कधीकधी गरोदरपणात तुम्हाला पोटात खड्डा पडल्यासारखे वाटू शकते. गर्भारपण म्हणजे सतत भूक लागणे, पोट भरल्यासारखे न वाटणे आणि सर्वात विचित्र पदार्थ खाण्याची इच्छा होणे होय ! पण घाबरू नका, कारण गरोदरपणात भूक वाढणे पूर्णपणे सामान्य आहे. गरोदरपणात भूक का आणि कशी वाढते आणि तुम्ही त्याचा सामना कसा करू शकता ते पाहूया.
गरोदरपणात भूक कधी वाढते?
गरोदरपणात सहसा दुसऱ्या तिमाहीत भूक वाढते, परंतु काही स्त्रियांना पहिल्या तिमाहीत सुरुवातीला ह्याचा अनुभव येतो. परंतु सामान्यतः दुसऱ्या तिमाही मध्ये भूक वाढते, कारण तेव्हा तुमचा मॉर्निंग सिकनेसचा त्रास संपतो आणि भूक लागायला सुरू होते. त्यामुळे पहिल्या तिमाहीमध्ये कमी झालेले वजन पुन्हा वाढते.
गरोदरपणाच्या काळात भूक वाढणे सामान्य आहे का?
तुमच्या शरीरातील प्रोजेस्टेरॉनची पातळी गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत वाढते. त्यामुळे तुमचा मॉर्निंग सिकनेसचा त्रास वाढेल. म्हणून भूक वाढेल. सहसा, उलट्या झाल्यानंतर, पोट रिकामे झाल्यामुळे तुम्हाला अचानक भूक लागते. तसेच, गरोदरपणात तुम्हाला भूक लागण्याची शक्यता असते कारण तुमच्या शरीराला उलट्या करताना तुम्ही गमावलेल्या कॅलरीजची गरज असते आणि तुमच्या पोटात वाढणाऱ्या बाळासाठी पोषण आवश्यक असते. गरोदरपणात, स्त्रियांमध्ये रक्ताचे प्रमाण जास्त असते. त्यांना स्वतःसाठी कॅलरीजची गरज असते. त्यामुळे तीव्र भूक लागते आणि अन्नाची तीव्र इच्छा होते. सहसा 7 व्या आणि 12 व्या आठवड्यांच्या दरम्यान असे घडू शकते. ह्या दरम्यान तुम्हाला पूर्वी आवडलेले पदार्थ आवडेनासे होऊ शकतात आणि इतर अन्नाची लालसा वाढू शकते. गरोदरपणात अनेक स्त्रियांना रात्री उशिरापर्यंत भूक लागते. ही स्थिती दुसऱ्या तिमाहीच्या शेवटी स्थिरावते आणि असे होणे अगदी सामान्य असते.
गरोदरपणात तुम्हाला सतत भूक का लागते?
- गरोदरपणाच्या दुस-या तिमाहीत भूक वाढण्याचे पहिले कारण म्हणजे तेव्हा गर्भाची वाढ होत असते. आणि गर्भाला योग्यरित्या वाढण्यासाठी तसेच विकसित होण्यासाठी पोषण आवश्यक असते.
- याव्यतिरिक्त, तुमच्या शरीरातील उच्च रक्त पातळी आणि गरोदरपणात होणार्या इतर प्रक्रिया योग्य रित्या होण्यासाठी तुमच्या शरीराला अतिरिक्त कॅलरीज हव्या असतात.
- गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीत आणि दुस-या तिमाहीच्या शेवटी भूक लागणे हे दुधाच्या उत्पादनामुळे देखील असू शकते, कारण तुमचे शरीर गर्भधारणेसाठी तयार होत असते.
अतिभूक लागण्यामागील तथ्य
तुम्ही दोन जीवांसाठी खात असलात तरीही तुम्ही सारखेच काहीतरी खाल्ले पाहिजे असे नाही. तुमचे पोट भरेपर्यंत तुम्ही जेवायला हवे. तुमच्या गरोदरपणात तुम्ही कमी जेवण आणि स्नॅक्स घेऊ शकता. परंतु, अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर, आपल्या लालसेला बळी पडू नका आणि जास्त खाऊ नका. जास्त तळलेले चिकन, समोसे किंवा केक तुमच्या बाळासाठी किंवा तुमच्यासाठी आरोग्यदायी नाही!
गरोदरपणात वाढलेल्या भुकेसाठी तुम्ही काय करू शकता?
खाली दिलेल्या टिप्सचा वापर करून तुम्ही तुमची भूक कमी करू शकता:
- तुमच्या कॅलरीज मोजून पहा: पहिल्या तिमाहीत, बहुतेक स्त्रियांना जास्तीच्या कॅलरीजची आवश्यकता नसते. दुसऱ्या तिमाहीत, तुम्हाला तुमच्या सामान्य आहारापेक्षा 350पेक्षा जास्त कॅलरीजची आवश्यकता असेल, ही गरज तुमच्या तिसऱ्या तिमाहीत 500 पर्यंत वाढते. हे लक्षात घेऊन अतिरेक टाळा.
- डिहायड्रेशन टाळा:काहीवेळा, तुमचे शरीर जास्त काम करते. गरोदरपणात शरीराला द्रवपदार्थांची जास्त गरज असते. त्यामुळे डिहायड्रेशन झाल्यास तुम्हाला भूक लागली आहे असे वाटू शकते. तुम्हाला तुमच्या शरीरातील द्रवपदार्थांची कमतरता पुन्हा भरून काढावी लागेल. त्यामुळे जर तुम्ही गरम वातावरणात राहत असाल आणि खूप घाम येत असेल तर दिवसातून १२ ते १३ कप पाणी प्या - साखरयुक्त पेय टाळा. फळांचा ताजा रस आणि पाणी प्या.
- पौष्टिक आहार घ्या:तुमचा गरोदरपणाचा आहार फक्त पोट भरण्यासाठी नसून पौष्टिक आहे ह्याकडे लक्ष द्या. प्रक्रिया केलेले किंवा परिष्कृत पदार्थ खाऊ नका. त्याऐवजी ताजे पदार्थ घ्या. ऊर्जेसाठी, निरोगी चरबी आणि प्रथिनांसह संपूर्ण धान्य किंवा फळे इत्यादींचा आहारात समावेश करा. तुम्ही जेवण करण्याचा प्रयत्न करू शकता त्यासाठी जास्त वेळ चावून खाण्याची गरज आहे कारण त्यामुळे तुम्हाला पोट भरण्यास मदत होईल. पोषक आणि तंतुमय पदार्थ असलेले सॅलेड तुम्हाला स्पॅगेटीपेक्षा जास्त पोटभरीचे वाटू शकेल.
- स्नॅक्स घेऊन जा:जर तुम्ही बाहेर असाल आणि तुम्हाला अचानक भूक लागली असेल तर, नट किंवा ट्रेल मिक्सचे पॅकेट सोबत ठेवा. असे केल्याने तुम्ही आरोग्यास चांगले नसलेले जंक फूड खाण्यापासून दूर रहाल.
- वारंवार थोडे थोडे खा:एकाच वेळी बसून मोठ्या प्रमाणात खाण्याऐवजी तीन तासांत तुम्ही थोडे थोडे खा. तुम्हाला आधीच पोट फुगणे, गॅस होणे आणि छातीत जळजळ इत्यादींचा त्रास होतो आहे. एकाच वेळी खाल्ल्यास तुम्हाला आहे त्यापेक्षा अधिक त्रास होईल.
- प्रलोभन टाळा:तुम्ही आठवड्यातून एकदा तुमचे आवडते पदार्थ खाऊ शकता, परंतु जंक फूड खरेदी करू नका किंवा तुमच्या स्वयंपाकघरातील कपाटांमध्ये जंक फूड आणून ठेवणे टाळा. डोळ्यासमोर नसले की ते खाल्ले जाणार नाहीत.
- तुमच्या गरोदरपणातील वजनावर लक्ष ठेवा:तुमच्या गरोदरपणात तुमचे वजन खूप वाढेल, त्यामुळे तुमच्या खाण्याच्या सवयीमुळे ते आणखी वाढणार नाही ह्याकडे लक्ष ठेवा. जंक फूड खाल्ल्याने वजन वाढू शकते. तसेच तुम्हाला मधुमेह किंवा हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे तुमच्या गर्भधारणेवर परिणाम होऊ शकतो. म्हणून, तुमचे वजन खूप वेगाने वाढत असल्याचे तुमच्या लक्षात आल्यास, मूळ कारण जाणून घेण्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
तुमच्या गरोदरपणाच्या तिसर्या तिमाहीत तुमची भूक हळूहळू कमी होईल, पण तोपर्यंत, वर दिलेल्या टिप्सचे अनुसरण करा. उच्च-गुणवत्तेचे अन्न खाण्याचे लक्षात ठेवा कारण गरोदरपणात तुमचा आहार वाढलेला असतो.