आहार आणि पोषण

गरोदरपणात तुम्ही काकडी खाऊ शकता का?

वजन कमी करण्यासाठी काकडी खाणे उत्तम! आणि विशेषतः उन्हाळ्यात काकडी खाणे म्हणजे एक पर्वणी असते! गरोदरपणात काकडी खाण्याचे अनेक फायदे असतात. काकडी पौष्टिक आहे. प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी आणि स्त्रियांमध्ये गर्भधारणेचा दर सुधारण्यासाठी काकडी खाल्ल्यास मदत होऊ शकते. त्यामुळे गरोदरपणाच्या आहारात काकडीचा समावेश करणे चांगले असते. परंतु, बर्‍याच गर्भवती स्त्रियांना, गरोदरपणात काकडी खाल्ल्यास त्याचे काही दुष्परिणाम होतात का असा प्रश्न पडतो. गरोदरपणात काकडी खाण्याबद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे अशी सर्व माहिती ह्या लेखात दिलेली आहे.

गरोदरपणात काकडी खाणे सुरक्षित आहे का?

काकडी खाल्ल्यामुळे स्त्रियांमध्ये काही प्रतिक्रिया निर्माण होऊ शकतात. सामान्यतः गरोदरपणात काकडी खाण्याचा सल्ला दिला जात नाही. नियमानुसार,तुम्हाला खालील आरोग्यविषयक समस्या असतील तर   "मी गर्भधारणेदरम्यान काकडी खाऊ शकते का?" ह्या तुमच्या प्रश्नाचे उत्तर "नाही" असे असेल.

काकडीचे पौष्टिक मूल्य

USDA नुसार प्रति 100 ग्रॅम काकडीचे पौष्टिक मूल्य खाली दिले आहे:
घटक प्रमाण
पाणी 95.2 ग्रॅम
कॅलरीज 15 kcal
प्रथिने 0.65 ग्रॅम
एकूण लिपिड (चरबी) 0.11 ग्रॅम
आहारातील एकूण फायबर 0.5ग्रॅम
एकूण NLEA साखर 1.67 ग्रॅम
कॅल्शियम 16 मिग्रॅ
लोह 0.28 मिग्रॅ
मॅग्नेशियम 13 मिग्रॅ
फॉस्फरस 24 मिग्रॅ
पोटॅशियम 147 मिग्रॅ
व्हिटॅमिन सी एस्कॉर्बिक ऍसिड 2.8 मिग्रॅ
व्हिटॅमिन ए आरएई 5 मिग्रॅ
बीटा कॅरोटीन, 45 µg
व्हिटॅमिन के (फायलोक्विनोन) 16.4 µg
एकूण कोलीन 6 मिग्रॅ

गर्भवती स्त्रियांसाठी काकडीचे आरोग्य विषयक फायदे

गरोदरपणात काकडीचे खाण्याचे काही फायदे इथे दिलेले आहेत. त्यामुळे जर तुमची इच्छा असेल तर तुमच्या गरोदरपणाच्या आहारात तुम्ही थोड्या प्रमाणात काकडीचा समावेश करण्याचा विचार करू शकता.

1. कमी कॅलरीज

काकडींमुळे वजन वाढत नाही. काकडी खाल्ल्यानंतर तुम्हाला जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटते. काकडीमध्ये किती कॅलरीज आहेत हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का? अर्धा कप काकडीमध्ये फक्त 8 कॅलरीज असतात ते सुद्धा सालासकट!

2. व्हिटॅमिन के

निरोगी आणि मजबूत हाडांसाठी व्हिटॅमिन के हा एक आवश्यक पोषक घटक आहे. काकडीत व्हिटॅमिन के, तसेच हृदय आणि मेंदूसाठी आवश्यक असणारे इतर घटक म्हणजेच बी-व्हिटॅमिन, लोह, फॉलिक अॅसिड आणि मॅग्नेशियम असतात.

3. निर्जलीकरण प्रतिबंधित करते

काकडीमध्ये भरपूर खनिजे आणि पाणी असते. निर्जलीकरणामुळे तुम्हाला इलेक्ट्रोलाइट असंतुलनाबद्दल काळजी करण्याची गरज नाही कारण काकडी खाल्ल्यामुळे आपोआप ह्या सर्व समस्यांची काळजी घेतली जाईल.

4. त्वचेची लवचिकता वाढवते

तुमची गरोदरपणाची पहिली तिमाही सुरु असेल तर, तुमचे कोलेजनचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि पोटाचा आकार वाढत असल्याने त्या भागातील त्वचेची लवचिकता वाढवण्यासाठी थोड्या प्रमाणात काकडी खाल्ल्याने मदत होऊ शकते.

5. सूज प्रतिबंधित होते

नैसर्गिक लघवीचे प्रमाण वाढवणारा काकडी एक पदार्थ आहे आणि काकडीमुळे शरीरातील सूज देखील दूर होते.

6. मूड सुधारते

काकडीमध्ये आढळणारे बी-व्हिटॅमिन्स "फील-गुड" जीवनसत्व म्हणून ओळखले जाते. त्यामुळे मूड चांगला होतो आणि मेंदूसाठी सुद्धा ते चांगले असते.

7. गर्भाचा विकास

वस्तुस्थिती विसरू नका. काकडीमध्ये व्हिटॅमिन सी, बी1, बी2, बी3, फॉलिक अॅसिड, जस्त, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि लोह असते, हे सर्व घटक गर्भाच्या विकासासाठी आवश्यक असतात, त्यामुळे वाढीच्या बाळामध्ये विकृती निर्माण होण्याची शक्यता कमी होते.

8. बद्धकोष्ठता नाहीशी होते

काकडीत फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे यापुढे गरोदरपणात बद्धकोष्ठता किंवा मूळव्याध होणार नाही.

9. प्रतिकारशक्ती वाढते

अत्यावश्यक अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध अशी काकडी तुमची प्रतिकारशक्ती वाढवते आणि त्यामुळे गरोदरपणात संसर्ग होत नाही.

10. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते

जर तुम्हाला गर्भावस्थेतील मधुमेहाचे निदान झाले असेल, तर तुम्ही काकडी खाण्याचा विचार करू शकता, कारण त्यामुळे रक्तदाब आणि शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते.

गरोदर असताना काकडी खाण्याचे धोके आणि दुष्परिणाम

गरोदरपणात काकडी खाण्याचे काही तोटे आहेत. येथे काकडीचे काही दुष्परिणाम दिलेले आहेत.र्माण होत नाहीत.

1. आतड्यांमधील वायू

गर्भधारणेदरम्यान काकडी खाल्ल्याने उद्भवणारी ही सर्वात सामान्य समस्या आहे. तुम्हाला अपचन आणि ढेकर देखील येऊ शकतात.

2. वारंवार लघवी होणे

मूत्राशय भरले असल्याचे तुम्हाला जाणवू शकते, त्यामुळे तुम्हाला वारंवार लघवी होते. तुमच्या गरोदरपणाच्या तिमाहीनुसार अस्वस्थता निर्माण होऊ शकते.

3. ऍलर्जी

तुम्हाला काकडीची ऍलर्जी असल्यास,  सूज आणि खाज येऊ शकते.

4. विषारीपणा

काकड्यांमध्ये क्युकर्बिटॅसिन आणि टेट्रासाइक्लिक ट्रायटरपेनोइड्ससारखे विषारी घटक असतात. त्यामुळे काकडीची चव कडू होते. मोठ्या प्रमाणात काकडीचे सेवन केल्यास, ही विषारी द्रव्ये जीवघेणी ठरू शकतात.

5. हायपरक्लेमिया होऊ शकते

काकडीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. जास्त प्रमाणात काकडी खाल्ल्यास पोटात पेटके येतात, सूज येते आणि तुमच्या किडनीवरही परिणाम होतो.

गरोदरपणात काकडीचा रस पिणे सुरक्षित आहे का?

होय, गरोदरपणात ताज्या काकडीचा रस पिणे सुरक्षित आहे. ताज्या आणि टणक काकड्यांपासून बनवलेला रस घ्या.

खाण्यासाठी काकडी तयार करण्यासाठी काही टिप्स

जर तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला गरोदरपणात काकडी खाण्याची परवानगी दिलेली असेल, तर त्याचे फायदे अनुभवण्याची वेळ आली आहे. स्वादिष्ट जेवणासाठी काकडी तयार करण्यासाठी येथे काही टिप्स आहेत-

1. काकडी नीट धुवून घ्या

काकडीसोबत येणारी रसायने, घाण आणि धूळ तुम्ही काढून टाकल्याची खात्री करा. काकडी बाजारातून आणून तशीच खाऊ नका. खाण्यापूर्वी धुवून स्वच्छ करा.

2. सॅलड्स आणि स्मूदीजमध्ये काकडीचा समावेश करा

सॅलड्स आणि ज्यूसमध्ये घालण्यासाठी काकडी उत्तम आहे. तुम्ही डिटॉक्स स्मूदीज किंवा शेक घेत असल्यास त्यामध्ये सुद्धा तुम्ही काकडी घालू शकता.

3. काकडी कच्ची खाणे

थोडे मीठ घालून 30 मिनिटे काकडी रेफ्रिजरेट करा. जर तुम्ही काकडी कच्ची खात असाल तर ते चांगले आहे.

4. सँडविचमध्ये काकडीचा वापर करा

काकडी आणि टोमॅटो सँडविच करून तुम्ही खाऊ शकता. तुम्ही काकडी वाफवू देखील शकता आणि बार्बेक्यू केलेले अन्न आणि इतर चवदार पदार्थांसोबत काकडी खाऊ शकता. चाट आणि स्नॅक्स सोबत सुद्धा तुम्ही काकडी खाऊ शकता.

5. ब्लेंडर वापरा

जर तुम्ही काकडीचा रस पिण्याची योजना करत असाल, तर ब्लेंडर घ्या आणि काकडी इतर फळे आणि स्वादिष्ट भाज्यांसोबत मिसळा आणि टॅंटलायझिंग स्मूदीज तयार करा. हा रस तुमच्यासाठी चांगला आहे आणि गरोदरपणात त्याचा फायदा होतो.

काकडीची लालसा बाळाच्या लिंगाबद्दल सांगते का?

गरोदरपणात जर तुम्हाला काकडी खाण्याची इच्छा झाली तर तुम्हाला मुलगा होतो असे जुन्या काळातील बायका सांगतात. परंतु, ह्या म्हणीमध्ये कोणतेही वैज्ञानिक सत्य नाही.

गरोदरपणात काकडी खाताना घ्यावयाची काळजी

गरोदरपणात काकडी खाणे सुरक्षित असते. परंतु, सावधगिरी बाळगणे गरजेचे असते. तुमच्या आहारात काकडीचा समावेश करावा की नाही ह्यासाठी डॉक्टरांची परवानगी घ्या. कारण जास्त प्रमाणात काकडी खाल्ल्यामुळे ढेकर येऊन अपचन होऊ शकते.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1. रात्री काकडी खाणे सुरक्षित आहे का?

होय, रात्रीच्या जेवणात काकडी खाणे सुरक्षित आहे. परंतु, लक्षात ठेवा की काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे तुमचे मूत्राशय नेहमीपेक्षा जास्त भरलेले वाटू शकते. म्हणून तुम्हाला वारंवार लघवीला आल्यासारखे वाटू शकते. त्यामुळे तुमची झोप खराब होऊ शकते, आणि इतर समस्या उद्भवू शकतात. असे होऊ नये म्हणून तुम्ही रात्रीचे जेवण लवकर करू शकता किंवा झोपण्याच्या आधी 3-4 तास काकडी खाणे टाळू शकता.

2. काकडी साठवण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे?

काकडी ताजी राहण्यासाठी ती फ्रिजमध्ये ठेवावी. जास्त काळ ओलावा टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही काकडी  झिपलॉक बॅग किंवा विशेष व्हेज बॅगमध्ये ठेवू शकता.

3 . ताजी काकडी कशी निवडावी?

मऊ काकड्यांऐवजी कडक झालेल्या काकड्या निवडा. सालीला डाग असता कामा नये. वजनाने हलक्या काकड्या उचलणे टाळा. गडद सालाची काकडी निवडा. काकडीचे साल जितके गडद असेल तितकी काकडी अधिक पौष्टिक असेल.

4. मी गरोदर असताना काकडीचे लोणचे आणि बिया खाऊ शकते का?

काकडीच्या बिया जास्त प्रमाणात न खाणे चांगले कारण त्यामध्ये क्युकरबिटासिन नावाचे विष असते. ह्या बियांमुळे काही लोकांमध्ये अपचन होते. संवेदनशील पचनसंस्था असलेल्या गर्भवती स्त्रियांनी ह्या बिया खाणे टाळावे.

5. काकडीमुळे गर्भपात होतो का?

काकडी आणि गर्भधारणेचा चांगला संबंध आहे. गरोदरपणात काकडी खाल्ल्यास गर्भपात झाल्याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही.

6. मी गरोदरपणात काकडीचे पाणी पिऊशकतेका?

होय, गरोदरपणात काकडीचे पाणी पिणे पूर्णपणे सुरक्षित आहे. जर तुम्हाला पाण्याची चव वाढवायची असेल तर तुम्ही त्यात लिंबू आणि पुदिन्याची पाने देखील टाकू शकता.

7. गरोदरपणात तुम्ही काकडी आणि व्हिनेगर (मॅरीनेट केलेली काकडी) खाऊ शकता का?

व्हिनेगरमध्ये मॅरीनेट केलेल्या काकड्या गरोदरपणात खाणे सुरक्षित असते, कारण काकड्या स्वच्छ धुतलेल्या असतात. जरी काकडी उत्तम असली तरी, तुम्ही गर्भवती असाल तर तुमची वैद्यकीय स्थिती आणि एकूण आरोग्यानुसार काकडी खाणे तुमच्यासाठी वाईट असू शकते. गरोदरपणात काकडी खाण्यापूर्वी काळजी घ्या आणि सावधगिरी बाळगा. तुमच्या डॉक्टरांशी बोला आणि तुम्ही गरोदर असल्यास काकडी तुमच्यासाठी सुरक्षित आहेत की नाही हे त्यांना विचारा. आणखी वाचा: गरोदरपणात वांगी खाणे सुरक्षित आहे का? गरोदरपणात भेंडी (ओकरा) खाणे चांगले आहे का?
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved