ह्युमन कोरिओनिक गोनाडोट्रॉपिन (एचसीजी) इंजेक्शन्सचा वापर स्त्रियांची गर्भधारणा सुरक्षित ठेवण्यासाठी केला जातो. परंतु गर्भपात टाळण्यासाठी एचसीजी इंजेक्शन्स वापरणे सुरक्षित आहे का? त्याचे काही दुष्परिणाम होतात का? ह्या लेखामध्ये तुम्हाला एचसीजी इंजेक्शन्सबद्दल माहित असणे आवश्यक आहे अशी सर्व माहिती आहे.
एचसीजी म्हणजे काय?
अंडाशयात शुक्राणूंचे रोपण झाल्यानंतर प्लेसेंटाद्वारे तयार होणारे संप्रेरक ह्यूमन कोरिओनिक गोनाडोट्रॉपिन (एचसीजी) म्हणून ओळखले जाते.
एचसीजी दोन प्रकारे कार्य करते. सर्वात आधी, ते अंडाशयातील अंड्याच्या सामान्य वाढीस मदत करते. दुसरे म्हणजे ते ओव्हुलेशन दरम्यान अंडी सोडण्यास प्रेरित करते.
एचसीजीला गर्भधारणा संप्रेरक म्हणतात आणि गर्भधारणेच्या काही दिवसांनंतर गर्भवती स्त्रीच्या रक्तामध्ये आणि लघवीमध्ये हे संप्रेरक आढळते. त्यामुळे स्त्री गर्भवती आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी लघवी आणि रक्ताची तपासणी केली जाते.
एचसीजी इंजेक्शन गर्भपात रोखण्यास मदत करते का?
गर्भवती स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात मोठे दुःस्वप्न म्हणजे गर्भपात. आधी गर्भपात झालेला असल्यास तुम्हाला गर्भपात टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे असेल.
अश्या परिस्थितीमध्ये, अंडाशयात अंडी सोडण्यास उत्तेजित करण्यासाठी डॉक्टर एचसीजी इंजेक्शन घेण्याचे सुचवू शकतात. संशोधनानुसार एचसीजी इंजेक्शन आणि इतर काही हार्मोनल इंजेक्शन्स स्त्रियांना गर्भवती होण्यास मदत करू शकतात परंतु त्याचे फायदे आणि तोटे आहेत.
मानवी कोरिओनिक गोनाडोट्रॉपिन इंजेक्शन गर्भधारणेमध्ये कसे कार्य करते?
गरोदरपणात, प्लेसेंटाच्या वाढीसाठी जबाबदार असलेल्या पेशींपासून एचसीजी हे संप्रेरक तयार होते. गर्भाशयाच्या भिंतीमध्ये रोपण झाल्यानंतर फलित अंडी वाढण्यास मदत करणे हे एचसीजी संप्रेरकाचे कार्य आहे. प्लेसेंटा यशस्वीरित्या तयार झाल्यानंतर, प्लेसेंटाच्या पेशी एचसीसी हे संप्रेरक बाहेर टाकतात. जसजशी गर्भाची वाढ होते तसे प्लेसेंटाद्वारे तयार होणाऱ्या एचसीजी संप्रेरकाचे प्रमाण लक्षणीय वाढते. म्हणून, गरोदरपणात गर्भाच्या सामान्य आणि निरोगी विकासासाठी, एचसीजी पुरेशा प्रमाणात असणे आवश्यक आहे.
गरोदरपणामध्ये एचसीजीचे दुष्परिणाम
गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात एचसीजी इंजेक्शनच्या वापरामुळे अनेक दुष्परिणाम होतात आणि त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ नये. एचसीजी हे गरोदरपणात वेदना आणि स्तनांची संवेदनशीलता वाढवते. गरोदरपणात एचसीजी इंजेक्शनचे काही गंभीर दुष्परिणाम आहेत त्यामुळे इंजेक्शन घेण्यापूर्वी आपल्या स्त्रीरोगतज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
- गरोदरपणात एचसीजी इंजेकशन्समुळे अंडाशयाचे हायपरस्टिम्युलेशन होऊ शकते. त्याला ओव्हेरियन हायपरस्टिम्युलेशन सिंड्रोम (ओएचएसएस) म्हणतात. संशोधकांच्या मते, ज्या 25%स्त्रिया गर्भवती होण्यासाठी हे इंजेक्शन घेतात त्यांना सिंड्रोमशी संबंधित सौम्य ते गंभीर समस्या निर्माण होतात. जर ओएचएसएसची लक्षणे सौम्य असतील तर ती आठवडाभरात कमी होतील. एचसीजी इंजेक्शन घेतल्यानंतर स्त्रियांमध्ये ओएचएसएसची गंभीर लक्षणे क्वचितच आढळतात. ओएचएसएसच्या लक्षणांमध्ये श्वासोच्छवासाच्या समस्या, लघवीला रंग नसणे आणि ओटीपोटात होणाऱ्या वेदना इत्यादींचा समावेश होतो. नमूद केलेली कोणतीही लक्षणे गंभीर झाल्यास, आपण ताबडतोब आपल्या स्त्रीरोगतज्ञाचा सल्ला घ्यावा.
- एचसीजी इंजेक्शन शरीराला द्रव टिकवून ठेवण्यास मदत करते. परिणामी, तुमचे वजन वाढू शकते. अनेक प्रकरणांमध्ये सूज किंवा जळजळ देखील दिसून आली आहे. थोडे वजन वाढणे ठीक आहे आणि काळजी करण्यासारखे काही नाही. पण वजन अचानक वाढल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरते.
- एचसीजी इंजेक्शन्स घेतल्यानंतरशरीरात होणारा आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे स्तन दुखणे आणि स्तनाना सूज येणे. काही स्त्रियांचे, स्तन दुखू लागतात आणि थोडे कोमल वाटू लागतात. एकदा शरीराने एचसीजी इंजेक्शन्सशी जुळवून घेणे सुरू केले की, ही लक्षणे नाहीशी होतात असे दिसून आले आहे. समस्या कायम राहिल्यास, आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- नैराश्य हा एचसीजी इंजेक्शनच्या इतर दुष्परिणामांपैकी एक आहे. यामुळे नेहमी चिडचिड होते, निराशा येते आणि राग येऊ शकतो. कारण शरीरातील कोणत्याही संप्रेरकांच्या बदलामुळे नैराश्य येऊन मूड बदलू शकतो. ही परिस्थिती जास्त काळ टिकणार नाही, परंतु ही परिस्थिती जास्त काळ टिकल्यास तुम्हाला तुमच्या डॉक्टरांना भेटावे लागेल.
- एचसीजी इंजेक्शन घेतल्यास त्यामुळे थकवा, डोकेदुखी, पोटदुखी आणि वेदना होऊ शकतात.
एचसीजी इंजेक्शन तुम्ही स्त्रीरोगतज्ञाच्या सल्ल्यानेच घेतले पाहिजे. हे इंजेक्शन घेतल्यानंतर सर्व संभाव्य लक्षणे आणि त्यांच्या तीव्रतेबद्दल चर्चा करणे आवश्यक आहे. यापैकी कोणतीही लक्षणे तशीच राहिल्यास, तुम्ही ताबडतोब आपल्या स्त्रीरोगतज्ञाचा सल्ला घ्यावा.
आणखी वाचा:
धनुर्वाताची लस (टिटॅनस टॉक्सॉइड – टीटी) – गरोदरपणात कधी आणि का दिली जाते?