Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home मोठी मुले (५-८ वर्षे) शिक्षण लहान मुलांसाठी श्रीगणेशाच्या १० रंजक बोधकथा

लहान मुलांसाठी श्रीगणेशाच्या १० रंजक बोधकथा

लहान मुलांसाठी श्रीगणेशाच्या १० रंजक बोधकथा

हिंदू पौराणिक कथांमधील अनेक देवतांपैकी आपला गणपती बाप्पा सगळ्यांचा लाडका आहे. श्रीगणेशाची मूर्ती देशाच्या जवळजवळ प्रत्येक कोपऱ्यात आहे आणि गणेश चतुर्थी साजरी करताना सर्वांना प्रचंड उत्साह असतो. श्रीगणेश हे नाव दोन शब्दांपासून तयार झाले आहे. “गण” म्हणजे लोकांचा समूह आणि “ईश” म्हणजे देव. त्यामुळे श्रीगणेश हा सर्वांचा प्रिय देव आहे. श्रीगणेशाची अनेक वर्षांपासून पूजा केली जाते आणि श्रीगणेशाच्या कथा खूप लोकप्रिय आहेत.

लहान मुलांसाठी गणपतीच्या मनोरंजक कथा

लहान मुलांना गणपतीची पूजा आणि उपासना ह्यामध्ये फारसा रस नसतो. परंतु तुम्ही त्यांच्यासाठी गणपतीच्या कथा वाचून दाखवू शकता. त्यापैकी काही कथा किती अद्भुत आहेत हे त्यांना कळू द्या.

1. श्रीगणेशाच्या जन्माची कथा

श्रीगणेशाच्या जन्माच्या कथेपासून सुरुवात करूया.

श्रीशंकर आणि देवी पार्वती कैलास पर्वतावर रहात होते. बऱ्याच वेळा श्रीशंकर इतर जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी बाहेर असायचे तर पार्वती डोंगरावर एकटी असायची.

एके दिवशी पार्वतीला आंघोळीला जावे लागले आणि कोणाचाही त्रास होऊ नये म्हणून पार्वतीने हळदीपासून एका मुलाची मूर्ती बनवली आणि त्याच्यात प्राण फुंकले. तिने मुलाचे नाव गणेश ठेवले. श्रीगणेश  तिच्याशी पूर्णपणे एकनिष्ठ होता. तिने आंघोळ करताना त्याला घराचे रक्षण करण्यास सांगितले आणि कोणालाही घरात प्रवेश देऊ नकोस असे सांगितले. तरीही श्रीशंकरांनी घरात प्रवेश केला. मात्र श्रीगणेशाने बाजूला होण्यास नकार देऊन त्यांना थांबवले. हे अज्ञात बालक कोण आहे हे श्रीशंकरांना माहिती नव्हते नव्हते म्हणून श्रीशंकरानी आपल्या सैन्याला त्या बालकाचा वध करण्यास सांगितले. पण गणेशाकडे  पार्वतीने दिलेली शक्ती होती आणि त्याने शिवाच्या सैन्याचा पराभव केला. श्रीशंकरांना राग अनावर झाला आणि त्यांनी गणपतीचा शिरच्छेद केला.

जेव्हा पार्वतीने बाहेर पडून मृत शरीर पाहिले तेव्हा तिच्या संतापाची सीमा राहिली नाही. तिने श्रीशंकरांना  त्यांच्या कृतींचा परिणाम म्हणून संपूर्ण विश्वाचा नाश करण्याची धमकी दिली. आता ब्रम्हा, विष्णू आणि शिव यांच्यावर विश्वाची जबाबदारी होती. ब्रह्मदेवाने पार्वतीचा क्रोध पाहिला आणि शिवाच्या वतीने माफी मागितली आणि तिला विश्वाचा नाश न करण्याचा सल्ला दिला. पार्वतीने गणेशाला पुन्हा जिवंत केले जावे आणि मुख्य देव म्हणून पूजले जावे  ह्या अटी घातल्या. श्रीशंकराना सुद्धा रागाच्या भरात आपण केलेली चूक लक्षात आली आणि त्यांनी पार्वतीची माफी मागितली. त्यांनी आपल्या सैन्याला जंगलात जाण्याचा सल्ला दिला आणि जो कोणी पहिला प्राणी दिसेल त्याचे शीर छाटून आणा असे सांगितले. योगायोगाने, ते एका हत्तीला भेटले आणि त्याचे डोके आणले. हे नंतर शरीरावर ठेवले गेले आणि शिवाने त्याला जिवंत केले आणि त्याला स्वतःचा मुलगा म्हणून स्वीकारले. अशाप्रकारे गणेशाचा जन्म झाला आहे हे आपल्याला माहीत आहे.  आता गणपतीची देवता म्हणून पूजा केली जाते.

बोधकथा

ही कथा गणेश जन्माची आहे. रागामुळे आपल्या जवळच्या आणि प्रियजनांचे नुकसान कसे होऊ शकते आणि आपल्या चुका लवकरात लवकर सुधारणे किती आवश्यक आहे याचा एक महत्त्वाचा धडा ह्या कथेतून घेतला जाऊ शकतो.

2. हरवलेल्या शंखाची कथा

हरवलेल्या शंखाची कथा

ही एक अद्भुत कथा आहे. ह्या कथेमध्ये श्रीविष्णूला सुद्धा श्रीगणेशाची कृत्ये कशी सहन करावी लागली हे सांगितलेले आहे.

श्रीविष्णूकडे एक शंख होता. हा शंख ते नेहमी स्वत:जवळ ठेवत असत. एके दिवशी, शंख हरवला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. शंख कुठेच सापडला नाही. त्यामुळे श्रीविष्णू खूप नाराज झाले आणि त्यांनी शंख शोधण्यात आपली सर्व शक्ती एकवटली.

शंखाचा शोध सुरू असतानाच अचानक श्रीविष्णूंना दुरून शंखाचा आवाज ऐकू येऊ लागला. आवाजाच्या दिशेने ते शंखाचा शोध घेऊ लागले आणि लवकरच तो आवाज कैलास पर्वतावरून येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. डोंगरावर पोहोचताच त्यांना समजले की तो शंख श्रीगणेशाने घेतला आहे आणि श्रीगणेश तो शंख फुंकत आहेत. श्रीगणेश सहजासहजी हार मानणार नाहीत हे जाणून त्यांनी शिवाचा शोध घेतला आणि गणेशाला शंख परत करण्याची विनंती करण्यास सांगितले.

श्रीशंकर म्हणाले की,श्री गणेशाची पूजा करणे हाच त्यांना प्रसन्न करण्याचा एकमेव मार्ग आहे. श्रीविष्णूंनी गणपतीच्या पूजेची सर्व तयारी केली आणि पूजा केली. हे सर्व पाहून श्रीगणेश अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी श्रीविष्णूचा शंख त्यांना परत केला.

बोध: 

या कथेत श्रीगणेश आणि त्याच्या कृत्यांबद्दलची मजेदार बाजू अतिशय मनोरंजकपणे मांडली आहे. शिवाय, श्रीविष्णू सारखी महान देवता श्री गणेशाची उपासना करते. त्यामुळे ह्या कथेतून नम्रता सुद्धा शिकायला मिळते.

3. श्रीशंकराच्या अयशस्वी लढाईची कथा

श्रीशंकराच्या अयशस्वी लढाईची कथा

श्रीशंकर आणि श्रीगणेशाच्या अनेक कथा आहेत. मात्र, ही कथा वडील आणि मुलाच्या नात्याच्या पलीकडे जाऊन एक अतिशय महत्त्वाचा धडा शिकवते.

हत्तीचे शीर जोडून  श्रीशंकरांनी श्रीगणेशामध्ये प्राण फुंकले, तेव्हा श्रीशंकरांनी पार्वतीच्या इच्छेकडे लक्ष दिले. आणि कोणत्याही नवीन गोष्टीस सुरुवात करण्यापूर्वी श्रीगणेशाची पूजा करावी असा नियम केला. मात्र, हा नियम स्वतःलाही लागू पडतो हे श्रीशंकर विसरले.

एकदा, श्रीशंकर राक्षसांशी युद्धासाठी आपले संपूर्ण सैन्य सोबत घेऊन निघाले. पण, लढाईला निघण्याच्या घाईत श्रीगणेशाची पूजा करण्यास विसरले. त्यामुळे रणांगणावर पोहोचण्यापूर्वीच त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. लढाईच्या ठिकाणी जाताना, युद्धगाडीच्या चाकाचे नुकसान झाले. तेव्हा श्रीशंकरांना त्यांची चूक लक्षात आली. युद्धाला सुरुवात करण्यापूर्वी श्रीगणेशाची पूजा करण्यास ते विसरले असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

आपल्या सर्व सैन्याला थांबवून श्रीशंकरांनी तेथे पूजा सुरू केली आणि गणेशाची पूजा करण्याचा विधी पूर्ण केला. गणेशाच्या आशीर्वादाने,श्रीशंकर राक्षसांचा पूर्णपणे पराभव करण्यात यशस्वी झाले.

बोध: 

तुम्ही कोणीही असाल, एकदा तुम्ही नियम तयार केला की, तो सर्वांना सारखाच लागू होतो.

4. गणेशाच्या बुद्धीची कथा

श्रीगणेशाला ज्ञान आणि बुद्धीची देवता का म्हटले जाते ह्याविषयीची एक सुंदर कथा आहे.

गणेशाला कार्तिकेय नावाचा धाकटा भाऊ होता. दोघांचेही एकमेकांशी चांगले जमायचे परंतु इतर भावंडांप्रमाणेच त्यांच्यातही वाद व्हायचे. एके दिवशी, श्रीगणेश आणि कार्तिकेय दोघांना जंगलात एक अनोखे फळ सापडले आणि त्यांनी ते एकाच वेळी घेतले . एकमेकांमध्ये वाटून घेण्यास नकार दिला आणि फळासाठी भांडू लागले.

जेव्हा ते कैलास पर्वतावर पोहोचले आणि त्यांनी ही सगळी परिस्थिती शिव आणि पार्वतीला सांगितली तेव्हा शिवाने एक प्रस्ताव मांडला. त्यांनी हे फळ ओळखले आणि सांगितले की हे फळ जो खाईल त्याला अमरत्व आणि ज्ञान प्राप्त होईल. त्यांनी दोघांना जगाला तीन वेळा प्रदक्षिणा घालण्यास सांगितले. जो सर्वात आधी प्रदक्षिणा पूर्ण करून कैलास पर्वतावर परत येईल त्याला ते फळ मिळेल.

कार्तिकेयने ताबडतोब त्याचे वाहन मोरावर उडी मारली आणि पृथ्वीवर तीन प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी वेगाने उड्डाण केले. गणेश कार्तिकेयच्या तुलनेत थोडासा कणखर होता आणि उडू न शकणारा उंदीर हे श्रीगणेशाचे वाहन होते. शिवाचा प्रस्ताव नीट ऐकून गणेशाने शिव आणि पार्वतीभोवती प्रदक्षिणेला सुरुवात केली आणि त्यांच्याभोवती तीन प्रदक्षिणा पूर्ण केल्या. श्रीशंकरानी गणेशाला ‘तू आमच्याभोवती प्रदक्षिणा का घातल्यास?”  असे विचारले त्यावर श्री गणेशाने उत्तर दिले की तुम्ही मला जगाला प्रदक्षिणा घालायला सांगितलीत परंतु माझ्यासाठी माझे आई वडीलच माझे विश्व आहेत.

गणेशाच्या ह्या उत्तराने श्रीशंकर प्रभावित झाले आणि त्यांनी श्रीगणेशाला ते फळ दिले.

बोध: 

तुमची बुद्धी वापरून एखादी परिस्थिती हुशारीने कशी सोडवता येते याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे ही कथा आहे. तसेच तुम्ही तुमच्या पालकांचा आदर केला पाहिजे आणि त्यांना प्रेम दिले पाहिजे.

5. पार्वतीच्या जखमांची कथा

पार्वतीच्या जखमांची कथा

संपूर्ण जग कसे एकच आहे याचे ही अद्भुत कथा म्हणजे एक उत्तम उदाहरण आहे.

श्रीगणेश हा एक खोडकर मुलगा म्हणून ओळखला जात असे आणि तो अनेक खोडकर कामे करत असे. एकदा, तो खेळत असताना त्याला एक मांजर दिसले आणि तो तिच्याशी मस्ती करू लागला. त्याने मांजरीला उचलून जमिनीवर फेकले, तिची शेपटी ओढली आणि मजा केली.  मांजर वेदनेने विव्हळत होते. श्रीगणेशाच्या हे लक्षात आले नाही . तो खेळत राहिला आणि मग घरी परत आला.

कैलास पर्वतावर पोहोचल्यावर, पार्वती घराबाहेर पडून, अंगभर जखमा आणि वेदनांनी रडत असल्याचे पाहून गणेशाला धक्काच बसला. श्रीगणेश पार्वतीकडे धावत आले आणि तिला विचारले की हे कोणी केले? त्यावर श्रीगणेशानेच असे केल्याचे पार्वतीने सांगितले. मांजर खरे तर पार्वतीचेच एक रूप होते, आणि तिला तिच्या मुलासोबत खेळायचे होते, परंतु गणेश तिच्याशी अन्यायकारक आणि निर्दयीपणे वागले आणि मांजरीसोबत केलेल्या कृती त्याच्या स्वतःच्या आईवर झाल्या.

गणपतीला त्याच्या वागण्याबद्दल पूर्ण पश्चाताप झाला आणि त्याने सर्व प्राण्यांशी सौजन्याने आणि प्रेमाने वागण्याची शपथ घेतली.

बोध:

ही कथा एक अतिशय महत्त्वाचा धडा देते. तो म्हणजे इतरांनी तुमच्याशी जसे वागावे असे तुम्हाला वाटते तसे तुम्ही इतरांशी वागावे आणि यामध्ये प्राण्यांचाही समावेश असतो.

6. कुबेराची गोष्ट

कुबेर हा एक प्रसिद्ध देव होता. संपूर्ण विश्वात सर्वात श्रीमंत असल्याने खूप लोकप्रिय होता. कुबेराकडे संपत्तीचा खजिना होता आणि तो अभिमानाने सर्वस्व स्वतःकडे साठवून ठेवत असे.

एके दिवशी, त्याने शिव आणि पार्वती यांच्यासह अनेक पाहुण्यांना जेवायला बोलावले. पण ते दोघेही जेवायला येऊ शकले नाहीत, म्हणून त्यांनी श्रीगणेशाला आपला प्रतिनिधी म्हणून पाठवले. कुबेराची वागणूक कशी होती हे गणेशाच्या लक्षात आले. त्याने पटपट खाण्यास सुरुवात केली आणि इतर पाहुण्यांसाठी जेमतेम शिल्लक राहिलेले सर्व अन्न संपवले. तरीही त्याची भूक भागली नाही. म्हणून तो कुबेराच्या संपत्ती संग्रहात प्रवेश करून सर्व सोने आणि मौल्यवान वस्तू घेऊन खाऊ लागला. तरीही श्रीगणेश अतृप्त राहिला. मग तो कुबेराला खाण्यासाठी निघाला आणि तो स्वतःच्या रक्षणासाठी कैलास पर्वतावर धावला.

गणेशाच्या कृतीमागचे कारण पाहून शिवाने गणेशाला धान्याची एक वाटी दिली. त्याने ते धान्य खाल्ले आणि लगेच तृप्त झाला. लोभीपणाने संपत्ती गोळा करू नये हे कुबेराला समजले आणि संपत्ती  सर्वांमध्ये वाटून घेण्याचे त्याने मान्य केले.

बोध: 

लोभ आणि अभिमान एखाद्या व्यक्तीसाठी कसा हानिकारक ठरू शकतो आणि प्रत्येकाशी विचारशील असणे असे गरजेचे आहे हे ह्या कथेतून समजते.

7. कावेरीच्या निर्मितीची कथा

कावेरीच्या निर्मितीची कथा

अगस्त्य नावाच्या ऋषींना दक्षिणेकडे राहणाऱ्या लोकांसाठी एक नदी निर्माण करण्याची इच्छा होती. देवांनी त्यांची इच्छा ओळखली आणि त्याला पाणी असलेली एक छोटी वाटी दिली. ह्या वाटीतील पाणी ते जिकडे ओतत असत तिथून नदीचा उगम व्हायचा.  अगस्त्याने कुर्गच्या पर्वतांच्या पलीकडे नदी निर्माण करण्याचे ठरवले आणि तेथून प्रवास करण्यास निघाले. प्रवासात थकल्यामुळे ते विश्रांतीसाठी जागा शोधू लागले. तेवढ्यात त्यांना एक लहान मुलगा दिसला. हा लहान मुलगा एकटा उभा होता. जाताना पाण्याचे भांडे धरून ठेवण्याची विनंती केली आणि स्वत:ला सावरले. तो मुलगा स्वतः गणेश होता. पाण्याचे भांडे कशासाठी आहे हे त्याला ठाऊक होते आणि त्याला समजले की तो ज्या ठिकाणी आहे ते ठिकाण नदीसाठी योग्य आहे, म्हणून त्याने भांडे खाली ठेवले.

अगस्त्य ऋषी परत आले तेव्हा त्यांना  भांडे जमिनीवर आहे असे दिसून आले आणि एक कावळा त्यातून पाणी पिण्याचा प्रयत्न करताना दिसला. त्याने कावळ्याला हाकलून लावले, कावळा उडून जाताना भांड्यातील पाणी जमिनीवर सांडले. यामुळे नदीचा उगम त्या ठिकाणाहून झाला, ह्या नदीला आता कावेरी नदी म्हणतात.

बोध: 

काहीवेळा, सर्व गोष्टी आपल्या इच्छेप्रमाणे होत नाहीत. तरीसुद्धा, जे होते ते चांगल्यासाठीच होते.

8. श्रीगणेशाच्या एका दाताची कथा

ह्याबाबतच्या अनेक कथा आहेत परंतु ही कथा सर्वात छान आहे.

पौराणिक कथांनुसार, महाभारत ही वेद व्यासांची रचना आहे, परंतु ही रचना स्वतः श्री गणेशाने लिहिली आहे. महाभारताची महाकथा लिहून घेण्यासाठी श्री वेद व्यास श्री गणेशाजवळ गेले. श्री व्यासांनी कुठेही न थांबता ही कथा सांगावी आणि त्याच वेळी श्री गणेशांनी ती कथा लिहावी अशी अट होती.

कथा लिहून होत असताना लेखणी तुटली आणि दुसरी लेखणी सुद्धा उपलब्ध नव्हती. वेद व्यास कथा सांगणे थांबवू शकले नाहीत कारण त्यांच्यासाठी आधीच अट ठेवण्यात आली होती. कोणताही वेळ वाया न घालवता, गणेशाने त्वरीत स्वतःचा एक दात तोडून त्याची लेखणी तयार केली. ह्या लेखणीचा वापर करून कुठेही न थांबता हे महाकाव्य लिहिणे सुरू ठेवले. त्यामुळे हे महाकाव्य पवित्र बनू शकले आणि गणेश आणि व्यास यांनी ते एकत्र पूर्ण केले.

बोध: 

एखादे कार्य पूर्ण करण्याचे कबूल केल्यानंतर शिस्त असणे आणि दृढनिश्चय करणे हे किती महत्वाचे आहे हे ह्या कथेतून समजते. महाकाव्य पूर्ण करण्यासाठी वैयक्तिक त्याग देखील आवश्यक असतो.

9. चंद्राच्या शापाची कथा

ही कथा कुबेराच्या भोजनाच्या वेळेची आहे. भरपूर खाल्ल्यानंतर श्रीगणेशाचे पोट खूप मोठे  होऊन दुखू लागते. हे मोठे झालेले पोट घेऊन फिरणे श्रीगणेशा साठी कठीण होते आणि हलताना त्यांचा तोल जाऊन अडखळून ते खाली पडतात. श्री गणेशाची अशी अवस्था पाहून चंद्र हसू लागतो. चंद्राने त्याचा अपमान केल्याचे पाहून श्रीगणेश चंद्राला शाप देऊन अदृश्य होतात. चंद्राला आपली चूक लक्षात येते. चंद्र श्रीगणेशाला माफी मागतो. चंद्राची अविरत क्षमायाचना बघून, दर १५ दिवसांनी चंद्र दिसेल आणि अदृश्य होईल असा निर्णय श्रीगणेश घेतात.

चंद्राला श्रीगणेशाने शाप दिल्याची आणखी एक कथा आहे. एके दिवशी पार्वतीने गणेशाचे आवडते अन्न म्हणजेच मोदक केले. श्रीगणेशाने भरपूर मोदक खाल्ले. त्यानंतर रात्री श्रीगणेश त्यांच्या वाहनावर म्हणजेच मूषकावर बसून निघाले. एवढासा उंदीर श्रीगणेशाचे वजन पेलू शकत नव्हता. अचानक एक साप मध्ये आल्यामुळे उंदीर अडखळला आणि श्री गणेश जमिनीवर आदळून त्यांचे पोट फुटले आणि सर्व मोदक बाहेर पडले.श्री गणेशाने पटकन सर्व अन्न पुन्हा पोटात भरले आणि सापाला पकडून कमरेला बांधले. काही गणेशमूर्तींच्या पोटाभोवती साप का असतो हे देखील या कथेत स्पष्ट झाले आहे. हे पाहून चंद्राला मनापासून हसू आवरले नाही. गणेशाला खूप राग आला आणि त्याने त्याला शाप दिला की, गणेश चतुर्थीच्या दिवशी कोणीही चंद्र पाहू शकणार नाही, पाहिल्यास  त्यांच्यावर काहीतरी चुकीचा आरोप केला जाईल.

बोध: 

दुसऱ्याच्या समस्या किंवा विकृतींवर कधीही हसू नये. हे असभ्य आहे आणि चांगल्या वर्तनाचे लक्षण नाही.

10. गोड खिरीची गोष्ट

गोड खिरीची गोष्ट

एकदा एका हातात तांदूळ आणि दुसऱ्या हातात दूध घेऊन श्रीगणेश लहान मुलाच्या रूपात गावात दाखल झाले. हा लहान मुलगा खीर बनवण्यासाठी मदत मागू लागला पण सगळे व्यस्त होते.

हा लहान मुलगा एका गरीब स्त्रीच्या झोपडीत पोहोचला. ही स्त्री त्याच्यासाठी खीर बनवायला तयार झाली. तिने सर्व जिन्नस एकत्र करून भांडे शिजवायला ठेवताच तिला झोप लागली आणि मुलगा खेळायला गेला. झोपेतून उठल्यावर तिला कळले की खीर शिजली आहे आणि ती अत्यंत स्वादिष्ट आहे.

तिला खूप भूक लागली होती आणि ती स्त्री भूक सहन करू शकत नव्हती. पण खीर खाण्यापूर्वी तिने त्यातील थोडी खीर वाटीमध्ये काढून श्रीगणेशाला नेवैद्य दाखवला आणि नंतर ती खीर खाऊ लागली. तिने कितीही खीर खाली तरी भांडे रिकामे होत नव्हते. जेव्हा मुलगा परत आला तेव्हा त्या स्त्रीने श्रीगणेशाला खिरीचे संपूर्ण भांडे दिले आणि कबूल केले की तिला भूक लागली म्हणून तिने खीर खाल्ली. तिने गणेशमूर्तीला वाटी अर्पण केली तेव्हा मी खीर खाल्ली  असे उत्तर मुलाने दिले. ती स्त्री त्याच्या पाया पडून रडू लागली आणि गणेशाने तिला संपत्ती आणि चांगल्या आरोग्याचा आशीर्वाद दिला.

बोध: 

स्वतःच्या गरजा पूर्ण करण्याआधी देवाची उपासना करा आणि दुसऱ्यांसाठी सुद्धा काहीतरी बाजूला काढून ठेवा

आपल्या मुलांना श्रीगणेशाची कथा सांगून त्यांच्याशी ओळख करून देण्याचा उत्तम मार्ग आहे. विविध पूजाअर्चा आणि विधी घरात नेहमीच होत असतात , परंतु आपल्या हृदयात देव असणे आणि तत्वांचे पालन करणे हे महत्वाचे आहे.

आणखी वाचा:

लहान मुलांसाठी श्रीकृष्णाच्या सर्वोत्तम कथा
लहान मुलांना नैतिकतेचे धडे देणाऱ्या छोट्या प्रेरणादायी भारतीय पौराणिक कथा

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article