Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण आहार आणि पोषण गरोदरपणात आईस्क्रीम खाणे सुरक्षित आहे का?

गरोदरपणात आईस्क्रीम खाणे सुरक्षित आहे का?

गरोदरपणात आईस्क्रीम खाणे सुरक्षित आहे का?

गरोदरपणात स्त्रियांना विशिष्ट अन्नपदार्थांची लालसा निर्माण होते. जर तुम्ही गरोदर असाल तर काही वेळा तुम्हाला काही विशिष्ट पदार्थ खाण्याचा मोह होईल.   हे पदार्थ तुमच्या आरोग्यासाठी तसेच तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी चांगले असू शकतात किंवा नसतात सुद्धा. तुम्ही गरोदर असल्याने, सर्व पौष्टिक पदार्थ तुम्ही खात असाल. तुम्हाला काही विशिष्ट पदार्थ काही वेळा खावेसे वाटतील आणि ते तुम्हाला तृप्त करू शकतील परंतु ते पदार्थ पौष्टिक नसतील! उदाहरणार्थ, आइस्क्रीम हा असाच एक स्वादिष्ट पदार्थ आहे. आईस्क्रीम खाण्याची तुम्हाला इच्छा असेल. पण गरोदरपणात आईस्क्रीम खाऊ शकतो का? ते खरंच सुरक्षित आहे का? तुम्हाला वाटत असेल की, तुमच्या आवडत्या आइस्क्रीमचा एक स्कूप तुमच्या बाळाला इजा करणार नाही, पण तुम्हाला याची खात्री आहे का?

फ्रोझन डेझर्ट आणि आइस्क्रीम मधील फरक

आइस्क्रीम खरेदी करण्यापूर्वी तुम्ही स्वतःला पहिला प्रश्न विचारला पाहिजे तो म्हणजे ‘हे खरंच आइस्क्रीम आहे का?’ आइस्क्रीम हे मुख्यतः दुधापासून बनवले जाते आणि ते मर्यादित प्रमाणात खाणे चांगले असते.परंतु बरीच उत्पादने आईस्क्रीम म्हणून विकली जातात. त्यामध्ये वनस्पती तेल किंवा हायड्रोजनेटेड फॅट्स वापरलेले असतात आणि ते आपल्या आहारात टाळले पाहिजे कारण त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. फ्रोझन डेझर्ट विकणाऱ्या कंपन्यांनी त्यांच्या पॅकेजिंगवर तेच लेबल लावणे आवश्यक आहे, त्यामुळे पुढच्या वेळी तुम्ही आईस्क्रीम विकत घ्याल तेव्हा ‘फ्रोझन डेझर्ट’ असे लेबल शोधा.

गरोदरपणात आइस्क्रीम खाणे सुरक्षित आहे का?

आइस्क्रीम हे गोड गोठवलेले मिष्टान्न आहे आणि सहसा ते दुधापासून बनवलेले असते. त्यामध्ये फळे किंवा फ्लेवर्स असतात. आपल्या सर्वांना आईस्क्रीम खायला आवडते. पण जेव्हा एखादी स्त्री गरोदर असते आणि तिला आईस्क्रीमची लालसा असते,  तेव्हा ती स्वतःच्या आणि बाळाच्या चांगल्यासाठी आईस्क्रीम खाण्याआधी विचार करेल. परंतु चांगली बातमी म्हणजे स्त्री गरोदर असताना मध्यम प्रमाणात आईस्क्रीम खाऊ शकते. होय, तुम्ही तुमच्या आवडत्या आइस्क्रीमचा आस्वाद घेऊ शकता. परंतु आईस्क्रीम करताना ते स्वच्छतेची काळजी घेऊन तयार केलेले आहे हे लक्षात घ्या. तुम्हाला आईस्क्रीम खायची इच्छा झाल्यास तुम्ही ते खाऊ शकता. परंतु, जर तुम्हाला एखाद्या विशिष्ट चवीची ऍलर्जी असेल किंवा तुम्हाला मधुमेह, लठ्ठपणा किंवा अगदी सर्दी यासारख्या वैद्यकीय समस्या असतील, तर तुम्ही तपासणी करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. परंतु गर्भवती असताना आईस्क्रीम खाणे टाळणे चांगले.

आइस्क्रीमचे पौष्टिक मूल्य

जरी आइस्क्रीम पौष्टिक नसले तरी आईस्क्रीम मधून तुम्हाला कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारख्या आवश्यक पोषक तत्वांचा पुरवठा होऊ शकतो. सर्वसाधारणपणे, आइस्क्रीममध्ये संतृप्त आणि असंतृप्त चरबी असते. आईस्क्रीम मध्ये कार्बोहायड्रेट आणि प्रथिने सुद्धा असतात. तुम्ही कमी चरबी असलेले, शुगर फ्री आणि योगर्ट बेस्ड ‘लाइट आइस्क्रीम’ देखील खरेदी करू शकता. आईस्क्रीममधून  तुम्हाला मध्यम प्रमाणात व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी 12 सारखी जीवनसत्त्वे देखील मिळू शकतात. परंतु, प्रत्येक आइस्क्रीममध्ये असलेली पोषक तत्वे ही आईस्क्रीमची चव आणि उत्पादक यावर अवलंबून असतात.

गर्भवती स्त्रियांनी एका दिवसात किती आइस्क्रीम खावे?

आइस्क्रीममध्ये फॅट्सचे प्रमाण जास्त असते आणि ते तुमच्या शरीराचे तापमान कमी करू शकते. जर तुम्ही आईस्क्रीम जास्त प्रमाणात खाल्ले तर त्यामुळे तुमच्या शरीराच्या चयापचयावर परिणाम होऊ शकतो आणि पचनसंस्थेला त्यामुळे त्रास होऊ शकतो. तुम्ही कधीतरी त्याचा आनंद घेऊ शकता. कदाचित दशकभरापूर्वी कोणीही विचार केला नसेल पण आजकाल, आइस्क्रीम्स अनेक फ्लेवर्समध्ये उपलब्ध आहेत. कॉफी आणि ग्रीन टी सारख्या काही फ्लेवर्समध्ये कॅफिन असते. त्यातील कॅफिनचे प्रमाण जवळजवळ नगण्य असले तरीसुद्धा जर तुम्हाला यापैकी एखादा फ्लेवर आवडला तरी जास्त प्रमाणात आईस्क्रीम खाणे टाळावे.

गर्भवती असताना आइस्क्रीम खाण्याचे संभाव्य दुष्परिणाम

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट आहे, हे तुम्हाला माहीत आहे. आईस्क्रीमच्या बाबतीत सुद्धा तेच आहे. जास्त आइस्क्रीम खाल्ल्याने पुढील समस्या निर्माण होऊ शकतात.

1. संक्रमण

तुम्हाला आइस्क्रीमपासून लिस्टरिया सारखे काही प्रकारचे संसर्ग होऊ शकतात. कारण हा जीवाणू अत्यंत कमी तापमानाला जिवंत राहू असतो. आईस्क्रीम करण्यासाठी वापरण्यात येणारे दूध पाश्चराइज केलेले नसेल तर तुम्हाला संसर्ग देखील होऊ शकतो. गरोदरपणात होणारे हे संक्रमण नाळेच्या वाढीवर, गर्भजलावर परिणाम करू शकते. बाळाला  जन्माच्या वेळी जन्मजात संक्रमण होऊ शकते. आणि त्यामुळे  अकाली प्रसूती, मृत जन्म आणि गर्भपात ह्यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

2. वजन वाढणे

आइस्क्रीममध्ये कॅलरी आणि फॅट्स जास्त असल्याने, जर तुम्ही आईस्क्रीम जास्त प्रमाणात किंवा रोज खाल्ले तर, त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रसूतीमध्ये गुंतागुंत होऊ शकते.

3. गर्भावस्थेतील मधुमेहाचा धोका

आइस्क्रीममध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे तुमची ग्लुकोज सहिष्णुता कमी होण्याची शक्यता वाढते. ज्यांना पीसीओएस, प्री डायबिटीज किंवा कौटुंबिक मधुमेहाचा इतिहास आहे त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय नाही.

गर्भावस्थेतील मधुमेहाचा धोका

4. सायनुसायटिस आणि श्वसन संक्रमण

गरोदरपणात, गर्भवती स्त्रीची रोगप्रतिकारक शक्ती दाबली जाते. जास्त प्रमाणात आइस्क्रीम खाल्ल्याने सायनस-संबंधित ऍलर्जी आणि श्वसनाच्या समस्यांचा धोका वाढू शकतो.

गरोदरपणात आइस्क्रीम खाण्याशी संबंधित समज

गरोदरपणात आइस्क्रीमचे फायदे आणि जोखीम सुद्धा असते. परंतु त्याच्याशी संबंधित काही गैरसमज देखील आहेत, उदाहरणार्थ, असे मानले जाते की आईस्क्रीम सारखा थंड पदार्थ खाल्ल्याने बाळाच्या मेंदूवर परिणाम होतो. ह्या वस्तुस्थितीसाठी कोणताही वैज्ञानिक डेटा किंवा अभ्यास उपलब्ध नाही. जर तुमचा आहार आणि जीवनशैली योग्य असेल तर हानिकारक थंड हवामान आणि थंड पदार्थांचा बाळावर काहीही परिणाम होत नाही.

गरोदरपणात आईस्क्रीम खाताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

आत्तापर्यंत तुम्हाला हे पूर्णपणे माहित आहे की गरोदरपणात आईस्क्रीम हा काही सुरक्षित पर्याय नाही कारण त्यामुळे संभाव्य धोके निर्माण होऊ शकतात. परंतु आईस्क्रीम तयार करताना स्वच्छतेची काळजी घेतलेली आहे ह्याची खात्री करून तुम्ही कधीतरी आईस्क्रीम खाऊ शकता. आइस्क्रीम निवडताना खालील गोष्टींची काळजी घ्या आणि आईस्क्रीमचा आनंद घ्या!

  1. तुम्हाला जे आइस्क्रीम खायचे आहे ते पाश्चराइज्ड दुधापासून बनवले आहे का ते तपासा. जर उत्तर हो असेल तर काळजी न करता आईस्क्रीम खाण्याचा आनंद घ्या.
  2. एखाद्या सुप्रसिद्ध ब्रँडचे आणि स्वच्छतेचे पालन करणाऱ्या नामांकित दुकानातून आइस्क्रीम खरेदी करा.
  3. रस्त्यावरील विक्रेत्यांकडून आणि मेळ्यांमध्ये विकले जाणारे आईस्क्रीम खाणे टाळा कारण अशा ठिकाणी स्वच्छतेची नीट काळजीघेतली जात नाही. लक्षात ठेवा की फ्रीजरमध्ये ठेवलेल्या आइस्क्रीममध्येही जिवाणू वाढू शकतात.
  4. तुम्हाला आरोग्यदायी पर्यायाची निवड करायची असेल, तर आम्ही सुचवितो की तुम्ही ‘लो-फॅट’ किंवा ‘हलके’ आइस्क्रीम खावे. असे आईस्क्रीम आजकाल मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. उदाहरणार्थ, तुम्ही फ्रोझन योगर्ट आइस्क्रीम खरेदी करू शकता.

गरोदर असताना, शक्य तितके पौष्टिक खाण्याचा प्रयत्न करा. परंतु,  पौष्टिक पदार्थांचा समावेश असलेला निरोगी आहार घेत असताना तुम्हाला एखादा पदार्थ खावासा वाटला तर तुम्ही त्याची लालसा सोडावी असे नाही. तुम्ही कधीतरी आईस्क्रीमचा एखादा सकूप खाऊ शकता. स्वच्छतेचे पालन करून तयार केलेले आईस्क्रीम योग्य प्रमाणात खा. कुठलीही समस्या निर्माण झाल्यास वेळेवर वैद्यकीय मदत घ्या. आईस्क्रीम खाल्ल्याने गरोदरपणाचा ताण कमी होण्यास मदत होऊ शकते. आईस्क्रीम खाण्याचा आनंद घ्या पण तुम्ही ते किती प्रमाणात खात आहात ह्यावर सुद्धा लक्ष ठेवा.

आणखी वाचा:

गरोदर असताना नारळपाणी पिणे
गरोदरपणात शीतपेये पिणे हानिकारक आहे का

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article