गर्भारपण

गरोदरपणातील मुतखडा (किडनी स्टोन)

गरोदर असताना मुतखड्याच्या वेदना सहन करणे खूप कठीण जाते. गरोदरपणामुळे मुतखडा होण्याची शक्यता वाढत नाही,परंतु बाळाला धोका पोहोचू नये म्हणून  मुतखड्याचे निदान करून त्यावर उपचार करणे कठीण असते. बहुतेक वेळा गरोदरपणात मुतखडे आपोपाप निघून जातात.  परंतु काही स्त्रियांना तीव्र वेदना होऊ शकतात. अशा परिस्थितीत  वैद्यकीय उपचार घेणे चांगले असते. या लेखात आपण किडनी स्टोनची कारणे,त्यांची चिन्हे आणि लक्षणे तसेच गरोदर असताना त्यापासून मुक्ती कशी मिळवायची ह्या सर्व मुद्द्यांचा आढावा घेणार आहोत. किडनी स्टोनपासून बचाव करण्याच्या उपायांबद्दलही आम्ही काही माहिती ह्या लेखामध्ये दिलेली.

गरोदरपणातील किडनी स्टोनची कारणे

गरोदरपणात किडनी स्टोन होण्याचा धोका जास्त असतो असे नाही. परंतु गरोदरपणात किडनी स्टोन होण्याची काही कारणे असतात. गरोदरपणात  किडनी स्टोन होण्याची काही सामान्य कारणे खालीलप्रमाणे आहेत:

1. द्रवपदार्थांचीकमतरता

किडनी स्टोन होण्याचे एक सामान्य कारण म्हणजे पाण्याचा अपुरा वापर होय.तुमच्या शरीरात द्रवपदार्थांच्या कमतरतेमुळे लघवीमध्ये फॉस्फरस आणि कॅल्शियमसारख्या खनिजांचे प्रमाण वाढते, त्यामुळे  किडनी स्टोन तयार होतात. गरोदरपणात तुमच्या शरीराला नेहमीपेक्षा जास्त पाणी लागते. आवश्यकतेपेक्षा कमी पाणी प्यायल्यामुळे  किडनी स्टोन होऊ शकतो.

2. अनुवांशिकपूर्वस्थिती

तुमच्या शरीराच्या अनुवांशिक रचनेमुळे तुम्हाला किडनी स्टोन होण्याची शक्यता वाढते.जर तुम्ही हायपरकॅल्शियुरियाच्या (म्हणजेच अशी स्थिती जेथे मूत्रात कॅल्शियमचे प्रमाण जास्त आहे ) उच्च प्रादुर्भाव असलेल्या कुटुंबातील असाल तर तुम्हाला गरोदरपणात किडनी स्टोन होण्याची अधिक शक्यता असते.

3. आतड्यांचात्रास

जर तुमचे आतडे खूप संवेदनशील असेल,तर तुम्हाला हायपरकॅल्शियुरिया होण्याची शक्यता असते किंवा तुम्हाला किडनी स्टोनचा धोका जास्त असतो. ह्यामागचे कारण म्हणजे आतड्यांमध्‍ये दीर्घकाळ जळजळ झाल्यामुळे  मूत्रपिंडांवर कॅल्शिअम जमा होते  आणि त्याची नंतर स्फटिके तयार होतात.

4. कॅल्शियमचेजास्तसेवन

गर्भवती स्त्रियांना जास्त प्रमाणात कॅल्शिअम घेण्यास सांगितले जाते . यामुळे मूत्रपिंडावर अतिरिक्त दबाव पडतो आणि मूत्रपिंडांवर स्फटिके तयार होऊ शकतात. तसेच, बाळाच्या विकासास मदत करण्यासाठी तुमचे शरीर भरपूर प्रमाणात कॅल्शिअम शोषून घेते. त्यामुळे  तुम्हाला किडनी स्टोन होण्याची शक्यता जास्त असते.

5. गाळण्याचीप्रक्रियावाढते.

मूत्रपिंडाच्या गाळण्याची क्रिया वाढते. त्यामुळे  आपण उत्सर्जित केलेल्या यूरिक ऍसिडचे प्रमाण देखील वाढू शकते.आणि त्यामुळे  यूरिक ऍसिडची स्फटिक तयार  होऊ शकतात.

6. गर्भाशयाचाविस्तार

गरोदरपणात मूत्रमार्गाचा वरचा भाग मोठा होऊ शकतो.त्यामुळे मूत्र पूर्णपणे बाहेर टाकले जात नाही  आणि परिणामी मुतखडा  तयार होण्याचा धोका वाढू शकतो.

7. युटीआय

गरोदरपणात सतत मूत्रमार्गात संसर्ग होतो आणि त्यामुळे मुतखडा होण्याचा धोका वाढू शकतो

चिन्हे आणि लक्षणे

गरोदरपणात किडनी स्टोनची चिन्हे आणि लक्षणे नेहमीपेक्षा वेगळी नसतात.गरोदरपणात किडनी स्टोन झाल्यास त्यामुळे जर काही गुंतागुंत निर्माण झाली तर ही गुंतागुंत दर्शवणारी कोणतीही लक्षणे नसतात. गरोदरपणात जर किडनी स्टोन झाला तर त्याची सामान्य लक्षणे खालीलप्रमाणे :

1. वेदना

तीव्र वेदना हे किडनी स्टोनचे पहिले आणि सर्वात सामान्य लक्षण आहे. मुतखडा कुठे आहे त्यानुसार वेदनांचे क्षेत्र ठरते. जर मुतखडा  तुमच्या मूत्रपिंडात असेल, तर तुम्हाला पाठीत आणि बरगडीच्या खालच्या भागात वेदना जाणवतील. एकदा मुतखडा मूत्रवाहिनीपर्यंत खाली गेल्यावर, तुम्हाला तुमच्या पाठीत एका बाजूला वेदना जाणवू लागतील. जसजसा मुतखडा मूत्रवाहिनीच्या आणखी खाली सरकतो, तसतसे तुम्हाला तुमच्या गुप्तांगाच्या जवळ किंवा मांडीला वेदना जाणवू शकतात. याशिवाय, तुम्हाला तुमच्या ओटीपोटाच्या खालच्या भागात सुद्धा वेदना होऊ शकतात.

2. लघवीकरतानावेदना

जर मुतखडा खाली सरकला असेल आणि मूत्रवाहिनीच्या खालच्या टोकाला अडकला असेल तर तुम्हाला लघवी करताना तीव्र वेदना होण्याची शक्यता आहे.

3. लघवीमध्येरक्त

मुतखड्यांमुळे  मूत्रपिंडातील ऊती आणि पेशींना नुकसान पोहोचू शकते. त्यामुळे लघवीतून  रक्त येऊ शकते. या लक्षणांव्यतिरिक्त, काहींना  उलट्या, मळमळ, थंडी वाजून ताप येणे (संसर्ग सूचित करते)किंवा ओटीपोटात थोडासा ताणही जाणवू शकतो.

गरोदर असताना किडनी स्टोन होण्यामागील धोकादायक घटक

गरोदरपणाच्या तिसऱ्या, दुसऱ्या आणि पहिल्या किडनी स्टोन होण्यामागे खालील घटक कारणीभूत असतात.

गरोदरपणात  किडनी स्टोनचे निदान कसे केले जाते?

गरोदरपणात  किडनी स्टोनचे निदान करण्यासाठी रक्त आणि लघवीचे विश्लेषण केले जाते.लघवी आणि रक्ताची चाचणी केल्यानंतर कॅल्शियमचे स्फटिक किंवा लघवीतील यूरिक ऍसिडची पातळी लक्षात येते. मूत्र संवर्धन चाचणी केल्यास संसर्गास कारणीभूत असलेले सूक्ष्मजीव ओळखले जाऊ शकतात आणि ते कोणत्या प्रतिपिंडांना संवेदनशील आहेत हे सुद्धा समजू शकते. मूत्रपिंडाचा अल्ट्रासाऊंड केला जाऊ शकतो. ही एक वेदनारहित प्रक्रिया आहे . ह्या प्रक्रियेदरम्यान बाळ  रेडिएशनच्या संपर्कात येत  नाही.  परंतु,रेनल अल्ट्रासाऊंड मध्ये काही प्रकारचे किडनी स्टोन ओळखले जाऊ शकत नाही आणि वाढलेल्या किडनीचे कारण लक्षात येत नाही (मग ते गर्भधारणेमुळे असो किंवा किडनी स्टोनमुळे निर्माण झालेल्या अडथळ्यामुळे) . गर्भाला कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून एक्स-रे आणि सीटी स्कॅन करणे टाळले जाते.एमआरआय सुरक्षित मानला जातो कारण त्यात रेडिएशन किंवा कॉन्ट्रास्ट सामग्री वापरली जात नाही, तरीही गगरोदरपणात  किडनी स्टोन शोधण्यासाठी ह्या प्रक्रियेचा वापर करणे योग्य नाही.

शस्त्रक्रिया केव्हा करायला सांगितली जाते? -  त्याबाबतचे संकेत

जर नैसर्गिक आणि घरगुती उपायांचा फायदा होत नसेल ,तर तुम्हाला या परिस्थितीत मुतखड्यांपासून सुटका होण्यासाठी शस्त्रक्रियेची निवड करावी लागेल:

गरोदर असताना किडनी स्टोनपासून कसे मुक्त व्हावे?

गरोदर असताना तुम्हाला मुतखड्याची लक्षणे दिसल्यास, मुतखड्याच्या उपचारासाठी युरोलॉजिस्टचा सल्ला घ्यावा. गरोदरपणात किडनी स्टोनपासून सुटका  होण्यासाठी काही उपचारपद्धती वापरल्या जातात. उपचार पद्धती तुमच्या मुतखड्याचे स्वरूप आणि तुम्ही ज्या तिमाहीत आहात त्यावर देखील अवलंबून असतात.

1. वैद्यकीयउपचार

किडनी स्टोनमुळे होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी पॅरासिटामॉल लिहून दिले जाते. तथापि,जर औषधे तुमची वेदना कमी करण्यात अयशस्वी ठरली, किंवा मुदतपूर्व प्रसूतीचे कोणतेही संकेत असतील तर, तुम्हाला शस्त्रक्रिया करावी लागू शकते.

2. सर्जिकलउपचार

3. नैसर्गिक/घरगुतीउपचार

घरगुती आणि नैसर्गिक उपाय हे किडनी स्टोनसाठी सर्वाधिक पसंतीचे उपचार आहेत.गरोदरपणात किडनी स्टोन पास करण्याचे काही नैसर्गिक मार्ग आहेत:

प्रतिबंध

किडनी स्टोन टाळण्यासाठी काही उत्तम मार्ग आहेत:

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1. किडनीस्टोनमुळेगर्भपात होऊ शकतो का?

किडनी स्टोन मुळे गर्भपात होत नसले तरी गरोदरपणात  किडनी स्टोनमुळे होणाऱ्या तीव्र वेदना आणि गुंतागुंत ह्यामुळे अप्रत्यक्षपणे गर्भधारणेमुळे गुंतागुंत होण्याचा धोका वाढू शकतो. ह्यासाठी संबंधित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

2. गरोदरअसतानाकिडनी स्टोन होणे किती सामान्य असते?

गरोदरपणात  किडनी स्टोन होणे तुलनेने दुर्मिळ आहे. अंदाजे 1,500 गर्भधारणेपैकी एका व्यक्तीमध्ये किडनी स्टोन होऊ शकतो. तपरंतु जेव्हा किडनी स्टोन होतो तेव्हा खूप आव्हाने निर्माण होतात आणि त्यांना वैद्यकीय मदतीची आवश्यकता असते. गरोदरपणात मुतखड्याचा त्रास होऊ शकतो  आणि बहुतेकवेळा त्यासाठी घरगुती अथवा नैसर्गिक उपचार केले जातात. परंतु, वेदना तीव्र असल्यास, त्या कमी करण्यासाठी  वैद्यकीय उपचार घ्यावे लागतात किंवा काही वेळा शस्त्रक्रिया देखील करावी लागते. किडनी स्टोनची लक्षणे दिसल्यानंतर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. योग्य उपचार करून गुंतागुंत टाळा.
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved