Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण आहार आणि पोषण गरोदरपणात कांदा खाणे सुरक्षित आहे का?

गरोदरपणात कांदा खाणे सुरक्षित आहे का?

गरोदरपणात कांदा खाणे सुरक्षित आहे का?

गरोदरपणात स्त्रीला असामान्य पदार्थ खाण्याची इच्छा होऊ शकते. काही स्त्रियांना गरदोरपणात लोणचे किंवा आईस्क्रीम खाण्याची इच्छा होते, तर काहींना कच्च्या भाज्या खाण्याची इच्छा असते. आज आपण एका विशिष्ट भाजीची चर्चा करणार आहोत आणि ती भाजी म्हणजे कांदे. काही स्त्रियांना गरोदरपणात कांदा खाण्याची खूप इच्छा होते. गरोदरपणात कांदा खाणे सामान्यतः सुरक्षित मानले जाते. खरं तर, गरोदरपणाच्या आहारात कांद्याचा समावेश केल्यास स्त्रीला अनेक आरोग्यविषयक फायदे मिळू शकतात. परंतु, काही गर्भवती महिलांना कांदा खाल्ल्यानंतर छातीत जळजळ होऊ शकते किंवा श्वासोच्छवासाचा त्रास होऊ शकतो. जर तुम्ही गरोदर असाल आणि तुमच्या गरोदरपणाच्या आहारात कांद्याचा समावेश करायचा असेल तर ते सुरक्षित आहे की नाही हे तुम्ही समजून घेतले पाहिजे!

कांद्याचे पौष्टिक मूल्य

कांद्यामध्ये एलियम फॅमिलीतील घटक असतात. हे घटक वैशिष्ट्यपूर्ण तीक्ष्ण सुगंध आणि चवीसाठी ओळखले जातात. कांद्यामध्ये अँटीकोलेस्ट्रॉल, अँटीइंफ्लॅमेटरी आणि कॅन्सरविरोधी गुणधर्म असल्यामुळे कांद्याला उत्तम औषधी मूल्य आहे. कांद्यामध्ये असलेले क्वेर्सेटिन, वनस्पती फ्लेव्होनॉइड असते हे घटक सोरायसिस, फ्लू आणि सामान्य सर्दीपासून संरक्षण देऊ शकतात.

कांद्यामध्ये कॅलरीज कमी असतात आणि त्यामध्ये खनिजे, अँटिऑक्सिडंट्स आणि सी तसेच बी ६ ह्यासारखे उपयुक्त पोषक घटक असतात. कांदा लोह, कॅल्शियम, फोलेट, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम इत्यादींचा देखील चांगला स्रोत आहे हे सर्व पोषक घटक गर्भवती महिलेसाठी आवश्यक आहेत. याव्यतिरिक्त कांद्यामध्ये फॉलिक ऍसिड आणि तंतुमय पदार्थ देखील असतात. हे घटक निरोगी नवीन पेशींच्या निर्मितीला मदत करतात. हृदयाचे आरोग्य, हाडांचे आरोग्य, प्रतिकारशक्ती आणि बाळाच्या वाढीसाठी जीवनसत्त्वे आणि खनिजे महत्त्वाची असतात. ही पोषकतत्त्वे चमकदार त्वचा आणि केसांसाठीही महत्त्वाची आहेत.

तुम्ही गरोदर असताना कांदा खाऊ शकता का?

शिजवलेला किंवा कच्चा कांदा खाल्ल्याने गरोदर स्त्रीला विविध आरोग्यविषयक फायदे होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही गरोदरपणात कांदे खाऊ शकता. परंतु ते कमी प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो.

गरोदरपणात कांदा खाण्याचे फायदे

गरोदरपणात कमी प्रमाणात कांदा खाणे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. कांद्याचे काही फायदे जाणून घेण्यासाठी वाचा.

. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास कांदा मदत करतो

कांदा व्हिटॅमिन सीचा एक चांगला स्त्रोत आहे. कांद्यामुळे गरोदर आईचीच नव्हे तर बाळाची सुद्धा रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होऊ शकते.

. कर्करोगापासून बचाव करण्यास मदत होते.

कांद्यामध्ये सेंद्रिय सल्फर संयुगे विपुल प्रमाणात असतात. ही संयुगे कर्करोगास कारणीभूत असलेल्या मुक्त रॅडिकल्सच्या वाढीशी लढा देऊन अनेक प्रकारच्या कर्करोगांना विशेषतः कोलोरेक्टल आणि पोटाच्या कर्करोगास प्रतिबंध करण्यास मदत करतात.

