गर्भारपण

सी सेक्शन प्रसूतीमध्ये टाक्यांना संसर्ग होणे – प्रकार, कारणे, लक्षणे आणि उपचार

मातृत्वाच्या आनंदाची तुलना दुसऱ्या कशाशीही होऊ शकत नाही. आता तुम्हाला बाळ झाले आहे. तुम्ही सगळा वेळ तुमच्या बाळासोबत घालवण्याचा विचार करीत असाल आणि तुम्ही लगेचच तुमच्या बाळाची काळजी घ्यायला सुरुवात देखील केली असेल! पण जर तुमची सिझेरियन प्रसूती झाली असेल तर आधी स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. सी-सेक्शनची संपूर्ण प्रक्रिया तीव्र शस्त्रक्रियेची असते. त्यामुळे  सिझेरियननंतर संसर्ग होण्याचा धोका असतो. जखम बरी होण्यास वेळ लागतो आणि टाके पडून जातात. परंतु जर  एखादा संसर्ग टक्क्यांपर्यंत पोहोचला तर जास्त काळजी घेण्याची गरज असते. सी-सेक्शन प्रसूतीनंतर जर टाक्यांना संसर्ग झाला तर प्रभावीपणे वैद्यकीय उपचार केले जाऊ शकतात - ते कसे केले जातात ते जाणून घेऊया!

सी-सेक्शन प्रसूतीनंतर टाक्यांना संसर्ग होणे म्हणजे काय?

सी-सेक्शन म्हणजे शरीरावर केली जाणारी शस्त्रक्रिया आहे. ही शस्त्रक्रिया म्हणजे एक प्रकारची जखम आहे. टाक्यांमध्ये संसर्ग झाल्यास आणखी गुंतागुंत निर्माण होऊ शकते.

सिझेरियन प्रसूतीनंतर टाक्यांना संसर्ग होण्याची कारणे

वैद्यकशास्त्रातील प्रगतीमुळे आज संसर्ग होण्याची शक्यता खूपच कमी असली तरी, काही घटकांमुळे धोका वाढू शकतो. त्यापैकी काही घटक खालीलप्रमाणे आहेत:
 1. शस्त्रक्रिया सुरू असताना किंवा प्रसूतीदरम्यानही मोठ्या प्रमाणात रक्त कमी होणे
 2. सिझेरियन प्रसूती आणि सामान्य प्रसूतीला नेहमीपेक्षा जास्त काळ लागणे
 3. आधीची सिझेरियन प्रसूती
 4. गर्भजलाला संसर्ग झाल्यामुळे प्रसूती सुरु असताना कोरिओअमॅनिओनाइटिस होणे
 5. मधुमेह किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करणारे एचआयव्ही सारखे रोग होणे
 6. लठ्ठपणामुळे जास्त चरबीचा थर
 7. जेव्हा सूक्ष्मजंतू सी-सेक्शन जखमेच्या संपर्कात येतात तेव्हा स्टॅफिलोकोकस ऑरियस, किंवा स्टॅफ बॅक्टेरिया, हे सिझेरियनच्या जखमेच्या संसर्गास कारणीभूत असतात. 15-20%प्रकरणांमध्ये हेच सूक्ष्मजंतू कारणीभूत असल्याचा अंदाज आहे. इतर सूक्ष्मजंतू मध्ये एस्चेरिचिया कोलाई आणि एन्टरोकोकस यांचा समावेश होतो
 8. आईचे वजन वाढते
 9. इमर्जन्सी सिझेरियन डिलिव्हरी
 10. आवरण फाटणे
नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार, असे आढळून आले आहे की प्रसूतीनंतर नायलॉन किंवा स्टेपल टाके  घेणार्‍या स्त्रियांना हा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. यासाठी, सुचवलेला सर्वोत्तम पर्याय म्हणजे पॉलीग्लायकोलाइड (पीजीए) टाके होय. कारण ते आपोआप विरघळतात.

सी-सेक्शन प्रसूतीनंतर टाक्यांना संसर्ग झाल्याची चिन्हे आणि लक्षणे

सी सेक्शन प्रसूतीमध्ये जखमेच्या आजूबाजूच्या भागाचे निरीक्षण करून टाक्यांना संसर्ग झाला आहे किंवा नाही ह्याचा अंदाज लावला जाऊ शकतो. जर तुम्ही स्वतः जखम पाहू शकत नसाल तर, इतर कुणाकडून तरी त्या भागाची तपासणी करून घ्यावी. काही वेळेला संसर्ग झालेला असू शकतो.

सी-सेक्शन प्रसूतीमध्ये टाक्यांना झालेल्या संसर्गाचे निदान

सी-सेक्शन नंतरच्या संसर्गाचे प्रकार

सी-सेक्शननंतर खालील प्रकारचे संसर्ग होऊ शकतात.

1. सेल्युलाईटिस

जेव्हा जखमेजवळील भाग लालसर होऊन त्याला सूज येते तेव्हा हे सेल्युलायटिसचे एक मजबूत लक्षण असते. हा प्रामुख्याने स्टेफिलोकोकल किंवा स्ट्रेप्टोकोकल स्ट्रेनशी संबंधित विशिष्ट जीवाणूंमुळे झालेल्या संसर्गाचा परिणाम आहे. अश्या परिस्थितीत क्वचितच पू होऊ शकतो.

2. पोटातील गळू

सी सेक्शनच्या चिरेभोवतीचा भाग सुजून मऊ झाला की, जखमेच्या कडेच्या आजूबाजूच्या भागाला देखील सूज येऊ लागते. यामुळे ऊतींच्या पोकळीत जीवाणूंचा संसर्ग होतो आणि पू तयार होतो. तो जखमेतून बाहेर पडू लागतो.

3. एंडोमेट्रिटिस

काही वेळा, संसर्ग गर्भाशयापर्यंत पोहोचू शकतो आणि गर्भाशयाच्या आतील आवरणाला त्यामुळे समस्या निर्माण होऊ शकते. जिवाणूंच्या संसर्गामुळे गळू तयार होतो, परिणामी एंडोमेट्रिटिस नावाची स्थिती उद्भवते. त्यामुळे ओटीपोटात तीव्र वेदना होतात आणि योनीतून स्त्राव होतो, तसेच खूप ताप सुद्धा येतो.

4. थ्रश

कॅन्डिडा नावाच्या शरीरात असलेल्या बुरशीमुळे, थ्रश सामान्यत: कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या स्त्रियांमध्ये आढळते. हे क्षेत्र निरोगी ठेवण्यासाठी चांगले बॅक्टेरिया नसल्यामुळे यीस्ट संसर्ग किंवा तोंडावर फोड देखील होऊ शकतात.

5. मूत्रमार्गात संक्रमण

काही स्त्रियांना लघवी जाण्यासाठी कॅथेटरची आवश्यकता असू शकते. यामुळे इ.कोलाय नावाच्या जिवाणूमुळे मूत्रमार्गात संसर्ग होण्याची शक्यता वाढते.

6. इम्पेटिगो

इम्पेटिगो हा त्वचेचा संसर्ग आहे. त्यामुळे खाज सुटून वेदना होतात. ग्रुप ए स्ट्रेप जिवाणूंमुळे हा संसर्ग होतो आणि संक्रमित भागात द्रवाने भरलेल्या फोडांच्या स्वरूपात दिसू लागतो. हा संसर्ग अत्यंत संसर्गजन्य.

सी-सेक्शन प्रसूतीनंतर टाक्यांना झालेल्या संसर्गामुळे निर्माण होणारी गुंतागुंत

 1. नेक्रोटाइझिंग फॅसिटायटिस- शरीराच्या निरोगी ऊतींना संसर्ग होऊ शकतो
 2. फेशियल रप्चर- शरीराच्या निरोगी ऊतींना आणखी संसर्ग होतो
 3. जखमेची निर्जंतुकता- टाके आणि बरे झालेले थर पुन्हा उघडले जातात
 4. जखमा बाहेर काढणे- सर्वात वाईट स्थिती म्हणजे जेथे जखम पूर्णपणे उघडते आणि त्यातून आतडे बाहेर पडू लागते

सी-सेक्शन संसर्ग उपचार

 1. जखम व्यवस्थित बरी होत आहे की नाही किंवा त्या भागातून द्रव गळत आहे की नाही हे पाहण्यासाठी नियमित तपासणी करा
 2. जखम बरी होण्यासाठी गळूमधील पू काढून टाकला पाहिजे
 3. जखम पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी आणि कोणतेही बॅक्टेरिया काढून टाकण्यासाठी निर्जंतुकीकरण सलाईन द्रावण वापरावे
 4. जर द्रवपदार्थ अजूनही गळत असेल, तर जखम शोषून घेण्यास मदत करणार्‍या निर्जंतुक पट्ट्यांचा वापर करावा
 5. जखमेची साफसफाई आणि मलमपट्टी नियमितपणे केली पाहिजे

