गर्भारपण

गरोदरपणातील झोपेची समस्या – कारणे आणि उपाय

झोप हा मानवी जीवनातील महत्वाचा पैलू आहे. झोप शरीराला शारीरिक, भावनिक आणि मानसिकदृष्ट्या पुनर्प्राप्त करण्यात मदत करते. झोपेच्या कमतरतेमुळे नैराश्य आणि चिंता यासारखे गंभीर मानसिक दुष्परिणाम होऊ शकतात. जर तुम्ही गरोदर असाल तर झोपेच्या कमतरतेची समस्या येते. त्यामुळे आधीच तणावग्रस्त असलेल्या शरीराच्या आणि मनाच्या समस्या आणखी वाढतात.

व्हिडिओ: गरोदरपणातील झोपेच्या समस्या कारणे आणि उपाय

https://youtu.be/c4hBA623OMY

गरोदरपणात नीट झोप लागणे कठीण का असते?

गरोदरपणात निद्रानाश होणे खूप सामान्य आहे कारण शरीराच्या रासायनिक रचनेत प्रत्येक तिमाहीत मूलभूत बदल होतात आणि शरीराला अनुकूल होण्यासाठी काही महिने लागतात. 2016 मध्ये केलेल्या एका अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की 78% स्त्रियांना गरोदरपणात झोपेचा त्रास होतो. झोपेबद्दल एक सामान्य गैरसमज आहे आणि तो म्हणजे झोपेच्या गुणवत्तेपेक्षा प्रमाण महत्वाचे असते. आरईएमचे एकापेक्षा जास्त चक्र पूर्ण करण्यासाठी 'गाढ झोपेची' इष्टतम खोली गाठणे जवळजवळ अशक्य आहे. हे गर्भवती महिलांच्या झोपेची गुणवत्ता कशी आहे हे पाहण्यासाठी एक उपाय म्हणून कार्य करते.

ह्याचाच अर्थ जर समजा एखादी गर्भवती स्त्री दिवसभरात ८ तास झोपली, तर झोपेचे सातत्य आणि खोली मर्यादित असल्याने तिची झोप एकूण २ तास इतकीच असते. गर्भवती महिलांना त्यांच्या शरीराबद्दल आणि त्याच्या स्थितीबद्दल अति-जागरूक म्हणून ओळखले जाते. हे एक वरदान आहे तसेच तो शाप सुद्धा आहे. जेव्हा गोष्टी ठरवल्याप्रमाणे होत नाहीत किंवा चुकीच्या होतात तेव्हा जागरूक असण्याचा फायदा होतो. तुम्ही झोपण्याचा प्रयत्न करत असताना तुम्ही स्वतःबद्दल जागृत असता त्यामुळे तुम्ही वारंवार जागे होता आणि त्यामुळे आरईएम चक्रांची संख्या कमी होते. अशा प्रकारे, गरोदरपणाचा नंतरचा टप्पा सुरु झाल्यानंतर झोपेची गुणवत्ता कमी होते. गरोदरपणात निद्रानाशाबद्दल सहसा बोलले जात नाही. परंतु ह्या आव्हानाचा सामना तुम्हाला करावा लागतो आणि तुमच्यावर त्याचा परिणाम होतो.

गरोदरपणात झोप न येण्यामागील कारणे

प्रत्येक त्रैमासिकात स्वतःची मानसिक आव्हाने येतात आणि त्यामुळे तुमच्या झोपेवर परिणाम होतो. त्यामुळे तुम्ही गरोदरपणात होणाऱ्या निद्रानाशाचा सामना करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात करणे महत्त्वाचे आहे. निरोगी आरईएम चक्राच्या दिशेने पहिले पाऊल म्हणजे गरोदरपणात निद्रानाशाची कारणे समजून घेणे.

. वारंवार लघवी होणे

. भावनिक ताण

. शारीरिक ताण

. छातीत जळजळ होणे

. पायात पेटके येणे

. नाक चोंदणे

. स्लीप एपनिया

. निद्रानाश

गरोदरपणातील झोपेच्या समस्यांसाठी उपाय

निद्रानाश ही एक मोठी चिंतेची बाब बनू शकते. त्याचा परिणाम आई आणि बाळ दोघांवर होतो. गरोदरपणातील झोपेसाठी काही टिप्स इथे दिलेल्या आहेत-

1. दुपारच्या जेवणानंतर तुम्हाला जास्त वेळ जागे ठेवणारी कोणतीही गोष्ट टाळा. यामध्ये एनर्जी ड्रिंक्स, कॉफी आणि मसालेदार पदार्थांचा समावेश आहे.

2. कोमट दूध हे उत्तम आरामदायी मानले जाते, रात्री झोपताना एक ग्लास कोमट दूध प्या

3. रात्रीचे जेवण आणि झोपण्याच्या वेळेत स्वतःला ब्रेक द्या. पाण्याबाबतही असेच म्हणता येईल. झोपण्याच्या किमान २ तास आधी अन्न आणि पाणी दोन्हीचे सेवन करा. त्यामुळे पचनास मदत होते आणि आपल्याला चांगली झोप लागते.

4. खूप साखरेचे सेवन: झोपायच्या ४-५ तास आधी त्या गोड लालसेपासून दूर रहा.

5. स्क्रीन्स पासून दूर राहा. हे सिद्ध झाले आहे की तुमचा फोन, लॅपटॉप आणि टीव्ही इत्यादींमुळे रात्रीच्या वेळी प्रचंड तणाव निर्माण होतो. झोपताना कुठलाही स्क्रीन बघू नका.

6. आंघोळीसाठी मीठ आणि मेणबत्त्यांसह उबदार पाण्याने आंघोळ करण्याचा प्रयत्न करा आणि दिवसभराच्या ताणातून विश्रांतीसाठी मूड सेट करा.

7. लैंगिकदृष्ट्या सक्रिय राहण्यामुळे महत्वाची रसायने बाहेर पडतात. ही रसायने तुम्हाला शांत आणि आरामशीर ठेवतात. ह्यामुळे तणाव देखील कमी होतो आणि आपल्याला चांगली झोप घेण्यास मदत होते.

8. आपण हवेशीर असल्याची खात्री करा: खिडकी उघडा किंवा एसी चालू करा. तुम्हाला गुदमरल्यासारखे वाटत असल्यामुळे जाग येऊन झोपेमध्ये व्यत्यय येऊ शकतो, म्हणून तुमची खोली हवेशीर असल्याची खात्री करा.

9. स्वतःला सक्रिय ठेवण्याचा प्रयत्न करा: काही प्रसवपूर्व योग करा, ध्यान करा आणि थोडे चाला. त्यामुळे रक्ताभिसरणात मदत होते आणि तणाव कमी होतो.

10. कधीकधी, तुमच्या जोडीदाराशी तुमची भीती, निराशा आणि असुरक्षिततेबद्दल बोलल्याने तुम्हाला रात्री चांगली झोप लागण्यास मदत होते.

11. गरोदरपणात झोप नीट न लागणे ही एक अत्यंत निराशाजनक गोष्ट असू शकते. आपले स्वतःचे आरोग्य किंवा आपल्या बाळाचे आरोग्य धोक्यात न घालणे महत्वाचे आहे. त्यामुळे कोणतीही गोष्ट करण्याआधी किंवा कोणत्याही सवयी लागण्याआधी वैद्यकीय सल्ला घेणे महत्वाचे आहे.

तुमच्या गरोदरपणात कोणत्याही वेळी झोपेची समस्या येणे सामान्य आहे. तुमच्या आरोग्यासाठी आणि गर्भाच्या विकासासाठी तुम्हाला शांत झोप आवश्यक आहे. तुम्ही झोपेचे वेळापत्रक नीट तयार करा. तुम्हाला तुमच्या आयुष्यातील या महत्त्वपूर्ण काळात त्यामुळे विश्रांती मिळण्यास मदत होईल.

आणखी वाचा: गरोदरपणात झोपतानाच्या सर्वोत्तम स्थिती गरोदरपणात चांगली झोप लागण्यासाठी परिणामकारक टिप्स
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved