बाल्यावस्थेच्या सुरुवातीच्या कालावधीचा मुलांच्या भविष्यावर खूप मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे आपल्या मुलांची वाढ चांगली होण्यासाठी पालकांनी त्यांची काळजी घेणे आवश्यक असते. मुलांची वाढ त्यांच्या आहारावर अवलंबून असते. म्हणून, लहान मुलांच्या आहाराला पालकांनी खूप महत्व दिले पाहिजे. आणि आपल्या मुलाला केवळ सर्वोत्तम अन्नपदार्थच दिले पाहिजेत.
आपल्या मुलाला काय खायला द्यावे हा प्रश्न पालकांना पडू शकतो. असे बरेचसे स्रोत आहेत जे परस्परविरोधी खाद्यपदार्थ आणि पाककृती सुचवतात. परंतु लहान मुलांसाठी एक आदर्श फळ आहे आणि ते म्हणजे टरबूज. बाळांना टरबूज दिले तर चालू शकते का? - असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. टरबूज कोणत्याही लहान मुलांना दिले तरी चालू शकते कारण टरबूजामध्ये बरेचसे चांगले गुणधर्म असतात. टरबूजाला छान गोड चव असते. तसेच त्यामध्ये पौष्टिक घटकांचे प्रमाण सुद्धा योग्य असते. लहान मुलांना टरबूज देण्याबद्दलची सर्व माहिती ह्या लेखामध्ये दिलेली आहे. अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.
तुमचे बाळ टरबूज कधी खाऊ शकते?
बाळ 6 महिन्यांचे झाल्यावर त्याला टरबूज दिले जाऊ शकते. टरबूजामध्ये जवळजवळ 95% पाणी असते. हे पाणी तुमच्या लहान बाळाला हायड्रेटेड राहण्यास मदत करू शकते. सहा ते आठ महिन्यांच्या लहान बाळाला तुम्ही टरबूज देऊ शकता.
टरबूजाचे पौष्टिक मूल्य
टरबूजाबद्दलचा सर्वात आकर्षक भाग म्हणजे 93% फळ हे पाण्याने बनलेले असते. त्यामुळे हे टरबूज लहान मुलांमध्ये निर्जलीकरण रोखण्यासाठी एक उत्तम पर्याय बनते. टरबूजांचे पौष्टिक मूल्य खालील तक्त्यामध्ये दिले आहे.
पौष्टिक घटक |
मूल्य प्रति 100 ग्रॅम्स |
पाणी |
91.45 ग्रॅम |
प्रथिने |
0.61 ग्रॅम |
कर्बोदके |
7.55 ग्रॅम |
साखर |
6.2 ग्रॅम |
ऊर्जा |
30 kcal |
एकूण लिपिड |
0.15 ग्रॅम |
फायबर |
0.4 ग्रॅम |
थायामिन |
0.033मिग्रॅ |
व्हिटॅमिन बी |
6 0.045 मिग्रॅ |
व्हिटॅमिन ए |
0.17 मिग्रॅ |
व्हिटॅमिन के |
0.1 ug |
व्हिटॅमिन सी |
8.1 मिग्रॅ |
नियासिन |
0.178मिग्रॅ |
फोलेट |
3 ug |
व्हिटॅमिन ई |
0.05मिग्रॅ |
लोह |
0.24 मिग्रॅ |
फॉस्फरस |
112 मिग्रॅ |
झिंक |
0.1मिग्रॅ |
कॅल्शियम |
7 मिग्रॅ |
मॅग्नेशियम |
11 मिग्रॅ |
सोडियम |
1 मिग्रॅ |
बाळासाठी टरबूजाचे आश्चर्यकारक आरोग्य विषयक फायदे
मोठी माणसे आणि लहान मुलांसाठी टरबूजाचे अनेक आरोग्यविषयक फायदे आहेत. यापैकी काही फायदे येथे दिले आहेत.
- टरबूज बाळाला हायड्रेटेड राहण्यास मदत करते: विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुमच्या बाळाच्या शरीरात पुरेसे पाणी असणे महत्वाचे आहे. बाळाला हायड्रेटेड ठेवण्यासाठी टरबूज हे योग्य अन्न आहे कारण त्यामध्ये 93%पाणी असते.
- टरबूज हे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करू शकते: टरबूज हे व्हिटॅमिन सीच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण आहे आणि बाळाच्या वाढीच्या सुरुवातीच्या काळात टरबूज मोठी भूमिका बजावते. टरबूजामध्ये व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असते, त्यामुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि शरीरात लोह शोषण्यास मदत होते.
- दृष्टी सुधारण्यास मदत करू शकते: टरबूज व्हिटॅमिन ए चा एक चांगला स्त्रोत असल्याने, दृष्टी, दात आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. तसेच मऊ ऊतक आणि श्लेष्मल त्वचा विकसित करण्यासटरबूज खाल्ल्याने मदत होऊ शकते. टरबूजामध्ये व्हिटॅमिन ए देखील भरपूर असते.
- हाडे मजबूत करण्यास मदत करते: टरबूजामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण चांगले असते. बाळाच्या हाडांच्या विकासामध्ये आणि लहान बाळांच्या हाडांची ताकद वाढविण्यामध्ये टरबूज मोठी भूमिका बजावते. बाळांमध्ये हार्मोन्सच्या योग्य स्रावासाठी कॅल्शियम देखील महत्त्वाचे आहे.
- लाल रक्तपेशींच्या निर्मितीस मदत करते: व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्समध्ये भरपूर जीवनसत्वे असतात. ह्या सर्व जीवनसत्वांमुळे बाळाच्या शरीरातील विविध प्रणालींची वाढ आणि विकासचांगला होतो. टरबूज खाल्ल्याने लाल रक्तपेशींची निर्मिती, मज्जासंस्थेचा विकास, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होणे आणि मुलामध्ये चयापचय वाढणे इत्यादी चांगले बदल होतात.
- हृदयासाठी चांगले आहे: टरबूज जसजसे पिकते तसतसे फळांमधील लायकोपीनचे प्रमाण देखील वाढते.टरबूज हे एक अँटिऑक्सिडेंट आहे आणि ते हृदयासाठी उत्तम असते तसेच ते बाळांमध्ये हृदय व रक्तवाहिन्यांचे आरोग्य चांगले राखण्यात महत्वाची भूमिका बजावते.
- पचनास मदत करते: फळामध्ये आहारातील फायबर समृद्ध प्रमाणात असते. त्यामुळे बद्धकोष्ठता टाळण्यास मदत होते आणि मुलांचे पचन सुधारते.
बाळाला टरबूज कसे खायला द्यावे?
तुमच्या बाळाला टरबूज खायला देताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत:
- टरबूजाचे लहान तुकडे करा.
- बाळ गुदमरू नये म्हणून सर्व बिया काढून टाका.
- बाळाला सरळ स्थितीत बसवा.
- टरबूज मॅश करून त्याचा लगदा तयार करा आणि बाळाला चमच्याने खायला द्या.
- जर तुमचे बाळ पुरेसे मोठे असेल, तर तुम्ही बाळाला फिंगर फूड म्हणून कापलेले टरबूज देऊ शकता.
बाळांना टरबूज देण्याचे काही धोके आहेत का?
लहान बाळांना टरबूजाची ऍलर्जी होणे दुर्मिळ असते, परंतु काही संवेदनशील बाळांना फळांच्या आम्लीय गुणधर्मामुळे पुरळ उठू शकते. ऍलर्जीच्या लक्षणांमध्ये पुरळ, अतिसार, नाक वाहणे आणि उलट्या इत्यादींचा समावेश होतो. आणखी एक मुख्य धोका म्हणजे गुदमरणे. फळांमधील बियांमुळे बाळ गुदमरण्याची शक्यता असते, परंतु तरीही हा धोका दुर्मिळ असतो.
बाळांसाठी चांगल्या दर्जाचे टरबूज कसे निवडावे?
तुमच्या लहान बाळासाठी टरबूज निवडताना या सूचना लक्षात ठेवा
- टरबूज जास्त जड, गुळगुळीत आणि वरच्या बाजूला थोडेसे निस्तेज असावे.
- जर तुम्ही पिकलेल्या टरबूजला ठोकले तर ते पोकळ वाटले पाहिजे.
- जर फळ कुजलेले किंवा जास्त पिकलेले असेल तर फळाच्या पृष्ठभागावर भेगा किंवा डाग असतील.
- टरबूज पूर्ण पिकलेले असेल तर जमिनीवर जिथे ते टेकलेले असते तो भाग मऊ होतो.
- तुमच्या बाळासाठी टरबूज निवडताना आधी कापलेले किंवा गोठवलेले टरबूज टाळा, कारण ते खराब होण्याचा धोका जास्त असतो.
आपण घरी टरबूज कसे साठवू शकता?
टरबूज घरी साठवण्यासाठी खाली दिलेल्या पद्धतींचा अवलंब करा.
- फळ वाहत्या पाण्याखाली धुवा आणि कापलेले नसल्यास स्वच्छ आणि कोरड्या जागी ठेवा.
- अर्धवट कापल्यास ते रेफ्रिजरेटरमध्ये हवाबंद डब्यात ठेवा किंवा कापलेली बाजू फूड-ग्रेड प्लास्टिकने गुंडाळा.
- टरबूज कापल्यानंतर एका दिवसापेक्षा जास्त काळ रेफ्रिजरेट करू नका.
- तुमच्या बाळाला सर्दी होऊ नये म्हणून रेफ्रिजरेट केलेले टरबूज आधी सामान्य तापमानाला आणा.
लहान मुलांसाठी टरबूजाच्या पाककृती
येथे काही टरबूजाच्या पाककृती आहेत. ह्या पाककृतींचा आनंद तुमच्या बाळाला घेता येईल.
1. टरबूज प्युरी
तयारीसाठी लागणारा वेळ: 10 मिनिटे
लागणारे साहित्य
- 2कप ताज्या टरबूजाचे तुकडे (बिया काढून कापलेले)
- ब्लेंडर
- पर्यायी: एवोकॅडो, केळी किंवा आंबा चवीनुसार
सूचना
- बिया काढून टरबूजाचे लहान तुकडे करा.
- तुकडे ब्लेंडरमध्ये ठेवा आणि गुळगुळीत प्युरी करा.
- प्युरी घट्ट होण्यासाठी तुम्ही बाळांसाठी योग्य असलेले अन्न आणि तृणधान्य त्यामध्ये मिसळू शकता.
- चव वाढवण्यासाठी त्यामध्ये एवोकॅडो, केळी किंवा आंबा घालण्याचा विचार करा.
- टरबूज प्युरी तुमच्या बाळाला पौष्टिक आणि स्वादिष्ट पदार्थ म्हणून सर्व्ह करा.
2. टरबूज ज्यूस
तयारीसाठी लागणारा वेळ : 5 मिनिटे
लागणारे साहित्य
- बिया काढून कापलेले 1कप गोड टरबूज
- ब्लेंडर
- गाळणी
सूचना
- टरबूजाच्या बिया काढून लहान तुकडे करा.
- तुकडे ब्लेंडरमध्ये ठेवून त्याची गुळगुळीत पेस्ट करा.
- रस काढण्यासाठी मिश्रण गाळून घ्या.
- हा ताजा रस तुमच्या बाळाला द्या.
3. फिंगर फूड म्हणून टरबूजबाळाला दिले जाऊ शकते
तयारीसाठी लागणारा वेळ : 5 मिनिटे
लागणारे साहित्य
- टरबूजाच्या बिया काढा आणि त्याचे चौकोनी तुकडे करून घ्या (1कप)
- पातळ काप करण्यासाठी चाकू
- पर्यायी: डिपिंगसाठी फ्रूट प्युरी किंवा दही
सूचना
- बिया काढून टरबूजाचे चौकोनी तुकडे करा.
- बाळासाठी फिंगर फूड करण्यासाठी टरबूजाचे पातळ काप करा.
- फळ प्यूरी किंवा दही सारख्या पौष्टिक डिपसोबत टरबूजाचे तुकडे सर्व्ह करा.
4. टरबूज आणि दही पारफेट
तयारीसाठी लागणारा वेळ : 15 मिनिटे
लागणारे साहित्य
- 1कप टरबूज, बारीक चिरून
- 1कप साधे दही
- गोडपणासाठी मध (पर्यायी)
- ग्रॅनोला
सूचना
- सर्व्हिंग ग्लास किंवा वाडग्याच्या तळाशी कापलेल्या टरबूजचा थर लावा.
- टरबूजच्या वर साध्या दह्याचा थर घाला.
- हवे असेल तर गोडीसाठी वरून मध घाला.
- भांडे भरेपर्यंत असेच थर लावत रहा.
- वरती ग्रॅनोला ठेवा आणि हे टरबूज आणि दही पारफेट सर्व्ह करा.
5. टरबूज आणि ब्लूबेरी स्मूदी
तयारीसाठी लागणारा वेळ: 8 मिनिटे
लागणारे साहित्य
- टरबूजाच्या बिया काढा आणि त्याचे चौकोनी तुकडे करून घ्या (1कप)
- 1/2कप ब्लूबेरी, धुवून घेतलेल्या
- 1/2कप साधे दही
- 1चमचा चिया बियाणे (पर्यायी)
- बर्फाचे तुकडे (पर्यायी)
सूचना
- टरबूजाच्या बिया काढा आणि त्याचे चौकोनी तुकडे करून घ्या (1कप).
- ब्लेंडरमध्ये टरबूज, ब्लूबेरी आणि साधे दही एकत्र करा.
- गुळगुळीत आणि क्रीमी होईपर्यंत ब्लेंड करा.
- हवे असेल तर अधिक पोषणासाठी चिया सीड्स घालून एकत्र करा.
- इच्छा असल्यास, थंड होण्यासाठी बर्फाचे तुकडे घाला.
- टरबूज आणि ब्लूबेरी स्मूदी,बाळासाठी योग्य अश्या कपमध्ये घाला आणि सर्व्ह करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1. टरबूज खाल्ल्यामुळे लहान बाळांना लाल रंगाचे शौचास होऊ शकते का?
होय, शक्य आहे. टरबूजमधील लाइकोपीन नावाचे लाल रंगद्रव्य पूर्णपणे शोषले जात नाही आणि पचनसंस्थेतून तसेच पुढे सरकते. त्यामुळे लाल रंगाचे मल तयार होते. ह्याचा बाळाला त्रास होत नाही तरीही तुमच्या बालरोगतज्ञांचा सल्ला घ्या.
2. माझ्या बाळाने किती टरबूज खावे?
बाळाच्या वयाप्रमाणे त्याला थोडे थोडे टरबूज द्या. एक चमचाभर टरबूजाचा रस किंवा टरबूजाचे छोटे छोटे तुकडे बाळाला द्या. बाळाला टरबूजाची कोणतीही ऍलर्जी होत नाही ना ह्याकडे लक्ष ठेवा. तुमच्या बाळाला जसे सहन होईल तसे हळूहळू प्रमाण वाढवा.
3. टरबूजामुळे लहान बाळांमध्ये पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात का?
सामान्यतः टरबूजाचा लहान बाळांना त्रास होत नाही. परंतु टरबूजामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे बाळाला पचनाचा त्रास होऊ शकतो. बाळाला हळूहळू टरबूज देण्यास सुरुवात करा. त्याला टरबूजाची प्रतिकूल प्रतिक्रिया येते का ते पहा. तुम्हाला चिंता वाटत असल्यास बाळाच्या बालरोगतज्ञांचा सल्ला घ्या.
तर ही सर्व माहिती बाळाला टरबूज द्यावे की नाही ह्याविषयी होती. अनेक आरोग्य संघटनांद्वारे टरबूज हे सर्वात कमी दूषित फळांपैकी एक असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे ते लहान मुलांसाठी अन्न म्हणून उत्तम पर्याय आहे. तुमचे बाळ सहा महिन्यांचे झाल्यावर, बालरोगतज्ञांच्या सल्ल्यानेच बाळाच्या आहारात टरबूजाचा समावेश करावा.
आणखी वाचा:
केळं बाळांसाठी चांगले आहे का?
बाळांसाठी स्ट्रॉबेरी – आरोग्यविषयक फायदे आणि धोके
बाळांसाठी चिकू: आरोग्यविषयक फायदे आणि पाककृती