तुमच्या गरोदरपणाच्या नऊ महिन्यांच्या कालावधीत तुम्ही खजूर खाल्ल्यास प्रसूती सुलभ होण्यास मदत होते हे खरे आहे का? खजूर खाल्ल्याने प्रसूतीस कशी मदत होते? ह्या प्रश्नांची उत्तरे ह्या लेखात दिलेली आहेत. तसेच गर्भारपण आणि खजूर यांच्यातील संबंध ह्याविषयीची माहिती देखील आपण ह्या लेखाद्वारे घेणार आहोत.
आई आणि बाळ दोघांसाठी खजूर फक्त सुरक्षित नाही तर फायदेशीरही आहे. खजुरामध्ये फ्रक्टोज असते त्याचे त्वरित विघटन होऊन ते खराब होते. रक्तातील साखरेची पातळी न बदलता त्वरित ऊर्जा प्राप्त होते. गरोदरपणात खजूर खाणे चांगले आहे कारण त्यामध्ये रेचक गुणधर्म असतात आणि ते गर्भाशयाच्या आकुंचनमध्ये मदत करतात. त्यामुळे प्रसूतीचा कालावधी कमी होण्यास मदत होते.
संशोधनात असे दिसून आले आहे की गरोदरपणात खजूर खाल्ल्याने प्रसूतीसाठी लागणारा कालावधी कमी होतो आणि प्रसूतीवर सकारात्मक परिणाम होतो.
येथे एक तक्ता दिलेला आहे. ह्या तक्त्यामध्ये 100 ग्रॅम खजूरमधील पौष्टिक सामग्री दर्शवलेली आहे.
ऊर्जा | 227 Kcal |
फायबर | 6.7 g |
प्रथिने | 1.8 g |
लोह | 0.9 mg |
फोलेट | 15 mcg |
चरबी | 0.2 g |
व्हिटॅमिन के | 2.7 mcg |
पोटॅशियम | 696 mg |
मॅग्नेशियम | 54 mg |
गरोदर स्त्रियांना खजूर खाण्याची शिफारस केली जाते कारण त्यामुळे ऍनिमिया कमी होतो तसेच मॉर्निंग सिकनेसच्या आजाराचा सामना करण्यास मदत होते. रक्तदाब आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते, विषारी पदार्थांपासूनमुक्ती मिळते, प्रतिकारशक्ती वाढते. तसेच शरीरातील निरोगी कॅल्शिअमचे प्रमाण वाढते. खजुरामध्ये विविध पोषक तत्वे असतात आणि त्यामुळे स्त्रियांना त्याची मदत होते. त्यापैकी काही पोषक तत्वे इथे दिलेली आहेत.
गरोदरपणात खजूर खाण्याचे काही फायदे येथे दिलेले आहेत.
गरोदरपणात खजूर केव्हा खावेत असा एक सामान्य प्रश्न गरोदर स्त्रिया विचारात असतात. गरोदरपणात खजूर कधी खाणे सुरू करावे हे माहिती करून घेण्यासाठी पुढे वाचा:
पहिल्या तिमाहीत खजूर खाणे महत्वाचे आहे कारण या काळात बद्धकोष्ठता ही एक मोठी समस्या आहे.पचन चांगले होण्यासाठी आणि अस्वस्थता टाळण्यासाठी खजूर खा. तथापि, जर तुम्हाला मधुमेह किंवा ग्रुप बी स्ट्रेप संसर्ग (गर्भवती महिलेच्या गुदाशय किंवा योनीमध्ये आढळलेला संसर्ग) असेल तर पहिल्या तिमाहीत खजुराचे सेवन मर्यादित प्रमाणात ठेवा.
जर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी जास्त असेल किंवा तुमची ग्लुकोज चाचणी सामान्य नसेल तर दुसऱ्या तिमाहीत खजूर खाणे टाळा कारण या काळात गरोदरपणातील मधुमेह होण्याची शक्यता खूप जास्त असते. परंतु तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोलून निर्णय घेऊ शकता कारण थोडे खजूर खाल्ल्याने कोणतेही नुकसान होणार नाही.
तिसऱ्या तिमाहीमध्ये खजूर खाणे चांगले असते कारण त्यामुळे प्रसूतीसाठी लागणारा कालावधी कमी होतो तसेच प्रसूतीची संपूर्ण प्रक्रिया सुलभ होण्यास मदत होते. नैसर्गिक रेचक गुणधर्मांमुळे गर्भाशयाचे आकुंचन होण्यास मदत होईल. ३६ व्या आठवड्यापासून म्हणजे प्रसूतीच्या अपेक्षित तारखेपासून चार आठवडे दिवसभरात सहा खजूर खाण्यास सुरुवात करा.
अनेक स्त्रिया उन्हाळ्यात खजूर खाणे टाळतात कारण त्यांना वाटते की यामुळे त्यांचे पोट खराब होईल. तथापि, हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले नाही.
गरोदरपणात, स्त्रीच्या शरीरात वेगवेगळ्या शारीरिक आणि हार्मोनल बदलांमुळे उष्णता निर्माण होते - जास्त खजूर खाल्ल्याने उष्णता वाढू शकते. कोणतीही गुंतागुंत टाळण्यासाठी गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात खजुराचे सेवन मर्यादित करा.
