Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home अन्य लहान मुलांना होणारा विषाणूंचा संसर्ग

लहान मुलांना होणारा विषाणूंचा संसर्ग

लहान मुलांना होणारा विषाणूंचा संसर्ग

In this Article

मुलांना विषाणूंचा संसर्ग पटकन होतो. अभ्यासाद्वारे असे निदर्शनास आले आहे की, वाढीच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये मुलांना एका वर्षात १२ विषाणूजन्य आजार होतात. एका विषाणूजन्य आजारातून बरे होत असतानाच मुलांना दुसऱ्या विषाणूचा संसर्ग होतो. परंतु, जसजशी मुलांचे वाढ होते तसे ह्या संसर्गाचे प्रमाण कमी होते.

विषाणू हे संसर्गजन्य असतात आणि संपर्क आल्यास ते सहज पसरतात. बरेचसे विषाणू हे हानिकारक नसतात आणि पुरेसा आराम करणे हा त्यासाठी योग्य उपाय आहे. परंतु जर विषाणूजन्य आजार झालेल्या मुलामध्ये ४८ तासात सुधारणा झाली नाही, तर वैद्यकीय सल्ला घ्यावा.

विषाणूंचा संसर्ग म्हणजे काय?

विषाणूंमुळे किंवा सूक्ष्मजंतूंमुळे झालेल्या आजारास विषाणूजन्य आजार म्हणतात. विषाणूंची बेसुमार वाढ झाल्यास त्यामुळे शरीराच्या कुठल्याही भागात संसर्ग होऊ शकतो. सामान्य पेशींवर हल्ला करून, पुन्हा ते विषाणूंच्या वाढीसाठी वापरले जातात.

सर्वसामान्यपणे आढळणारे विषाणूजन्य आजार म्हणजे फ्लू, सर्दी तसेच घशाचा संसर्ग, जुलाब आणि उलट्या इत्यादी होय. विषाणूंमुळे कांजिण्या, इबोला आणि एचआयव्ही सारखे संसर्ग सुद्धा होऊ शकतात

मुलांमधील विषाणूजन्य आजाराची कारणे

लहान मुलांना विषाणूंचा संसर्ग लगेच होतो. हा संसर्ग शाळेमध्ये किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी संसर्ग झालेल्या मुलाच्या सानिध्यात आल्यावर होतो. शिंका, खोकला किंवा अस्वच्छ हात किंवा गळणारे नाक ह्यामार्फत संसर्ग होतो. शौचातून, उलटीतून किंवा कीटकांनी चावल्यावर सुद्धा विषाणू पसरतात. अस्वच्छ पाणी आणि अन्नपदार्थांमार्फत विषाणूंचा संसर्ग पसरू शकतो. हवामानात जेव्हा बदल होतात तेव्हा विषाणूंचा संसर्ग पसरतो. विषाणूंचा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होतो किंवा आईला संसर्ग झाल्यास तो मुलाला होतो.

विषाणूंमुळे होणारे सर्वसामान्य आजार

विषाणूंमुळे होणारे काही सामान्य आजार खालीलप्रमाणे

  • इन्फ्लुएंझा किंवा फ्लू
  • सर्दी
  • ब्रँकिओलिटीस
  • कानाचा संसर्ग
  • टॉन्सिल्स
  • गोवर
  • कांजिण्या
  • हिपॅटायटिस
  • पोलिओ
  • डेंग्यू
  • देवी
  • चामखीळ
  • एपस्टेईन बार विषाणू
  • सिव्हिअर ऍक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम (एसएआरएस)
  • हॅन्ड फूट माऊथ डिसीज

लहान मुलाला विषाणूंचा संसर्ग झाल्याची चिन्हे आणि लक्षणे

कुठल्या विषाणूंचा संसर्ग झाला आहे त्यानुसार लक्षणे वेगवेगळी असतात. लहान मुलांमध्ये सर्वात सामान्यपणे आढळणारी चिन्हे आणि लक्षणे म्हणजे

  • सतत वाहणारे किंवा चोंदलेले नाक
  • घसा दुखणे
  • डोळे लाल होऊन पाणी येणे
  • शिंका किंवा खोकला येणे
  • ताप आणि थंडी वाजून येणे

  • जुलाब आणि उलट्या
  • रॅशेस
  • भूक न लागणे
  • आळस
  • अंगदुखी

निदान

जर विषाणूंचा संसर्गाची लक्षणे काही दिवसानंतर कमी होत नसतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. अशावेळी, डॉक्टर काही रक्ताच्या तपासण्या करण्यास सांगू शकतात, त्यामुळे कुठल्या विषाणूमुळे संसर्ग होतो आहे हे समजेल. आणि त्यानुसार डॉक्टर योग्य ते उपचार करतील.

मुलांना विषाणूंचा संसर्ग झाल्यास त्यावर उपचारपद्धती

विषाणूंच्या संसर्गावर उपचार पद्धती म्हणजे संसर्गाची लक्षणे नियंत्रित करणे होय. जुलाब होत असतील तर डॉक्टर ओआरएस किंवा लोहाच्या गोळ्या घेण्यास सांगू शकतात. ताप आणि वेदना होत असतील तर आयबुप्रोफेन घेण्याचा सल्ला डॉक्टर देतील. जर मुलाला खोकला किंवा सर्दी असेल तर डॉक्टर खोकल्याचे औषध आणि नाकात घालायचे थेम्ब देतील.

परंतु, योग्य लसीकरण देऊन विषाणूंना आळा घालता येतो. प्रतिविषाणू औषधे वापरून सुद्धा त्यावर उपचार करता येतात. परंतु विषाणूजन्य आजारांसाठी सर्वात चांगली उपचारपद्धती म्हणजे चांगली विश्राती घेणे, पुरेसे द्रवपदार्थ घेणे आणि नैसर्गिकरित्या विषाणूंचा संसर्ग घालवणे.

तुमच्या मुलास झालेला विषाणूंचा संसर्ग बरा करण्यासाठी घरगुती उपाय

तुमच्या मुलाला झालेला विषाणूंचा संसर्ग बरा करण्यासाठी काही घरगुती उपचार खालीलप्रमाणे

  • तुमचे मूल भरपूर प्रमाणात द्रवपदार्थ घेत आहे ना ह्याकडे लक्ष द्या. मध्ये मध्ये नियमित पाणी घेतल्यास दुखणाऱ्या घशाला आराम पडतो आणि जुलाब, उलट्या झाल्यास, शरीरातील पाण्याची पातळी कमी होत नाही.
  • तुमच्या मुलाने पुरेशी विश्रांती घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे प्रतिकार प्रणाली विषाणूंचा सामना करू शकते.
  • जर तुमच्या मुलास घनपदार्थ खाण्यास त्रास होत असेल तर सूप, नैसर्गिक फळांचा रस त्याला द्या.
  • चोंदलेले नाक मोकळे होण्यासाठी सलाईन नेझल ड्रॉप्स वापरा. नाक मोकळे झाल्यावर तुमच्या मुलाला अन्नपदार्थ खाणे सोपे जाते.
  • मध आणि आल्याचा रस एकत्र करून दिल्यास त्यास बरे वाटेल
  • मिरपूड आणि मध एकत्र केल्यास खोकल्यापासून आराम मिळेल
  • वाफ दिल्यास किंवा गुळण्या केलास दुखणाऱ्या घशापासून किंवा नाक चोंदले असल्यास त्यापासून थोडी सुटका होईल.
  • खोलीत ह्युमिडीफायर लावल्यास त्याचा उपयोग होईल

मुलांमध्ये विषाणूंचा संसर्ग किती वेळ राहतो?

जरी काही दिवसात बरे वाटले तरी लहान मुलामध्ये विषाणूंचा संसर्ग दोन आठवड्यांपर्यंत राहू शकतो. विषाणूंचा संसर्ग झाल्यानंतर त्याची लक्षणे दिसेपर्यंत मध्ये काही काळ जातो. काही काळ खोकला येऊ शकतो. विषाणूंचा संसर्ग झाल्यामुळे रॅशेस होतात आणि काही दिवसातच ते नाहीसे होतात.

लहान मुलाला विषाणू झाल्यास काय अपेक्षित आहे?

तुमच्या मुलाला विषाणूंचा संसर्ग झाल्यावर खालील गोष्टी अपेक्षित आहेत

  • जर तुमच्या मुलाला खोकला झाला तर, तो दोन आठवडे राहतो
  • जर तुमच्या मुलाला बालदमा असेल तर विषाणूंच्या संसर्गामुळे दमा वाढू शकतो
  • काही वेळा,मुलांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो आणि घरघर होऊ शकते
  • काहीवेळा, मुलांना रॅशेस होतात आणि त्यामुळे खाज सुटते
  • विषाणूंचा संसर्ग झालेल्या मुलास भूक लागत नाही

ह्या धोकादायक लक्षणांवर लक्ष ठेवा

सामान्यपणे, विषाणूजन्य आजार म्हणजे काही काळजी करण्याचे कारण नसते, परंतु काहीवेळा त्यामुळे गंभीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते. म्हणून जर तुमच्या मुलामध्ये खालील लक्षणे आढळली तर तुमच्या डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधा.

  • खूप आठवडे खोकला येत राहणे
  • जास्त प्रमाणात जुलाब
  • काही दिवस ताप
  • फिट
  • बरेच दिवस भूक मंदावणे
  • शौचामध्ये रक्त
  • खूप जास्त उलट्या होणे
  • हातापायांना सूज येणे
  • श्वसनास त्रास
  • खूप जास्त सुस्तपणा

तुमच्या मुलाचे शरीर विषाणूंचा सामना कसा करते ?

चांगली प्रतिकार प्रणाली असलेल्या मुलाचे शरीर यशस्वीरीत्या विषाणूंचा सामना करते. चांगल्या प्रतिकार प्रणालीमुळे विषाणूंचा शरीरात सहजासहजी प्रवेश होत नाही. शरीरात प्रवेश केलेल्या विषाणूंचा शरीरातील पांढऱ्या पेशी शोध घेतात आणि त्यांना नष्ट करतात. लहान मुलाची प्रतिकार प्रणाली प्रतिपिंडे तयार करते. ही प्रतिपिंडे शरीरातील विषाणूंना ओळखून त्यांना नष्ट करतात आणि संसर्गाला आळा घालतात.

तुमच्या मुलाला विषाणूंचा संसर्ग होऊ नये म्हणून त्यास प्रतिबंध कसा कराल?

तुमच्या मुलाला विषाणूंचा संसर्ग होऊ नये म्हणून तुम्ही खालील गोष्टी करू शकता

  • तुमच्या मुलाचे लसीकरण नीट झाले आहे कि नाही ते पहा
  • जर तुमच्या कुटुंबातील सदस्याला विषाणूंचा संसर्ग झाला असेल तर त्यांच्याशी तुमच्या मुलाचा संपर्क येणार नाही ह्याची काळजी घ्या
  • घरात स्वच्छतेच्या सवयी पाळल्या तर त्याचा उपयोग होतो म्हणजेच शिंकताना किंवा खोकताना टिश्यूचा वापर करणे किंवा साबणाने हात स्वच्छ धुणे आणि इतर बऱ्याच सवयी. त्यामुळे जंतूंचा संसर्ग होत नाही
  • हवामानात बदल झाल्यास विषाणूंचा संसर्ग वाढतो. म्हणून, ह्या काळात तुम्ही जास्त काळजी घेतली पाहिजे.
  • तुमच्या मुलाला पोषक आणि संतुलित आहार घेण्यास सांगा म्हणजे त्याची प्रतिकार शक्ती वाढेल.

तुमच्या मुलाला विषाणूंचा संसर्ग झाल्यावर त्याला मदत करण्यासाठी काही टिप्स

तुमच्या मुलाला विषाणूंचा संसर्ग झाल्यावर त्याला मदत करण्यासाठी काही टिप्स खालीलप्रमाणे

  • तुमच्या मुलाला भरपूर प्रमाणात द्रवपदार्थ देऊन सजलीत ठेवा. जर तुमच्या मुलाला खूप जास्त जुलाब झाले तर तुमचे डॉक्टर त्यास ओआरएस (ओरल रेहायड्रेशन सॉल्ट्स) देण्याचा सल्ला देऊ शकतात
  • जर तुमच्या मुलाला खूप ताप आला असेल तर त्यास बरे वाटावे म्हणून त्याचे शरीर पाण्याने पुसून घ्या
  • तुमच्या मुलाला वरण, सूप किंवा पचनास हलके पदार्थ जसे की खिचडी, लापशी किंवा उकडलेल्या भाज्या खाणे सोपे जाईल
  • तुमचे मूल शक्य तितकी जास्त विश्रांती घेत आहे ना ह्याची काळजी घ्या. जितकी जास्त विश्रांती तुमचे मूल घेईल तितके त्यास बरे वाटेल
  • तुमच्या मुलाला वेगळ्या खोलीत ठेवा जेणेकरून कुटुंबातील इतर सदस्यांना संसर्ग होणार नाही. तसेच त्याचे टॉवेल सुद्धा वेगळे ठेवा
  • संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी तुमच्या मुलाची काळजी घेताना तुम्ही तुमचे हात नीट स्वच्छ धुवू शकता
  • घराची दारे खिडक्या उघडून हवा खेळती ठेवा त्यामुळे ताजी हवा आत आल्यामुळे विषाणू नाहीसे होतील आणि संसर्ग पसरणार नाही.

विषाणू आणि जिवाणूंच्या संसर्गातील फरक

विषाणूजन्य आजार विषाणूंमुळे होतात आणि जिवाणूजन्य आजार हे जिवाणूंमुळे होतात. जिवाणूंमुळे होणारे आजार प्रतिजैविके देऊन बरे केले जातात. ज्या जिवाणूंमुळे संसर्ग होतो त्यांना प्रतिजैविके नष्ट करतात. तथापि, टॉडलर्स मध्ये संसर्ग बरा करण्यासाठी प्रतिजैविके तितकीशी परिणामकारक नसतात. जिवाणूंचा संसर्ग झाल्यावर शरीराच्या वेगवेगळ्या भागात सूज येणे, वेदना होणे आणि त्वचा लाल होणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. म्हणून, जर तुमच्या मुलाला घसा दुखीचा त्रास होत असेल तर त्याला घशामध्ये वेदना होऊ शकतात. तसेच, बाळांना जर विषाणूंचा संसर्ग झाला तर तो शरीराच्या बहुतांश भागांमध्ये पसरतो. लहान मुलांना जर विषाणूंचा संसर्ग झाला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा नाही तर न्यूमोनिया सारखी समस्या उद्भवू शकते.

तुमच्या मुलाला विषाणूंचा संसर्ग होऊ नये म्हणून त्याचे संरक्षण करणे अवघड जाऊ शकते. परंतु विषाणूंचा संसर्ग होण्याची शक्यता कमी व्हावी म्हणून तुम्ही तुमच्या मुलाची प्रतिकार प्रणाली मजबूत करण्यासाठी प्रयत्न करू शकता. संतुलित आहार तुमच्या मुलाला दिल्यास तुमचे मूल विषाणूंच्या संसर्गाला प्रभावी प्रतिकार करू शकते.

आणखी वाचा:

लहान मुलांच्या तापासाठी १४ सर्वोत्तम घरगुती उपाय
बाळांच्या सर्दी-खोकल्यादरम्यान आवर्जून खाल्ले पाहिजेत आणि टाळायला हवेत असे अन्न-पदार्थ

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article