सिझेरियन प्रसूतीनंतर संसर्ग होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय

सी-सेक्शनच्या जखमेच्या उपचारात मदत करू शकतील अशा काही टिप्स

 1. वेदना आणि सूज यावर उपचार करण्यासाठी तुम्ही नियमित औषधे घ्या
 2. शिंकताना तुमच्या पोटाला आधार द्या आणि तुमच्या पाठीला कोणताही ताण न पडता सरळ चाला
 3. भरपूर द्रवपदार्थ घ्या
 4. कोणतीही जड वस्तू उचलू नका
 5. स्तनपान करताना शक्य तितकी विश्रांती घ्या

सिझेरियन विभागातील संसर्ग आणि स्तनपान

सी-सेक्शनमुळे तुम्हाला संसर्ग झाल्यास तुमच्या बाळाला स्तनपान करणे थोडे कठीण होऊ शकते. अशा वेळी, स्तनपान करताना फुटबॉल होल्ड ह्या स्थितीत बाळाला स्तनपान करा. बाळाला एका बाजूला धरण्यासाठी तुमचे कोपर वाकवा. बाळाच्या डोक्याला आधार देऊन त्याला स्तनाच्या जवळ आणा. हे करत असताना उशीचा वापर केल्याने तुम्हाला आवश्यक आधार मिळू शकतो.

डॉक्टरांना कधी फोन कराल?

तुम्हाला कोणतीही असामान्य लक्षणे आढळल्यास, तुम्ही विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा:

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1. सी-सेक्शनची जखम का दुखते?

स्कार एंडोमेट्रिओसिस ही एक दुर्मिळ स्थिती आहे. ह्या समस्येमध्ये एंडोमेट्रियल टिश्यू गर्भाशयाच्या भित्तिकांच्या आत आणि बाहेर वाढतात. ह्यामुळे जखमेकडील भागात दुखापत होऊ शकते. ह्या समस्येसाठी अनेक वैद्यकीय आणि सर्जिकल उपचार पर्याय उपलब्ध आहेत.

2. सी-सेक्शनकेल्यानंतर टाक्यांमध्ये पू होणे सामान्य आहे का?

नाही, सी-सेक्शनच्या टाक्यांमध्ये पू होणे सामान्य नाही. सी सेक्शननंतर लालसरपणा आणि सूज ही लक्षणे सामान्य आहेत. परंतु सी-सेक्शनच्या जखमेच्या ठिकाणी पू होणे हे सामान्य नाही. हे शस्त्रक्रियेच्या जागी संसर्ग झाल्याचे लक्षण आहे.

3. सिझेरियन सेक्शन नंतर अंतर्गत टाके उघडू शकतात का?

सी-सेक्शननंतर गर्भाशयावरील आतल्या बाजूचे टाके उघडू शकतात. परंतु, टाक्यांमध्ये पू होणे दुर्मिळ आहे.

4. सिझेरियन दरम्यान किती स्तर कापले जातात?

सिझेरियन करण्याच्या प्रक्रियेत, गर्भाशयाचे तीन स्तर काळजीपूर्वक कापले जातात. सर्वात बाहेरचा थर म्हणजे सेरोसल लेयर होय. मधला थर स्नायूंचा असतो त्यास मायोमेट्रियम म्हणतात आणि शेवटच्या सर्वात आतील श्लेष्मल थरास एंडोमेट्रियम म्हणून ओळखले जाते. शस्त्रक्रियेदरम्यान हे थर काळजीपूर्वक कापले जातात. असे केल्याने शस्त्रक्रिया प्रक्रियेदरम्यान बाळापर्यंत सुरक्षित पोहोचता येते. सी-सेक्शन नंतर अंतर्गत संसर्ग झाल्यास शस्त्रक्रियेतून नुकतीच बरी झालेली आई खूपच कमकुवत होऊ शकते. नवजात बाळाची काळजी घेताना असे झाल्यास खूप अस्वस्थता येते. या टप्प्यावर तुमच्या पतीचा पाठिंबा अत्यंत आवश्यक आहे.  तुम्ही लवकर बरे होण्यासाठी आणि मातृत्वाचा प्रवास सुरू करण्यासाठी तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत असता. तुमची सिझेरिअन प्रसूतीनंतरची जखम बरी होण्यासाठी आवश्यक काळजी घ्या.
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved