Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ आरोग्य लहान बाळांना होणाऱ्या कोरड्या खोकल्याचा सामना कसा कराल?

लहान बाळांना होणाऱ्या कोरड्या खोकल्याचा सामना कसा कराल?

लहान बाळांना होणाऱ्या कोरड्या खोकल्याचा सामना कसा कराल?

बाळांना खोकला येणे ही सामान्य गोष्ट आहे. हवेतील काही घटक अनेकदा श्वास घेताना फुफ्फुसात प्रवेश करतात आणि काही वेळा त्यामुळे कोरडी खोकला देखील होतो. खोकला हा एक प्रभावी माध्यम आहे ज्याद्वारे हे घटक फुफ्फुसांमधून बाहेर फेकले जातात. ह्याचा परिणाम म्हणजे कोरडा खोकला येऊन बाळ अस्वस्थ होते. कोरड्या खोकल्यामुळे मुलांच्या फुप्फुसात आणि घश्यात जळजळ होऊ शकते.

कोरडा खोकला म्हणजे काय?

कोरडा खोकला म्हणजे कफ, श्लेष्मा किंवा थुंकी नसलेली खोकला. कोरडा खोकला सहसा वरच्या श्वसनमार्गाच्या संसर्गाशी संबंधित असतो (नाक आणि घसा) ज्यामुळे सर्दी किंवा इन्फ्लूएंझासारख्या वैद्यकीय परिस्थिती उद्भवू शकते. मूल उबदार खोलीत राहिल्यास अशा परिस्थितीत कोरडा खोकला आणखी वाढू शकतो. काही वेळा, कोरडा खोकला श्वसनमार्गाच्या खालच्या भागातील संसर्गाशी संबंधित असू शकतो ज्यामुळे ब्राँकायटिस किंवा न्यूमोनिया होऊ शकतो

बाळांमध्ये कोरडा खोकला कशामुळे होतो?

जर बाळाला कोरड्या खोकल्याचा त्रास होत असेल तर ते खूप अस्वस्थ आणि वेदनादायक असू शकते. अशी अनेक कारणे आहेत ज्यांमुळे बाळांना कोरडा खोकला होतो. खाली त्यापैकी काहींचा उल्लेख केला आहेः

. सामान्य सर्दी

सामान्य सर्दीमुळे मुलांना कोरडा खोकला होतो. कोरडा खोकला हे सामान्य सर्दीचे पहिले लक्षण नसले तरी तो सर्दीच्या शेवटच्या टप्प्यात दिसून येतो. सर्दी हे एक व्हायरल इन्फेक्शन असते ज्यामुळे आपल्या बाळाला घशात अस्वस्थ वाटू शकते. सर्दीच्या सुरुवातीच्या अवस्थेत तुमच्या बाळाला सौम्य आणि ओल्या खोकल्याचा त्रास होऊ शकतो, परंतु सर्दी जसजशी वाढत जाईल तसतसे खोकलाही कोरडा होत जातो. आपल्या मुलाची सर्दी आणि खोकला शांत करण्यासाठी घरगुती उपाय चांगले कार्य करतात.

. गॅस्ट्रोयुसोफॅगेल रिफ्लक्स डिसीज

गॅस्ट्रोयुसोफॅगेल रिफ्लक्स डिसीज किंवा जीईआरडीचा परिणाम मुलांवरही होतो. जेव्हा आपल्या मुलाच्या पोटातील सामग्री अन्ननलिकाद्वारे परत येते तेव्हा जीईआरडी उद्भवते. उलट्या, जळजळ ह्यामुळे थोडासा त्रास होऊ शकतो. ऍसिडिटीमुळे बाळाच्या घशात जळजळ होऊ शकते, परिणामी कोरडा खोकला होतो. ही स्थिती बरी करण्यासाठी बरीच औषधे उपलब्ध आहेत. तथापि, बाळाला कोणतेही औषध देण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

. पर्यावरणातील घटक

कधीकधी बाळाला पर्यावरणातील घटकांची ऍलर्जी होऊ शकते ज्यामुळे कोरडा खोकला होऊ शकतो. ही स्थिती संवेदनशील बाळांमध्ये अधिक दिसून येते. तीव्र रासायनिक गंध, सिगारेटचा धूर किंवा जास्त कोरड्या व गरम हवेला ही मुले सहज प्रतिक्रिया देतात. आपल्या मुलास अशा पर्यावरण घटकांपासून दूर ठेवा. गरम हवामानामुळे होणाऱ्या कोरड्या खोकल्याचा सामना करण्यासाठी तुम्ही तुमच्या मुलाच्या खोलीत एक ह्युमिडिफायर वापरू शकता.

. इन्फ्लूएंझा

फ्लू किंवा इन्फ्लूएन्झाची लक्षणे सारखीच दिसू शकतात परंतु लहान मुले आणि बाळांमध्ये ही लक्षणे तीव्र असू शकतात. सामान्य सर्दीप्रमाणेच कोरड्या खोकल्यापासून इन्फ्लूएंझाची सुरूवात होते. इन्फ्लूएंझा जसजसा वाढत जाईल तसतसे खोकल्यासह कफ देखील दिसून येईल.

. डांग्या खोकला

डांग्या खोकला किंवा पेर्ट्यूसिसचा परिणाम बाळावर होऊ शकतो. डांग्या खोकला हा एक संसर्गजन्य जिवाणू संसर्ग आहे जो शिशुंच्या श्वसनमार्गावर परिणाम करतो. जर आपल्या बाळाला या अवस्थेत त्रास होत असेल तर बाळाला तीव्र आणि सतत खोकला येताना दिसेल. खोकताना बाळ एक विचित्र आवाजही काढेल. या स्थितीत खोकला अत्यंत कोरडा असतो आणि लहान मुलांमध्ये गुदमरण्याचा धोका असतो. ह्या खोकल्यासोबतच, तुमच्या मुलाच्या डोळ्यात अश्रू किंवा गुलाबीसर रंगाची छटा दिसू शकते.

बाळांना होणाऱ्या कोरड्या खोकल्यावरील उपचार

कोरडा खोकला होण्यामागे बरेच घटक कारणीभूत असतात आणि लक्षणांनुसार त्यासाठीचे उपचार बदलतात. तुमच्या बाळाच्या कोरड्या खोकल्यावरील उपचारांचा योग्य मार्ग पाळणे खूप महत्वाचे आहे. तुम्ही बालरोगतज्ञांना भेट द्या ते आपल्या बाळाची कसून तपासणी करतील आणि सर्वात योग्य उपचारांचा निर्णय घेतील. खाली आपल्या बाळावर उपचार करण्यात मदत करणारे काही उपाय आहेत

. सामान्य सर्दीमुळे होणाऱ्या कोरड्या खोकल्यावरील उपचार

सामान्य सर्दीमुळे होणारा कोरडी खोकला बरा करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे घरगुती उपचारांचा पर्याय. हे घरगुती उपाय केवळ फक्त सहजपणे उपलब्ध नसतात तर लहान मुले आणि बाळांसाठी सुरक्षित सुद्धा असतात. तथापि, बाळाला काहीही देण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

. जीईआरडीमुळे होणाऱ्या कोरड्या खोकल्यावरील उपचार

जर तुमच्या मुलाच्या कोरड्या खोकल्याचे कारण जीईआरडी असल्याचे निदान झाले तर त्याचे नेमके कारण काय आहे हे जाणून घेण्यासाठी डॉक्टर बाळाची कसून तपासणी करतील. एकदा तुमच्या डॉक्टरांना त्याचे कारण माहित झाले की त्यावर उपचार करण्यासाठी ते काही औषधे लिहून देतील. जीईआरडीच्या उपचारासाठी बरीच ओव्हरकाउंटर औषधे उपलब्ध असूनही, डॉक्टरांनी सांगितलेलीच औषधे घेणे योग्य आहे.

. पर्यावरणीय घटकांमुळे होणाऱ्या कोरड्या खोकल्यावरील उपचार

पर्यावरणातील घटकांमुळे होणारा कोरडा खोकला दूर करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे तुमच्या मुलाला बाहेरील जगाशी थोडीशी ओळख करून देणे. हिवाळ्याच्या वेळी तुमच्या बाळासाठी हवा ओलसर ठेवा आणि कृत्रिम ह्युमिडीफायर वापरणे लक्षात ठेवा आपण ह्युमिडिफायर नियमितपणे स्वच्छ करता आहात ना हे पहा कारण ते बॅक्टेरिया आणि जंतूंसाठी प्रजनन केंद्र बनू शकते. बाळाला त्रास होऊ शकेल अशा फवारण्या, डीओडोरंट्स किंवा रूम फ्रेशनर वापरणे टाळा. तुमच्या बाळाला आरामदायक, हवामानानुसार योग्य कपडे घालावे कारण खोकल्यामुळे त्याला घाम येईल. आरामदायक कपडे घातल्याने हवा खेळती राहील आणि तुमच्या बाळाच्या शरीराचे तापमान देखील नियंत्रित राहील.

. इन्फ्लूएंझामुळे होणाऱ्या कोरड्या खोकल्यावरील उपचार

जर तुमच्या मुलाचा कोरडा खोकला इन्फ्लूएन्झामुळे वाढत असेल तर, अँटिबायोटिक्स मुळे समस्या सुटणार नाही. डॉक्टर तुमच्या मुलास पुरेशी विश्रांती आणि निरोगी आहार घेण्यास सांगतील. तुमच्या मुलाने हायड्रेटेड राहणे आणि संक्रमणास तोंड देण्यासाठी पुरेसे द्रव सेवन करणे खूप महत्वाचे आहे. तुम्ही स्तनपान देत असल्यास, तुम्हाला ते तसेच चालू ठेवण्यास सांगितले जाते. जर तुम्ही बाळाला आईच्या दुधाशिवाय इतर खाद्य देणे सुरू केले असेल तर तुम्ही बाळाला कोमट आणि घरी केलेले सूप किंवा ताज्या फळांचा रस देखील देऊ शकता.

. डांग्या खोकल्यामुळे होणाऱ्या कोरड्या खोकल्यावरील उपचार

एकदा जर आपल्या डॉक्टरांनी हे सिद्ध केले की पेर्ट्यूसिस हा कोरडा खोकला आहे, तर ते बाळाला प्रतिजैविकांचा एक कोर्स लिहून देतील. जर तुमच्या मुलाचे वय १ वर्षापेक्षा कमी असेल तर समस्येचे अचूक निदान करण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले जाऊ शकते. डांग्या खोकला झालेला असताना गुदमरण्याची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे अशा परिस्थितीत योग्य वैद्यकीय पर्यवेक्षण उपयुक्त असल्याचे सिद्ध होते. तुमच्या बाळाला वेगळ्या वॉर्डमध्ये ठेवण्यात येईल कारण डांग्या खोकला हा अत्यंत संक्रामक आहे. जेव्हा तुमच्या बाळाला श्वास घेण्यास त्रास होतो तेव्हा तुमचे डॉक्टर कोर्टिकोस्टेरॉईड औषधोपचार करू शकतात. हे औषध गुदमरण्याची जोखीम कमी करते. तुमच्या बाळाचा श्वासोच्छवास सुरळीत सुरु रहावा म्हणून डॉक्टर ऑक्सिजन मास्कचा देखील वापर करू शकतात. बाळाची लक्षणे, वय आणि स्थिती हे घटक डॉक्टरांना सर्वात योग्य उपचारांबाबत निर्णय घेण्यास मदत करतात.

बाळांच्या कोरड्या खोकल्यासाठी घरगुती उपचार

बाळाला कुठलाही आजार झाल्याचे दिसताच आपल्या डोक्यात पहिल्यांदा घरगुती उपायांविषयी विचार सुरु होतात. येथे आम्ही काही सोप्या आणि प्रभावी घरगुती उपायांवर चर्चा करणार आहोत जे आपल्या मुलास कोरड्या खोकल्याशी लढायला मदत करतील. घरगुती उपचार करण्यापूर्वी तुम्ही बाळाच्या डॉक्टरांना त्याविषयी माहिती द्या. त्यामुळे डॉक्टरांना तुमच्या बाळासाठी कुठले घटक सर्वोत्कृष्ट कार्य करू शकतात हे समजण्यास मदत होईल.

तुमच्या बाळासाठी करून बघू शकता असे काही घरगुती उपचार खालीलप्रमाणे आहेत

जन्मापासून ते ६ महिने

जर आपल्या बाळाचे वय सहा महिन्यांपेक्षा कमी असेल तर कोरडे खोकला दूर करण्यासाठी आपण खालील घरगुती उपचारांचा वापर करू शकता:

. आईचे दूध

सहा महिन्यांपेक्षा कमी वयाच्या मुलासाठी, कोरड्या खोकलावर उपचार करण्यासाठी आईचे दूध हा एक उत्तम उपाय आहे. आवश्यकतेनुसार बाळाला आईचे दूध देत रहा. आईचे दूध पोषक तत्वांनी समृद्ध असते आणि बाळाला संसर्गाविरूद्ध प्रतिपिंड प्रदान करते.

. लसूण आणि ओवा

काही लसूण पाकळ्या आणि २३ चमचे ओवा कढईत भाजून घ्या. हा भाजलेला लसूण आणि ओवा मऊ कापडात घेऊन त्याची पुरचुंडी करा आणि बाळाच्या उशीवर किंवा पाळण्याजवळ ठेवा. लसूण आणि ओव्यांमध्ये असलेले अँटीबॅक्टेरियाचे गुणधर्म सर्दी आणि खोकल्याशी लढण्यासाठी प्रभावी आहेत

. हर्बल रब

मोहरीचे तेल, ओवा आणि लसूण वापरून हर्बल रब बनवू शकता. मोहरीच्या तेलाचा उष्णता वाढवण्याचा गुणधर्म आणि लसूण व ओव्याचे अँटीबॅक्टेरिअल गुणधर्म कंजेशनचा सामना करण्यास फायदेशीर ठरतात. कढईत मोहरीचे तेल गरम करून त्यात दोन लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचा ओवा घाला. तपकिरी झाल्यावर आचेवरून काढा. हे कोमट तेल आपल्या बाळाच्या छातीवर आणि पायांवर लावा.

. तुळस (तुळशी) आणि नारळ तेल

मुलांमध्ये कोरड्या खोकलावर उपचार करण्यासाठी हा एक प्रभावी उपाय आहे. पाव कप नारळाचे तेल घ्या आणि गरम करा. त्यात चिरलेली तुळशीची पाने घाला. हे कोमट तेल आपल्या बाळाची छाती, पाठ, घसा आणि पायांवर लावा.

. अनुनासिक सलाईन थेंब

बाळाचे नाक साफ करण्यासाठी सलाईन थेंब फार प्रभावी आहेत. तुमच्या मुलाचे डोके मागील बाजूस वाकवून प्रत्येक नाकपुड्यात काही थेंब घाला. तुम्ही घरीही सलाईन थेंब बनवू शकता. ८ ते १० चमचे कोमट आणि फिल्टर केलेले पाणी घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घाला.

१० महिन्यांच्या बाळासाठी

जर आपले बाळ सहा महिने किंवा त्याहून मोठे असेल तर खालील घरगुती उपचार त्याच्यासाठी काम करू शकतात:

. जिरे पाणी

जिरे पाणी बनविण्यासाठी, तुम्हाला फक्त १ ते २ चमचे जिरे आणि एक ग्लास पाणी आवश्यक आहे. पॅनमध्ये दोन्ही साहित्य घाला आणि उकळवा. एकदा पाणी उकळण्यास सुरवात झाली की एका झाकणाने पॅन झाकून ठेवा आणि काही मिनिटे उकळू द्या. काढा थोडा थंड होऊ द्या. तो गाळून घ्या आणि दिवसातून बऱ्याचदा तो बाळाला द्या. लहान मुलांना आणि बाळांना कोरड्या खोकल्यावर उपचार करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी आहे.

. हळद पेस्ट

कोरड्या हळदमध्ये काही थेंब पाणी घालून हळद पेस्ट बनवा. खोकला आणि सर्दीपासून मुक्त होण्यासाठी ही पेस्ट तुमच्या बाळाची छाती , पाय आणि कपाळावर लावा.

. गाजर रस

बाळांच्या खोकला आणि सर्दीवर उपचार करण्यासाठी गाजराचा रस चांगला आहे. ताज्या गाजराचा रस घ्या आणि त्यात थोडे गरम पाणी घाला. आराम मिळण्यासाठी तुमच्या बाळाला गाजराचा रस द्या.

. मोहरी तेल मालिश

मोहरीचे तेल घेऊन पॅनमध्ये गरम करा. त्यात थोडे कांद्याचे बी घाला. या तेलाने आपल्या बाळाची छाती , पाय आणि पाठीची मालिश करा आणि बाळाला आराम मिळण्यासाठी थोडे नाकाच्या खाली सुद्धा लावा.

. वेपोर लावणे

खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी आपण बाळाच्या पायावर थोडे वेपोर चोळा

१०१२ महिन्यांच्या बाळासाठी

जर आपल्या मुलाचे वय १० ते १२ महिने असेल तर कोरड्या खोकल्यासाठी पुढीलपैकी कोणताही उपाय प्रभावी उपाय म्हणून वापरला जाऊ शकतो:

. संक्रमित नारळ तेल

१ सुपारीची कांडी, ३ ते ४ तुळशी (तुळशी) पाने आणि १ पांढरा कांदा घ्या; अर्धा कप नारळ तेलात हे सर्व पदार्थ गरम करा. गॅस बंद झाल्यावर चिमूटभर कापूर घाला. हे तेल आपल्या बाळाच्या छाती, पाठ आणि घश्यावर लावा.

. नारळ व कापूर तेल

नारळ तेल गरम करून झाल्यावर चिमूटभर कापूर घाला. खोकला आणि सर्दी दूर करण्यासाठी बाळाची मालिश करण्यासाठी याचा वापर करा

. द्रवपदार्थाचे सेवन वाढवा

बाळाला अधिक द्रव पिण्यास मदत करा, कारण पुरेसे हायड्रेशन श्लेष्मा कमी होणे थांबवते. कोमट सूप प्यायल्याने घसा खवखवणे आणि तसेच श्लेष्मा कमी होण्यास मदत होते

. काळी मिरी, जिरे आणि गूळ

एक कप पाणी घ्या आणि त्यात एक चिमूटभर जिरे, अर्धा चमचा काळी मिरी आणि १२ चमचे गूळ घाला. या सर्व घटकांना सुमारे १० मिनिटे उकळवा. दिवसातून एकदा आपल्या बाळाला या चमच्याने १२ चमचे द्या.

. भेंडीचे सूप

हे सूप सर्दी आणि खोकल्याच्या लक्षणांशी लढायला मदत करते. काही ताजी भेंडी चिरून घ्या.सुमारे १० मिनिटे पाण्यात उकळवा आणि गाळा. बाळाला सूप म्हणून द्या.

ह्या घरगुती उपचारांनी नक्कीच फायदा होईल. परंतु बाळाची लक्षणे तशीच राहिल्यास वैद्यकीय मदत घ्या.

तुमच्या मुलास आरामदायक ठेवण्यासाठी टिप्स

कोरड्या खोकल्याच्या वेळी खालील टिप्स वापरल्यास आपल्या बाळाला आराम पडू शकतो

  • शांत वातावरण तयार करुन आपल्या बाळाला झोपायला मदत करा.
  • वेदना आणि अस्वस्थता कमी करण्यासाठी बाळ खोकत असताना त्याला पाठीवर चोळा आणि झुलवत रहा.
  • तीव्र कोरड्या खोकल्यामुळे बाळ गुदमरण्याची शक्यता असते, बाळाला जास्त काळ एकटे सोडू नका.
  • डॉक्टरांनी सांगितल्याखेरीज ४ वर्षाखालील मुलांना खोकला आणि सर्दीची औषधे देऊ नका.

योग्य काळजी आणि वैद्यकीय लक्ष देऊन तुम्ही तुमच्या बाळाला कोरड्या खोकल्यापासून बरे होण्यासाठी मदत करू शकता. तुम्ही बाळाच्या डॉक्टरांशी संपर्क साधून ह्या परिस्थितीचा जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कसा सामना करता येईल ते पहा.

आणखी वाचा: बाळांना होणारी सर्दी

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article