In this Article
कोणत्याही स्त्रीसाठी गरोदरपणाचा काळ हा एक महत्त्वाचा काळ असतो. जर तुम्ही गरोदर असाल तर तुम्ही स्वतःची चांगली काळजी घेतली पाहिजे. गरोदरपणात निरोगी आणि पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे. तुमच्या गरोदरपणाच्या आहारात भाज्या, संपूर्ण धान्ये, फळे आणि सुका मेवा इत्यादींचा समावेश असणे आवश्यक आहे. हे सर्व पदार्थ पौष्टिक असणे गरजेचे आहे, परंतु असे काही पदार्थ असतात जे तुमच्या आरोग्यासाठी चांगले असतात आणि नसतात सुद्धा. असे पदार्थ, आपण टाळले पाहिजेत. ह्या लेखात आपण एका फळाची चर्चा करणार आहोत – अंजीर. जर तुम्हाला अंजीर खाण्यात आनंद वाटत असेल, तर तुमच्या गरोदरपणात अंजीर खाणे चांगले आहे की नाही हे तुम्ही जाणून घेतले पाहिजे.
गरोदरपणात अंजीर खाणे सुरक्षित आहे का?
अंजीर हे आरोग्यदायी फळांपैकी एक मानले जाते कारण त्यामध्ये भरपूर पोषक घटक असतात. गरोदर स्त्रियांसाठी अंजीर खाण्याची शिफारस केली जाते. अंजीर खाल्ल्याने गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळात, विशेषत: पहिल्या तिमाहीत मॉर्निंग सिकनेसचा सामना करण्यास मदत होते. गरोदरपणामध्ये तुमच्या शरीराच्या पौष्टिक गरजा पूर्ण करण्यास त्यामुळे मदत होऊ शकते.
अंजिराचे पौष्टिक मूल्य
खाली दिलेल्या तपशीलवार यादीमध्ये प्रति ५० ग्रॅम अंजिराचे पौष्टिक गुणधर्म दिलेले आहेत. त्यावर तुम्ही नजर टाकू शकता.
- कॅलरी – ४१ किलो कॅलरी
- आहारातील तंतुमय पदार्थ – २.३२ ग्रॅम
- व्हिटॅमिन बी ६ – ०.०८ मिग्रॅ
- पोटॅशियम – ११६ मिग्रॅ
- मॅंगनीज – ०.०४ मिग्रॅ
- तांबे – ०.१मिग्रॅ
- पॅन्टोथेनिक ऍसिड – ०.१३ मिग्रॅ
- जीआय – मध्यम
- प्रथिने – १.०१ ग्रॅम
- कर्बोदके – ८.१४ ग्रॅम
- चरबी – ०.१९ ग्रॅम
- एकूण साखर – ४.३२ ग्रॅम
गरोदरपणात तुम्ही दररोज किती प्रमाणात अंजीर खाऊ शकता?
गरोदरपणात अंजीर खाणे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. अंजिराचे सेवन माफक प्रमाणात केले पाहिजे कारण अंजिराच्या अतिसेवनाने गरोदरपणात रक्तातील साखर वाढू शकते. सामान्यत: गर्भवती स्त्रियांनी अंजीर हे फळ म्हणून वापरावे, औषध म्हणून नव्हे. तुम्ही स्नॅकच्या स्वरूपात दिवसातून १–३ अंजीर वेगवेगळ्या वेळी खाऊ शकता. तुम्ही कॉफी ब्रेक दरम्यान एखादे अंजीर खाऊ शकता किंवा सॅलड मध्ये घालू शकता. टीप: लक्षात ठेवा अंजिराचे सेवन कमी प्रमाणात करा. वरती नमूद केल्याप्रमाणे दररोज जास्तीत जास्त ३ अंजीर खा.
गरोदरपणात अंजीर खाण्याचे फायदे
गर्भवती स्त्रीच्या आरोग्यासाठी तसेच बाळाचे योग्य पोषण करण्यासाठी आवश्यक असणारे असंख्य घटक अंजिरामध्ये मध्ये असतात. हे घटक गर्भवती स्त्रीचे आरोग्य चांगले राखतात तसेच तिच्या बाळाचे योग्य पोषण करू शकतात. गरोदरपणात अंजीरचे सेवन करण्याचे काही फायदे खाली दिले आहेत:
1. हाडे मजबूत करण्यास मदत करते
अंजिरामध्ये असलेले कॅल्शियम गर्भाच्या तसेच आईच्या हाडांच्या आणि दातांच्या विकासास मदत करते. अंजीर हा कॅल्शियमचा उच्च स्रोत असल्याने गरोदरपणात आणि नंतर आईची हाडे मजबूत होण्यासाठी अंजिराची मदत होते, त्यामुळे दैनंदिन कामे पुन्हा सुरू करण्यासाठी स्त्री तंदुरुस्त आणि मजबूत राहते.
2. गर्भाच्या मेंदूच्या विकासात मदत होऊ शकते
अंजीर खाल्ल्यास त्याचे गर्भाच्या मेंदूच्या विकासात प्रशंसनीय योगदान आहे. अंजिरामध्ये ओमेगा–३ आणि फोलेट भरपूर प्रमाणात असतात, आणि ते मेंदूच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असतात.
3. तुमची लालसा नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते
गरोदरपणात, बर्याच स्त्रियांना सर्वसाधारणपणे विशिष्ट पदार्थ किंवा अन्नाची तीव्र इच्छा असते. अशा लालसेमुळे गर्भावस्थेतील मधुमेह किंवा लठ्ठपणा यासारख्या इतर गंभीर परिस्थिती उद्भवू शकतात. अंजीर त्याच्या अल्कधर्मी गुणधर्मामुळे अशा स्थितीस प्रतिबंध करण्यास मदत करते. अंजीर खाल्ल्याने तुमची लालसा नियंत्रित राहते.
4. अॅनिमियाचा धोका कमी होऊ शकतो
लोहाच्या कमतरतेमुळे गर्भाला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊ शकतो. अंजीर शरीराला पुरेशा प्रमाणात लोह सामग्री प्रदान करते. अंजिरामध्ये व्हिटॅमिन सी देखील भरपूर असते, आणि ते शरीरातील लोह शोषण्यास मदत करते. त्यामुळे गर्भवती स्त्रियांमध्ये अॅनिमियाचा धोका कमी होऊ शकतो.
5. पचन सुधारू शकते
अंजिरामध्ये भरपूर प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात, हे पदार्थ आतड्याची हालचाल नियंत्रित करण्यास आणि बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करतात. शिवाय, अंजिरामध्ये असलेले प्रोबायोटिक्स तुमच्या आतड्यातील चांगल्या जीवाणूंना मदत करतात आणि पचन सुलभ करतात.
6. मॉर्निंग सिकनेसपासून आराम मिळू शकतो
अंजिरामध्ये असलेले व्हिटॅमिन बी ६ हे मॉर्निंग सिकनेस कमी करण्यासाठी फायदेशीर असल्याचे मानले जाते.
7. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकते
अंजीर पोटॅशियमचा समृद्ध स्रोत आहे, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते. याशिवाय, त्यात जास्त प्रमाणात पॉलीफेनॉल अँटिऑक्सिडंट्स असतात आणि ते एथेरोस्क्लेरोसिस टाळण्यास मदत करतात.
8. कोलेस्टेरॉलची पातळी संतुलित करण्यास मदत होऊ शकते
अंजिरामध्ये ओमेगा-3, ओमेगा-6 फॅटी ऍसिडस् आणि फायटोस्टेरॉल सारखे पौष्टिक घटक असतात. हे घटक कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात. याव्यतिरिक्त, अंजिरामध्ये असलेला पेक्टिन हा घटक शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतो.
9. ग्लुकोज प्रदान करते
अंजीर गोड असतात आणि गरोदरपणात ग्लुकोजची गरज पूर्ण करण्याचा तो एक चांगला मार्ग आहे.
गर्भवती असताना अंजीर खाण्याचे दुष्परिणाम
अंजीर खाल्ल्यास त्याचा गरोदर स्त्रीला खूप फायदा होतो. परंतु त्याचे प्रमाण मध्यम असावे. ह्या फळाच्या अतिसेवनाने गरोदरपणात काही दुष्परिणाम होऊ शकतात, जसे की
- गरोदरपणात त्वचेच्या रंगद्रव्यावर उपचार करण्यासाठी अंजीराचा उपयोग होतो. परंतु काही वेळा, शरीरात जास्त प्रमाणात सोरॅलेन्सने (अंजीरात असलेले) प्रवेश केल्यास, त्वचेची गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. ह्या समस्येस फोटोडर्माटायटीस म्हणतात.
- माफक प्रमाणात अंजीर खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो. परंतु जास्त प्रमाणात अंजिराचे सेवन केल्यास त्याचा विपरीत परिणाम होतो. अंजीर जास्त प्रमाणात खाल्ल्यास रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी होऊ शकते.
- अंजिराच्या ऍलर्जिक प्रतिक्रियांच्या बाबतीत आपण काहीच अंदाज लावू शकत नाही आणि कोणत्याही वेळी त्या ट्रिगर होऊ शकतात. जरी आईमध्ये ऍलर्जीचा इतिहास नसला, तरीही बऱ्याच वेळा, गरोदरपणात होणाऱ्या संप्रेरकांमधील बदलांमुळे अंजीर खाल्ल्यावर ऍलर्जिक प्रतिक्रिया निर्माण होऊ शकतात
गरोदरपणात अंजीर कसे खावे?
खालीलपैकी एक किंवा अधिक पद्धतींनी तुम्ही तुमच्या आहारात अंजीर समाविष्ट करू शकता:
1. ताजे अंजीर
ताजे अंजीर खाणे हा उत्तम पर्याय आहे. ताजे अंजीर फ्रूट सॅलडमध्ये घालता येते. काही प्रमाणात फ्रेश क्रीम देखील तुम्ही त्यामध्ये घालू शकता.
2. सुके अंजीर
सुके अंजीर सोबत नेण्यास सोपे असतात. तुम्ही इतर सुक्या फळांसह काही सुके अंजीर एका डब्यात ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला काही स्नॅक्सची इच्छा असेल तेव्हा ते खाऊ शकता.
3. मिल्कशेक
२ कप दुधासोबत ब्लेंडरमध्ये १ ताजे अंजीर घाला. थोडासा व्हॅनिला अर्क घाला. सर्व साहित्य एकत्र मिसळा. तुमच्याकडे काही मिनिटांत अंजीर मिल्कशेक तयार होईल. जर तुम्हाला नुसते अंजीर खाणे आवडत नसेल तर तुमच्या आहारात अंजीराचा समावेश करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे
4. अंजीर स्मूदी
½ केळी आणि १–२ अंजीर ब्लेंडरमध्ये घालून त्यामध्ये एक कप दही आणि १ चमचा मध घाला. एकत्र मिसळा, आणि जर तुम्हाला पातळ सुसंगतता आवडत असेल तर अधिक दूध घाला. ही एक पॉवर–पॅक रेसिपी आहे. ही स्मूदी तुम्ही नाश्त्यासाठी घेऊ शकता.
अंजीर खाऊन आनंद तर मिळतोच परंतु त्यामुळे काही दुष्परिणाम दूर करण्यास सुद्धा मदत होते. परंतु अंजीर खाण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या आणि लक्षात ठेवा की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक आरोग्यासाठी हानिकारक असू शकतो आणि त्यास अंजीर सुद्धा अपवाद नाही.
आणखी वाचा:
गरोदरपणात बीटरूट खाणे: आरोग्यविषयक फायदे आणि दुष्परिणाम
गरोदरपणात आवळा खाणे – फायदे, खाण्याच्या पद्धती आणि बरंच काही