सफरचंद खाल्ल्याने शरीर निरोगी राहते. कारण त्यामध्ये शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करणारे घटक असतात. सफरचंदामध्ये आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी विविध अँटिऑक्सिडंट्स देखील असतात. सफरचंदाची रचना महत्वाची आहे, कारण ते विविध प्रकारच्या तंतूंनी तयार झालेले असते. सफरचंदामध्ये विरघळणारे तसेच न विरघळणारे असे दोन्ही प्रकारचे घटक असतात. हे दोन्ही घटक एकाच वेळी आतड्याची हालचाल उत्तेजित करण्यासाठी आणि आतडे निरोगी ठेवण्यासाठी काम करत असतात. शिवाय, सफरचंद हे लहान मुलांसाठी एक प्रकारचे उत्तम अन्न आहे. सफरचंदाचे चविष्ट असे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करता येऊ शकतात.
लहान मुलांसाठी सफरचंदाच्या 10 सोप्या पाककृती
तुमच्या बाळासाठी येथे सफरचंदाच्या काही चविष्ट पाककृती दिलेल्या आहेत:
1. चविष्ट सफरचंद सॉस (5महिने आणि त्यावरील वयाच्या बाळांसाठी)
लहान मुलांसाठी सफरचंदाच्या विविध पाककृतींपैकी, ही एक सर्वात सोपी आणि पटकन करता येईल अशी पाककृती आहे. तुमच्या बाळाला सफरचंदांची ओळख करून देण्यासाठी ही रेसिपी छान आहे.
साहित्य
- सोललेली सफरचंदे
- साखर न घातलेला सफरचंदाचा रस
- पाणी
- दालचिनी पावडर
- जायफळ पावडर
- व्हॅनिला इसेन्स
कृती
- सफरचंद चिरून घ्या. सफरचंदाचे तुकडे एका भांड्यामध्ये ठेवा. त्यामध्ये थोडे पाणी आणि सफरचंदाचा रस घाला.
- हे भांडे गॅस वर ठेऊन उकळी येऊ द्या. गॅस कमी करा, झाकण ठेवा आणि सफरचंदाचे तुकडे मऊ होईपर्यंत सुमारे 8-10मिनिटे शिजू द्या. खूप जास्त मऊ होईपर्यंत उकळू नका.
- सफरचंद मऊ झाले की भांडे बाजूला घ्या. सफरचंदाचे तुकडे बाजूला काढून तुमच्या बाळाला योग्य अशा सुसंगततेसाठी ब्लेंडर मध्ये फिरवून घ्या.
- चवीसाठी, त्यावर दालचिनी आणि जायफळ पावडर शिंपडा. त्यामध्ये थोडा व्हॅनिला इसेन्स घाला.
- आपल्या लहान बाळाला हा सॉस थोडा कोमट असताना भरवा. जर तुम्हाला थंड सर्व्ह करायचे असेल तर तुम्ही सर्व्ह करत असतानाच फ्लेवर्स घाला आणि दुसरा भाग फ्रीझ करून ठेवा.
2. रताळे घालून सफरचंदाचे सूप (६ महिने आणि त्याहून अधिकवयाच्या बाळांसाठी)
रताळे आणि सफरचंद दोन्ही एकत्र करून एक स्वादिष्ट सूप तयार करा.
साहित्य
- पीठ
- लोणी
- चिकन ब्रॉथ
- सफरचंद
- शिजवलेले रताळे
- बारीक केलेले आले
- दालचिनी पूड
- आईचे दूध किंवा फॉर्मुला
कृती
- एक भांडे घेऊन त्यात थोडे लोणी घाला. लोणी वितळेपर्यंत गरम करा. पॅनमध्ये वितळलेल्या लोण्यामध्ये पीठ घाला आणि हे सर्व एकत्र ढवळून घ्या. सोनेरी रंग येईपर्यंत नीट शिजवत रहा.
- आता भांड्यामध्ये,चिकन ब्रॉथ हळूहळू ओतण्यास सुरुवात करा. असे करताना ढवळत रहा. सफरचंदाचे तुकडे, रताळ्याचे तुकडे, आले आणि दालचिनी हे सर्व एकत्र करून घ्या.
- संपूर्ण मिश्रण नीट ढवळून घ्या आणि उकळी येण्यासाठी गॅस वाढवा. उकळी आली की, गॅस कमी करा आणि आणखी 5मिनिटे उकळू द्या.
- पूर्णपणे उकळी आल्यानंतर, ते मिश्रण ब्लेंडरमध्ये ओता आणि ब्लेंडरला प्युरीची सुसंगतता येईपर्यंत काही मिनिटे फिरवत रहा. ही प्युरी ब्लेंडरमधून परत भांड्यामध्ये घाला.
- या प्युरीमध्ये थोडे दूध घाला. गरम होऊ द्या. हे गरम सूप तुमच्या मुलाला सर्व्ह करा.
3. ऍपल आणि द्राक्ष स्क्वॅश (6महिने आणि त्यावरीलबाळांसाठी)
तुमच्या लहान बाळाने विविध प्रकारच्या चवींचा आस्वाद घेण्यासाठी ही रेसिपी करा.
साहित्य
- द्राक्ष स्क्वॅश
- एक सोलून चिरलेले गोड सफरचंद
- वितळलेले लोणी
- मध
- दालचिनी
- जायफळ
- बारीक केलेल्या लवंगा
कृती
- सुमारे 180डिग्री पर्यंत गरम करून ओव्हन तयार ठेवा.
- द्राक्षांचे लहान तुकडे करून बाजूला ठेवा.
- बेकिंग ट्रेला ग्रीस करा आणि त्यात द्राक्षे ठेवा.द्राक्षाची सालाची बाजू वरच्या बाजूला ठेवा.
- ट्रे झाकून ओव्हनमध्ये ठेवा. सुमारे 20मिनिटे ठेवा.
- ते चालू असताना, एक भांडे घ्या आणि त्यात सफरचंदाचे तुकडे घाला. थोडे वितळलेले लोणी, मध, दालचिनी, जायफळ आणि आले घाला. हे मिश्रण चांगले एकत्र करून घ्या.
- ओव्हनमधून ट्रे बाहेर काढा आणि द्राक्षेटाका. त्यावर सफरचंदाचे मिश्रण घाला, ट्रे झाकून ठेवा आणि पुन्हा ओव्हनमध्ये आणखी 20 मिनिटे ठेवा.
- जर तुमचे बाळ एक वर्षापेक्षा कमी वयाचे असेल तर मधाच्या ऐवजी साखर किंवा इतर गोड पदार्थ वापरा.
4. सफरचंद आणि चिकन (७ महिने आणि त्याहून अधिकवयाच्या बाळांसाठी)
बाळ घनपदार्थ खाऊ लागल्यानंतर त्याला उत्साही वाटेल आणि तो अधिक प्रमाणात खाऊ लागेल.
साहित्य
- साल काढून तुकडे केलेले चिकन ब्रेस्ट
- चिरलेले सफरचंद
- रताळे
- दालचिनी पूड
- चिकन स्टॉक
- वांगं
कृती
- रताळे सोलून घ्या. त्याचे लहान तुकडे करा.
- एक भांडे घेऊन त्यामध्ये चिकन स्टॉक घाला. ते गरम करून उकळू द्या.
- उकळी आली की त्यात चिकन ब्रेस्ट टाका आणि गॅस कमी करा. हे मिश्रण सुमारे 10मिनिटे शिजू द्या.
- त्यामध्ये सफरचंद आणि रताळ्याचे तुकडे घाला. हे मिश्रण एकत्र नीट ढवळून घ्या आणि आणखी 10मिनिटे शिजू द्या.
- हे झाले की भांड्यामध्ये चिरलेल्या वांग्याचे तुकडे घाला आणि आणखी काही मिनिटे गॅसवर उकळू द्या. बटाटे मऊ झाले की गॅस बंद करा.
- ब्लेंडर मध्ये घालून हे मिश्रण एकसारखे करून घ्या. त्यात दालचिनी घालून छान सर्व्ह करा.
5. सफरचंद शेक (10महिने आणि त्यावरील)
लहान मुलांसाठी सफरचंदाच्या रसाच्या लोकप्रिय पाककृतींपैकी ही एक आहे.
साहित्य
- सफरचंद
- पाणी
- मनुका
- बदाम
- दालचिनी
- दूध
कृतो
- सफरचंद घ्या आणि स्टीमर किंवा प्रेशर कुकरमध्ये ठेवा. संपूर्ण सफरचंद सुमारे 10मिनिटे वाफवून घ्या, जेणेकरून ते व्यवस्थित शिजेल.
- थंड झाल्यावर सफरचंद बाहेर काढून सोलून घ्या. आत असलेल्या बिया काढून टाका.
- एकाभांड्यामध्ये, सफरचंदाचे तुकडे आणि दूध घाला. हे मिश्रण चांगले एकत्र करा. बदाम सोलून घ्या आणि भांड्यामध्ये घाला. मनुके मॅश करून घ्या आणि त्यात चिमूटभर दालचिनी पावडर घाला. पावडर तुमच्या बाळाला आवडत नसेल तर टाळा.
- संपूर्ण मिश्रण ब्लेंडरमध्ये घाला आणि ते गुळगुळीत करण्यासाठी अनेक वेळा ब्लेंडर मध्ये फिरवून घ्या. मिश्रण करताना बदाम पूर्णपणे बारीक झाले असल्याची खात्री करा.
- तुमचे बाळ एक वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे असल्यास, चव वाढवण्यासाठी तुम्ही त्यात मध घालू शकता.
6. बेक्ड ऍपल डिश (6महिने आणि त्यावरील वयाच्या बाळांसाठी)
तुमच्या बाळासाठी फळांचे एक चांगले स्नॅक तयार करा.
साहित्य
कृती
- सफरचंद कापून त्याचा आतील गर काढून घ्या. बाहेरची साल काढू नका.
- बोटावर थोडे लोणी घ्या आणि सफरचंदाच्या आतील भागावर लावा. जर तुमच्या बाळाला दालचिनी पावडर आवडत असेल, तर ती सुद्धा थोडी लावून घ्या.
- एक उथळ ट्रे घ्या त्यात थोडे पाणीघाला. हे तुकडे ट्रेमध्ये ठेवा.
- ट्रे एका ओव्हनमध्ये ठेवा आणि तापमान 200अंशांवर सेट करा. तुकडे मऊ होईपर्यंत सुमारे अर्धा तास बेक होऊ द्या. ट्रेमधील पाण्याचा मागोवा ठेवा.
- गार झाल्यावर ट्रे बाहेर काढा आणि हवी असल्यास साले काढून टाका. हे तुकडे काढून पुन्हा मॅश करा.
7. धान्यांसह सफरचंद सॅलड नाश्ता (10महिने आणि त्यावरील बाळांसाठी)
तुमच्या लहान बाळाला आता चांगला पोट भरणारा नाश्ता करू द्या जेणेकरून त्याला योग्यरित्या घन पदार्थ मिळू शकतील.
साहित्य
- पाणी
- मीठ
- दही
- मनुका
- पीच
- सफरचंद
- गहू
- तपकिरी तांदूळ
कृती
- एक भांडे घ्या आणि त्यात पाणी तसेच मीठ घाला. ते गॅसवर ठेवा आणि उकळी येईपर्यंत गरम करा. भांड्यात तपकिरी तांदूळ आणि गहू घालून अनुसरण करा. नंतर, गॅस कमी करा, भांडे झाकून ठेवा आणि सुमारे 8-10मिनिटे शिजू द्या.
- शिजल्यावर गॅस बंद करा आणि काही मिनिटे थंड होऊ द्या.
- एका प्लॅटफॉर्मवर बेकिंग शीट पसरवा आणि त्यावर हे धान्य पसरवा.
- सफरचंद चिरून घ्या आणि एका भांड्यात घाला. पीच सोलून त्याचे लहान तुकडे करा. तेही भांड्यात घाला.
- सर्व फळे धान्याच्या मिश्रणात काही मनुके घाला, आवश्यक असल्यास मॅश करा.
- या संपूर्ण मिश्रणाचा पाठपुरावा करून त्यात थोडे दही घालून सर्वकाही व्यवस्थित झाकले आहे याची खात्री करा.
- तुम्ही ह्या रेसिपी मध्ये फळे सुद्धा घालू शकता.
8. ऍपल राईस पुडिंग (10महिने आणि त्यावरीलवयाच्या बाळांसाठी )
सफरचंदाची गोड आणि आंबट चव घेऊन तयार होणारा एक गोड पदार्थ
साहित्य
- तपकिरी तांदूळ
- पाणी
- आले
- दालचिनी
- ब्राऊन शुगर
- मनुका
- सफरचंद
कृती
- एक चांगल्या आकाराचे भांडे घ्या आणि त्यामध्ये सर्व फळे, धान्ये, मसाले आणि साहित्य एकत्र करा.
- भांडे गॅसवर मध्यम आचेवर ठेवा आणि सुमारे अर्धा तास तसेच राहू द्या. हा तांदूळ मऊ होण्यासाठी पुरेसा वेळ असावा. हे मिश्रण शिजू लागल्यावर एक छान सुगंध येईल
- या मिश्रणात दूध घाला आणि आणखी 8-10मिनिटे शिजू द्या. मिश्रण पातळ राहू द्या. ते भांड्याला चिकटणार नाही म्हणून सतत ढवळत राहा आणि आवश्यक असल्यास दूध आणि पाणी घाला.
- शिजल्यावर थंड करून बाळाला सर्व्ह करा.
9. सफरचंद केळी कस्टर्ड (८ महिने आणि त्यावरील वयाच्या बाळांसाठी)
दुधाचे दात असलेल्या बाळांसाठी ही पाककृती खूप योग्य आहे
साहित्य
- सफरचंदाचे साल काढून फोडी करून घ्या
- केळी, सोललेली
- दालचिनी पूड
- आईचे दूध किंवा फॉर्मुला
कृती
- सुमारे 180डिग्री पर्यंत ओव्हन गरम करून तयार करा.
- सफरचंद वाफवून घ्या आणि एक गुळगुळीत मिश्रण तयार करण्यासाठी ब्लेंडरमध्ये सर्व साहित्य एकत्र करा.
- हे एका बेकिंग डिशमध्ये घाला आणि सुमारे 15-20मिनिटे ओव्हनमध्ये राहू द्या.
- चाकूने मऊपणा तपासून घ्या आणि जेव्हा योग्य असेल तेव्हा ट्रे बाहेर काढा.
10 . सफरचंद पपई डिश (10महिने आणि त्यावरील)
उत्कृष्ट चव अनुभवण्यासाठी वेगवेगळी फळे एकत्र करा.
साहित्य
- गोड सफरचंद
- सोललेली आणि चिरलेली पपई
कृती
- सफरचंद सोलून चिरल्यानंतर वाफवून घ्या आणि ते मऊ होईपर्यंत ब्लेंड करा.
- ह्यामध्ये पपई घाला आणि एकसंध प्युरी ब्लेंडर मध्ये फिरवून घ्या.
तुमच्या बाळाला सफरचंदाची आवड निर्माण होईल अशा विविध पाककृती ह्या लेखामध्ये दिलेल्या आहेत. बाळासाठी योग्य अशी रेसिपी तुम्ही निवडून तुम्ही त्याच्या आवडीचा खाद्यपदार्थ करू शकता. तुमच्या बाळाला नवीन आणि सुंदर चवीचा आनंद घेऊ द्या.
आणखी वाचा:
बाळांसाठी संत्री: फायदे आणि रेसिपी
बाळांसाठी ब्लूबेरी – फायदे, धोके आणि पाककृती
बाळासाठी अननस – तुमच्या बाळाला तुम्ही अननस देऊ शकता का?