आहार आणि पोषण

गरोदरपणात पिझ्झा खाणे हानिकारक आहे का?

पिझ्झा हे एक लोकप्रिय स्नॅक आहे. पिझ्झा खाण्याचा आनंद सर्व वयोगटातील लोक घेतात – परंतु, गरोदरपणात पिझ्झा खाणे सुरक्षित आहे का?. गरोदरपणाच्या महत्त्वाच्या काळात गर्भवती स्त्रियांना वेगवेगळ्या अन्नपदार्थांची लालसा निर्माण होते, त्यामुळे हा प्रश्न अर्थपूर्ण ठरतो. स्वादिष्ट, गरम, झणझणीत पिझ्झा नेहमीच मोहक असू शकतो, परंतु त्याचा तुमच्या आरोग्यावर होणारा परिणाम समजून घेणे महत्त्वाचे आहे कारण आता फक्त तुमचेच नाही तर - तुमच्या बाळाचे आरोग्यही महत्त्वाचे आहे.

गर्भवती स्त्रिया पिझ्झा खाऊ शकतात का?

पिझ्झा आवडणाऱ्या गर्भवती स्त्रीला खऱ्या अर्थाने त्रास देऊ शकणारा प्रश्न म्हणजे - "गरोदरपणात पिझ्झा खाणे सुरक्षित आहे का?".  पिझ्झा जंक फूडच्या श्रेणीत येतो. गर्भवती स्त्रियांना जंक फूड टाळण्यास सांगितले जाते कारण पिझ्झ्यामध्ये खूप जास्त कॅलरीज आणि रिफाइंड गव्हाचे पीठ वापरले जाते. गर्भवती स्त्री आणि गर्भाच्या शरीरावर होणारे हानिकारक परिणाम अश्या वेळी लक्षात घेतले जातात. परंतु, जर पिझ्झा घरी बनवलेला असेल किंवा दर्जेदार मानक घटक आणि सेवा असलेल्या चांगल्या ब्रँडचा असेल तर असा पिझ्झा कधीतरी खाणे सामान्य आहे. जर तुम्ही गरोदरपणात पिझ्झा खात असाल तर, भाज्या आणि चीज यांच्यात योग्य समन्वय साधण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्ही दोन्हीपैकी एकाचे जास्त सेवन करणार नाही. असे केल्याने तुम्हाला आवश्यक पोषक तत्वे मिळण्यासाठी मदत होईल. तसेच, गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत पिझ्झा खाणे चांगले आहे कारण त्यानंतरच्या काळात आपल्याला पौष्टिक आणि अधिक समृद्ध आहार घेणे अधिक आवश्यक असेल.

गरोदरपणात पिझ्झा खाण्याचे काही फायदे आहेत का?

गरोदरपणात पिझ्झाच्या फायद्यांबद्दल बोलत असताना, आम्ही विचारात घेतलेल्या काही गोष्टींची यादी केली आहे

गरोदर असताना पिझ्झा खाण्याचे हानिकारक परिणाम काय आहेत?

पिझ्झाच्या फायद्यांपेक्षा त्याचे हानिकारक प्रभाव जास्त आहेत. पिझ्झा खाण्याचे काही हानिकारक परिणाम येथे दिलेले आहेत: 2017 मध्ये उंदीरांवर केलेल्या अभ्यासात, शास्त्रज्ञांना असे आढळून आले की गरोदरपणात जंक फूड खाणाऱ्या उंदरांनी खूप जास्त वजनाच्या उंदरांना जन्म दिला आणि दूध सोडल्यानंतर अश्या उंदरांना थेट चरबीयुक्त पदार्थ खाण्याची इच्छा झालेली होती. त्यांना संतुलित आहार दिल्यानंतर लगेचच त्यांची चरबीयुक्त अन्नाची लालसा कमी होण्यास मदत झाली, परंतु उंदरांच्या मेंदूची क्रिया प्रौढत्वात चरबीयुक्त अन्न मिळविण्यासाठी तशीच राहिली. तुम्ही जे खाता त्याचा तुमच्या बाळावर परिणाम होतो त्यामुळे तुम्ही जितके चांगले खाऊ शकता तितके खाणे शहाणपणाचे आहे.

गरोदर असताना पिझ्झा सुरक्षितपणे कसा खावा?

गरोदर असताना पिझ्झा सुरक्षितपणे खाणे हे तुमच्या आरोग्यासाठी आणि तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.
पिझ्झा हा एक मोहक खाद्यपदार्थ आहे हे आपल्या लक्षात आले आहे. परंतु गरोदरपणात पिझ्झा खाणे काही प्रमाणात टाळले पाहिजे. परंतु, जर तुम्ही पिझ्झा प्रेमी असाल आणि तुमची लालसा नियंत्रित करू शकत नसाल, तर अधूनमधून गरम गरम पिझ्झा खाणे ठीक आहे. वर नमूद केलेल्या टिप्स लक्षात घेऊन तुम्ही पिझ्झा खाण्याचा आनंद घेऊ शकता!

संसाधने आणि संदर्भ:  The Bump

आणखी वाचा: गरोदरपणात आईस्क्रीम खाणे सुरक्षित आहे का? गरोदरपणात सुकामेवा खाणे – फायदे आणि जोखीम
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved