Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण आहार आणि पोषण गरोदरपणात सुकामेवा खाणे – फायदे आणि जोखीम

गरोदरपणात सुकामेवा खाणे – फायदे आणि जोखीम

गरोदरपणात सुकामेवा खाणे – फायदे आणि जोखीम

जेव्हा एखाद्या स्त्रीला ती गर्भवती असल्याचे समजते तेव्हा तिच्या खाण्याच्या सवयी चांगल्या प्रकारे बदलतात. आणि अर्थातच, हे आवश्यक आहे, कारण गरोदरपणात निरोगी आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुम्ही गर्भवती असाल तर बाळाच्या निरोगी वाढीसाठी तुमच्या शरीरात अतिरिक्त जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर आवश्यक पोषक तत्वे आवश्यक असतील. आणि तुमच्या शरीरात तुमच्या बाळाचे पालनपोषण करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व पोषणद्रव्ये मिळण्यासाठी संतुलित आहार घेणे हा एक उत्तम मार्ग आहे. तुम्ही तुमच्या गर्भारपणाच्या आहारामध्ये समाविष्ट करू शकता असे काही पोषक स्नॅक्स म्हणजे सुकामेवा आणि नट्स. कारण ते आई आणि बाळाला विविध फायदे पुरवतात. परंतु त्यांना आपल्या आहाराचा एक भाग बनविणे पूर्णपणे सुरक्षित आहे का ? पाहुयात!

गरोदरपणात सुकामेवा आणि नट्स खाणे सुरक्षित आहे का?

सुकामेवा आणि नट्स हे जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि अमीनो ऍसिड्सचे भांडार आहेत, म्हणून त्यांना गर्भवती महिलेच्या आहारात समाविष्ट करणे आवश्यक आहे. सुक्या मेव्यामध्ये बी १बी ९, सी, के, , आणि एच सारखी निर्णायक जीवनसत्त्वे असतात. भूक लागल्यास गर्भवती असताना सुकामेवा खाणे उपयुक्त ठरू शकते. गरोदरपणात सुकामेवा खाणे सुरक्षित असते परंतु इतर सर्व गोष्टींप्रमाणेच, गरोदरपणात त्यांचे सेवन करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे कारण जास्त प्रमाणात घेतल्यास गुंतागुंत निर्माण होऊ शकते. तुम्ही गरोदरपणात सुकामेवा मध्यम प्रमाणात खाऊ शकता.

गरोदर असताना सुकामेवा आणि नट्स खाण्याचे फायदे

सुकामेवा आणि नट्स कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, जस्त आणि सेलेनियम इत्यादी घटकांनी समृद्ध असतात. ते अँटीऑक्सिडेंटचा एक चांगला स्त्रोत देखील आहेत आणि गर्भवती महिलांसाठी एक उत्तम स्नॅक म्हणून भूक शांत करण्यास देखील चांगले आहेत.

  • तंतुमय पदार्थानी समृद्ध असल्याने, ड्रायफ्रूट्स गरोदरपणात बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करतात. गरोदरपणातील संप्रेरकांमधील बदलांमुळे बद्धकोष्ठता आणि इतर अनेक समस्या उद्भवू शकतात. परंतु ही ड्रायफ्रुट्स खाऊन समस्या सोडविली जाऊ शकते. सुकामेवा असलेला उच्च फायबर आहार गर्भवती महिलांसाठी चांगला आहे.
  • लोह निरोगी गर्भधारणेसाठी अविभाज्य आहे आणि सुके अंजीर तसेच खजूर आणि नट्स आपल्याला रोजच्या लोहाची गरज पूर्ण करण्यात मदत करतात.
  • सुक्यामेव्यातून तुम्हाला भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए आणि ते बाळाचे दात आणि हाडांच्या विकासासाठी आवश्यक असतात
  • सुकामेवा आणि नट्समध्ये आढळणारे पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि स्नायूंचे नियंत्रण वाढविण्यात मदत करू शकते
  • ड्रायफ्रूट्स आणि नट्समधील मॅग्नेशियममुळे तुमच्या बाळाच्या मज्जातंतू आणि हाडांच्या योग्य वाढीस मदत होते.
  • सुक्या मेव्यातील नैसर्गिक साखर सहज पचवता येते आणि त्यामुळे तुमच्या शरीरास चांगली ऊर्जा मिळते.
  • मनुके आणि खजूर गर्भाशयाच्या स्नायूंना बळकट करण्यास मदत करतात. तसेच त्यामुळे प्रसूतीनंतर रक्तस्त्राव होण्याची शक्यता देखील कमी होते.
  • गरोदरपणात सुकामेवा आणि नट्स खाल्ल्याने बाळामध्ये दमा आणि घरघर लागण्याचे धोके कमी होतात असा विश्वास आहे.
  • सुकामेवा आणि नट्समधील व्हिटॅमिन ई, बाळाच्या पेशी आणि फुफ्फुसांच्या विकासास मदत करू शकते. हे जीवनसत्व आपल्या रक्तातील साखर नियंत्रित करू शकते आणि आपल्या बाळाला दमा होण्यापासून रोखू शकते.

सुकामेवा आणि नट्स खाण्याचे दुष्परिणाम आणि जोखीम आहे काय?

मध्यम प्रमाणात सेवन केल्यास, गरोदरपणात सुकामेवा आणि नट्स पूर्णपणे सुरक्षित असतात. तथापि, जर तुम्ही ते जास्त प्रमाणात खाल्ले तर आरोग्याच्या विविध समस्या येऊ शकतात.

  • पोटाच्या समस्या जसे की गॅस होणे, सूज येणे आणि अतिसार.
  • सुकामेवा आणि नट्समध्ये भरपूर कॅलरीज असतात आणि जास्त प्रमाणात सेवन केल्याने आरोग्याच्या समस्या नक्कीच उद्भवू शकतात.

सुकामेवा आणि नट्स खाण्याचे दुष्परिणाम आणि जोखीम आहे काय?

  • सुक्यामेव्यामध्ये फ्रुक्टोज सारखी नैसर्गिक साखर असते, जर तुम्ही दातांची नीट काळजी घेतली नाही तर ते दात किडण्यास कारणीभूत ठरू शकतात.

सावधगिरी

जरी सुकामेवा आरोग्यासाठी चांगला असला तरी त्याचे सेवन करताना खबरदारी घेणे आवश्यक आहे.

  • कारखान्यात प्रक्रिया केलेल्या सुक्यामेव्याऐवजी नैसर्गिकरित्या वाळवलेल्या सुक्यामेव्याची निवड करा. असे केल्यास अक्रिलामाइड हे टॉक्सिन तुम्ही टाळू शकता कारण जास्त उष्णतेमुळे ते टिकाव धरत नाही. हे एक कार्सिनोजेन आहे आणि मज्जासंस्था आणि प्रजनन यावर त्याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.
  • तुम्ही खरेदी केलेल्या सुक्यामेव्यामध्ये साखर घातली आहे की नाही ते तपासा. सुक्यामेव्यामध्ये विशिष्ट प्रमाणात नैसर्गिक साखर असते परंतु काही ब्रँडमध्ये साखर घातलेली असते. त्यामुळे ते ब्रँड टाळा.
  • कधीकधी, पॅक केलेला सुकामेवा आणि नट्समध्ये संरक्षक घटक असतात. त्यांच्यात सल्फरडाय ऑक्साईड असल्याने ऍलर्जिक प्रतिक्रिया किंवा श्वसन समस्या उद्भवू शकतात.
  • कोरडे करण्याच्या प्रक्रियेमुळे सुक्यामेव्यामुळे कॅलरींमध्ये वाढ होऊ शकते. म्हणून आपल्या कॅलरीचे प्रमाण नियमित करण्यासाठी आपण किती खाल्ले पाहिजे याबद्दल आपण सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
  • नामांकित विक्रेत्यांकडून ऑरगॅनिक आणि संरक्षकमुक्त सुकामेवा खरेदी करण्याचा प्रयत्न करा आणि एका महिन्याच्या कालावधीत आपण जे खाऊ शकता तेवढेच खरेदी करा.
  • स्थानिक विक्रेत्यांकडून खरेदी करत असल्यास किडे, बुरशी किंवा घाण नाही ना ते पहा. मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यापूर्वी स्वादही घेऊन पहा.
  • सुकामेवा स्वच्छ आणि कोरड्या कंटेनरमध्ये ठेवा आणि खराब होऊ नये म्हणून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.

एका दिवसात तुम्ही किती सुकामेवा आणि नट्स खाल्ले पाहिजे?

सुक्यामेव्यामध्ये ताज्या फळांपेक्षा बर्‍याच कॅलरी असतात. काही नट्समध्ये देखील कॅलरी जास्त असतात. म्हणून, तुम्ही विशेषतः गरोदरपणात काय खावे हे पाहणे आवश्यक आहे. ह्या काळात तुम्ही एका दिवसात १०० ग्रॅमपेक्षा जास्त सुकामेवा आणि नट्स खाऊ नये. उदाहरणार्थ, तुम्ही बदामाचे चार ते सात तुकडे, अक्रोडचे चार, दोन खजूर आणि एका वेळी सुमारे आठ पिस्ता खाऊ शकता.

एका दिवसात तुम्ही किती सुकामेवा आणि नट्स खाल्ले पाहिजे?

गरोदरपणात सुका मेवा आणि नट्स खाण्याचे शिफारस केलेले प्रमाण

गर्भवती महिलांना जवळजवळ सर्व सुकामेवा आणि बियांची शिफारस केली जाते. तुम्ही गर्भवती असल्यास, तुमच्या आयुष्यातील ह्या खास काळात तुम्ही नियमितपणे आपल्या आहारामध्ये खालील गोष्टींचा समावेश केला असल्याची खात्री करा.

सुकामेवा आणि नट्स पोषणमूल्ये कॅलरीज कशी मदत होते
बदाम कॅल्शियम, मॅग्नेशियम, प्रथिने, राइबोफ्लेविन, व्हिटॅमिन ई ५२९
  • रक्तदाब नियमित करते
  • बाळाचे दात आणि हाडे विकसित करण्यात मदत करते
  • बाळामध्ये जन्माचे वजन कमी करण्यास प्रतिबंध करते आणि मेंदूच्या विकासास चालना देते
वाळलेल्या जर्दाळू फायबर, व्हिटॅमिन ए, कॉपर, व्हिटॅमिन ई ३८१
  • बद्धकोष्ठता प्रतिबंधित करते
  • रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
  • स्नायू आणि अवयव कार्य सुधारते
  • प्रीएक्लेम्पसियाचा धोका कमी करते
मनुका लोह आणि फायबर ४८८
  • बद्धकोष्ठता प्रतिबंधित करते
अक्रोड ओमेगा-3 फॅट्स ७२०
  • बाळाच्या मेंदूत आणि दृष्टीच्या विकासास मदत

होते

काजू फॉस्फोरस ६४०
  • सामान्य हृदय गती सुनिश्चित करते
वाळलेले सफरचंद फायबर, पोटॅशियम २०८
  • आतड्यांसंबंधी कार्य सुधारते
  • स्नायू कार्य सुधारते
  • रक्तदाब नियंत्रित करते
पिस्ता कॉपर ३३०
  • अवयव आणि स्नायूंच्या सुरळीत कामकाजाची हमी देते
खजूर तंतुमय पदार्थ ५०२
  • पचन प्रोत्साहित करते आणि वजन नियंत्रित राखते
सुके अंजीर तंतुमय पदार्थ ३७१
  • बद्धकोष्ठता आणि हृदयरोगाशी सामना करण्यास मदत करते
शेंगदाणे प्रथिने ८२८
  • निरोगी जन्म वजन

सुकामेवा आणि नट्स खातानाच्या टिप्स

गरोदरपणात सुकामेवा आणि नट्स सेवन करण्याविषयी बरेच गैरसमज आहेत. काजू, बदाम, जर्दाळू, मनुका, खजूर, अक्रोड आणि पिस्ता हा सुकामेवा गर्भवती महिलांसाठी चांगला आहे. सुकामेवा पौष्टिक असल्याने तुम्ही दररोज आपल्या आहारात त्यांचा शिफारस केलेल्या प्रमाणात समावेश करण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे. आपण हे करण्याचे काही मार्ग येथे आहेतः

  • बहुतेक सुकामेवा गर्भवती महिलांसाठी चांगला असतो आणि त्याचे कच्चे सेवन केले जाऊ शकते. गरोदरपणात भूक लागल्यावर हेल्दी स्नॅक म्हणून देखील ते चांगले आहेत.
  • तुम्ही कोशिंबीर, सँडविच आणि मिठाई किंवा कस्टर्ड्स सारख्या मिठाईमध्ये सुद्धा सुकामेवा आणि नट्स घालू शकता.

सुकामेवा आणि नट्स खातानाच्या टिप्स

  • खजूर आणि अक्रोड घालून तसेच किसलेल्या नारळामध्ये ती बुडवून आपली स्वतःची ड्राईफ्रूट कँडी बनवा. खायला वापरासाठी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. तुम्ही दहा दिवसांपर्यंत ती खाऊ शकता.
  • सुक्यामेव्याचे काही प्रकार चावणे कठीण होते. त्यामुळे खाण्यापूर्वी तुम्ही त्यांना पाण्यात भिजवू शकता.

गरोदरपणाच्या काळात तुम्ही पोषक अन्न खाल्ले पाहिजे आणि तसेच आपल्या मुलाच्या आणि स्वतःच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. खाण्याच्या निवडी करताना गोंधळून न जाणे महत्वाचे आहे. तुम्हाला तुमचे नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्यांकडून बरेच सल्ले मिळतील आणि काय खावे आणि काय खाऊ नये यासंबंधीची भरपूर माहिती तुम्हाला गोंधळात टाकू शकेल. पण काळजी करू नका. तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी काय चांगले आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

आणखी वाचा:

गरोदरपणात तीळ खाणे सुरक्षित आहे का?
गरोदर असताना नारळपाणी पिणे

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article