हवामान काहीही असो, खजूर जास्त प्रमाणात खाऊ नयेत. हिवाळ्यात तुम्ही खजुराचे सेवन वाढवू शकता कारण तयार होणारी उष्णता थंडीवर मात करण्यास मदत करेल आणि तुम्हाला आवश्यक पोषक तत्वे देखील प्रदान करेल.
नियमानुसार, गर्भाच्या योग्य विकासासाठी तुम्हाला दररोज 300 कॅलरीज अतिरिक्त लागतील. अशा प्रकारे, या सर्व कॅलरींच्या वापरासाठी आरोग्यदायी तसेच पोषक तत्वांनी भरलेले पर्याय निवडा. कमी पोषण आणि साखरेचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ टाळा. फोलेट, लोह, कॅल्शियम आणि पोटॅशियम हे गरोदरपणात तुमच्या शरीराला आवश्यक असलेले सर्वात महत्वाचे पोषक घटक आहेत आणि खजुरापासून तुम्हाला ही सर्व पोषक तत्वे मिळतात.
गरोदरपणात खजूर खाण्याचे अनेक मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे अर्थातच खजूर आहेत तसे खाणे. तुम्ही खजूर कसे खाऊ शकता याबद्दल आणखी काही पर्याय इथे दिलेले आहेत.
खजूरचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. काही मऊ असतात आणि त्यात जास्त आर्द्रता असते, तर काही प्रकार कोरडे असतात आणि ते चघळता येऊ शकतात. खजुराचा प्रकार कोणताही असला तरी सुद्धा तुम्ही याचा वापर असंख्य स्नॅक्स आणि पाककृती बनवण्यासाठी करू शकता. गरोदरपणात तुम्ही कोणत्या प्रकारच्या खजूर खाऊ शकता ते पाहूया:
यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. अशा प्रकारचे खजूर ऍनिमिया टाळण्यास मदत करतात. असे खजूर आईच्या दुधाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि प्रसूतीनंतर रक्तस्त्राव रोखण्यासाठी देखील ओळखले जातात.
या विविध प्रकारच्या खजुरांमध्ये गर्भवती स्त्रीला आवश्यक असणारे सर्व पोषक घटक असतात. असे खजूर कार्बोहायड्रेट्सचे उत्कृष्ट स्त्रोत आहेत आणि त्यामध्ये चरबी कमी असलेले घटक असतात. ह्यामध्ये भरपूर प्रमाणात तंतुमय पदार्थ आणि प्रथिने असतात. अश्या प्रकारचे खजूर तुम्ही गरोदरपणात खाऊ शकता. मेडजूल खजूरमध्ये व्हिटॅमिनचे प्रमाण जास्त असते - फोलेट, नियासिन, पॅन्टोथेनिक ऍसिड, पायरिडॉक्सिन, रिबोफ्लेविन, थायामिन आणि ए, सी आणि के सारखी इतर जीवनसत्त्वे सुद्धा ह्यामध्ये भरपूर प्रमाणात असतात. अशा प्रकारच्या खजूरामधील लोहाचे प्रमाण खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते आणि तुमचे हृदय निरोगी ठेवते. अँटिऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्स काढून टाकतात आणि कॅन्सरलाही प्रतिबंध करतात.
गरोदरपणात खजूर खाणे असुरक्षित असल्याचे कुठल्याही अभ्यासाद्वारे निदर्शनास आलेले नाही. खरं तर, पहिल्या आणि तिसर्या तिमाहीत खजूर खाणे हे तुमच्या आरोग्यासाठी तसेच तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. परंतु, जर तुम्ही जास्त प्रमाणात खजूर खाल्ले तर खालील परिणाम दिसू शकतात.
आपण किती खजूर खात आहात याची काळजी घेणे आवश्यक आहे. जास्त खाल्ल्याने वजन वाढू शकते आणि आरोग्याच्या इतर समस्या उद्भवू शकतात.
खजुरामध्ये भरपूर पोषक तत्वे असतात आणि त्यामुळे खजूर खाणे सोपे असते. अनादी काळापासून गरोदर स्त्रियांसाठी खजूर हा एक चांगला अन्नपदार्थ आहे असे म्हटले जाते तसेच गर्भवती महिलांनी त्यांच्या दैनंदिन आहारात खजूर समाविष्ट करण्याची शिफारसही डॉक्टरांनी केली आहे. जर तुम्ही आई होणार असाल आणि तुमच्या आहारात खजूर समाविष्ट करण्याचा विचार करत असाल तर प्रथम तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. सेंद्रिय खजूर देणारे ब्रँड शोधा कारण त्यामध्ये रासायनिक आणि संरक्षक घटक नसतात. ताज्या खजूरांचे सेवन करणे चांगले. ते मध्यम प्रमाणात खा आणि म्हणजे तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही!
आणखी वाचा:गरोदरपणात अंजीर खाणे गरोदरपणात सुकामेवा खाणे – फायदे आणि जोखीम