गर्भधारणा होताना

IVF यशस्वी होण्यासाठी 11 टिप्स

    In this Article

नैसर्गिकरित्या गर्भधारणा होत नसलेल्या जोडप्याना बाळ होण्यासाठी 'इन विट्रो फर्टिलायझेशन' ही पद्धती वापरली जाते. ह्या प्रक्रियेमध्ये गर्भधारणेची शक्यता फक्त 15-20 टक्के असते. पहिल्याच प्रयत्नात आयव्हीएफ कसे यशस्वी करायचे हे तुम्हाला माहिती असल्यास, ह्या प्रक्रियेदरम्यान येणारा खर्च वाचू शकतो. तसेच तुम्हाला लवकर गर्भधारणा सुद्धा होऊ शकते.

आयव्हीएफ यशस्वी होण्यासाठी इथे काही उपयुक्त टिप्स दिलेल्या आहेत:

1. आयव्हीएफ केंद्राची माहिती घ्या

तुम्हाला गर्भधारणा होण्यासाठी सर्वात आधी चांगले आयव्हीएफ केंद्र निवडणे महत्त्वाचे आहे. तंत्रज्ञाचे कौशल्य तसेच भ्रूण ज्या परिस्थितीमध्ये वाढते त्या परिस्थितीनुसार ही केंद्रे वेगवेगळी असतात. आयव्हीएफ ची सुविधा असणाऱ्या क्लिनिकची यादी बनवा आणि निर्णय घेण्यापूर्वी त्या क्लिनिकची माहिती तपासून पहा.

2. शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी स्खलन टाळा

शुक्राणू दान करण्यापूर्वी तीन ते चार दिवस आधी पुरुष जोडीदाराचे स्खलन होऊ नये. लैंगिक संभोग आणि हस्तमैथुन टाळल्याने शुक्राणूंची संख्या वाढते आणि त्यामुळे आयव्हीएफ यशस्वी होण्याची शक्यता वाढते. प्रक्रियेपूर्वी वीर्याचे विश्लेषण करणे देखील महत्त्वाचे असते कारण शुक्राणूंची गुणवत्ता कालांतराने बदलू शकते.

3. भरपूर चरबीयुक्त पदार्थ खा

हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या अलीकडील अभ्यासात असे आढळून आले आहे की मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स असलेले अन्न खाल्ल्याने आयव्हीएफ पद्धतींद्वारे गर्भवती होण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्त्रियांना  मदत होऊ शकते. ही "चांगली  चरबी" हृदयाचे रक्षण करण्यासाठी, शरीरातील जळजळ कमी करण्यासाठी आणि प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी ओळखली जाते. त्यामुळे ॲव्होकॅडो, नट्स आणि बिया, सूर्यफूल तेल आणि ऑलिव्ह ऑईल यांसारखे भरपूर मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स असलेले पदार्थ खा. प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी तसेच गर्भाच्या विकासासाठीही ह्या चरबीची खूप गरज असते. याउलट, इतर संशोधनात असे दिसून आले आहे की लोणी आणि लाल मांसामध्ये असणाऱ्या सॅच्युरेटेड फॅट्समुळे कमी अंडी तयार केली जातात. परंतु ही अंडी प्रजनन उपचारांसाठी पुरेशी निरोगी होती. त्यामुळे तुमच्या आयव्हीएफ सक्सेस टिप्स डाएटमध्ये ह्या गोष्टींचा समावेश करा. आयव्हीएफ प्रक्रियेद्वारे तुम्हाला गर्भधारणा होईलच असे नाही, परंतु तुमचे प्रयत्न यशस्वी होण्याची शक्यता निश्चित वाढू शकते.

4. ध्यान आणि तणाव दूर करणे

तणावामुळे प्रजनन व्यवस्थेवर विपरीत परिणाम होतो. आयव्हीएफच्या यशाची शक्यता कमी होते. प्रजनन उपचारांचा योग्य परिणाम होतो आहे की नाही याबद्दल काळजी वाटणे सामान्य आहे. परंतु ताण दूर करण्यासाठी तुम्ही दररोज वेळ काढणे गरजेचे आहे. आपल्या श्वासावर लक्ष ठेऊन ध्यान केल्यास ताण कमी होण्यासाठी बऱ्यापैकी मदत होते. आणि आपले शरीर योग्यरीत्या काम करू लागते.

5. कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले अन्न, अल्कोहोल आणि कॅफिन टाळा

आपल्या शरीराद्वारे अन्न किती सहज पचते त्याचे वर्गीकरण ग्लायसेमिक इंडेक्स (GI) द्वारे केले जाते.  ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यास अन्न हळू पचेल आणि त्यामुळे शरीराला हळूहळू पण स्थिर उर्जेचा पुरवठा सुनिश्चित होईल. रक्तातील ग्लुकोजची पातळी योग्य राखण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी हे महत्त्वपूर्ण आहे. शेंगा, संपूर्ण धान्य, कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ, ब्रोकोली, रताळे आणि मशरूम हे या श्रेणीतील काही पदार्थ आहेत. प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ आणि त्यांच्याशी संबंधित तेले आणि साखरेमध्ये उच्च जीआय असते. हे पदार्थ शरीरासाठी हानिकारक असतात. हे पदार्थ जळजळ वाढवतात आणि त्याचा शरीरातील संप्रेरक पातळीवर परिणाम होतो. तसेच रोगप्रतिकारक शक्तीवर सुद्धा नकारात्मक परिणाम होतो. अल्कोहोल हे एक टेराटोजेन आहे (गर्भामध्ये विकृती निर्माण करणारा पदार्थ किंवा घटक). हा घटक गर्भाच्या विकासासाठी खूप हानिकारक आहे. म्हणूनच कोणत्याही परिस्थितीत अल्कोहोल घेणे टाळले पाहिजे. तसेच धुम्रपान करणे सुद्धा तुम्ही टाळले पाहिजे. तुम्हाला धूम्रपानाचे व्यसन असल्यास, आयव्हीएफ उपचारांसाठी जाण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी बोला. कॅफिन देखील विकसनशील गर्भावर प्रतिकूल परिणाम करते. गरोदरपणात दररोज 200mg पेक्षा जास्त कॅफेन घेऊ नये. खरं तर, तुमच्या आयव्हीएफ उपचारादरम्यान धूम्रपान करणे तुम्ही टाळले पाहिजे.

6. समुपदेशकाशी बोला

तुमच्या मानसिक आरोग्याचा, तुम्हाला गर्भधारणा होईल किंवा नाही ह्यावर लक्षणीय परिणाम होतो. आयव्हीएफ चा तुमच्या भावनिक आरोग्यावर परिणाम होतो म्हणून रोलर-कोस्टर राईडसाठी तुम्ही तयार रहा. तुम्हाला कुठल्याही प्रकारची भीती वाटत असल्यास आपल्या सल्लागाराशी बोला. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान तुमचा जोडीदार, जवळचे मित्र आणि कुटुंबीय ह्यांची मदत घ्या.

7. कठोर व्यायाम टाळा

आरोग्य चांगले राखण्यासाठी व्यायाम करणे गरजेचे आहे. कठोर व्यायामामुळे स्त्रियांमधील प्रजनन क्षमता कमी होऊ शकते. तसेच गर्भधारणेची शक्यता सुद्धा कमी होते. जड व्यायाम केल्यामुळे इम्प्लांटेशन अयशस्वी होण्याची शक्यता असते. आणि गर्भधारणा होण्याची शक्यता दुप्पट असते. त्यामुळे तुमच्या आयव्हीएफ प्रक्रियेदरम्यान चालणे, योग किंवा पोहणे यासारख्या कमी तीव्रतेच्या व्यायामाची निवड करा.

8. भरपूर झोप घ्या

आयव्हीएफ प्रक्रियेपूर्वी किमान दोन आठवडे तुमचे झोपेचे चक्र सामान्य असले पाहिजे. लवकर झोपा. दिवसातून किमान आठ तासांची झोप घ्या. संपूर्ण अंधारात झोपल्याने शरीरातील मेलाटोनिनची पातळी नियंत्रित होण्यास मदत होते. त्यामुळे तुमचे शारीरिक तसेच भावनिक आरोग्य सुधारते.

9. निरोगी वजन राखा

तुमचा बॉडी मास इंडेक्स (BMI) चा आयव्हीएफ प्रक्रियेवर परिणाम होतो. लठ्ठपणा (BMI>35) किंवा कमी वजन (BMI<19) ह्यामुळे तुमचा गर्भधारणेचा त्रास अनुक्रमे 2 आणि 4 पट वाढू शकतो. जास्त वजनामुळे गुंतागुंत देखील होऊ शकते. जर तुमचे वजन खूप कमी किंवा खूप जास्त असेल, तर तुमच्या आहारात आणि जीवनशैलीत बदल केल्याने आणि कार्डिओ वजन कमी करण्याच्या कार्यक्रमात नावनोंदणी केल्याने तुम्हाला लवकर आई होण्यास मदत होऊ शकते.

10. धूम्रपान सोडा

धुम्रपानामुळे अंडी आणि शुक्राणूंच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. त्यामुळे आयव्हीएफद्वारे गर्भधारणेची शक्यता खूपच कमी होते. कुटुंब आणि मित्रांच्या पाठिंब्याने, धूम्रपान सोडणे शक्य आहे.

11. पूरक आहार घ्या

तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोलू शकता आणि तुमच्यासाठी उपयुक्त पूरक आहार लिहून देण्यास सांगू शकता. DHEA आणि CoQ10 सारखी औषधे शुक्राणू आणि अंड्याची गुणवत्ता सुधारू शकतात. व्हिटॅमिन डी पूरक देखील उपयुक्त आहेत. आयव्हीएफ प्रक्रियेदरम्यान तुमच्या शारीरिक आणि भावनिक आरोग्याची चांगली काळजी घेतल्याने गर्भधारणा होण्याची शक्यता वाढू शकते.
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved