आहार आणि पोषण

गरोदरपणात चहा पिणे

एक कप आले घालून केलेला गरम चहा प्यायल्यावर आपल्याला एकदम तरतरीत वाटते. परंतु गरोदरपणात कुठले पेय प्यावे असा तुम्हाला प्रश्न पडेल. कॉफीमध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असल्याने बहुतांश स्त्रिया जाणीवपूर्वक कॉफीपासून दूर राहतात. परंतु मॉर्निंग सिकनेस पासून सुटका करून, मूड फ्रेश करणाऱ्या चहाच्या बाबतीत सर्व नियम बाजूला ठेवले जातात. विशेषतः हर्बल चहापासून अनेक आरोग्यविषयक फायदे मिळतात. चहा प्यायल्याने गरोदरपणातील शारीरिक अस्वस्थता आणि मानसिक ताण कमी होऊ शकतो.

गरोदरपणात चहा पिणे सुरक्षित आहे का?

होय, गरोदरपणात विशिष्ट प्रकारचा चहा पिणे सुरक्षित आणि फायदेशीर मानले जाते. चहामध्ये पॉलीफेनॉल असतात आणि त्यामुळे तुमच्या हृदयाचे रक्षण होते. अँटिऑक्सिडंट असलेल्या चहामुळे  तुमची प्रतिकारशक्ती वाढते आणि विशिष्ट प्रकारचे कर्करोग होण्याचा धोका कमी होतो. परंतु, गर्भवती स्त्रियांनी हलका व्यायाम केला पाहिजे आणि काही प्रकारच्या चहापासून दूर राहावे. गरोदरपणातील चिंता आणि तणावाचा सामना करणा-या स्त्रियांसाठी हर्बल टी हा एक उत्तम पर्याय आहे. औषधी वनस्पतींनीयुक्त चहाचे पाणी शरीराला हायड्रेट करण्याचा उत्तम मार्ग आहे. बहुतेक वेळा गरोदरपणात चहा पिणे सुरक्षित असले तरीसुद्धा चहा पिणे टाळले जाते. गरोदरपणात काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा अशी शिफारस केली जाते.

चहाच्या कपमध्ये कॅफिनचे प्रमाण किती असते?

गरोदरपणात कॅफिन खूप उत्तेजक असू शकते आणि बहुतेक स्त्रिया या काळात कॅफिनयुक्त पेये घेणे टाळतात. गरोदरपणात दररोज 200 मिलिग्रॅमपेक्षा कमी कॅफीन घेणे तुमच्यासाठी सुरक्षित आहे. तुमच्या चहाच्या कपातील कॅफिनची टक्केवारी ही चहा करण्याची पद्धती, पाण्याचे तापमान, उकळण्याचा कालावधी यानुसार बदलू  शकते. सर्वसाधारणपणे, दुधाचा चहा, हिरवा चहा आणि काळ्या चहासारख्या गैर-हर्बल चहाच्या कपमध्ये सुमारे 40-50 मिलिग्रॅम कॅफिन असते. दुसरीकडे, हर्बल टीमध्ये सुमारे 0.4 मिलिग्रॅम कॅफिन असते, त्यामुळे गरोदरपणात पिण्यासाठी हर्बल टी एक सुरक्षित पर्याय  आहे.

गरोदरपणात पिण्यासाठी सुरक्षित चहा

हर्बल टी  ला टिसॅन्स देखील म्हणतात.  हा चहा साल, पाने, बेरी, मुळे, फुले आणि विविध वनस्पतींच्या बिया टाकून तयारकेला जातो. असा चहा प्यायल्यास त्याचे अनेक औषधी फायदे आहेत. असा चहा अनेक संयोजनांमध्ये उपलब्ध आहे. गरोदरपणात सुरक्षित असलेले काही चहाचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत. उकळत्या पाण्यात मध, दालचिनी, लवंगा, लिंबूवर्गीय फळांचे रस यांसारखे वेगवेगळे घटक घालून तुम्ही हर्बल टीचे स्वतःचे मिश्रण देखील बनवू शकता. तुम्ही डिकॅफिनेटेड ग्रीन किंवा ब्लॅक टी देखील घेऊ शकता.

गरोदरपणात सुरक्षित चहा पिण्याचे फायदे

गरोदरपणासाठी सुरक्षित असलेला चहा प्यायल्याने अनेक फायदे मिळतात. प्रत्येक औषधी वनस्पतीमध्ये वेगवेगळे औषधी गुणधर्म असतात आणि तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि मूडनुसार सर्वोत्तम चहा निवडू शकता. गरोदरपणात सुरक्षित चहा पिणे हे अति-कॅफिनयुक्त पेये बनवण्याचा योग्य पर्याय आहे कारण त्यामुळे:

गरोदरपणात पिण्यासाठी सुरक्षित चहा कसा निवडावा?

हर्बल टी नैसर्गिकरित्या कॅफीन-मुक्त असतात. आणि त्यामुळे औषधी चहा गर्भवती महिलांसाठी फायदेशीर आणि सुरक्षित असतात. परंतु, सर्व औषधी वनस्पती गरोदरपणात सुरक्षित नसतात. तुम्हाला घटकांची यादी तपासावी लागेल आणि तुमच्यासाठी सुरक्षित समजल्या जाणार्‍या चहाच्या यादीसाठी तुमच्या हेल्थकेअर प्रॅक्टिशनरचा सल्ला घ्यावा लागेल. तुमची चहाची निवड करण्यापूर्वी लेबल काळजीपूर्वक वाचा. गरोदरपणात कोणत्याही गोष्टीचे सेवन करताना संयम महत्त्वाचा असतो.  हे तत्व चहाच्या बाबतीत पण लागू होते. तुम्ही थोड्या प्रमाणात सुरुवात करू शकता आणि जास्त चहा घेण्यापूर्वी तुमचे शरीर कसे प्रतिक्रिया देते ते पहा. जर तुम्हाला चहातील घटक आणि त्यांचे फायदे याबद्दल खात्री नसेल तर चहा घेऊ नका अपरिचित घटक टाळा कारण त्यांचा तुमच्या शरीरावर किंवा बाळावर कसा परिणाम होईल याची तुम्हाला खात्री नसते.

किती चहा प्यायला पाहिजे?

गरोदरपणात संयम राखणे चांगले. दिवसातून 200 मिग्रॅ पेक्षा कमी कॅफीन सेवन करणे सुरक्षित असते. तुम्ही तुमच्या शरीराला कोणतेही नुकसान न करता तीन ते चार कप नॉन-हर्बल टी घेऊ शकता. लक्षात घ्या की कॅफीनचे अति प्रमाणात सेवन केल्यास गर्भपात होण्याचा धोका वाढू शकतो.

कुठल्या प्रकारचे चहा पिणे टाळावे?

उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला असतो. विशिष्ट प्रकारच्या चहाच्या सुरक्षिततेबद्दल शंका असल्यास, आपण नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गरोदरपणात टाळावे लागणारे काही हर्बल टी खालीलप्रमाणे आहेत.

गरोदरपणात सुरक्षित नसलेला चहा पिण्याचे संभाव्य दुष्परिणाम

गरोदरपणात पिण्यासाठी सुरक्षित नसलेला चहा प्यायल्याने अनेक प्रकारची गुंतागुंत निर्माण होऊ शकते. तसेच त्यामुळे गर्भपात किंवा अकाली कळा सुरु होऊन प्रसूती सुद्धा होऊ शकते.

तुम्ही चहा घरी डिकॅफिन करू शकता का?

चहाप्रेमीं साठी घरी बनवलेल्या चहाला डिकॅफिनेट करण्यासाठीचे एक सामान्य तंत्र आहे. चहाला डिकॅफीन करण्यासाठी, तुम्हाला फक्त एक चहाची पिशवी गरम पाण्यात सुमारे 20 ते 40 सेकंद भिजवावी लागेल, पाणी फेकून द्यावे लागेल.  कप गरम पाण्याने पुन्हा भरून तीच कृती करावी लागेल. असा दावा केला जातो की या तंत्राने चहामध्ये कॅफिनचे प्रमाण मोठ्या प्रमाणात (50% ते 80%) कमी होते. दुर्दैवाने, हे खरे नाही. चहाला डिकॅफिन बनवण्याची प्रक्रिया खूपच अवघड आहे, ह्यामध्ये कार्बन डायऑक्साइड, इथाइल एसीटेट किंवा मिथिलीन क्लोराईड सारखी रसायने असतात आणि व्यावसायिक चहा उत्पादक पॅकेज केलेला डिकॅफिनेटेड चहा तयार करतात. म्हणून, चहाची पिशवी 30 सेकंदांसाठी पाण्यात ठेवल्याने फारसा उपयोग होत नाही. त्याऐवजी, तुम्ही पूर्णपणे कॅफीन-मुक्त चहा घेऊ शकता. हा चहा निरोगी आहे आणि त्याचे तुम्हाला भरपूर फायदे आहेत. असे म्हटले जाते की गरोदरपणात योग्य चहा पिणे चांगले असते. जर तुम्ही गरोदरपणात पिण्यासाठी सुरक्षित चहा कमी प्रमाणात प्यायला तर तुमची चिंता आणि तणाव कमी होण्यास मदत होईल. गरोदरपणात तुम्ही कोणता चहा पिऊ शकता आणि तसेच तुमच्यासाठी चहाचे सुरक्षित प्रमाण समजून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणखी वाचा: गरोदरपणात आल्याचा चहा घेणे गरोदर असताना नारळपाणी पिणे
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved