघवीचा नमुना एक चमचा साखर असलेल्या भांड्यात घाला.
  4. 4ते 5 मिनिटे राहू द्या.

तर, आम्ही चाचणीतून कोणत्या निकालाची अपेक्षा करत आहोत? अधिक जाणून घेण्यासाठी वाचा.

साखर गर्भधारणा चाचणी कशी कार्य करते?

साखरेचा सर्वात महत्वाचा गुणधर्म म्हणजे त्याची विद्राव्यता. आणि ह्याच तत्वावर ही गर्भधारणा चाचणी देखील काम करते. जेव्हा एखादी स्त्री गरोदर असते तेव्हा तिच्या लघवीमध्ये मानवी कोरिओनिक गोनाडोट्रोपिन हार्मोन किंवा एचसीजीची मात्रा चांगली असते. जेव्हा गर्भवती स्त्रीची पहिली लघवी साखरेच्या कणांच्या संपर्कात येते तेव्हा एचसीजी संप्रेरक साखरेवर प्रतिक्रिया देते, .त्यामुळे ते मूत्रातील द्रवपदार्थात मिसळण्यापासून प्रतिबंधित होते. त्यामुळे, साखर विरघळणार नाही आणि गुठळ्या तयार होतील. चाचणीसाठी ताजी साखर वापरणे अत्यंत आवश्यक आहे आणि जुनी साखर वापरू नये.

चाचणीच्या निकालांचा अर्थ कसा लावायचा?

शुगर प्रेग्नेंसी टेस्टचे परिणाम साखरेच्या लघवीसोबत होणाऱ्या प्रतिक्रियेवर आणि प्रतिक्रियेनंतर वाडग्यात साखर दिसते की नाही यावर अवलंबून असतात. चाचणी एकतर सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकते

1. सकारात्मक साखर गर्भधारणा चाचणी

भांड्यातील साखरेमध्ये लघवी टाकल्यावर, जर गुठळ्यांच्या स्वरूपात साखर तळाशी राहिली,  तर तुम्ही गरोदर असण्याची दाट शक्यता आहे. या परिस्थितीला सकारात्मक साखर गर्भधारणा चाचणी असे म्हटले जाते. अनेकदा लघवीच्या संपर्कात आल्यानंतर पाच मिनिटांत गुठळ्या तयार होतात.

2. नकारात्मक साखर गर्भधारणा चाचणी

तुमच्या लघवीच्या संपर्कात आल्यास, साखर काही वेळातच विरघळली, तर तुमच्या लघवीमध्ये एचसीजी हे संप्रेरक नसते असे सूचित होते. त्यामुळे, तुम्ही गरोदर नसल्याचे हे लक्षण आहे आणि अशा परिस्थितीला नकारात्मक साखर गर्भधारणा चाचणी असे म्हटले जाते.

आता तुम्हाला शुगर प्रेग्नेंसी टेस्ट कशी करायची हे माहित आहे, पण तुमच्याकडे टेस्टशी संबंधित आणखी काही प्रश्न असतील. तर उर्वरित लेखात, आम्ही त्यापैकी बहुतेक प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

साखर गर्भधारणा चाचणी करण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती आहे?

घरगुती गर्भधारणा चाचणी तसेच स्टोअर मधून खरेदी केलेल्या गर्भधारणा चाचण्या ह्या तुमच्या लघवीतील एचसीजी  ह्या संप्रेरकाची उपस्थिती शोधतात. एचसीजीची उपस्थिती हे स्त्री गर्भवती असल्याची पुष्टी करणारे सर्वात पहिले आणि महत्त्वाचे लक्षण आहे.

साखर गर्भधारणा चाचणी करण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती आहे

दिवसभर, मूत्र दूषित होऊ शकते किंवा इतर अनेक घटकांसह पातळ होऊ शकते आणि त्यामुळे त्यामध्ये असलेल्या एचसीजीचे प्रमाण बिघडते आणि सहजपणे शोधले जाऊ शकत नाही. म्हणून, दिवसाच्या पहिल्या लघवीच्या ताज्या नमुन्यासह, चाचणी करण्याची सर्वोत्तम वेळ सकाळची आहे. यामध्ये एचसीजी हार्मोन्स असण्याची सर्वाधिक शक्यता असते. यामुळे साखरेची गुठळी होईल आणि स्पष्ट परिणाम मिळण्याची शक्यता वाढेल

साखर गर्भधारणा चाचणी किती अचूक आहे?

कोणत्याही घरगुती गर्भधारणा चाचण्यांप्रमाणे, साखर गर्भधारणेच्या चाचण्यांसाठी सामान्यीकृत अचूकता पातळी सांगणारे कोणतेही बेंचमार्क किंवा नियमपुस्तक नाही. बहुतेक चाचण्या पर्यावरणीय घटक, वापरलेले घटक, स्वच्छतेची पातळी, अशुद्धता, चाचण्यांची वेळ इत्यादींवर अवलंबून असतात.

वाटी पूर्णपणे स्वच्छ आणि निर्जंतुक नसण्याची शक्यता असते. त्यामध्ये अशुद्धता असते. त्यामुळे चाचणीवर तीव्र परिणाम होऊ शकतो. जर दिवसाची पहिली लघवी ताजी नसेल, तर परिणाम मोठ्या प्रमाणात बदलू शकतो. त्यामुळे साखर सहज विरघळते आणि तुम्हाला गर्भधारणा चाचणीचे खोटे नकारात्मक परिणाम मिळतात.

चाचणीसाठी वापरली जाणारी साखर ताजी असणे आवश्यक आहे आणि ती हवाबंद कंटेनरमध्ये व्यवस्थित साठवली गेली पाहिजे. कोणतीही योग्य प्रकारे न साठवली गेलेली साखर किंवा बरीच जुनी साखर  अतिसंवेदनशील आणि हायग्रोस्कोपिक असू शकते. त्यामुळे लघवीशी रिऍक्शन होण्यापूर्वीच गुठळ्या तयार होऊ शकतात. आणि तुम्ही गरोदर आहात असे तुम्हाला वाटू शकते.  हा खोट्या सकारात्मक गर्भधारणा चाचणीचा परिणाम आहे.

त्यामुळे, तुम्हाला ह्याच किंवा वेगळ्या निकालाची अपेक्षा आहे की नाही याची पर्वा न करता, काही दिवसांनी व्यावसायिक किट वापरून घरगुती गर्भधारणा चाचणीची पुष्टी करणे चांगले असते.

तुमच्या गर्भधारणेशी संबंधित तुमच्या मनातील प्रश्न सोडवण्यासाठी घरगुती गर्भधारणा चाचण्या हा एक झटपट आणि स्वस्त मार्ग आहे. बहुतेक चाचण्या चांगल्या असतात कारण त्यामध्ये कोणत्याही विषारी पदार्थाचा वापर केला जात नाही. परंतु, ह्या चाचण्यांना कोणतीही वैद्यकीय मान्यता नाही कारण ह्या चाचण्या अनेक घटकांवर अवलंबून असतात. म्हणूनच,ह्या चाचण्यांसोबत वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध केलेल्या गर्भधारणा चाचणी किट सुद्धा वापरून पहा.

साखर गर्भधारणा चाचणी किती अचूक आहे

अजून एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे तुमचे शरीर तुम्हाला जास्त माहिती असते आणि तुम्ही गर्भवती आहात की नाही हे तुम्हाला समजते. बहुतेकदा जेव्हा तुमची मासिक पाळी चुकते तेव्हा गर्भधारणेच्या चाचण्या घेतल्या जातात. परंतु, तणाव आणि तुमच्या आयुष्यातील इतर कारणांमुळे तुमच्या मासिक पाळीला उशीर होण्याची शक्यता असू शकते. परंतु, जर तुम्ही जाणीवपूर्वक गरोदर राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असाल आणि प्रत्येक दोन दिवसांनी परिणाम तपासत राहायचे असतील, तर तुम्ही ह्या  घरगुती गर्भधारणा चाचणीची निवड करू शकता किंवा त्याऐवजी परवडणाऱ्या एचसीजी स्ट्रिप्स घेऊन पहा. ह्या स्ट्रिप्स नेहमीच्या गर्भधारणेच्या किटच्या तुलनेत खूपच स्वस्त आहेत आणि त्यांचा अचूकता दर देखील चांगला आहे.

आणखी वाचा:

घरगुती गरोदर चाचण्या
गरोदर चाचणी केव्हा आणि कशी करावी?

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article