. केस आणि त्वचेचे आरोग्य सुधारते

कांदा हे व्हिटॅमिन ए, सी आणि इ चा चांगला स्रोत आहे. ही सर्व जीवनसत्त्वे त्वचा आणि केस निरोगी ठेवण्यास हातभार लावतात. ह्या जीवनसत्वांमुळे केस गळणे कमी होते तसेच ते अकाली वृद्धत्वास प्रतिबंध करतात.

केस आणि त्वचेचे आरोग्य सुधारते

. पचन चांगले होते

गरोदरपणात कच्चा कांदा खाल्ल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो कारण कांद्यामध्ये तंतुमय पदार्थ जास्त प्रमाणात असल्याने पचन सुधारते. गरोदरपणात कांदा खाल्ल्याने गॅस्ट्रिक अल्सरची शक्यता कमी होते आणि तुमचे पचन सुधारते, त्यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

. गर्भावस्थेतील मधुमेहाचा सामना करण्यास मदत करते

कांद्यामध्ये असलेली सल्फर संयुगे आणि क्वेर्सेटिन देखील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करतात. गरोदरपणातील मधुमेह टाळण्यास कांद्याची मदत होते. कांद्यामध्ये असलेले तंतुमय पदार्थ जीडीएममध्ये देखील मदत करू शकतात.

. झोप सुधारण्यास मदत होऊ शकते

कांद्यामध्ये प्रीबायोटिक्स असतात. त्यामुळे तणाव कमी होतो आणि झोप सुधारते. कांद्यामध्ये फोलेट देखील असते त्यामुळे शरीरातील होमोसिस्टीनची अतिरिक्त निर्मिती रोखली जाते. त्यामुळे गरोदरपणातील नैराश्याशी लढण्यास मदत होऊ शकते. होमोसिस्टीनच्या निर्मितीमुळे शरीरात फीलगुड हार्मोन्सचे प्रमाण बिघडते. त्यामुळे मूड स्विंग, तणाव आणि नैराश्य इत्यादी समस्या निर्माण होतात.

. रक्तदाब व्यवस्थापित करण्यात मदत होऊ शकते

गरोदरपणात कांदा खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होऊ शकते कारण कांद्यामध्ये भरपूर फायटोन्यूट्रिएंट्स आणि पोटॅशियम असते त्यामुळे उच्चरक्तदाबाशी संबंधित गुंतागुंत टाळता येते.

गरोदर असताना कांदे खाण्याचे संभाव्य दुष्परिणाम

गरोदर स्त्रीला कांद्याचे आरोग्यविषयक फायदे असले तरीसुद्धा, जास्त प्रमाणात कांद्याचे सेवन केल्यास काही दुष्परिणाम होऊ शकतात. कांद्याचे जास्त सेवन केल्याने होणारे दुष्परिणाम खाली नमूद केले आहेत:

. अतिसार आणि छातीत जळजळ

गरोदरपणात कांदा जास्त प्रमाणात खाल्ल्याने छातीत जळजळ किंवा कधी कधी अतिसार देखील होऊ शकतो.

. ऍलर्जीक प्रतिक्रिया

काही गर्भवती स्त्रिया कांद्याबद्दल असहिष्णु असू शकतात आणि जास्त प्रमाणात कांदे खाल्ल्याने त्यांना ऍलर्जी होऊ शकते. कांदा जास्त प्रमाणात खाल्ल्यानंतर काही महिलांना श्वास घेण्यास त्रास होतो.

कांदा ही एक आरोग्यदायी भाजी आहे आणि तुम्ही गरोदरपणाच्या आहारात कांद्याचा समावेश करू शकता. परंतु, खूप जास्त प्रमाणात कांदा खाऊ नका. ऍलर्जीक प्रतिक्रियांबद्दल तुम्हाला चिंता वाटत असल्यास डॉक्टरांचा किंवा आहारतज्ञांचा सल्ला घेणे उचित असते. तुम्हाला सुरक्षित आणि निरोगी गर्भारपणासाठी शुभेच्छा!

आणखी वाचा:

गरोदरपणात केळी खाणे
गरोदरपणात बीटरूट खाणे: आरोग्यविषयक फायदे आणि दुष्परिणाम

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article